नावात काय आहे?

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25

खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?

olakhu%20anande%20-%20new.jpg

पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निषेध नको हह. काही लोकांना बेदाणे आवडतात पण काहींना सहन होत नाहीत त्याचा विचार करून सर्वांना खुश करत आहेत संयोजक.

(काही लाडवांवर बेदाणे आहेत काहींवर नाहीये याचाही निषेध करावा का? डोळा मारा )
<<
ओ एच्चेच!
बेदाणे = किस मिस. (kiss miss नव्हे. मनुकांसारखी असतात नं ती वाळलेली द्राक्षं)
हितं काजूच्या खापा दिसताहेत?

(की लहाणपणापासून बेदाणे म्हन्जे किस्मिस सांगून फशिव्लंय मला?)

संयोजक नक्की कोणते उत्तर बरोबर आहे ?मी भ्रमत आहासी वाया, की 'मी माणूस शोधोतोय'. मी व प्राचीने दोन उत्तरं दिली होती.

अरेरे, संयोजक मी नाव ठीक करायलाच येत होते.

बक्षीसाबद्दल धन्यवाद. मी ते स्वाती आणि संपदाबरोबर वाटून खाते Happy

don dhruv : v. s. khandekar
दोन ध्रुव - वि. स. खांडेकर

हायला हो की लोला. आधीच बघायला हवं होतं. किमान अर्धा तास तरी वाचला असता.
मी आपली नक्षत्रांची मराठी नावांची यादी घेऊन गूगल ईमेजमध्ये एकेक शोधत बसलो. विशाखा सोळावं होतं.

ओ संयोजक, बघा अश्याने आमच्या मेहनतीचं क्रेडीट जातं बरं का.

असल्या भिन्न चित्रांचा संबंध लाऊन इतक्या लवकर ओळखणारे सर्वजण नक्कीच सी.आय.ए., मोसाद, रॉ वगैरेंचे छुपे एजंट असावेत अशी भावना वाढीस लागत आहे आणि देव 'बुद्धी' वाटत असताना फिरायला गेल्याचा पश्चातापही. >> अनुमोदन अमेय .. Lol

Pages