नावात काय आहे?

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25

खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?

olakhu%20anande%20-%20new.jpg

पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो, आता आहे डबल धमाका! आम्ही देतोय एकापाठोपाठ एक दोन कोडी. एक सोडवलंत की पुढचं आपसूक सुटेलच. तर आहात ना?
हे पहिलं -
book1.jpg

त्रिवेणी - गुलजार

संयोजक, पुलंच्या पुस्तकाचं नाव 'असामी असामी' नसून 'असा मी असामी' आहे. Happy

तुम्ही सरळ बघताय, 'संक्षिप्त' रुपात बघा बरं.

चिनूक्स, चमन - अचूक नावाशिवाय बक्षीस देता येणार नाही.
धन्यवाद स्वाती_आंबोळे.

कृपया पामरांसाठी कोणी समजावून सांगेल काय? खाऊन झाले असेल तर.
अरे आहे काय? उद्या दोन टिंबे दाखवून 'अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम' आहे म्हणाल.

अमेय, त्याआधी तुम्ही "ओबामा" चं काय लॉजिक आहे ते सांगा Happy
बाकी वरची दोन्ही कोडी मायबोली युजर्स शी संबंधित आहेत (युजर नं. दिलाय ना संयोजकांनी)

संयोजक, ते मिरर ईमेजवरून 'असा मी असामी' कळलं. पण दुसरं जास्तच ओढून ताणून वाटलं.
चित्रांचा अर्थ आणि परस्परसंबंध कळल्यानंतर जी काय मजा वाटते ती अशी अद्याक्षरं जुळवून आणि ओ ला ठो जोडून वगैरे ऊत्तरं मिळवण्यात नाही वाटत.

*हे माझं वैयक्तिक मत.

संयोजकांनी दिशाभूल केली. दुसरं कोडं नोड नंबर आहे असं वाटलं मला. सदस्यत्वाचा संदर्भ नसल्याने.

दुसरं कोडं कालनिरपेक्ष नव्हतं. ज्यांना मैत्रेयीचा जुना आयडी माहित आहे त्यांनाच ते कळलं. संयोजक, सगळ्यानिरपेक्ष कोडी घाला बरं.

>>ज्यांना मैत्रेयीचा जुना आयडी माहित आहे त्यांनाच ते कळलं.
मामी, असे नंबरानं आयडी लक्षात ठेवता आले असते तर गुंत्याची सगळी बक्षिसं घेतली नस्ती?! Proud फक्त स्वतःच्या प्रोफाइलमधे जाऊन, यूजरनंबर ३१ करा. क. ध. सं. तो मैचा निघाला.

Pages