नावात काय आहे?

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25

खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?

olakhu%20anande%20-%20new.jpg

पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी उपक्रम संयोजक ! माबोकरांच्या कल्पना शक्तीला सलाम .
लिप्स्टिक , स्पा , भारी आहेत बक्षिसं , संयोजक काळजी पुर्वक आयडी बघुन बक्षीस द्या बरं , नाहीतर मेल आयडीला फिमेल आयडीचं बक्षीस द्याल . Proud

हायला, बक्षीस म्हणून लिष्टिप!!! लै भारी.

लिंगनिरपेक्ष बक्षीसं द्या. >>> Lol लोला. लिंगनिरपेक्षतेनं सर्वांनी लावून घ्या. हाकानाका. Proud

लोकहो, तुम्ही धरलेला रस्ता बरोबर आहे, पण त्या पाटीवर काहीतरी महत्त्वाचं लिहिलेलं असतं. ते काय ते शोधा बरं. नाहीतर अजून एक क्लू येतोच आहे थोड्या वेळात.

मामी, उदयन - जवळ आहात.

Untitled_2.png

तुम्ही खरंच पुस्तकाचं मुखपृष्ठ बघत असाल तर आम्ही तेच आणलंय. Happy

-

Pages