नावात काय आहे?

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25

खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?

olakhu%20anande%20-%20new.jpg

पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक तरी बक्षीस मिळालं. Happy पण या बक्षीसावर हक्क मात्र प्राचीचाच. कारण तिने लेखिका ओळखल्यावर काहीह्च कठीण नव्हतं. पण या पुस्तकांचा चित्रांशी संबंध कसा ते अजून नीट लक्षात आले नाही.

संयोजक हसु का रडु एवढेच सांगा ?
ते केतकरवहीनीसारखं कोडं द्या.
तुमचा अत्यंत दुर्बोध फालतुपणा चालु आहे स्पष्ट सांगतोय, राग नको.

मी मॉनेस्ट्री आणि चार्ल्स मिंग्जच्या अल्बमच्या नावावरून 'संत' ओळखले. फुलांच्या लोलकांवरून 'झुंबर'पण त्या हेक्साडेसिमल नंबर्सचा संबंध कळला नाही. Uhoh

दुसर्‍या चित्रात नर्तकीचे चित्र आणि 'आवाज' क्लू यावरून 'घुंगुरवाळा' ओळखले. त्यातही १ल्या चित्राचा संबंध कळला नाही. Sad

झुंबर -
पहिलं चित्र - नामग्याल सेमो मोनास्ट्री
दुसरं - बहावा / अमलताश
मोनास्ट्री - साधूंचे वास्तव्य. संताचे घर अशा अर्थाने इथे. प्रकाश संतांच्या घराचे नाव 'अमलताश' आहे.

तिसरे चित्र - चार्ल्स मिंगझ
त्याखाली - हेक्स केलेले शब्द ज्याचे मूळ आहे Year 1977.
मिंगझचा अल्बम His final work प्रसिध्द झाला १९७७ ला. प्रकाश संताचे शेवटचे पुस्तक झुंबर.

मोनास्ट्रीखाली एक हेक्स शब्दसमूह आहे, ज्याचा मूळ शब्द आहे candelabrum. लॅटिनमधून झुंबरासाठी आलेला हा शब्द.

कोपर्‍यात को-ऑर्डिनेट्स आहेत जे कर्‍हाड दर्शवतात.हे प्रकाश संताचे गाव.

Monestry varun monk mhanun sant donho chitra nigadit mhanun lekhakanmadhe common sometbi.g + relted music varun nad

घुंगुरवाळा -
पहिलं चित्र - अलेक्झांड्रिआ शहर
दुसरं चित्र - अलेक्झांड्रिआच्या म्यूझिअममधला नर्तिकेचा पुतळा
तिसरं चित्र - वाला या बेटाचे को-ऑर्डिनेट्स
खालचे आकडे - खोलखाल या अरबी शब्दाचे हेक्स रुप.

अलेक्झांड्रिआ शहरातल्या बायका ज्या प्रकारचे पैंजण घालत त्यांना खोलखाल म्हटले जाई. नर्तिकेने घातलेले पैंजण = घुंगरु.

लोकहो, हे इंदिरा संतांचे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्ताने शेवटचे कोडे त्यांच्या पुस्तकावरुन घेण्याचा मानस होता.

संयोजक, खेळ लई भारी होता. सोडवायला मजा आली. तुम्हांला मनःपूर्वक धन्यवाद.
(पुढच्या मभादिपर्यंतही हा खेळ सुरू राहिला असता तरी हरकत नव्हती. :फिदी:)

Pages