नावात काय आहे?

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25

खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?

olakhu%20anande%20-%20new.jpg

पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्ट्रांड रसेल विथ देशी फिलॉसॉफी - बब्रुवान रुद्रकंठावार.

चित्रांवरूनचे क्लू:
ब्रिटिश झेंडा, नोबेल, बाजूला पुस्तके म्हणजे नोबेल इन लिटरेचर.
त्यावरून शोधले ब्रिटिश नोबेल विजेते. चर्चिल, किपलिंग, रसेल वगैरे. गीता आणि ऋग्वेदाची सुरुवात म्हणजे भारतीय धर्मग्रंथ वा तत्त्वज्ञान. (फिलॉसॉफी.)

मग टण्याने टाकलेले परीक्षण आठवले. Happy

कविन हेच लिहीणार होतो आणि मला वाटते हे बरोबर आहे कारण ६ फीट मनोरमा चित्रपटात सारीका पण आहे! (सचीन-सारीका वाली सारीका! :))

बरोबर उत्तर आहे -
निरगाठी आणि चंद्रिके ग सारिके ग
लेखिका:गौरी देशपांडे

पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.

सहीच Happy

एकाच पुस्तकाचं नाव आहे का ? मला तीन वाटली.

शाळा
गोष्ट मेंढा गावाची ( 'आमच्या गावी आम्हीच सरकार' अर्थात राजाची सत्ता झुगारुन दिलेल्या गावाची गोष्ट, जंगलाचा स्वामित्व हक्क मिळवणे - सिंह- जंगलचा राजा )
समुद्र / समुद्रापारचे समाज ( सगळ्या पुस्तकांचे लेखक मिलिंद बोकील )

Pages