मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुसाफिर वाचले - थोडे रिपीट वाटले - कदाचित गोडबोलेंचे बाकीचे लिखाण वाचले असल्यामुळे असेल. मनात मात्र आवडले

Karna's Wife प्रतिमा काणेचे हे पुस्तक फारच रटाळ वाटले. मृत्युंजयचा कर्ण अगदी खोल आहे मनात म्हणूनही असेल. माझ्या अमराठी मैत्रीणीना हे पुस्तक फार आवडले होते.

चार नगरातले माझे विश्व - जयंत नारळीकरांचे आत्मचरित्र - खूप साध्या सोप्या भाषेत लिहिलेले पुस्तक. आवडले.

नुकतेच संपवलेले प्रकाशवाटा - बाबा आमटेंचे काम माहित असूनही पुस्तक वाचताना पुन्हा त्या सर्व निर्माण प्रक्रिया डोळ्यासमोरून जातात. हे ही अतिशय साधेपणाने लिहिलेले पुस्तक.

Karen ARmstrong ची या विषयावरची पुस्तके खूप छान आहेत >> त्यांचेच "THE BATTLE FOR GOD : FUNDAMENTALISM IN JUDAISM, CHRISTIANITY, AND ISLAM" हे पण अतिशय सुंदर पुस्तक आहे. तिन्ही धर्मातील fundamentalism मधील विसंगती नि साम्य ह्यात भाष्य करत fundamentalism हा कसा monolithic (एक जिनसी ?) नसून त्याला स्वतःच्या अर्थाचे कसे प्रस्तर आहेत हे दाखवत जाते.

नुकतेच लमाण वाचले. डॉ. श्रीराम लागूंनी त्यांच्या नाट्यकारकिर्दीचा घेतलेला आढावा भावला.
नाटकाच्या वेडातून घडलेली कारकीर्द, आलेले अनोखे अनुभव (आफ्रिकेत नाटक करायला मिळणे), नटसम्राटाचा प्रवास, सिनेमातील कारकीर्द या सगळया गोष्टी उत्तमरित्या दिल्यात.

गॅब्रिएल गार्सिया मार्केज ला श्रद्धांजलीच्या निमित्ताने आवर्जून वाचावा असा दुवा देतेय

त्याच्या 'क्रॉनिकल ऑफ अ डेथ फोरटोल्ड' कादंबरीचे सलमान रश्दीने लिहिलेले परीक्षण

दोन दिवसांपूर्वी मामी कडे गेले होते तेव्हा गिरीश कर्नाड चा आत्मचरित्र बर्यापैकी वाचून काढाल . त्याच लहानपण थोडस वेगळच गेल. विधवा आई आणि विवाहित वडील पाच वर्ष लग्न न करता एकत्र राहत होते १९२० काळाच्या सुमारास . त्यामुळे त्याचं लहान पण बर्याच प्रश्नाच्या भेंडोळ्यात सापडलं अस त्याचं म्हणण. त्यातली बरीच उत्तर त्यांना माहित नव्हती . अगदी लहानपणी i. पण लोक बरेच प्रश्न विचारायचे. काही बाही सांगायचे इत्यादी इत्यादी. काहीतरी वेगळच वाटल वाचायला. त्यांनी स्वत पण वयाच्या ४२ व्या वर्षी लग्न केल माझ्या मते. ते सुद्धा बरेच वर्ष ठरवून ठेऊन ( १६ वर्ष वगैरे.) हेमामालिनी च्या आईला मात्र त्याचं लग्न हेमाशीच लावायचं होत . पण त्यांनी नम्र पणे नकार दिला आणि आपल लग्न ठरलं आहे अस सांगितलं Happy

एक इंटरेस्टींग पुस्तक वाचलं. 'स्मृतितील शांतिनिकेतन'.
अमृतलाल वेगड या गुजराती भाषिक ज्येष्ठ साहित्यिक-चित्रकाराने शांतिनिकेतनात १९४८ ते १९५३ या कालावधीत शिक्षण घेतानाचा काळ यात वर्णन केला आहे.
अमृतलाल शांतिनिकेतनात होते तेव्हा गुरुदेव रविन्द्रनाथ नव्हते. ते जाऊन सहा-सात वर्ष झाली होती. पण त्यांची दाट छाया शांतिनिकेतनात सर्वत्र होती. मनोहर वातावरण होतं त्यावेळच्या शांतिनिकेतनात. अमृतलालना गुरु लाभले ते नंदलाल बसु, बिनोद बिहारी मुखर्जी, रामकिंकर बैज, विनायक मसोजींसारखे एकाहुन एक महान कलावंत.
अमृतलाल आपल्या या गुरुंबद्दल भरभरुन लिहितात. त्यांची व्यक्तिचित्रणं ते सहजतेनं, आपल्या जवळच्या माणसाची ओळख करुन द्यावी तशी करतात.
प्रत्येकाची चित्रशैली, शांतिनिकेतनात ते कसे, का आले, विद्यार्थ्यांसमवेतचं त्यांचं वागणं, त्यांचं वैयक्तिक आयुष्य, प्रेमप्रकरणे, शैक्षणिक सहली याबद्दल वाचताना रमायला होतं. त्यांची शैलीही नर्म विनोदी, प्रसन्न. त्यामुळे बंगाल स्कूलच्या या महान चित्रकारांची एक वेगळीच ओळख होत जाते जी एरवी कलेचा इतिहास शिकतानाही होऊ शकली नाही.
शांतिनेकतनात या प्रत्येक कलावंताने घडवलेला आपल्या कलेचा आविष्कार, तिथली ती नंतरच्या काळात अजरामर झालेली म्यूरल्स, फ्रेस्को, शिल्प प्रत्यक्ष घडत असताना अमृतलाल साक्षिदार होते. त्या सगळ्या आठवणी उतरल्याही आहेत खूप छान.
सर्वात मोहात पडून जातं शांतिनिकेतनातलं ते साठ-सत्तर वर्षांपूर्वीचं वातावरण. तिथले ते सगळे उत्सव, वृक्षप्रेम, पलाश-पारिजातकाची फ़ुलं, संथालबस्तीत जाऊन केलेली कलासाधना, गाणी, नृत्य-नाटिका, निसर्गसहवास..
अहाहा.. काश आपल्याला ही संधी मिळाली असती, त्या काळातल्या शांतिनिकेतनात शिकण्याची तर? अशी हळहळ वाटत रहाते.

आय मॅरिड अ कम्युनिस्ट - फिलिप रॉथ

एकाच लेखकाची एकामागोमाग एक पुस्तकं मी वाचू शकत नाही, काही अपवाद, रादर मी एकाच जॉनरची सलग दोन पुस्तकं वाचत नाही, हिस्ट्रीचे एक पुस्तक, मग फिक्शन आणि मग परत हिस्ट्री असा माझा प्रवास चालू असतो, पण फिलिप रॉथचे अमेरिकन पॅस्टोरल संपवल्यावर मला त्या ट्रिलॉजी मधील दुसरे पुस्तक लगेच वाचावे वाटले. आणि देअर कम्स, आय मॅरिड अ कम्युनिस्ट.

पुस्तकातील मुख्य पात्र आयरा (Ira*) रिनगोल्ड आहे, पण हे पुस्तक आपल्या नेथन सांगत असतो. नेथनचा आयकॉन आयरा रिनगोल्ड आहे. आयराची पत्नी ही आणखी एक मुख्य पात्र. ही कथा आयराची, आणि तो कम्युनिस्ट असतो. त्या भाऊ मरे. त्यालाही कम्युनिस्ट फॅमिली मेंबरची झळ बसते. मरे कॅरेक्टर पण खूप गोड आहे. पुस्तकाची सुरूवातच "I ran into Murray, now ninety years old but in every discernible way still the teacher whose task is realistically, without self-parody or inflating dramatics, to personify for his students the maverick dictum ‘I don’t give a good goddamn,’ to teach them that you don’t have to be Al Capone to transgress--you just have to think" अशी सुंदर आहे. नोटस फ्रॉम अंडरग्राउंड ह्या पुस्तकामधील सुरूवातीची लाईन जी प्रभाव करून जाते, तसाच प्रभाव 'teach them that you don’t have to be Al Capone to transgress--you just have to think" ही लाईन करून जाते. किंवा मग underestimates how mankind mangles its noblest ideas and turns them into tragic farce” अश्या अनेक ओळी ज्या पुस्तक वाचता वाचता, आपल्याला कुठे तरी हेलावून सोडतात.

कथा लिहितानाचा बॅकड्रॉप म्हणजे अमेरिकेतन लोकांचा कम्युनिझमप्रति असलेला तिटकारा आणि एकुणच प्रचंड राग. मग त्यातून खुद्द सरकार कसे कम्युनिस्ट लोकांना व्यवस्थित त्रास देत होते तिथपासून ते तो कम्युनिस्ट असल्यामुळे त्याच्या फॅमिलीवर होणारे परिणाम हे सर्व पुस्तकात येतं.

खरेतर २००९-१० मधील ओबामा इज सोशॅलिस्ट टिका अमेरिकेत राहणार्‍यांना चांगलीच आठवत असेल, जर २००९ मध्ये हे वातावरण असेल तर इमॅजिन करा की १९४०-५०-६० मध्ये कसे असेल. आज जसे नक्षलवादी पोलिसांना मारतात, तसे टिपून टिपून अमेरिकन सरकार कम्युनिस्ट लोकांना हतबल करी, त्यांचे अपघाती मरण होई, हे सर्व त्या पुस्तकात विविध घटनांमधून प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरित्या पुढे येतं असतं.

मी कम्युनिस्ट नाही, कधीही होऊ शकणार नाही कारण रक्तरंजीत क्रांती ही क्रांती वगैरे असते ह्यावर माझा पर्सनली विश्वास नाही, पण तरीही मला स्वतःला एक वाचक म्हणून कम्युनिझम आणि कम्युनिस्ट कडे पाहण्याची एक वेगळी दिशा ह्या पुस्तकामुळे मिळाली.

फिलिप रॉथ हा एक सिद्धहस्त लेखक आहे हे अनेकांचे म्हणणे आहे, पण जो पर्यंत आपण अनुभवत नाही तो पर्यंत अनुभूती येत नाही, त्या दोन्ही पुस्तकांनी मला तो अजून आवडायला लागला आहे. आता पुढची वाचेन म्हणतो.

* रशिया मध्ये IRA हे मुलीचे नाव असते. त्याला इरा आणि आयरा असे दोन्हीही म्हणता येते.

केदार, पुस्तक परिचय आवडला, वाचेन कधी नाही सांगता येणार.

शर्मिला, थँक्स, पुस्तक खुप छान वाटतंय. तु अनुवाद वाचलास का? कुणी केलाय?
बंगाल आणि शांतीनिकेतन हे फॉरेव्हर आकर्षणाचे, अगदी मनात फतकल मारून बसलेले विषय आहेत. त्यामुळे इतकं सुंदर वर्णन असेल तर वाचायलाच पाहिजे.
मी आणि इथलीच एक घट्ट मैत्रिण दोघी मिळून शांतीनिकेतनला जाणार होतो.. काही सुखद घडामोडींमुळे ते तेव्हा जमलं नाही, आता बघू कधी योग येतोय तो!

जाई, का नाही आवडलं गं स्मॄतीचित्रे? वाचायला घेताना काही ग्रह होते का मनात त्यामुळे निराशा झाली? मी ब-याचदा ते असंच हातात घेते आणि कुठूनही कुठेहीपर्यंत वाचते, मूड बदलतो मग. म्हणुन का आवडलं नाही याबद्दल उत्सुकता वाटली.

धन्यवाद केदार, पुपबद्दल! वाचेन की नाही ते सांगता येत नाही मला. मात्र अमेरिकी कम्युनिस्ट चळवळीबद्दल अधिक माहिती निश्चित जाणून घेईन म्हणतो! Happy

आ.न.,
-गा.पै.

शर्मिला फडके, पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल आभारी आहे. मला स्वत:ला कलेची फारशी जाण नाही. मात्र कलाकार कसा घडतो व त्याची प्रतिभा कसकशी कार्य करते याचं कुतूहल आहे. प्रस्तुत पुस्तकातून काही प्रमाणात शमेल असं वाटतं.
आ.न.,
-गा.पै.

शर्मिला, सुरेख पुस्तक परिचय. मराठीत कुणी अनुवाद केलाय? कुठे मिळेल ते पुस्तक?

<<तिथले ते सगळे उत्सव, वृक्षप्रेम, पलाश-पारिजातकाची फ़ुलं, संथालबस्तीत जाऊन केलेली कलासाधना, गाणी, नृत्य-नाटिका, निसर्गसहवास..>> या सगळ्याचं आता 'ओ' येईल इतकं क्लिशेड रिच्युअल झालेलं आहे Proud

केदार, सुरेख लिहिलंयस. Happy
तुला ते पुस्तक किती आवडलंय हे तुझ्या शब्दांतून कळून येतंय. ट्रिलजी वाचून झाल्यावर एक मोठा लेख लिही ही आग्रहवजा विनंती.

शर्मिला, केदार छान लिहिलंत.

गेल्या काही महिन्यापासून का कोण जाणे पण जड जड शब्द आणि मोठी काँप्लेक्स वाक्ये लिहिलेलं लिखाण वाचायला नको वाटतं. वर लिंकमधून दिलेल्या रश्दी यांच्या लेखाचं उदाहरण देतो. पहिल्या सुंदर परिच्छेदानंतर गॅब्रिएल यांच्या आजीचा उल्लेख येईपर्यंतचे लिखाण अति शब्दरंजित वाटले. त्यामुळे थकवा येऊन लेखाचा खरा परिपाक असलेला पुढचा उत्कृष्ट भाग कदाचित सोडून दिला गेला असता.

त्यामुळे फिल रॉथ वाचायचा धीर करायला हवा पण या परिचयामुळे मदत मिळावी.
केदार तुम्ही वाचनातील बदलाबद्दल जे लिहिलंय ते खरे आहे अगदी. जॉनर बरोबरच लेखकही मुद्दामून बदलायला हवा. मध्यंतरी ओरहान पामुकच्या दोन रचना सलग वाचल्या. इतका वाचनशीण आला म्हणता.

केदार छानच परिचय करुन दिलास. धन्यवाद. बरंच ऐकलं होतं या पुस्तकाबद्दल.

स्मृतितील शांतिनिकेतन हे अमृतलाल वेगड यांचे मूळ पुस्तक गुजराती भाषेत आहे. मी वाचला तो मराठीमधला अनुवाद. तो केला आहे मिनल कुमुदचंद्र फ़डणीस यांनी. विद्या प्रकाशनाचं पुस्तक आहे.

वरदा हो. हिंदुस्तान टाइम्समधे यावर एक कव्हर स्टोरी आली होती. उत्सवप्रेमी लोक शांतिनिकेतनातल्या पलाश वृक्षांची फुलं तोडून, माळा बनवून त्या वृक्षांची, निसर्गाची किती वाट लावून टाकत आहेत गेली काही वर्ष. हे सर्वत्रच आहे. उत्सवांचा, मग तो निसर्गप्रेमातून का जन्मलेला असेना, त्याचं कसं बाजारीकरण करुन टाकायचं असतं हे भारतीयांना शिकवायला लागत नाही बहुधा.

केदार, परिचय अतिशय आवडला. ट्रिलजीवरील लेखाची वाट पाहतो.

कथा लिहितानाचा बॅकड्रॉप म्हणजे अमेरिकेतन लोकांचा कम्युनिझमप्रति असलेला तिटकारा आणि एकुणच प्रचंड राग. मग त्यातून खुद्द सरकार कसे कम्युनिस्ट लोकांना व्यवस्थित त्रास देत होते तिथपासून ते तो कम्युनिस्ट असल्यामुळे त्याच्या फॅमिलीवर होणारे परिणाम हे सर्व पुस्तकात येतं.

-- अगदी, अगदी. हा तिटकारा ४०-५० च्या दशकात अगदी पॅरानोईया म्हणावा, या पातळीला पोचला होता. जोसेफ मॅकार्थी आणि जे एडगर हूव्हर (एफबीआयचा सर्वेसर्वा) यांचा मॅकार्थीझम कुप्रसिद्ध आहेच; पण स्टाईनबेकचं 'ग्रेप्स ऑफ रॅथ' वाचून त्याच्यावरही कम्युनिस्ट असल्याचा आळ घेतला गेला होता, हे अलीकडेच ऐकून द्वेष सारासारविवेकाला आंधळं करतो; याची पुन्हा एकदा खात्री पटली.

<<एकाच लेखकाची एकामागोमाग एक पुस्तकं मी वाचू शकत नाही, काही अपवाद, रादर मी एकाच जॉनरची सलग दोन पुस्तकं वाचत नाही, हिस्ट्रीचे एक पुस्तक, मग फिक्शन आणि मग परत हिस्ट्री असा माझा प्रवास चालू असतो>> +११११

इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअर्स, पुणे येथे "किलोवर पुस्तके" प्रदर्शन चालू आहे.
बहुतेक फक्त इंग्रजी पुस्तके आहेत. १०० रु. किलो. लहान मुलांची १५०/२०० रु. किलो.
६ मे २०१४ पर्यंत आहे. मी अजून गेले नाहिये. त्यामुळे मोठ्यांसाठी किती आणि कुठली पुस्तके आहेत ते माहीत नाही.

Pages