मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

. पण एका मुलीची आई म्हणून मात्र भयंकर अस्वस्थ वाटत जाते हळूहळू. >>> खरं आहे. आईच काय वडील म्हणून मलाही अस्वस्थ वाटलेच होते. ( वाचता वाचता नकळत वाचक वर्तमानाशी सांगड घालतो)

To Sir with love - अमेझिंग कथा. वाचू वाचू म्हणून राहून जात होती पण इथे उल्लेख वाचला आणि आणली. फ्लाईट मध्ये घेतली आणि उतरेपर्यंत संपविली. परीक्षण दोन ओळीत संपल्यासारखे नाही. चक्क त्यातील उतारे च्या उतारे परीक्षणात घेऊन त्यावर लिहिण्यासारखे आहेत. माझ्या ऑल टाईम ग्रेट मध्ये ही कादंबरी नक्कीच येईल.

our trees still grow in dehra वाचायला सुरुवात केली प्रवासात. खूप सुरेख वर्णनं आहेत.भाषा सुरेख नेहमीप्रमाणेच.

Dan Brown's Inferno - खुप रटाळ. मी हौसेनी prelaunch offer वरती घेतलं. पण सगळा पोपट. फार अपेक्षा होत्या.

'द्रोहपर्व'.. धन्स केदार.
या पुस्तकात रमाबाईंच्या तथाकथित सहगमनातही सक्तीचा वापर झाल्याचे लिहिले आहे.. मराठेशाहीतल्या या मिथ्यकामागचे सत्य असे असेल तर अरेरे !
फारेंड, >>राघोबाला इतिहासकारांनी एवढा व्हिलन का केला आहे, तसेच तेव्हाच्या लोकांनी सुद्धा त्याला पेशवा का होऊ दिले नाही कळत नाही. ते इंग्रजांना फितूर वगैरे नंतर झाले ना >>
फितुरी अन त्याहीआधी पुतण्याचा क्रूर खून.. व्हिलन मटेरियल त्यांच्या वाट्याला आले,कर्तीकरविती पत्नी आनंदीबाई,पण त्यांचाही मूक अन संदिग्ध सहभाग होताच.

kiranyake, नॉट विदाऊट माय डॉटर बेस्ट पुस्तक आहे. त्याबद्द्ल आधी काय लिहिलं गेलं माहित नाहि , मला खुप आवडलं

@ हो मधुरीता. वाचूनच खाली ठेवलं सगळी कामं राहिली. याच धाग्याच्या पहिल्या भागात त्याबद्दल शंका व्यक्त गेल्यात. पण एखाद्याच्या अनुभवाला कसं काय खोटं ठरवायचं ? त्यातून वर्णनं बिनचूक आहेत. अयातुल्ला खोमेनीची राजवट चांगली उभी राहते, तसंच इतक्या प्रतिकूल परिस्थितीत परक्या देशात खचून न जाता विलक्षण धीराने परिस्थिती हाताळणा-या नायिकेचं कौतुकही करावंसं वाटतं.

मांडणी करताना अनेकदा घटना लिहून काढल्या असल्या पाहीजेत असं वाटलं. कथानक प्रभावी आणि ओघवतं होण्यासाठी काही वेळा फ्लॅशबॅकचा वापर अत्यंत परिणामकार रित्या केला गेल्याचं जाणवलं. मुळातच तिचा संघर्ष अत्यंत रोमांचक असला तरी ते दिवस नक्कीच कंटाळवाणे असतील. मात्र वाचकांपर्यंत नेमकं ते पोहोचवण्यात लेखिका यशवी ठरली आहे...

न राहवून विदाउट माय डॉटरचा पहिला भाग बेट्टीच्या इराणमधल्या अमेरिकन मैत्रिणीच्या मुलाखतीपर्यंत पाहिला. पुढे पाहण्याची इच्छाच झाली नाही. तिच्या मुलाखतीमधून तिला वाटणारी भीती उघड झाली. अशा मुलाखतींची विश्वासार्हता किती मानायची ? पुढे काय आहे याची कल्पना नाही, मात्र लेखिकेला तुर्कस्थानातून पळावे लागले ही वस्तुस्थिती उरतेच..

A Song of Ice and Fire series... मी रिव्ह्यू मिसला असेन तर कळवा प्लीज

Immortals of Meluha वाचतेय सध्या. मस्त आहे. एकदा हातात घेतलं की खाली ठेववत नाही. काही संकल्पना आपल्या परंपरागत कल्पनांशी compare करायला मजा येतेय. Happy

काल आर्थर हेलीच्या रनवे झिरो एट या पुस्तकाचा श्रीधर फडके यांनी केलेला स्वैर अनुवाद हाती लागला. पुस्तकाबद्दल कसलीही कल्पना नसताना वाचायला सुरुवात केली आणि तीन तासात संपवूनच खाली ठेवलं. उत्कर्ष प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे हा अनुवाद. स्वैर अनुवाद असला तरी अतिशय थरारक आहे. शेवटची काही प्रकरणं तर उत्कंठा इतकी शिगेला पोहोचली होती कि ते भयनाट्य खरंच संपलं हे समजलंच नाही. अक्षरशः खिळवून ठेवणारा अनुवाद आहे...

या आधी कुणीतरी रिव्ह्यू लिहीला असेल म्हणून काही लिहीलं नाही. आता सर्च दिला तर सापडलं नाही. प्रामाणिकपणे सांगायचं तर इतकं जुनं पुस्तक माहीतच नव्हतं. एका खाजगी विमानकंपनीकडून काही फुटबॉल शौकिनांनी भाड्याने घेतलेलं विमान आणि त्यातला विलक्षण थरार. उड्डाणाला धुक्यामुळे तीन चार तास उशीर झाल्याने नेहमीच्या केटरर ऐवजी इतर मार्गाने जेवण चढवण्यात येतं आणि त्यातून विषबाधा होते. अनेक प्रवाशांची अवस्था जगतोय कि मरतोय अशी होत असताना धुक्यामुळे काही दिसेनासं होतं. विमान मागे फिरवण्याची संधी नाही, चार तसांचा पल्ला आणि त्यातच दोन्ही वैमानिकांनाही विषबाधा होऊन ते बेशुद्ध पडतात. नशिबाने शेवटची क्रिया ऑटोपायलट वर विमान घेतलेलं असतं ही असते. दहा हजार फुटांवरून जाणारं त्या काळचं ते अत्याधुनिक विमान, विमानात नशिबाने असलेला एक डॉक्टर.. दिमतीला हवाईसुंदरी आणि कॉकपिटमधल्या परिस्थितीबद्दल अनभिज्ञ असणारे प्रवासी...

श्रीधर फडके यांनी पुस्तकाच्या सुरुवातीला विमानाचं कामकाज, विमानोड्डाणाच्या शास्त्रातल्या महत्वाच्या गोष्टी, विमानाचे विविध भाग , त्यांच्या आकृत्या आणि नावे, कॉकपिटची आकृती, रनवे याबद्दल उपयुक्त माहिती दिली आहे एका दुर्धर आजाराशी झुंजत त्यांनी हा अनुवाद पूर्ण केला आहे.

सहन होण्याच्या पलिकडचा थरार गाठलाय शेवटच्या काही प्रकरणात. ही खरी कथा आहे का हे पहायला विसरलो.
आता आर्थर हेलीचंच हॉटेल वाचायला घेतलं आहे. बघूयात.

पण तीन चार पुस्तकं वाचली की मग हेलीच्या लिखाणात तोचतोचपणा जाणवायला लागतो... (इतर बहुतेक थ्रिलर रायटर्सप्रमाणे)

हो वरदा, बरोबर आहे तुझे. मी ही सगळी पुस्तके साधारण दोन्तीन वर्षांच्या अंतराने वाचली होती. त्यामुळे, मला शैली छान वाटली असेल.

आर्थर हेलीचे हॉस्पीटल वर आधारीत पण एक पुस्तक आहे ना? मी वाचल्याचं आठवतंय.
बाकी नॉट विदाऊट माय डॉटर नंतर त्या सेरीज मधले अजुन एक पुस्तक बघीतले. पण नाव नाही आठवत.
सध्या आशा कर्दळे यांनी अनुवादीत केलेले 'नाईट' हे पुस्तक वाचते आहे. कल्पनेपेक्षाही खुप उच्च दर्जाचे आहे. नाझींनी केलेल्या छळाबद्द्ल अनुभव आहेत एका लहान मुलाचे. वाचुन खुप अस्वस्थ वाटते. रडुही येते. पण अप्रतीम लिखाण! एकदा तरी वाचावेच असे पुस्तक.

हॉटेल झालं वाचून. चांगलं आहे असं म्हणतोय पण ..

रनवे झिरो एट मुळे अपेक्षा खूप वाढल्या होत्या. संपूर्ण कथानक एका हॉटेलमधे घडते. त्याला अनेक उपकथानकांची जोड देत गुंता इतका वाढला आहे कि शेवटी लेखकाची तो गुंता आवरताना झालेली दमछाक जाणवते. ड्युक आणि डचेस चं उपकथानक तर संपूर्ण अनावश्यक आणि पात्रांचा पसारा वाढवून ठेवणारं वाटलं. कथेचा नायक पीटर मॅक्डरमॉटचं चरित्र चांगलं उभं केलं आहे. विशेषतः त्याच्या गतायुष्यातला एक काळा डाग आणि त्याचे झालेले परिणाम हे छान योजलं आहे. मात्र काही गोष्टींचं प्रयोजन ताबडतोब लक्षात येतं. जसं कि लिफ्टचं खराब होणं.

धक्क्यांवर धक्के देण्याच्या नादात लेखक अनेकदा चकला आहे. अवास्तव आत्मविश्वास नडला असं वाटलं. कल्पनाविलास जरा जास्तच झालाय. रनवे झिरो एट काल्पनिक असलं तरी श्वास रोखून धरणारं आहे. हॉटेलचा प्लॉट त्या मानाने सामान्य तरीही खिळवणारा आहे. मात्र पुस्तक वाचताना काही कारणाने लिंक तुटली तर पुन्हा पात्रांची नावं लक्षात ठेवणं किंवा उअकथानकांशी जुळवून घेणं जड जातं. ही कादंबरी वाचताना आपली रॅम वाढवलेली बरी..

दहा पैकी सहा गुण द्यायला हरकत नाही. पण हॉटेल व्यवसायाचे बारकावे, विविध डिपार्टमेंटचं कामकाज आणि त्यांचा अभ्यास याबद्दल आणखी दोन गुण द्यावे म्हणतो.

हो, हेलीने एकेक 'इंडस्ट्री' घेऊन त्यावर थ्रिलर्स पाडल्यात. हॉटेल, मोटर इंडस्ट्री, हॉस्पिटल, बॅन्किंग, पॉवर, इ. मला एकदीड कादंबरीतच भयंकर बोर झालेला लेखक (तरी नेटाने काही वाचून बघितल्या)

मला एकदीड कादंबरीतच भयंकर बोर झालेला लेखक (तरी नेटाने काही वाचून बघितल्या)<<< असं एका इन्फॉर्मल ग्रूप डिस्कशनमधे मी म्हटलं तेव्हा तिथे भयाण शांतता पसरली होती. लोकांना हेली एकेक इंडस्ट्री घेऊन त्यावर रीसर्च करून थ्रिलर्स लिहितो याचंच कोण कौतुक. पण मला त्याच्या प्लॉट्समधे रीपीटेशन जाणवतं त्याला काय करणार? मला त्याची ती विमानवाली आणि हॉस्पिटल हे दोनच थ्रिलर आवडले.

थ्रिलरमधे आपला फेवरेट- जेम्स हॅडली चेस. त्यासम तोच. Happy

हो, हेलीने एकेक 'इंडस्ट्री' घेऊन त्यावर थ्रिलर्स पाडल्यात. हॉटेल, मोटर इंडस्ट्री, हॉस्पिटल, बॅन्किंग, पॉवर, इ. मला एकदीड कादंबरीतच भयंकर बोर झालेला लेखक (तरी नेटाने काही वाचून बघितल्या) >> +१. पहिले एक दोन वाचले कि प्रचंड उत्सुकता वाटून पुढचे वाचायला घेतले कि pattern लक्षात येतो नि मग सगळे predictable होते.

वरदा, नंदिनी, असामी>>>>>+++++१
हेलीने एकेक 'इंडस्ट्री' घेऊन त्यावर थ्रिलर्स पाडल्यात. नवीन इंडस्ट्री शोधावी लागेल त्याच्यासाठी.

kiranyake | 14 June, 2013 - 20:38
काल आर्थर हेलीच्या रनवे झिरो एट या पुस्तकाचा श्रीधर फडके यांनी केलेला स्वैर अनुवाद हाती लागला.

मी रूटस आणि हॉटेल सोडून काही नाही वाचलं हेलीचं. ते एक बरंच झालं असं दिसतंय. Happy

मधुर भांडारकरचं प्रेरणास्थान आर्थर हेली असावं का?<<
नंदीनीची पोस्ट वाचताना एक्झॅक्टली हेच डोक्यात आलं होतं माझ्या Happy

टण्या, मी हेच लिवायला आलेलो!!!
थ्रिलरमधे आपला फेवरेट- जेम्स हॅडली चेस. त्यासम तोच>> प्रचंड अनुमोदन!

Pages