फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या काळी मॅक्सी नावाचाही एक प्रकार होता. अगदी घोळदार, रस्त्याने चालताना सगळी धुळ झाडत जाणारा. मी अगदी आवडीने एक घेतलेला शिवुन...

सहावीला वगैरे असताना आई चप्प तेल घालायची केसांवर आणि मध्ये भांग पाडून केस विंचरुन द्यायची. महान कळकट्ट दिसायचे मी. नंतर नंतरही केस मोठे असल्याने आईच विंचरुन द्यायची. तेव्हाही तसंच. कॉलेजचं वारं लागल्यावर केस छाटले ते अजुनही वाढले नाहीतच.

आमच्या ज्यु कॉ च्या काळात फ्लिक्स कापलेल्या हिरोंची लाट आली होती.
पहिला राहुल रॉय. Happy

मॅक्सी म्हणजे काय?? गाऊन?? माझ्याकडे एक टुपीस होता कॉटनला. फुल्ल पकाव प्रकरण होतं ते. इकडुन तिकडुन फलकारत रहायचं नुसतं.

अकरावीत असताना स्वतःच्या हाताने अति कापलेल्या फ्लिक्स होत्या माझ्या काही काळ. माणसाने किती घाण दिसावे.. >> Rofl चला हायसं वाटलं की अशी मी एकटीच नाही ते.. Lol

सुरुवातीला चिकना होता नै <<
कश्याच्या सुरूवातीला?
आशिकीमधे तरी तो यळम्या दिसायचा. ईईक्स!

इयत्ता ६वीतल्या बड्डेला 'तुला काय हवं?' असं विचारल्ल्यावर मी 'मॅक्सी" असं उत्तर दिलेलं. मग बाबांनी एक स्काय ब्लू कलरचा शर्टपीस आणून त्यातून मॅक्सी शिवून घेतलेली माझ्यासाठी. Uhoh नंतर मॅक्सी लोळून खाली खराब व्हायला लागल्यावर कापून त्याचा फराक केला.

अर्रर्र मॅक्सी मी पण. एका ताईची सिक्षफोर फोर साडी माग मागून आणली मग गाउन शिवला लाइट व्हायोलेट रंगाचा. वर पर्पल फुले लेसची.पॅच वर्क. असा तो गाउन घालून क्लासला मग थेट कमला नेहरू पार्कात. उतरत्या उन्हात मला मी जाम हिरॉइन आहे असेच वाटले होते. नीतू सिंग टाइप. Happy

चनिया चोली प्रकरण र्‍हायलं की डिस्कसायचं..

काकूने वापरून कंटाळलेल्या साडीची चचो शिवायचो आम्ही.

चला हायसं वाटलं की अशी मी एकटीच नाही ते>>>>... मी सुद्धा ....कापली फ्लिक्स आणि लपवुन ठेवली......फेकुन द्यावे असा विचार केलाच नाही....मम्मी कामावरुन परत आल्यावर तिने माझा पाठीच्या फ्लिक्स काढल्या त्या वेगळ्या... Sad

मी फ्लिक्स कापल्या होत्या आणि डस्टबीनमध्ये टाकल्या तर आईला दिसतील म्हणुन टॉयलेटमध्ये टाकल्या होत्या.

योडे तु टॉयलेट मधे टाकल्यास...मी लपवुन ठेवल्या बावळटासारख्या

अरे पण ज्या डोक्यावर दिसायच्या त्या दिसणारच ना?
मला आईची भिती अशी वाटली नव्हती. मी जोरात शूरपणा केल्यासारखे आई कॉलेजातून आल्या आल्या आईला दाखवल्या होत्या कापलेल्या फ्लिक्स. त्याकाळी सगळ्या फ्याशनीवर आई एकच प्रश्न विचारायची "हे चांगलं दिसतं असं तुला वाटतं का?'. तसंही अ‍ॅन्टीब्युटी ८०ज संपत होतं तेव्हा त्यामुळे अ‍ॅन्टीब्युटी इफेक्ट गेलेला नव्हता.

मी फ्लिक्स कापल्या होत्या आणि डस्टबीनमध्ये टाकल्या तर आईला दिसतील म्हणुन टॉयलेटमध्ये टाकल्या होत्या.>>>>
Rofl

केसावरून आठ्वलं. बंजारा ड्रेस घालून मी लग्नाला गेले होते तो किस्सा वाचलाच असेल तुम्ही. त्या लग्नाच्या आदल्या दिवशी.. मी आमच्या शेजारच्या लहान मुलाची खेळण्यातली मोटार घुईंघुईं फिरवली आणि कानापाशी नेली (त्याचे टायर फिरत होते) ते टायर्स इतके जवळ होते कानाच्या की केसाची एक बट त्यात गुंडाळली गेली.. Uhoh मग काय केस कापण्याशिवाय पर्याय नव्हता.. Proud मी लग्नाला तशीच शकुंतला बुचडा घालून Proud

मॅक्सी तर मी पण घालायचे. मी ६ वीत असताना दिल्ली आग्रा असे फिरायला गेलो होतो. त्या फोटोत मी उडत्या बाह्यांची ( बेल शेप ना देसी नाव) काळी मॅक्सी घालुन ताजमहाल समोर फोटो काढलेला आहे.... आणि केसांचे दोन बो.... कसली क्युट दिसते आहे....

हाय!!! काय नॉस्टॅल्जिक झाल्या सारखं वाटतय.....

अरे पण ज्या डोक्यावर दिसायच्या त्या दिसणारच ना?>>>>>>>. हो पण मी पिना लावुन लपवायची...... शी आता आठवलं तरी हसायला येते...

मी पिना लावुन लपवायची
>>
मी पण तेच करायचे. एकदा केस हायलाईट करायला एकाच साईडच्या बटेला ब्लीच लावलं होतं. इतकं भयाण दिसत होतं ते. लपवुनही लपत नव्हतं. शेवटी बाबांनी बघितलच आणि शिव्या पडायच्या त्या पडल्याच.

Pages