फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिश्का मी पण आवडीने लावायची. आंबाडा घालून भोवती. (केस लांब होते तेव्हा) दिव्या भारती घालायची तसलं बहुतेक, त्यामुळे तसं दिसायची केविलवाणी धडपड.

बाबा मुंबयहून कौतुकानी पटीयाला, चुरीदार, स्कर्ट्स आणायचे मारे... गावात त्या फ्याशनी यायला वेळ लागायचा... मग माझ्या चुलत बहीणी - काय गो, आजोबांचे धोतर नेसलीस काय ते? अन आईचा परकर काय तो असा लहान करून घालतेस वगैरे.. Sad

फॅशनचा आणि आमचा संबंध म्हणजे आईबाई आणि बाबासाहेब जे पण हौशीने आणतील ते विनातक्रार घालणे येव्हढाच असे... अगदी कोणीही काहीही बोल्ले तरी Happy

मुमताज स्टाईल ड्रेस शिवायचं खूप दिवस मनात आहे. वरून पासून खालपर्यंत तंग.. कसा दिसेल?

माझ्याही खुप मनात आहे, आता फक्त मुमताज तेव्हा जशी स्लिम ट्रिम होती तशी मी होणेच बाकी आहे, एकदा ते झाले की मग काय, माझा टेलर आणि मी...

फक्त मुमताज तेव्हा जशी स्लिम ट्रिम होती तशी मी होणेच बाकी आहे, >> बेबे मुमताज आणि स्लिम ट्रिम? Uhoh
तु लईच मापात आहेस तिच्या मानाने.
आणि तसा ड्रेस शिवायचा असेल तर आपण लाईट कलर आणि प्लेन कापड टाळायचं. काळं, डार्क नेव्ही ब्ल्यू, बॉटल ग्रीन विथ गिचमिड डिझाईन शिवायचं की त्यात व्हॉल्यूम दिसत नाही.

बरोबर ना? Uhoh जाणकारांनी लाईटी माराव्यात. Happy

दिव्या भारती घालायची तसलं बहुतेक, त्यामुळे तसं दिसायची केविलवाणी धडपड.>>>>>>>>> बापरे ती वारली तेव्हा मी २ रीत होती त्यामुळे ती फॅशन आता पिक्चर किंवा फोटो बघुन माहित झाली आहे...पण १९९५ १९९६ पर्यंत होती ही फ्याशन

आणि तसा ड्रेस शिवायचा असेल तर आपण लाईट कलर आणि प्लेन कापड टाळायचं. काळं, डार्क नेव्ही ब्ल्यू, बॉटल ग्रीन विथ गिचमिड डिझाईन शिवायचं की त्यात व्हॉल्यूम दिसत ना>>>>>>.. जाणकार नाही पण तु म्हणतेस ते बरोबर आहे....

नशीबाने मला तेव्हा टेलर भारी मिळालेला... बदामी रंगाचा व डाळींबी मेहेंदी छोटी फुलंवाली डिझाईन असलेल्या चायना सिल्क कापडाचा प्लेट्सचा साईडला चेन नी हूक लावलेला गुडघ्याच्या थोडा खाली येणारा सुंदर स्कर्ट शिवलेला आणि ऑफव्हाईट फ्रील चा डीप व्ही डिझाईनचा गळा असलेला नेव्हीब्लू मोरपिशीअश्या वेगळ्याच इंग्लीश कलरच्या कापडाचा बलून फ्रॉकही!!! आमच्या आईबाई फार हौशी आहेत या फ्याशनींच्या बाबतीत!!! मला मात्र तो वारसा नाही मिळाला Sad

ते एक बलून स्कर्ट प्रकरण मात्र मी कधीही घातलं नाही.>>>>>>>> मी पण नाही...पण तो आता इन फॅशन आहे.....

मी पण नाही <<
मुली तुझ्या अठरा-विसाव्या वर्षी ती फ्याशन नव्हती. माझ्या होती. Happy

बलून स्कर्टस ही तशीही टिनेजर फॅशन आहे. आता परत आली म्हणून मी घातले तर वेडी किंवा ग्रिप्सच्या नाटकातून कॉश्च्युम न बदलता पळून आल्यासारखी दिसेन.

हो अनिश्का तेच ते आशिकी रिबिन. माझ्याकडे लाल, पांढरी, गुलाबी आणि आकाशी अशा ४ होत्या. त्यांच्या उधार्‍याही चालायच्या. मैत्रिणी वापरून २ दिवसांनी परत द्यायच्या.

वेडी किंवा ग्रिप्सच्या नाटकातून कॉश्च्युम न बदलता पळून आल्यासारखी दिसेन.>>>>>>>>. Biggrin Biggrin Biggrin

लाल, पांढरी, गुलाबी आणि आकाशी>>>>>>>>. मला अजुनही आवडतात....पण आता त्या १९७० सार्ख्या हेयर बँड म्हणुन बांधल्या तर मस्त दिसतील...

पोनीला रुमाल कुणी कुणी बांधलेत इथे??

मी दो-याही बांधल्या आहेत Happy तेव्हा रंगीबेरंगी दो-या मिळायच्या. अगदी नारदमुनीसारखी उंच पोनी बांधाय्ची, कधी लांबलचक दोरीने उंच पोनी बांधुन मग खाली वेणी घालायची आणि त्यात ती दोरीही लपेटुन घ्यायची, कॉलेजातला गुज्जू पोरी हमखास हा प्रकार करायच्या. मला वेणीत दोरी जमायची नाही त्यामुळे मी फक्त पोनीच बांधायचे.

ग्रिप्सच्या नाटकातून <<<
ग्रिप्स थिएटरमधे लहान मुलांसाठी नाटके असतात आणि त्यात लहान मुलांचे रोल मोठी माणसे करतात.

जरासं आवांतर..
आशिकीचं पोस्टर आहे त्यात त्या कोटाखाली दोघं आहेत.
आमच्या इथे त्यावेळच्या तायांची प्रेमपत्रं सापडायची त्यातल्याच एका पत्रात 'त्या' प्रियकराने ते चित्र लाल शिसने काढण्याचा (दारूण प्रयत्न) केलेला... शिवाय मी आणि माझ्या चुलतभावाने ते उघडण्याचा इब्लिसपणा केला होता त्यातून मग लाल रंगाच्या 'दिला'च्या आकाराच्या चमचम चकत्या पडलेल्या.. (पत्रांची देवाणघेवाण आमच्या मार्फत व्हायची ना :अओ:)

नी, का तुला सकाळी सकाळीच मॅसोशिस्ट स्ट्रीक चढलीये? सगळ्या वाया गेलेल्या कॉलेजच्या वयाच्या दु:खद आठवणी. तत्कालीन फोटो पाह्यलासुद्धा इयू वाटतं.
तत्कालीन चष्म्याच्या स्टायली सुद्धा भयाण होत्या. प्लास्टिक/फायबरच्या ओव्हरसाईझ फ्रेम्स असायच्या. त्यात माझा चेहरा लहान. बहुतेक सगळ्यांप्रमाणे प्रचंड लुकडी देहयष्टी आणि त्यात तो चष्मा आणि तसले कपडे.. विज्युअल अत्याचार!!

चष्मा तिशीला लागलाय त्यामुळे त्या काळातलं काही लक्षात नाही.
गॉगल तोही फोटोक्रोम मस्ट असे कारण म-८० दिवसा-रात्री ताबडवायची असे.
चेहरा मोठ्ठाड असल्याने वाट्टेल तेवढ्या मोठ्ठ्या फ्रेम्स चालायच्या.
माझ्याकडे एक साधारण दीड इंचाचा चौरस जेवढा असेल तेवढी फ्रेम असलेला काळा गॉगल होता. त्याच्या दांड्यांना खडे होते. काकाश्रींनी गल्फातून आणल्यामुळे मी कौतुकाने वापरायचे तो. Happy

बाकी ती ढालीसारखी टळटळीत कानातली आठवतायत का?

नी, का तुला सकाळी सकाळीच मॅसोशिस्ट स्ट्रीक चढलीये? सगळ्या वाया गेलेल्या कॉलेजच्या वयाच्या दु:खद आठवणी. तत्कालीन फोटो पाह्यलासुद्धा इयू वाटतं. <<
Lol
अकरावीत असताना स्वतःच्या हाताने अति कापलेल्या फ्लिक्स होत्या माझ्या काही काळ. माणसाने किती घाण दिसावे.. Happy

Pages