फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते स्लाइट लो वेस्ट मिडीज आठवतायत का?
प्रिन्सेस कट, फ्रंट ओपन, ढालीसारखी टळटळीत बटणे, लेगोमटन पण शॉर्ट स्लीव्ह्ज आणि लो वेस्टला जोडलेला स्कर्टचा फ्लेअर.
माझ्याकडे होता एक तसा. यक्क!

अक्षरश: यक्क Sad

मला अंगाबरोबर बसणार्‍या जिन्स अजिबात आवडायच्या नाहित पुर्वी त्यामुळे मी हमखास जेण्ट्स जिन्स घेत असे.. Uhoh अरारा! आता आठवल तरी माझं ध्यान तेव्हा कसं दिसत असेल ते कल्पना करवत नाही.

मला तुम्ही सगळ्या या फॅशनींतून गेलायत हे वाचून बरं वाटलं.
मला वाटत होतं मीच एक अजागळ ध्यान होते. Happy

ते अत्यंत खाली कंबर असलेले फ्रॉक्स कित्ती खराब दिसत. मोठ्ठी झाल्यावरही मला फ्रॉक्स आवडायचे पण फक्त या विचित्र फॅशनीपायी नको वाटून घातले नाहीत.

साती कॉलेजात असताना मी मोस्टली मोठ्या बहिणीचे पंजाबी वापरले. मोजून चार होते Proud त्यात एक बॅगी पँट होती Rofl

संपदा, नी_+ १००००
आधीच पेठी फ्याशन संस्कार त्यात अशा या फॅशन्स. अगदी वाया गेली ती वर्षं
ते अनारकली का कसल्याशा कुर्त्यात फ्रॉकसारखा घेर आणि कमरेला फिट करण्यासाठी दोन्ही बाजूला दोर्‍या, नाड्या हा प्रकार तर केवळ हॉरर होता

लोवेस्ट जीन्स हे प्रकरण ९६-९७ नंतर उद्भवलेले आहे. आमच्या कॉलेजच्या काळात हाय वेस्ट बॅगी होत्या ज्या घोट्यापर्यंत जेमतेम येत.

ते अत्यंत खाली कंबर असलेले फ्रॉक्स कित्ती खराब दिसत. <<
पण तेव्हा तळमळून घेतलेले आहेत तसले एक सोडून दोन दोन.

वरदा... अगदी अगदी. त्या नाड्या भीषण.. आणि अनारकली म्हणून खरोखरीचा तंबू विकत तेव्हा.

अगदी अगदी. त्या नाड्या भीषण.. आणि अनारकली म्हणून खरोखरीचा तंबू विकत तेव्हा.>>> Lol
आमच्याकडे मामा त्याला तानाजी मालुसरे टाईप म्हणतो अजुनही

माझ्याकडे बंजारा ड्रेस होता एक Uhoh
मफलर सारखी पट्टी टाईप ओढणी, वर एक टॉप आणि खाली स्कर्ट
आणि तो तसला घालून मी आमच्या इथल्या एका मोठ्या मैत्रिणीच्या लग्नाला गेले होते. तांब्या घेऊन उभं असलेला फोटो आहे त्या ड्रेसात,
हाईट म्हणजे मी शकुंतला हेअर स्टाईल केलेली तेव्हा (एका बाजुला बुचडा) Uhoh

लोवेस्ट जीन्स हे प्रकरण ९६-९७ नंतर उद्भवलेले आहे.>> आमच्या कालिजात जायच्या दिवसांमधे. तेव्हा कांटालगा ने गदारोळ उठवला होता.

पॅरलल नावाचा एक भयाण ड्रेस आठवतोय का कुणाला?

पॅरलल ज्याला भय्ये दुकानदार प्यारेलाल म्हणायचे Proud
करीना कपूरनी आणली ती फॅशन्..मेरा मन डोले मेरा तन डोले Lol

नवनवीन ट्रेन्ड्सचा धागा आहे का जुन्याजुन्या ट्रेन्डस चा? <<
जुनेजुने ट्रेण्डस नवेनवे होके आते है.. हिस्टरी रिपीटस! Wink

करीना कपूरनी आणली ती फॅशन्..मेरा मन डोले मेरा तन डोले <<
छे गं. प्यारेलाल ९३-९४ पासून होते. माझ्याकडे एक बडोदा प्रिंटचं सुंदर मटेरियल होतं त्याच्या ए लाइन कुर्त्याला बेल स्लीव्ह्ज आणि खाली प्यारेलाल... हरे राम किती तो तंबू. Happy

फोटो मै इधर नही टाकेंगा. Happy

बडोदा प्रिंटचे ड्रेसेस मी सुद्धा भयंकर ताबडलेत Proud , त्यांच्या ओढण्या कित्ती वर्षं छान राहायच्या Happy

मला बडोदा प्रिंट आजही आवडतील..
माझ्याकडे होतं ते व्हाइट आणि डल पिस्ता कॉम्बो उलट पलट होतं.. फार सुंदर दिसायचं.

बडोदा प्रिंट म्हंजे?

ते वेल्वेटचे उंच टाचांचे बुट होते का कोणाकडे? कित्त्ती दिवस हट्ट केला होता मी त्यासाठी? Uhoh

.

९३-९४ मध्ये गुडघ्याइतका फ्रॉक, सँडल-मोजे अन बॉयकट ही आमच्या आईनी लादलेली सक्तीची फॅशन होती. <<
आता लिहिणं बंद करायला हवं इथे. वयाची जाणीवबिणीवच होते.. श्या!! Proud

Pages