फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उलट स्किनी जिन्स मस्त.. चांगल्या बसतात ढळढळीत मध्ये अजुन जाड दिसायला होतं.

हं.............वाचतेय. मस्त धागा.
एक भयंकर बेसिक प्रश्न. इथे पीएचडीचे पेपर वाचले जाताहेत आणि मी ?
असो....... पर्सेस कश्या ठेवायच्या/स्टोअर करायच्या? जेणेकरून त्यांचा शेप बिघडणार नाहीत आणि पटकन हाताशी दिसतीलही?

मानुषी, एक हॅन्डबॅग होल्डर म्हणुन आहे माझ्या कडे. मी त्याचातच ठेवते. जमल्यास फोटो टाकते.

हॅन्डबॅग होल्डर <<<<< हे काय असतं. पेरु टाकच फोटो.
मी तर सरळ मऊ प्लॅस्टीकच्या पिशव्या किंवा मऊ कपडे ठेवते त्यात भरून.

अ‍ॅक्सेसिरीज म्हणुन काय वापरायचे,कसे नि कुठे या बाबतीत जरा लिहा..
मला झेपतच नाही .. साडी/अनारकली वर मी मोती/पाचुवाले हेवी सेट्स वापरते..पण जीन्स, स्कर्ट्स वर काय? रोज ऑफीस मधे?
रोज बदलायची सवय नाहीये.. नेहमी सोन्याची चेन,छोटे रिंग्स नि हातात एक तांब्याच कडं कायम

ऑलिवीयाचा फाऊंडेशन केक बघितला होता पण खरंतर ते सगळं वापरायची आधीच भिती वाटते मला स्कीन सेन्सिटीव्हीटीमुळे>>> योडी, माझ्याकडे होता तो,पण अजिबात आवडला नाही.लावल्यावर तेलकट वाटायचा चेहरा.सध्या लॅक्मेचा नाइन टू फाइव्ह (Flawless Creme Compact) वापरत आहे.

चनस अनारकली वर शक्यतो गळ्यात काही घालु नये....एखादी नाजुक बारिक चेन चालेल..पण तेही नाही घातलं तरी चालतं. कानातले हेवी घालायचे सध्या हिच फॅशन चालु आहे...

जिन्स वर तु कुठले टीशर्ट घालतेस त्यावर अ‍ॅक्सेसरीज डिपेन्ड करतात.. जर कॉलर वाला नॉरमल टी असेल तर गळ्यात काही घालायची गरज नाही.. बाकी बीड्स, क्रिस्टल, मेटल असंख्य प्रकार आहेत...

चनस, महालक्ष्मी सरस मेळाव्यात एका स्टॉलवर वेस्टर्न आउटफिट वरील अ‍ॅक्सेसरीज आहेत. जसे मोठ्या स्टोन्सचे गळ्यातील, कडे, विविध आकारप्रकारांच्या चेन्स एकत्र करून गळ्यातील सेट केलेला. स्कर्ट टॉप्स, जीन्स टी शर्ट्स वर अप्रतिम दिसतील असे...

ट्रॅडीशनल वर हेवी कानातले व ब्रेसलेट! बस्स! गळ्यात काही नको...

21.jpeg

ओक्के.. पण गळ्यात काही नाही घातलं तर आईला उघडं वगैरे वाट्त.. त्यात कुठ्लातर फंक्शन असेल तर झालचं
ड्रीमगर्ल ते कुठे आहे? मी पुण्यात राहते

ओ वॉव.. अनिश्का.. ग्रेट कलेक्शन.. मस्तच..
मलाही चंकी ज्वेलरी फार आवडते.. पण गळ्यात काही चंकी असेल तर काना,हातात काही घालत नाही..

ड्रीमगर्ल.. मस्त दिसतायतं..ट्राय करेन
सोन्याचे असताना हे कशाला म्हणुन अजुन एक टॉण्ट आहेच .. त्याच पण कराव लागेल काहीतरी..ह्म्म

चनस,
पुण्यात एफ. सी. रोडला संध्याकाळी बीड्सच्या माळा, ब्रेसलेट्स वगैरे विकायला घेवून बसतात...
जीन्सवर छान वाटते....

Happy

पण गळ्यात काही चंकी असेल तर काना,हातात काही घालत नाही>> गळ्यात एवढे मोठे स्टोन्सचे फंकी नेकसेट घातल्यावर बाकी हातात कानात गॉडी घालायची गरजच उरत नाही. कानात सिंगल स्टोन्स पण बरे दिसतात मग...

नी हे कसलं आहे? माझ्याकडे एक दुखदबाव पट्टी आहे (याला काय म्हणतात कोण जाणे केमिस्ट ने तर हेच नाव सांगितले) त्याच्यासारखं दिसतंय ते गुलाबी...

सोन्याचे असताना हे कशाला म्हणुन अजुन एक टॉण्ट आहेच ..>> आमच्याकडे पण! Wink पण सांगायचं हल्ली लग्नात वधू पण पण असे मॅचिंग हेव्ही इमिटेशन ज्वेलरीच वापरतात... फ्याशन है बोलनेका... लग्नालावगैरे ठीके... पार्टी/फंक्शनला कुठे सोन्याबिन्याचे...

नी,
व्हाईट प्लेन टी वर मस्त दिसेल...
किंवा लाँग कूर्ती थ्री फोर्थ हात असलेल्यावर ही छान दिसेल हे...

पल्लवी अगं हो.. मला सवय नाहीये असं घालायची ,कॅरी करायची.. मग उगाच घेणं होईल
पण बाकी सगळे घेताना बघुन टेम्प्ट होतचं Wink

चनस,
अग एखाद घेवून बघायच... खूप हेवी नाहीयेत या माळा वगैरे... नाजूक पण मिळतात...

अनिश्का दुसर्‍या फोटूतील कलेक्शन मस्तच! मी नाही वापरत... अजून नाही वापरून बघीतले नाहीयेत... कॅरी नाही करू शकत मी! Sad पण आवडतात बघायला वगैरे... ड्रेस व अक्सेसरीज कॉम्बी रिलेट करणारं हवं एकमेकांना... नाहीतर बावळ्ट्ट अजागळ दिसतं. अर्थात ते कॉन्फीडेन्टली कॅरी करता आलं पाहीजे. माझ्याकडे ते नाहीये बहुदा... Sad

मी तर सरळ मऊ प्लॅस्टीकच्या पिशव्या किंवा मऊ कपडे ठेवते त्यात भरून.>>>>>>>>>> हो पण ठेवते कुठे? म.? कारण त्या टांगून नाही ठेवल्या तर शेप बिघडतो ना!
पेरू धन्यवाद..........फोटो टाक!

@मानुषी ,
कपाटातला एक मोठ्ठा कप्पा फक्त त्याचसाठी वापरते आणि त्या छान रांगेनी उभ्या करुन ठेवते. वापरताना त्यातल्या पिशव्या वा कापडं काढुन तिथेच ठेवते. वापरुन झाल्यावर ती पर्स रिकामी करून त्यात परत सगळ [पिशव्या कापडं इ] भरुन जागेवर ठेवते.

अ‍ॅनचा एकदम लेटेस्ट फोटो आहे हा..त्यादिवशी तिला अवॉर्‍डपण मिळालं होतं Happy
मी अजून ़कधीच साधं रंगवणं सोडून कुठलेच नेल आर्ट केले नाहीत. रोज्ची कामं , पाण्यात हात घातल्यावर खराब होत असेल नं?
बरं ती नखांवर चिकटवायची प्रकरणं कुणी टृआय केलीत ़का? त्याच्याने मूळ नखं खराब व्हायची शक्यता कितपत असते?

Pages