फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रॅपअराउंड स्कर्ट लांब असतात ते मलाहि नाहि आवडत. सांभाळायचा व्याप असतो.पण रॅपअराउंड स्कर्ट मधे शॉर्ट स्कर्ट मिळतात ते एकदम टाईट बसतात आणि काहि ए लाईन सारखे असतात ते चांगले दिसतात.

जुन्या आठवणी वाचून खरंच मज्जा आली. काय फॅशन असायची भयानक एकेक.... पॅरलल, बंजारा, लांब चुण्याचा हातवाला ड्रेस, माधुरी दिक्षीत घुंगरांचे कडे (दिल तो पागल है वाले) आणि ते मैने प्यार किया, हम आपके चे ड्रेस अर्रर्र.....

आता सध्याची ट्रेंड.... कोणतीही साडी असो ते रेडिमेड गोल्डन, चंदेरी, मरून असे ब्लाऊज घालायचे. तुबा मधे खूप पाहिले. छान दिसतात. सिरिअलीतल्या बायका घालतात म्हणे Happy

तसला रस्ट आणि ग्रीन रंगाचा रॅप अराऊंड स्कर्ट आणि आपला ऑलिव्ह ग्रीन शॉर्ट मायबोली टिशर्ट मी या डिसेंबरात घातला होता मायबोलीकरांसोबत गटगला. थंडीसाठी एकदम बेष्ट Proud

दक्षे, मला कुणी जास्तीची जाड दिसतेय वगैरे म्हटलं नाही गं पण तसला स्कर्ट घातल्यावर. कदाचित मला घाबरुन म्हटलं नसेल Lol

दक्षिणा,माझ्याकडे होता बंजारा ड्रेस. ऑफव्हाइट टॉप,बॉटलग्रीन स्कर्ट व पट्टा(ओढणी).तेव्हा हौसेने घेतला होता. आता फोटो बघताना हसू येते. Happy

image

@ चिंगी.. <"पॅरलल चुडीदार पण असायचे.. हम पाँच मध्ये विद्या बालन आणि ती २ नं ची चशमिस बहीण घालायच<""

अगा ती चशमिश मुलगी म्हणजेच विद्या बालन...

यावेळी भारतात पाहिले सर्वत्र साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ची फॅशन दिसली.. आणी साड्यांमधेही २,३ वेगवेगळे कलर्स आणी प्रिंट्स एकत्र.. मला खूप आवडला हा ट्रेंड.. सारखं मॅच मॅच करायची कटकट नाही..

मग बंगलोर हून ,' म्हैसूर साडी उद्योग' या माझ्या अत्यंत आवडत्या दुकानातून २,३ ब्रोकेड चे तयार ब्लाऊजेस घेऊन आलेय. आता त्यांना नॉन मॅचिंग साड्या भारतात आल्यावर घेईन..
तोपर्यन्त हा ट्रेंड राहो ना राहो.. Happy

यावेळी भारतात पाहिले सर्वत्र साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ची फॅशन दिसली.. आणी साड्यांमधेही २,३ वेगवेगळे कलर्स आणी प्रिंट्स एकत्र.. मला खूप आवडला हा ट्रेंड.. सारखं मॅच मॅच करायची कटकट नाही..
>>>>>>>>
मस्त वाटले ना? मलाही आवडले आणि रेडीमेड परत म्हणजे त्या टेलर भानगड नको Happy

भुभै साबुदाणा कापड म्हणजे सेमी ट्रान्स्परंट कापड खडबडीत, साबुदाणासदृश उंचवटे असायचे कापडी (एम्बॉसिंग सारखे) ते कापड टोचायचं भयंकर.

बराच पुढे गेलाय धागा... Sad
ते अत्यंत खाली कंबर असलेले फ्रॉक्स कित्ती खराब दिसत.>>>>>>>>.. पोटाच्या खाली व्ही शेपवाले फ्रॉक्स असायचे ते मुव्ही मधे नीलम घालायची...ते कसले घाण दिसायचे....

आणि पॅरलल तर माझी उंची जास्त म्हणुन मला मिळता मिळता नाकी नउ यायचे......तरी हट्ट करुन एक घेतला होता..टांगा दिसायचा अक्षरशा:.......तरी मी आवडीने घालायची.....आणि ते फुलांच्या शेप मधले पोनी ला बांधायचे रबर....हिरवे, पिवळे

बरोडा प्रिन्ट्स मला ही आवडत... साधारण असं असायचं/ अजुनही मिळतं...

990130_116.jpg

ते कमरे खाली फ्रील असलेले फ्रॉक भयानक दिसायचे... मी कधीच घेतले नाहीत तेंव्हा... धोती आणि पॅरलल मात्र आवडीने शिवली होती... अनारकली खरच तंबु दिसायचे तेंव्हा..... आता सारखा फॅशन अवेअरनेस नव्हता त्या काळी.... माझी आई तर म्हणाली ती तरुण असताना ( आता ६५ वर्षांची आहे) काळा किंवा पांढरा परकर सगळ्या साड्यांत घालायचे... ब्लाउज पण काही खास मॅचिंग नसायचे...तिच्या लग्नातही तिने शेवाळी साडी मधे पांढरा परकर घातलेला आहे.....

मेकिमी हे तर मलाही आवडतं.. फॅब इंडिया मधे अवाच्या सव्वा किंमतीत कुर्तीज मिळतात... किंवा इतर दुकानात पण मिळतात....जीन्स वर असले कुर्ते बरे पडतात....किंवा पटीयाला चुडीदार वर पण

तिच्या लग्नातही तिने शेवाळी साडी मधे पांढरा परकर घातलेला आहे.....:) आम्च्या शाळेतल्या बाइ होत्या त्या रोज प्रत्येक साडी वर काळा नाहीतर सफेद ब्लाउज घालायच्या....

मोकीमी अनुमोदन.
मी कॉलेजात असताना साडीचा फ्रॉक शिवायची फॅशन आलेली. कुठच्यातरी सेल मधुन तेव्हा मी १०० रू ची साडी घेऊन तो फ्रॉक शिवून घेतला होता. (टेलर जेके होता बहुतेक, कोल्हापूरात फेमस होता तेव्हा)

हे कलमकारीचे मोटिफ ब्लॉक प्रिंटने केलेले आहेत.
टिपिकल बडोदा प्रिंट थोडे अजून वेगळे असते.

मला अ‍ॅक्च्युअली त्या इंदुरी साड्यांवर (बारीक चेक्स, जेमतेम इंचभराचा काठ आणि ठराविक रंग) ऑफ व्हाईट ब्लाउज हे जुन्या बायकांचं कॉम्बो असायचं ना ते जाम आवडतं.

मी कॉलेजात असताना साडीचा फ्रॉक शिवायची फॅशन आलेली. कुठच्यातरी सेल मधुन तेव्हा मी १०० रू ची साडी घेऊन तो फ्रॉक शिवून घेतला होता. <<
टेलर्स त्याच कापडातून स्क्रंची पण शिवून द्यायचे म्हणजे असा साडीचा ड्रेस घालायचा आणि त्याच कापडाची स्क्रंची आपल्या सागरवेणीला लावायची...

काय इयू फ्याश्नी होत्या...

शोध बरे

15.jpeg
अच्छा हे आहेत..तेच मी मघाशी लिहिलेय फुलांसारखे रबर हिरवे पिवळे पण माहित नव्हतं त्याला स्क्रंची म्हणतात....यक्क कसले घाण होते ते......पण मी अवडीने लावायची ......

नॉट ओन्ली दॅट, त्याच काळात जाळीचे बो लावलेली आडवी क्लिप सुद्धा मिळायची. ती महाग, त्यामुळे नुसती जाळीदार पट्टी (रिबिनीसारखी) मिळायची, ती वेणीला शेवटी गुंडाळुन आम्ही त्याचं फुल करायचो. Uhoh

.

त्यामुळे नुसती जाळीदार पट्टी (रिबिनीसारखी) मिळायची>>>>>>. आशिकी मुव्ही मधे अन्नु अगरवाल ने बांधल्या आहेत ना तशा जाळीदार रिबिनी

तो फिक्सर की काय म्हणतात तो वेलवेटसारखा रब्बर तोच ना.... श्या फ्याशनीतला फ्या समजून घेताना पण फ्या फ्या होतंय तरी हौस मोठ्ठी आहे... Sad

फार्र्च कॉम्प्लेक्स यायला लागलाय मला... Sad ही तर मटण हात, बडोदा प्रिंट नावेसुद्धा पहील्यांदाच कानांवर पडताहेत आपलं डोळ्यांखालून जाताहेत!!!

अनिश्का ..

जे कॉपीराईट वाले पिक्स आहेत ते इकडे टाकु नको... उगाच माबो ला त्रास नको...

Pages