फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीतू सिंग टाइप

येस्स्स.. ती मस्त मॅक्सीज घालायची...

मीही फ्लिक्स कापल्या होत्या आणि वर त्या वडलांपासुन लपवण्याची धडपडही केली होती. माझ्या काळी केस कापणे हे कोणाचे शीर कापण्यापेक्षाही मोठे पाप आहे असे आईबाबा मानत, मी ११ वी गेल्यावर एकेक इंच करत कापत गेले Happy इतका आनंद व्हायचा आपण केस कापतोय याचा... पण खरीखुरी हेअरस्टाईल मिळायला मात्र खुप वर्षे गेली. त्याआधी नुसताच सरळ कट मारुन घ्यायचा गुपचुप.. नंतर मात्र मी सुटले ती सुटलेच , एकदा तर बॉयकटही केलेला आहे, फोटो मुद्दाम ठेवलेत अजुन.. Happy

योडी मी पण ब्लिच लाऊन केस हायलाईट केले होते आईच्या हापिसातले आईला विचारायचे मुलिचे केस अकाली पांढरे झाले आहेत का?

योडे ते देशी हायलायटींग.
ब्लिच लावून वरून मेंदी.. हायड्रोजन मारलाय काय असं विचारायचे मला सगळे. Uhoh

दक्षे

जमाना बदलला आहे ग !!! परवा माझ्या वयात येणार्‍या लेकीला मी म्हंटलं की ह्या टॉपच्या आपण उडत्या बाह्या शिवु, तर तिने आणि नवर्‍याने हासुन हासुन माझं पार भजं केलं... म्हणते कशी " आईने स्लीव मधे हात घातला आणि ती उडाली ".... आणि नवरा तिला साथ देणारा...

त्याला बहिण नाही त्या मुळे हे असले शब्द म्हणजे हिब्रु....

मी फक्त पुढच्या फ्क्लिक्स ना लावलेलं ते प्रकरण त्यामुळे त्यांचा रंग, जंजीर मधल्या प्राणच्या केसांसारखा दिसायचा Rofl

कोणाचे शीर कापण्यापेक्षाही मोठे पाप आहे असे आईबाबा मानत
>>
साधना, ह्या बाबतीत सेम पिंच. कॉलेजला गेल्यावर केस कापले आणी दिवसभर गुंडाळुन ठेवले होते. दुसर्‍या दिवशी सकाळी केस बांधताना सोडले तेव्हा जो तमाशा झाला की ज्याचं नाव ते..

मोकीमी... Happy

जंजीर मधल्या प्राणच्या केसांसारखा दिसायचा>>>>>>>>>.हीहीहीहीहीहीहीही कशी दिसत असशील गं??

माझे इयत्ता चौथी पर्यंत कमरेपर्यंत लांब केस होते. आईला ती सोडून इतर कुणीच काय मी स्वतः हात लावलेला सुधा आवडायचा नाही. शाळेत बेंचवर वेण्या रूळायच्या मागची मुलगी बोंबा मारायची म्हणून एकदा आमच्या बाईंनी पेडाच्या वेण्या वर गुंडाळून त्याचे बुचडे बांधले, मी घरी तशीच. आईचा लई मार खाल्ला, एकच प्रश्न, 'तु त्यांना तुझ्या केसाला हात लावूच कसा काय दिलास?' Uhoh

ब्लिच लावून वरून मेंदी..
>>
हे पण केलं होतं मी. पण ते त्याहुनही भयानक दिसु लागलेल..

त्याच काळी मला पोनी टेल चे प्रचंड वेड होते.. आणि आई केसाचं एक टोक सुद्धा उघडं ठेवत नसे. एका शनिवारी मला संधी मिळाली.. आणि मी बो घालून शाळेला.. आल्यावर पुन्हा मार.. Sad

आई गेल्यावर अत्याने पुण्यात पोचल्या पोचल्याच केस कापायला लावले. केसाच्या बाबतीत इतकी धास्ती होती की कित्येक दिवस मला स्वप्न पडायचं आई येऊन आपल्याला केस कापले म्हणून ओरडतेय्/मारतेय असं.

माझ्या काळी केस कापणे हे कोणाचे शीर कापण्यापेक्षाही मोठे पाप आहे असे आईबाबा मानत>>>

माझे बाबा फारच फॉर्वर्ड.... त्यांनी मला काय काय अमिषं दाखवली मी केस कापावे म्हणुन... शेवटी एक दिवस त्यांच्या लाचेला बळी पडले आणि बॉय कट केला... नंतर आजीने जे तोंडसुख घेतलय.... रामा शिवा गोविंदा!!!! पण त्या नंतर तीच माझी स्टाइल झाली... आज ही माझे शॉर्ट हेअरच आहेत... अगदी माने पर्यंत... जरा वाढले की त्रास होतो. नशीबाने नवर्‍याला ही तेच आवडतं...

मला जेन्ट्स सलून मधुन केस कापुन आणलं जायचं......बॉय कट....:( ६वीत गेल्यावर लेडीज पार्लर मधे नेलं तेव्हा काय खुश झाली होती मी...ब्लन्ट कट केला होता.....दॅट वॉज माय फर्स्ट हेअर कट.....हिरेविण छाप....;)

शॉर्ट केस हे स्वप्न होतं माझं. मस्त असे हवेवर उडतायत केस असं. लग्नानंतर मला चान्स मिळाला आणि पार खांद्यापर्यंत केस कापले होते. नवर्‍याने इतका बेक्कार लुक दिला होता बघितल्या बघितल्याच की बस रे बस.

दक्षु जामच मार खाला आहेस तु....मी पण तसाच खाल्लाय...अंगात किडे कमी का होते....... मला बाकी कशाने नाही झाडुने मारल्याशिवाय आईचं समाधान व्हायचं नाही....पण उंची जास्त आणि प्रमाणापेक्शा बारिक असल्यामुळे १२ वी पर्यंत बाबांनी पंजाबी घालु दिला नाही,, Happy स्कर्ट आणि जीन्स च घालायला लावली

मला जेन्ट्स सलून मधुन केस कापुन आणलं जायचं......बॉय कट. +१
आता ही शॉर्ट हेअरच आवड्तात मला.. नी घरचे सगळे फक्त मामा सोडून मागे लागतात शॉर्ट केस कापुन घे म्हणुन .. मामाला लग्नाची काळ्जी Sad

आता सध्या रे बॅन ९०'ज मधले परत आलेत.....झक्कास दिसतात....नवर्‍याने आणलाय स्वता:साठी...माझा नंबर कधी लगतो ते पाहु.......तो पर्यंत पोलोरॉइड आहेच.....

नी घरचे सगळे फक्त मामा सोडून मागे लागतात शॉर्ट केस कापुन घे म्हणुन .. मामाला लग्नाची काळ्जी >>>>

आज काल कोण बघतय केस मोठे आहेत का नाही... मस्त कट करुन घे... तुला आवडतं ना .. मग तर झालच...

अनिश्का,मोकिमी.. ऑफ कोर्स येस्स .. मी त्याला नेहमी हेच बोलते.. नाहीतर असा प्रश्न की नवरा वाढ्वेल का केस मी सांगितल म्हणुन? मग काही उत्तर देतच नाही तो Happy

तसंच असतं ते...मी पण फेस केलं आहे त्यामुळे कळतंय.......अजुन पण कापायचे आहेत पण नवरोजी रेडी नाहीतः(

काय हसले वाचून. Lol
बन्जारा, फ्रॉक्स, चनिया चोली. सगळे अवतार केले होते लहानपणी. मैत्रीणीकडे अभ्यासाला जाताना सुधा बंजारा घालून गेल्याचे आठवते आहे. आणि बाकीच्यांना काय वाटायचं ते वाटो आम्हाला मैत्रिणींना मात्र आपण भयंकर सुंदर माधुरी, आयेशा जुल्का वगैरे असल्यासारखं वाटायचं. आता आठवून पण भयंकर वाटतं. Proud कॉलेजात मात्र (ज्युनियर ला )फ्रॉक्स आणि नंतर स्कर्ट्स आणि जीन्स सोडून बाकी उद्योग केले नाहीत. स्कर्ट्स चे मस्त कलेक्षन होते माझ्याकडे. आईबाबा दोघेही आणायचे. ते आत्ता सुद्धा छान वाटतील (३ इंच कमी झाले तर) Happy
अनिश्का तो तु टाकलेला रॅप अराऊंड सेम आहे माझ्याकडे. पण जाड दिस्ते जरा मी त्यात. Sad
फॅब चे छान दिस्तात. स्क्विरल कट तर एकदम.

Pages