फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कॉलेजात होते तेव्हा स्पगॅटी टॉप आलेच नव्हते इथे. जगातली डबडीएस्ट फॅशन माझ्याच कॉलेजच्या काळात एकवटलेली होती.
लेगो मटन स्लीव्ह्ज वाले तंबू ए लाइन ड्रेसेस, त्याखाली टांगा होणार्‍या सलवारी, केसांची सागर वेणी, हातात रामायण किंवा महाभारत बांगड्या............
यक्क यक्क यक्क!!!

पेरू इन माय ओपिनियन बांधा घोटीव असेल आणि कंबर(अगदी) ३४ पर्यंत असली तरीमग स्कर्ट्स चांगले दिसु शकतात.

नी अगं ती फॅशन परत यायला निघालीय ....... <<
सध्या लेट ८०ज येतायत. ते संपले की मग ९०ज.

11.jpg

सध्या लेट ८०ज येतायत. >>>>>>>>. सही.... Happy ट्रायल अ‍ॅन्ड एरर करायला मज्जा येइल

तसं तर लेगोमटन स्लीव्ह्ज रोमँटिक कालखंडात मग आर्ट नुव्हो काळातही होतेच की.
पण लेट ८०ज आणि अर्ली ९०ज मधे त्यांचं जे वांगं केलं होतं त्याला तोड नाही. विशेषतः देशी ड्रेसेसमधे आले की भयाणच दिसायचे.

सेम तू बेल स्लिव्हज.. काही बाह्याप्रकारांसाठी विशिष्ट पोत असलेलं कापडच हवं. मुली फॅशन म्हणलं की सरसकट कोणत्याही कपड्याचं काहीही करून घालणार. कोणा एके काळी (अजूनही कधीकधी) मी अपवाद नाही Proud

विशेषतः देशी ड्रेसेसमधे आले की भयाणच दिसायचे.>>.. खरं आहे...पण आता आले तर मला आवडेल....आता बर्यापैकी सुधारणा झाली आहे.....

बॅट्विंग स्लीव्ज मला आवडतात पण ते टॉप्स पोटाला टाईट असल्यामुळे घालायची इच्छा होत नाही.....शेप दिसतो ना Wink

हा करते

Happy

वॉव.. छान आहे हॉट पँट्स.. मायक्रो मिनी दिस्तीये Wink

' लेगो मटन स्लीव्ह्ज वाले तंबू ए लाइन ड्रेसेस,'.. नी>>> मेले हसून हसून............ कित्ती कित्ती नॉस्टेल्जियालँड मधे घेऊन गेलीस................ हाहाहा!!!!!!

लेगॉफमटन.. घालण्यापेक्षा खायला छान लागतात.. Proud

अर्रे ये रामायण,महाभारत बांगड्या म्हंजे क्वाय??? प्लीज एक्स्प्लेन...

दक्षी.. मुमताज स्टाईल छान दिसेल तुझ्यावर.. शॉर्ट ,टाईट्टं कुडता आणी घट्ट्ट्ट्ट चुडीदार.. ओढणी गळ्यात लपेटलेली...

मेटलच्या बांगड्या मिळतात ना हल्ली काचेसारख्या दिसणार्‍या.
त्यातलाच अत्यंत लो क्वालिटी मल्टिकलर प्रकार ज्यावर खडी लावलेली असे. भंगार एवढंच म्हणता येईल.

नी +१०० ,सगळ्या लांब/ मोठे केस वाल्या मुलींमध्ये मी ऑड गर्ल आऊट होते Angry , जीन्सचे फिटींग बकवास असायचे, टॉप्स बेल स्लीव्हजचे, ड्रेसेसमध्ये सुद्धा मिनी अनारकली टाईप स्टाईल होती, ए लाईन कटचे ड्रेसेस शिवून घ्यायला लागायचे, केवळ तेव्हढेच मला आवडायचे. ना कुर्तीची फॅशन, ना लेगिंग्ज . छ्या... फुकट गेली ती वर्षे Proud

ओ अच्छा!!! अर्र्र या बांगड्या खरोखरी वाईट्ट दिसत..
मला अजूनही काचेच्या बांगड्या खूप आवडतात.. त्यांचा आवाज भलताच रोमांटिस.. Happy
संपदा.... आई गं... Rofl

Pages