महिलांनि स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?

Submitted by प्रिया७ on 18 December, 2012 - 11:06

गेले २ दिवस दिल्लीच्या रेपची माहिति वाचण्यात येत आहे. आजकाल बर्‍याच कारणाने महिलांना उशिरा पर्यंत घराबाहेर राहावे लागते. किंवा बाहेरगावी सुद्धा एकटे रहावे लागते. काहि सिंगल पेरेंट सुद्धा आहेत. अशा वेळी एकटे राहाणार्‍यानी घरि आणि घराबाहेर काय खबर्दारी घ्यावी? असा धागा असेल तर हा उडवुन टाकेन.

कवठीचाफा | 26 December, 2012 - 10:14
साडेतीन-चारवर्षे सेल्फ डिफेन्स अ‍ॅकेडमी नावाच्या संस्थेसोबत लहान काळाची शिबीरं झाली त्यात ज्या गोष्टींचे ट्रेनिंग दिले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी. केवळ स्त्रियाच नाही पुरूषांनाही उपयोगी पडू शकतील अश्या.
१ ) कधीही समोरच्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर प्रतिकारापेक्षा माघार घेणं उपयुक्त अर्थात याचा अर्थ थेट पळायला सुरूवात करणं असा नाही, यात तुम्ही दमाल आणि आयतेच हाती सापडाल.
२ ) सर्वात आधी परिस्थिती/वातावरणाचं बारकाईनं निरीक्षण करत रहायला हवं अनेकदा संभाव्य धोका लक्षात येतोच.
३ ) समोरच्या व्यक्तींमधल्या म्होरक्या किंवा लिडरकडे आधी लक्ष द्या, (काही सेकंदातच तो लक्षात येतो ) आपलं पहिलं लक्ष्य त्यालाच करा. आता कसं ? ते पुढे
४) पायात जर हिल्स असतील तर त्यांचा आघात गुडघ्याच्या बाजूच्या भागावर करा, लक्षात घ्या संवेदनशील भागावर हल्ला होणार या तयारीत समोरची व्यक्ती असते तीथे प्रहार वाया जाईल. गुडघ्याचा बाजूचा भाग हा देखील विक पॉइंटच असतो तिथला मार सहन होत तर नाहीच पण त्यानंतर काहीकाळ पायही टेकता येत नाही.
५ ) डोळे हा अतिमहत्वाचा भाग त्याला लक्ष्य करा
६ ) पेन, डोक्यातली क्लिप ही उपयुक्त हत्यारं आहेत त्यांचा वापर करा, यांच्यासाठी हाताचा कोपराजवळचा भाग, तळहाताचा मागचा भाग, कान, त्याच्या मागच्या सॉफ्ट टिश्युज यांना लक्ष्य करा
७ ) पाठीमागुन पकड घातल्यावर ताबडतोब हताश होऊ नका ( सामान्यपणे इथेच आपण गडबडतो ) पायाच्या टाचेचा आघात मागच्या व्यक्तीच्या पायाच्या नडगीवर करा आथवा हातातला पेन, पीन मागच्या व्यक्तीच्या कानाच्या आसपास मारा.
८ ) दातांचा वापर करा मात्र हात किंवा दंड यांच्या बाबत माणूस सहनशील असू शकतो, त्यांचा वापर कान आथवा मानेवर करा.
९ ) दगड हे उत्तम शस्त्र आहे, अंतर मिळालं तर हमखास वापर करा
१० ) हे सगळं करण्यासाठी, मनात बेडरता आणि क्रूरता येण्याची गरज आहे त्याचसोबत सवयही लागण्याची गरज आहे. शक्य झाल्यास कुणीतरी पार्टनर घेऊन नॉनफेटल प्रॅक्टीस करा.
११ ) प्रतिकार करायचाच आहे याची खूणगाठ बांधून शरीर शिथील ठेवण्याची सवय करून घ्या.

उदयन.. | 18 December, 2012 - 22:15
चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही. >>>>>>>>>> इथेच चुकतात तुम्ही......एक ब्लेड नाहीतर लहानसा धारधार चाकु ठेवा..... असे काही झाल्यास लगेच मारा.......तेही जोरात.... परत कुणाला हात लावणार नाही

सामोपचार | 18 December, 2012 - 22:17
उदयनजींना अनुमोदन.......हल्ली लहान नेलकटरसारखी अवजारे असतात ती जवळ ठेवावीत. पटकन काढून भोसकायला बरी पडतात.

स्मितू | 18 December, 2012 - 22:57
मी उदय च्या मताशी सहमत आहे.... ...ट्रेन मध्ये... बसमध्ये प्रवास करतांना महिलांना ,मुलींना आश्या बर्‍याच प्रसंगांना तोंड द्यावे लागते आश्या वेळेस मुलींनी.... आपल्या जवळच्या सेफ्टी पिन चा वापर करावा.... पुरुषाच्या घाणेरड्या हालचाली लक्षात आल्या की लगेच बारिक पिन टोचायची...बरोबर चुपचाप बसतो तो.... ब्लेड, चाकु हे हत्यार जरा जास्तच होते..
शक्य्तोवर रात्रीचा प्रवास एकटीने टाळावाच... खुपच अर्जंट असेल तर सोबत कोणाला तरी घ्यावे...

mansmi18 | 19 December, 2012 - 03:12
पेपर स्प्रे मधे पेपरच असायला हवा का? हौ अबाउट सल्फ्युरिक अ‍ॅसिड?
असे काही चाळे करणार्‍यावर महिलानी अ‍ॅसिड का टाकु नये? एक दोन लोकाना या अ‍ॅसिडचा प्रसाद मिळाला की पुढे अशी काही विकृत इच्छा असणारे पुरुष असे काही करण्याआधी शंभर वेळा विचार करतील.

swanand_ml | 19 December, 2012 - 16:42
मला तात्वीक चर्चेत रस नसल्याने फारसे प्रतीसाद न वाचता प्रतिसाद देत आहे तरी माफी असावी.
महिलांसाठी स्वसंरक्शणावर दोन शब्द लिहु इच्छीतो.
ज्याला जगायचे आहे त्याला झगडावे लागेलच.
महिलांनी शस्त्र बालगण्यावर येथे चर्चा झाली. मला स्वताला ह्या दोन गोष्टी आवडतातः
http://en.wikipedia.org/wiki/Karambit
http://en.wikipedia.org/wiki/Push_dagger
लपवीण्यासाठी सोपे, हाताळण्यासाठी सोपे व हिसकावून घेण्यास अवघड. इंटरनेट वर उपलब्ध.
केवळ शस्त्र आहे हे पुरेसे नसते. ते हाताळन्याची व वापरण्याची मानसीकता असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशीक्शण गरजेचे आहे.
बंगळुर वासी येथे जवु शकतातः
http://kravmagabangalore.in/
मुम्बई: http://www.kravmagaindia.in/locations/mumbai
दिल्ली: http://www.kravmagaindia.in/locations/delhi
वरील प्रशिक्शण केंद्रे शस्त्रप्रशिक्शणाची नसून संरक्शण प्रशिक्शण केन्द्रे आहेत ह्यची नोन्द घ्यावी.
बहुत काय लिहणे. आपण सुज्ञ असा.

दिनेशदा | 21 December, 2012 - 05:52
मीही जसे सुचेल तसे लिहित जातोच. एकटे घराबाहेर पडल्यावर, जर कुठल्याही असुरक्षित भागातून जात असू तर अगदी नियमित रित्या घरच्या व्यक्तीला किंवा सहकारी व्यक्तीला फोन करुन आपला खरा ठावठिकाणा कळवत राहणे हा एक उपाय सुचतो मला.
संध्याकाळच्या वेळी आपल्या परिसरातील कुठलाही भाग एकाकी राहणार नाही, याची काळजी. घरी असणार्‍या किंवा जेष्ठ व्यक्तीनी घेतली तरी चालेल. अशा भागात गटाने ऊभे राहून चर्चा करावी, जाग राखावी.
घरीच कंटाळत कण्हत राहण्यापेक्षा. बसस्टॉपवर / नाक्यावर जाऊन ऊभे राहिले तर काय वाईट ?
पुर्वी आमच्या कॉलनीत यायला अंधारा रस्ता होता. त्यावेळी एखाद्या व्यक्तीला उशीर होत असेल, तर घरची माणसे रस्त्यावर जाऊन थांबत असत. तसेच कुणी एकटा माणूस असेल, तर तो सोबत मिळेपर्यंत हायवेवरच थांबत असे.
ज्यांची कामाला जायची जागा निश्चित आहे त्यांनी यायच्या जायच्या वेळी गटाने आणि तेसुद्धा स्त्री आणि पुरुष अशा मिश्र गटाने शक्यतो प्रवास करावा. जर यायच्या जायच्या बस किंवा गाड्या ठराविक असतील, तर
सहप्रवाश्यांशी मैत्री करावी. एखादा सहप्रवासी नेहमीच्या वेळी दिसला नाही तर चौकशी करावी.

नीधप | 21 December, 2012 - 08:28
प्रतिकार करा हा उपाय व्यवहार्य नाही <<<
सतत शक्य नाही. हपिसला/ कॉलेजला जाताना, घरी परतताना... रोजचे रोज
एखाद्या दिवशी केला जातोच.
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.

Kiran.. | 21 December, 2012 - 08:50
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.
+
()महिला जागृतीसाठी अभियान निर्माण करणे : राज्य / राष्ट्रव्यापी अभियान आणि त्याच्या गाव/तालुका/जिल्हास्तरीय समित्या यातून कायमस्वरुपी जागृती घडवून आणणे. यात स्वयंसेवी संस्था / सरकारी संस्था / खाती यांचा समन्वय साधलेला असावा. कार्यकर्त्या निर्माण करून घराघरापर्यंत जागृतीचे अभियान न्यायला हवे.
* ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी परिसंवाद / वर्कशॉप्स राबविणे. माध्यमप्रतिनिधी / पोलीस / न्याययंत्रणा यांच्या प्रतिनिधींनाही सामान्यजनांबरोबर सहभागी करून घेतल्यास लोकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातल्या अडचणी याबद्दल देवाण घेवाण होऊ शकेल.
* महिलांविषयक गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना व्हावी यासाठी पाठपुरावा करणे.

आहना | 21 December, 2012 - 08:46
१. पेपर स्प्रे बाळगणे>>> पेपर प्रे उपलब्ध नसल्यास पर्स मधे डिओड्रन्ट वापरा

उदय | 21 December, 2012 - 09:01
(अ) प्रसंगावधानता दाखवणे महत्वाचे आहे. १९९८, दिल्लीच्या DTC मधेच एका युवतीवर असाच प्रसंग आलेला होत, पाच लोकांशी सामना करत सुटका केली... पुढे कोर्टाने गुन्हेगारांना शिक्षाही दिल्यात.
थोडा कमी पणा आला तरी चालेल, पण 'पाच लोक' टवाळी करत आहेत, तर तेथे हुज्जत घालण्यापेक्षा सटकणे महत्वाचे. माघार घेण्यात कमीपणा कधिच नसतो...
युक्ती (थोडे डोक) आणि बळ असा समन्वय साधल्यास घटना कमी घडतील.
(ब) सर्वात महत्वाचे असे प्रसंग अगदीच अनोळखी लोकां कडुनच होतात हा गैरसमज काढुन टाकणे. बहुतेक प्रकारांत ओळखी किंवा नात्यामधिलच व्यक्ती असतात. वर अनेकांनी सुचवलेल्या उपायांत हा मुद्दा मला दिसला नाही म्हणुन लिहावेसे वाटले.
दर दिवशी जरी त्याच व्यक्तीसोबत प्रवास करत असाल किंवा कामा निमीत्त संपर्कात येत असलांत, तरी प्रत्येक क्षणी सतर्क राहुन "उद्देशांत काही बदल झालेला नाही आहे नां?" हे तपासायला हवे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणि काम करत आहेत, कामा निमीत्त प्रवासाला सोबत जावे लागणार आहे... सावध आणि सतर्क रहाण्यात काहीच हरकत नाही.
(क) प्रसंगावधानता मधे गाड्यांना (मग ऑफिसची असेल किंवा सार्वजनिक वहान असेल) पारदर्षक काचा नसतील तर प्रवास करायला चक्क नकार द्यायचा. सार्वजनिक वहानांना कशासाठी हवेत टिंटेड काचा किंवा पडदे ?

प्रिया७ | 21 December, 2012 - 16:12
ब्राईट एलईडि फ्लॅश लाईट जो वेळ प्रसंगि कामी येतो सरळ डोळ्यात मारता येतो,सेफ्टि पिन,सेल फोन वर (९११) किंवा ईमर्जन्सि नंबर स्पीड डायल ला सेव्ह करुन ठेवणे, पेपर स्प्रे नसेल तर छोटि परफ्युम बाटलि सुद्धा वापरता येते, फेसबु़क वर कुठे जात असाल तर त्याची माहिति न टाकणे किंवा Laxmi (कसे लिहायचे मराठित) पुजन चे दागिन्यांसकट फोटो न टाकणे,कुठे एकटे असतांना कानात हेड्सेट घालुन ठेवु नये,गाडि चे रिमोट लॉक गाडिजवळ जावुनच उघडणे,गरज पडल्यास खोटे बोलणे,रात्रिच्या वेळि एकटे असाल तर कोणाला दया दाखवायच्या आधि/ मदत करायच्या आधि २-३ दा विचार करा .

मुंगेरीलाल | 23 December, 2012 - 00:51
एक साधा आणि परिणामकारक उपाय म्हणजे एक जोरदार, तीव्र आवाजाची शिट्टी (पर्समध्ये अथवा किचेन म्हणून) जवळ बाळगणे. कुठलाही गुन्हेगार (किंवा त्यांचा समूह) एका क्षणात दचकतो आणि तुम्हाला सुटका करून घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. शिवाय हे शस्त्र नसल्यामुळे जवळ ठेवण्याला कुठली परवानगीही लागत नाही आणि वापरायला कसलं कौशल्यही लागत नाही.

अश्विनीमामी | 23 December, 2012 - 03:12
एक गोष्ट मला लक्षात आली, मुली, स्त्रीया ऑफिसला जातात किंवा घरी उशीरा येतात. तर आपला हपीसचा मजला आणि ग्राउंड फ्लोअर, कँतिनचा फ्लोअर हेच सहसा माहीत असते. घरीही तेच. ग्रा. फ्लो आणि आपला मजला. व्यतिरिक्ग आपली बिल्डिंग कशी दिसते आपल्याला माहीत नसते. सवडीने, फुल प्रकाशाच्या दुपारी पूर्ण बिल्डिंग/ ऑफिस काँप्लेक्क्ष , खास करून पार्किंगची जागा ह्याची माहिती करून घ्यावी. नजर सरावलेली असावी. फोटो काढून जागांची माहिती करून घ्यावी. प्रत्येक जागी आडोसे, अंधार्‍या जागा, उंचावरून मुलीला फेकून देता येइल अश्या जागा विशेषतः पार्किंग मध्ये खूप आढळतील. त्या अवगत करून घ्याव्यात. मैत्रिणींना, घरच्यांना सांगावे बोलावे ह्याबाबत. बरेचदा पहाटे किंवा रात्री आपलीच बिल्डिंग अनोळखी भीती दायक जागा बनू शकते. अ‍ॅटॅकरला तेच हवे असते. तो तुमचा गैरफायदा घेण्यास पूर्ण समर्थ असतो. फोनवर इमर्जन्सी नंबर आधीच देऊन स्पीड डायल वर ठेवावा. आयत्यावेळी कोणाला फोन करावा असे व्हायला नको.
पोर्टेबल टेसर सारखे उपकरण पर्स मध्ये असावे. बॅटरी नक्की. मुली फ्लॅट मध्ये राहात असतील तर शक्य असल्यास एक कुत्रा नक्की पाळावा. हे मी विनोदाने आजिबात लिहीत नाही. त्यासारखे संरक्षण नाही.
पुरुषांना त्याची भीती नक्की वाट्ते.
बिनओळखीच्या पुरुष व स्त्रीयांशी आजिबात बोलू नये. लिफ्ट मध्ये खास करून.
वॉचमन ला पण आपल्या जाण्या येण्याच्या पॅटर्न ची माहीती फार देऊ नये. रिक्षा वाले टॅक्सीवाले कधे कधी फार बोलतात त्यांना उत्तेजन देऊ नये. इथे किती पटेल माहीत नाही पण शहरांमध्ये सर्विस इंडस्ट्री जसे वाहन चालक, वेटर, वॉचमन ऑफिसातील प्यून्स वगैरे बाहेरच्या राज्यातून आलेले एक्टे
पुरुष असतात. एकाच रूटीन कामात अडकलेले, जास्तीच्या तासांचे काम करून वैतागलेले असतात.
बायको गावी त्यामुळे ..... पण त्यांना आपली मानसिकता समजेल अश्या भ्रमात राहू नये. स्त्रीवाद वगैरे तर दूरची गोष्ट.

सुमेधाव्ही | 29 December, 2012 - 08:02

आमच्या ऑफिसमधे मध्यंतरी एसीपी पुणे यांचे भाषण झाले होते त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या खालीलप्रमाणे, (भाषण साधारणपणे हिंजवडी परिसरात काम करणार्‍या महिलांची सुरक्षा असा असल्यामुळे नयन पुजारी केसच्या संदर्भात होत्या पण त्या सगळ्यांनाच उपयोगी पडतील त्यामुळे आठवेल तसे लिहिते आहे.)

पुणे पोलीस, फोन नं फक्त १०० एवढाच नाहीये. १०० नं लक्षात रहाण्यासाठी उत्तम पण इथे काहीही+ सर्व कंप्लेंट्स येत असतात त्यामुळे हा नं दर वेळेस लागतोच असे नाही. त्यामुळे इतर नं पण माहीत हवेत. ते मोबाईलवर सेव्ह केलेलेही हवेत.
पोलीस कं रुम. १००, २६१२२०२, महिला/ बाल हेल्पलाईन - २६०५०१९१ क्राईम अ‍ॅलर्ट -२६११२२२.
हे नं दिवाळी किंवा कोणत्याही निमित्ताने शुभेच्छा संदेशाबरोबर एकमेकांना वारंवार समस करून पाठवले म्हणजे मग ते आपोआप सेव्ह होतात व सेव्हड रहातातही.
(वि.सु. पोलीसांशी बोलताना मराठी लोकांनी मराठीतच बोलावे, कारण पुण्यातले जवळपास सगळे पोलीस पुणे परिसरातले व मराठी बोलणारे आहेत. इंग्लीशला ते कधीकधी बिचकतात व मग संभाषण नीट होऊ शकत नाही.)
अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागु नये. सार्वजनीक वहान सगळ्यात सेफ.
काही जणींना कॅबमधून यावे लागते ती कॅब जरी कं ने पुरवली असेल तरी ती बाहेरील एजन्सीकडून आणलेली असते त्यामुळे सजग रहावेच लागते. कॅबमधे बसल्यावर "रोज"सगळ्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात घरी एक फोन करायचा. त्या फोनमधे कॅबचा नं तुम्ही उच्चारुन अमुक अमुक कॅबमधून तुम्ही प्रवास करत आहात व आत्ताचे तुमचे लोकेशन सांगायचे व अजून कीती वेळ घरी पोचायला लागेल त्याचाही उल्लेख करायचा. (जर का मोबाईलमधे बॅलन्स नसेल, किंवा रेंज येत नसेल तरी हा फोन खोटा खोटा असायलाही हरकत नाही. तेवढे अ‍ॅक्टींग जमवायचे स्मित
"कायम" हो हो...कायम्...कधीही जोरात पळता येउ शकेल असेच बुट्/चपला/कपडे असावेत. म्हणजे उंच टाचांचे बुट वगैरे ऑफिसात किंवा ऑफिसच्या पार्टीजना जिथे तुम्ही एक्ट्या जाणार आहात तिथे नकोत.
आर्थिक व्यवहारांची, घरगुती भांडणे, भानगडींची चर्चा कॅबमधे नकोच. इथे रोज अ‍ॅलर्ट रहायला हवेच.
बरेचसे कॅब ड्रायव्हर हे युपी एमपी मधील खेड्यांमधून आलेले असतात जिथे बायका त्यांच्या दृष्टीसही फारश्या पडत नाहीत. त्यामुळे शहरातल्या कॉन्फिडन्ट, पैसे मिळवणार्‍या, स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करणार्‍या व स्वतंत्र विचारांच्या बायकांबद्दल त्यांना असुया वाटते. अनेकदा त्यांचा इगो दुखावल्यामुळे सुडापोटी पण बलात्कार केले जातात. त्यामुळे शक्यतो ह्या लोकांशी हुज्जत न घालणे, जेवढ्यास तेवढे बोलणे, जास्त माहीती शेअर होणार नाही हे पहाणे हे महत्वाचे. काही मुली कॅबमधे बसल्या की घरच्यांशी जे काही बोलतात त्यातून बरीच माहीती दुसर्‍याला मिळते आहे हे त्या विसरतात.
एटीएम मधे दर शुक्रवारी पैसे काढणे, एकाच एटीएम मधून पैसे काढणे असे करू नये...बदलत रहावे. थोड्क्यात म्ह़णजे प्रेडीक्टेबल राहू नये. बर्‍याच जणी जाता जाता २ मि. थांबायला सांगून एटीएम मधून पैसे काढतात.
एकटीदुकटी मुलगी/स्त्री रात्री कारमधून घरी परत जात असताना जर गाडी बंद पडली, तर आड रस्त्यावर असाल तर गाडीतून बाहेर पडण्यापेक्षा पोलीसांना फोन करावा. रात्री त्यांच्या मोबाईल व्हॅन्स हिंजवडी परिसरात गस्त घालतात. (त्यांचा सेल नं पण आहे) त्या दहा मिनिटात मदतीसाठी पोचू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरुंधती कुलकर्णी यांनी मराठीत लिहीलेल्या पोस्टमधली भाषा ही सर्वांना अपील होणारी आहे. दुस-या पोस्टमधे je काही इंग्लीशमधे आहे , ज्या कुणी तयार केलेल आहे ती व्यक्ती एकतर अत्यंत उद्धट, मानसिक रुग्ण किंवा पुणेरी असली पाहीजे. पुण्यात जरा साईड देता का म्हणण्याऐवजी डोळे फुटले का असं विचारलं जातं. सौजन्याने विचारलं तर ज्याला साईड द्यायची आहे तो देईलच. ज्याला नाहीच द्यायची तो दुसरा प्रश्न विचारल्यावरही देणार तर नाहीच उलट चांगली मरम्मत करेल बॉडीची. पुणेरी लोक पण असे कि अशा मवाल्यांना मात्र प्लीज वगैरे म्हणतील. जिवाची भीती अन काय. त्या वेळी कसं सगळं शहाणपण सुचतं ?

या पोस्ट वाचल्यावर वाटतंय कि अरे रोज गेला बाजार एकतरी बलात्कार आपल्याकडून झालेला असला पाहीजे. मग आठवत कसं नाही ? हे सगळं स्वतःचा मुलगा, वडील, नवरा, नातू, भाऊ यांना त्या बाईने पाठवला का हे कसं समजणार ?

Mr.बैल छाप जर्दा -Tumhala prtek post cha kahi na kahi problem asto ka ? Arundhatichya post madhe nemka kay arth aahe to samjala ka ? ka aapan nava prmanech aahat ?
Puneri mansanwarti kay tumchi jati dushamni wagaire aahe ka ? pretek weli puneri puneri kay ahe ?

माफ करा.

माझ्या आजूबाजूला जी पुरुषमंडळी आहेत त्यातले ८०% सुसंस्कृत आहेत याची खात्री आहे. त्यांना बलात्कार म्हणजे काय याची माहिती आहे. ते घराबाहेर पडल्यापासून दिसली बाई कि कर बलात्कार, दिसलं सराफाचं दुकान कि लूट, दिसला शत्रू कि कर खून असं वागत नाहीत. यातले जे पुरुष हट्टेकट्टे आहेत ते छेड काढताना कुनी दिसला रट्टे दिल्यावाचुन रहात नाहीत. त्यांना हे सांगणं उर्मटपणाचं वाटतंय. ज्यांच्या आजूबाजूला असे पुरूष वावरतात त्यांच्यासाठी हे गरजेचं असेल. त्यांना हे पटणारच.

पुणेरी माणसाचा उल्लेख झोंबला ना ?

त्या पत्रात लिहीलंय कि तुम्हाला माहीत असलेल्या प्रत्येक माणसाला हे फॉरवर्ड करा. तुम्ही पाठवलंत का तुमच्या जवळच्या पुरुषांना ? आधी त्यांना पाठवा मग दुस-यांना बोला.

Arundhatichya post madhe nemka kay arth aahe to samjala ka ? >>

tumhi sanga samajavun...

kaa ho yewadhya 400 chya war changlya post pahilyawar sudha kalat nahi,6 diwasa pasun paper wachala tari kalal nahi ,T.V. warchya news baghun hi kahi kalal nahi ? kahi khar nahi baba !
Nemaka kuthe problem aahe???? Baki Punyat Janmalyawar ethech lahanche mothe zalyawar punyala kuni boat dakhawal ki Shivaji rajyani jashi shahiste khanachi boat kapli na laal mahalat tas ti boat kapawishi watat.Shewati Janmbhumi aani karmbhumi cha abhiman aswach lagto ! Tumchi case nirali disate watat.

अल्का किंवा जे कुणी आहे ते.

मानसिक रुग्ण न बनण्याचे पन्नास उपाय तुम्हाला पाठवू का ? तुमच्यासारख्या आयडीबरोबर वाद घालण्यापेक्षा झोपलेलं बरं.

अरुंधती कुलकर्णी यांनी कुठून तरी ते कॉपी पेस्ट केलं आहे. त्या वेळी त्यांना लक्षात आलं नसेल. त्यांना एखादवेळी कसलाच प्रॉब्लेम येणार नाही त्यातली भाषा चुकीची आहे हे अ‍ॅक्सेप्ट करायला. तुम्ही कशाला वाद घालायला आलाय मधेच ? तुमच्या कुठल्या आधीच्या पोस्टबदद्ल मला प्रॉब्लेम आलाय ? काहीच्या काही. तुमचं एकंदर टुणटुणं वाचून तुमच्या पूर्वजांची बोटं छाटली गेली असतील असं वाटतं. नाहीतर महाराजांच्या वंशजांना असली पत्रंं फॉरवर्ड करायची गरज नाही हे तुमच्या बिनडोक टाळक्यात शिरलं नसतं. महाराजांचा उल्लेख तुमच्या तोंडी अपमानास्पद वाटतोय.

कुणी बैल वगैरे भाषा वापरतो तेव्हांच पात्रता लक्षात येते.

तुम्ही स्त्रीच आहात असं समजून ति पोस्ट तुम्हाला पटलि ना ?

PLEASE FORWARD THIS TO EVERY MAN YOU KNOW:

Fifty Ways Prevent Yourself from Being a Rapist:

8. If you see a woman in a parking lot, don't rape her.

9. If you see a woman walking alone at night, don't rape her.

10. If you see a woman in a short skirt, don't rape her.

11, If you see a woman with long hair, don't rape her.

12. If you see a woman walking down a dark street at 4 AM, naked, don't rape her.

13. If you see a woman who is not carrying pepper spray for self protection, does not know karate, does not have a gun, and is not even holding an umbrella to ward you off, still don't rape her.

14. If you see a woman who has a sign on her head that says "I Want Sex", you don't have the right to force sex upon her.

31. Stay away from women.

32. Stay away from little girls.

33. Stay away from boys.

34. Stay away from the human race.

हे पॉइण्टस तुम्ही कुणाला सर्वप्रथम पाठवाल ? बाबा / भाऊ / बहीणीचा नवरा/ मुलगा ? या मुद्यांमुळे त्या पत्राचं गांभीर्य जातंय. जे पुरूष रेपिस्ट आहेत त्यातले खूप जण क्रिमिनल माईंडचे असतात. चान्स मिळताच क्राईम करनारे. त्यांना पाठवणार हे पत्र ? तुम्हाला सांगून किती उपयोग होईल ?

Tumhi yewade panic ka hotay? Hi post tumchya mazya sarkhya samany mansa sathi nahich aahe.Tumhi katrine sangu shakta ka tumchya mazya bajula asnarya asankhy mansan madhe ashi vikrut manse nastilch mhanun.
Jashi ashi vikrut manas aapan patakan olkhu shakat nahi na tasach aapan prtekala nirdosh pan nahi samju shakat.Tya mule hya post madhali prtek waky hey tya mansan sathi aahe ji asha vikrutine pachadleli aahet.
Tumcha mitr,kiwa koni natewaek asa asuch shakat nahi as tumhi khatrine mhanu shakta ka ? karan me tar tashi khatri deuch shakt nahi.Mag hi post jar prtekala pathwali tar apoapch te tya vikruti parent janar na ! Yacha asa pan arth nahi ki prtek wyakti tashich asel ok.Ashi criminal mind manas olkhata aali asti aani tyana ase msg pathun tyanchya madhe changes karta aale aste tar ase gunhe ghadlech naste.Mhanun kahi nahi karta aal tar ha msg forward karun thodi shi janjagruti tari karta yel na ?
I agree ki post madhali bhash thodi tokachi aahe pan je pan aahe te " Saty aahe !"Aani aata nivant Zopa!

बैलोबा, (बैल छाप जर्दोबा)
चिल.
इथे इमोशनल चाल्लंय. दूर रहा.

इमोशनलचा प्रश्न नाही.

जर मानुस विकृत आहे तर त्याला हे पत्र पाठव्वुन उपयोग काय ? यांच्या लक्षात येत नाहि का ? स्वतःच्या वडिलांचा उल्लेख आला कि यांना राग येतो, पुणेरी म्हटलं कि राग येतोय मग एखाद्याला असं पत्रं आलं तर त्याला राग येईल हे समजत नाही का ? कितीही शांत मानुस असला तरी हे असले कुनी शिकवतय म्हटलं तर त्याला राग येईल ना. फोरम मधे ही टाळ्यांची वाक्यं आहेत. जरा विचार करा हे पत्र स्वतःच्या बाबांना पाठवलंत. काय रिअ‍ॅक्शन असेल त्यांची ? तसच हे पत्र जसच्या तस समजुन घ्यायची ज्याचि कुवत आहे त्याला ते पाठवायचि गरजदेखील नाहि. कारन त्याला माहित आहे.

ज्याच्यासाठि ते पत्र आहे त्याच्यासाठि हा उपाय नाहि. बलात्कार हा फक्त त्या इच्छेनेच होतो असं कुनी सांगितलं ? सुडाच्या भावनेनेही होतो. खुन पन त्याच भावनेतुन होतो.

मला नाही जम्त हो लिहायला देवनागरीत एका श्ब्दाला २ मिनिट लागतायत्.पण मी प्रय्त्न करेन हा.! Thanks ! धन्य्वाद !

‍अरुंधती कुलकर्णी,

आपण www.maayboli.com/node/39716?page=9#comment-2481702 या ठिकाणी कापडकवलेल्या (कॉपीपेस्टेड) सूचना प्रत्येक पुरुषास बलात्कारी म्हणून गृहीत धरणार्‍या आहेत.

तुम्ही दिलेल्या लेखाचा जालनिर्देश असा आहे: http://womensstudies.homestead.com/tipsformen.html

त्यातल्या womensstudies या शब्दावर माझा तीव्र आक्षेप आहे. प्रस्तुत समस्या स्त्रीबरोबर पुरुषांचीही आहे. या लेखात (कदाचित पूर्ण संकेतस्थळावर) स्त्रीवादी दृष्टीकोनाचा एकांगी प्रचार केलेला उघड दिसतो.

असला विखार टाळलेला बरा.

आ.न.,
-गा.पै.

@बैल छाप जर्दा यांनी कांहीही कारण नसतांना 'पुणेरी' शब्द आणून धाग्याच्या मूळ विषयाला भरकटवून त्याचा शेवट जवळ आणण्यासाठी प्रयत्न केलेला दिसतो आहे आणि याचा मी [स्वतः पुणेरी नसूनही] निषेध करतो.
अलका यांनी मराठी लिहिण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले याबद्दल धन्यवाद! टायपिंगमधील चुका [विद्वान वगळता] बहुतेकांच्या लक्षात येतात आणि ते मूल भावना लक्षात घेतात. तेव्हा बिनधास्त होऊन मराठीत लिहा.

ते पत्र "मी भास्कर" यांना पाठवण्याचि गरज आहे. अल्का हे त्यांचंच रुप आहे का ?
अल्का यांनि गरज नसताना विषय भरकटवला आहे. जे पुरुष मदतिसाठि किंवा आपलि जबाबदारि ओळखुन आपल्याला काय करता येईल यासाठि इथं येत होते त्यांच्यात आणि स्त्रियांच्यात फुट पाडन्याचा त्यांचा हेतु असावा. त्या स्त्रि असतील तर गामा पैलवान यंनि म्हटल्याप्रमाणे अतिरेक टाळावा आनि नसतील तर हेतुबद्दल शंका आहे. मी भास्कर यांनी शहानपणा इतरांना शिकवू नये.

अकु, अतिशय चांगल्या पध्दतीनं मांडलेले मुद्दे आहेत ते. यातला सरकॅझम डोळ्यांवर आणि विचारांवर झापडं लावून फिरणार्‍या सगळ्या मंदमतींना कळेल अशी आशा करते.

माझ्या आधीच्या पोस्ट् मधील एकच वाक्य नमूद करतो

मी-भास्कर | 19 December, 2012 - 11:39
......................... इथे कांही स्त्रियांनी या विषयाला स्त्री- विरुद्ध- पुरुष अशा वादाचे स्वरूप आणायचा केलेला प्रयत्न अयोग्य आहे.

वाचल्याशिवाय पोस्टी टाकण्याची सवय सोडा अशी विनंती.

"बैल छाप जर्दा" - Good Morning प्लिज आपण जरा भाड्ण विसरुया का?
बस झाल आता !
"मी-भास्कर "-धन्यवाद ! १ दिवसा पुर्विची id असुनही ,चुका समजुण घेतल्या बद्द्ल!

अरुंधती पोस्ट मस्तच. पण वरती जर्द्याने म्हटल्याप्रमाणे जे विकृत आहेत त्याना अशी पत्रे वाचुनही काहीच फरक पडणार नाही आणि जे विकृत नाहित त्याना हे पत्र वाचुन प्रचंड सात्विक संताप येईल.
तरिही घराघरांतून मुलांवर स्त्रियांबद्दल समानतेची भावना ठेवण्याबद्दल शिकवले गेले पाहिजे हेच खरे.

ती वेबसाइट पाहिली. महिलांनी काय करावं याचे ईमेल फॉरवर्ड येत असल्याने त्या बाईने वैतागुन तिला आलेल्या एका पुरुषांनि काय करावं याचं इमेल फॉरव्र्ड दिलय. त्याने काय परिनाम होतिल याची ना त्या बाईला कल्पना ना खन्त. तसच त्या साईटवर योरपियन्स आनि प्रगत देशाच्या कल्चरचा प्रभाव आहे. त्यातल इथं काहीच लागु होत नाही. सगळेच पुरुष बलात्कारी असते तर काय भयंकर परिस्थिती असती याचा काही विचार ? २० टक्के असे असतात असं अनुभवाने म्हणु. त्यात बलात्काराच्या घट्ना (प्रकाशात आलेल्या , आजुबाजुला घडलेल्या) ५% असतील. या लोकांपासुन आपल्या आईबहिणींना धोका आहे हे कुनी नाकारलय ? पण सगळ्यांनि एकत्र येऊन लढा द्यावा असे प्रयत्न चाललेले असताना तुम्ही विकृत आहात असं सांगणं शहाणपनाचं समजायचं का ? इथल्या वादाने समाजाचं काहि भलं होईल कि नाहि माहीत नाही, पण एकत्र तरी यावंसं वाटंल का ?

त्या ईमेल फॉरवर्ड मधे सुरुवातिला प्रस्तावना लिहायचि गरज आहे.
हा ईमेल बलात्कारा विरोधात जागृतिसाठी आहे. तुम्ही जबाबदारीने वागत आहात याची कल्पना आहे. पण माणसाचा स्वभाव पाहता विकृतीला ठेचण्यासाठी आणि जागृतीसाठी आमाला तुमचि साथ हवि आहे. आपल्य माहितीच्या पुरुषांना हा ईमेल फॉर्वर्ड करावा हे नम्र आवाहन आहे.

ही प्रस्तावना दिली तर हेतु साध्य होईल. नाहीतर पुरुषजातीबद्दल असलेला द्वेष बाहेर काढण्यासाठी त्या ईमेलचा अतिरेकी महिलांना उपयोग होईल. ज्याने भारतासारख्या देशात तरी काहीच साध्य होनार नाही कारन त्या बसमधल्या त्या चार बलात्कारी मुलांकडे स्वतःचा इमेल तरी असेल का याची खात्रि देता येत नाहि.

@प्रसादपंत | 19 December, 2012 - 11:35
एक जेन्युइन प्रश्न : फाशी , क्यॅस्ट्रेशन , अ‍ॅम्पुटेशन असल्या गंभीर शिक्षांची जरब बसल्याने बलात्कारासारखे गुन्हे कमी होतील असे किती जंणांना वाटत आहे ?

माझे वैयक्तिक मत : शिक्षेला घाबरुन गुन्हेगार पुरावा नष्ट करणे अर्थात बलात्कारीत स्त्रीला मारण्याचाच प्रयत्न करेल
>>
अहो प्रसादपंत,
शिक्षेला घाबरुन गुन्हेगार पुरावा नष्ट करणे अर्थात बलात्कारीत स्त्रीला मारण्याचाच प्रयत्न करेल नव्हे तर ते तसे करतातच असे दिसते आहे. त्यांना फाशीच्या शिक्षेची भीतीचवाटत नाही. कारण ती होण्याची शक्यता दूर आणि झालीच तर त्यातून जीवदान मिळण्याची खात्रीच असा अलिकडचा इतिहास आहे.
पण म्हणून कायदे नकोतच का? कायदे रग्गड आहेत. त्यांच्या अंमलबजावणीत वांधे आहेत आणि लूपहोल्स पण! फाशी रद्द करण्याचा राष्ट्रपतींच्या अधिकाराचा दुरूपयोग हे कायद्याला लोक घाबरत नसल्याचे मोठे कारण आहे.

अरेरे.... ३-४ दिवस वाचतीय मी.... किती भरकटवाल एखादा धागा (अर्थात विषयाला धरुन असणार्‍या काही निवडक पोस्ट सोडून)!
आता "धाग्याला सुरक्षित कसे ठेवावे" अश्या एखाद्या धाग्याची गरज आहे.... अर्थात तोही भरकटेलच म्हणा Wink

एक साधा आणि परिणामकारक उपाय म्हणजे एक जोरदार, तीव्र आवाजाची शिट्टी (पर्समध्ये अथवा किचेन म्हणून) जवळ बाळगणे. कुठलाही गुन्हेगार (किंवा त्यांचा समूह) एका क्षणात दचकतो आणि तुम्हाला सुटका करून घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. शिवाय हे शस्त्र नसल्यामुळे जवळ ठेवण्याला कुठली परवानगीही लागत नाही आणि वापरायला कसलं कौशल्यही लागत नाही.

एक गोष्ट मला लक्षात आली, मुली, स्त्रीया ऑफिसला जातात किंवा घरी उशीरा येतात. तर आपला हपीसचा मजला आणि ग्राउंड फ्लोअर, कँतिनचा फ्लोअर हेच सहसा माहीत असते. घरीही तेच. ग्रा. फ्लो आणि आपला मजला. व्यतिरिक्ग आपली बिल्डिंग कशी दिसते आपल्याला माहीत नसते. सवडीने, फुल प्रकाशाच्या दुपारी पूर्ण बिल्डिंग/ ऑफिस काँप्लेक्क्ष , खास करून पार्किंगची जागा ह्याची माहिती करून घ्यावी. नजर सरावलेली असावी. फोटो काढून जागांची माहिती करून घ्यावी. प्रत्येक जागी आडोसे, अंधार्‍या जागा, उंचावरून मुलीला फेकून देता येइल अश्या जागा विशेषतः पार्किंग मध्ये खूप आढळतील. त्या अवगत करून घ्याव्यात. मैत्रिणींना, घरच्यांना सांगावे बोलावे ह्याबाबत. बरेचदा पहाटे किंवा रात्री आपलीच बिल्डिंग अनोळखी भीती दायक जागा बनू शकते. अ‍ॅटॅकरला तेच हवे असते. तो तुमचा गैरफायदा घेण्यास पूर्ण समर्थ असतो. फोनवर इमर्जन्सी नंबर आधीच देऊन स्पीड डायल वर ठेवावा. आयत्यावेळी कोणाला फोन करावा असे व्हायला नको.
पोर्टेबल टेसर सारखे उपकरण पर्स मध्ये असावे. बॅटरी नक्की. मुली फ्लॅट मध्ये राहात असतील तर शक्य असल्यास एक कुत्रा नक्की पाळावा. हे मी विनोदाने आजिबात लिहीत नाही. त्यासारखे संरक्षण नाही.
पुरुषांना त्याची भीती नक्की वाट्ते.
बिनओळखीच्या पुरुष व स्त्रीयांशी आजिबात बोलू नये. लिफ्ट मध्ये खास करून.
वॉचमन ला पण आपल्या जाण्या येण्याच्या पॅटर्न ची माहीती फार देऊ नये. रिक्षा वाले टॅक्सीवाले कधे कधी फार बोलतात त्यांना उत्तेजन देऊ नये. इथे किती पटेल माहीत नाही पण शहरांमध्ये सर्विस इंडस्ट्री जसे वाहन चालक, वेटर, वॉचमन ऑफिसातील प्यून्स वगैरे बाहेरच्या राज्यातून आलेले एक्टे
पुरुष असतात. एकाच रूटीन कामात अडकलेले, जास्तीच्या तासांचे काम करून वैतागलेले असतात.
बायको गावी त्यामुळे ..... पण त्यांना आपली मानसिकता समजेल अश्या भ्रमात राहू नये. स्त्रीवाद वगैरे तर दूरची गोष्ट.

............... जाहीर माफीनामा ....................

मुली, 'आम्हा' ला माफ कर. नाही नाही ......... फक्त 'दिल्लीकांडातील' मुलीला उद्देशून नाही म्हणत. होणारे मुल स्त्री (मुलगी) आहे कळल्यावर गर्भ पाडणारे नराधम, झुंडीने दलित स्त्रियांना विवस्त्र करून, धिंड काढून 'पुरुषार्थ' (?) दाखवणारे गावगुंड, वय ४ महिने ते ७० वर्षे या वयोगटातील कोणत्याही स्त्री ला फक्त मादी समजून बलात्कार करणारे राक्षस ह्यापासून आम्ही कोणी तुला वाचवू शकत नाही म्हणून ही जाहीर माफी.

आम्ही पुरुष, धर्म, अर्थ, काम, मोक्ष हा वेदकालापासून सांगितलेला पुरुषार्थ मानीत नाही नव्या काळानुसार आम्ही त्याची व्याख्या बदलली आहे ( पुरुषप्रधान संस्कृती असल्याने आम्ही म्हणू तीच व्याख्या ), आता पुरुषार्थ म्हणजे भय, भूक, निद्रा, मैथुन असे आहे. काय? जनावरांमध्ये पण हेच असते ? नीट बघ .... तुला आम्ही २ पायांची जनावरे नाही वाटत? अत्याचार झाल्यावर 'सिस्टीम' ला नावे ठेवून, सरकारवर उपदेशांची पिंक टाकली की आम्ही दुसरे 'सावज' सापडेपर्यंत निर्धास्त, फारतर अमेरिकेतून आलेल्या नवीन 'फॅड'प्रमाणे एखादा 'कॅण्डल मार्च'! रोजच्या रगाड्यात कायकाय लक्षात ठेवणार? आद्य ह.भ.प. आबामहाराज म्हणालेच होते की ' बडे बडे शहेरोमे छोटी छोटी बाते होती ही रहेती है '. आमच्या मुलीला गाडी चालवताना 'sidestand' लागून खरचटल की आम्ही specialist गाठणार आणि दुसऱ्यांच्या मुलींना कराटे शिका, खाजगी बस मधून जावू नका असे सल्ले देणार. हो पोरी, तुझ्या बदलत्या वस्त्रशैलीवर टीका करतो आम्ही, बऱ्याचदा चेष्टेने, कधी नापसंतीने, कधी कधी काळजीने सुद्धा. पण, अगं..... अत्याचार करणारे कपडे, केस,वय, बघतातच कुठे? आणि हेच आम्हाला समजत नाही. काय म्हणालीस? तुम्हाला पसंत नसले तरी कपडे, केशरचना या मध्ये बदल करायचे स्वातंत्र्य तुला घटनेने दिलेच आहे त्याला व्यक्तीस्वातंत्र्य का काही तरी म्हणतात म्हणे. 'आम्ही घटना मानणारे सभ्य नागरिक आहोत' असं आम्ही मानतो ( नाही मानलं तर देशद्रोही ठरवतात म्हणे ) पण संस्कृती नावाची काही गोष्ट आहे की नाही? तू आमच्या घरातील असलीस तर तुझ्यावर चिडून, रागावून तुझा निषेध करतो आणि घरातील नसशील (हुश्य...) तर आपली 'भारतीय संस्कृती' कशी लयाला चाललीये ते ठामपणे सांगातो. म्हणजे काय होतं, असे अत्याचार झाले की 'ती मुलगीच तसली होती' म्हटलं की सुटलो. हो, आणि तुझ्यावर अत्याचार काय आजच होतायत का? अहिल्या, सीता, द्रोपदी विसरलीस का सगळे शिकवलेले? हो, पण त्यांना वाचवायला राम, कृष्ण होते तरी. अगं अगदी आपले शिवाजीमहाराज ही त्याबबातीत कठोर शासन करायचे अपराध्यांना! पण ते सगळे शूर पुरुष होते, आम्ही वस्त्रहरणाच्या वेळी नुसत्या बघ्याची भूमिका घेणारे भीष्म, युधिष्ठीर, धृतराष्ट्र ह्यांचेच वंशज ! मुल जन्माला घालण्यातच आमचा मर्दपणा. एवढे विष्णू,शंकर असे पराक्रमी देव असतानाही राक्षसांशी लढायला दुर्गा, भवानी वगैरे स्त्री शक्तिलाच पुढाकार घ्यावा लागला होता ना तसेच आताही तुलाच पुढाकार घेवून ह्या नराधामांशी लढा द्यावा लागेल गं! ते नाही का विदर्भात काही गुंडांना स्त्रियांच्या घोळक्यांनी ठेचून ठार मारले....... अगदी तसेच नाही तरी कायद्याची लढाई तर तुला लढता येईल. आम्ही आहोतच की गर्दी करायला आणि फुकटचे सल्ले द्यायला.

काय करू ग अगदीच हतबल झाल्यासारखे वाटतेय. नराधमांनी तुझी अब्रू नाही लुटली ....... आमचीच अब्रू लुटली गेलीये, आम्ही हातात बांगड्या भरून बसलोय नं म्हणून तुझी जाहीर माफी मागतोय. आम्हाला माफ कर!!
------ तुझाच 'आम्ही' ( झालेला/होणारा/होवू न शकलेला ---- बाप, भाऊ, मुलगा )

<<<<<मामी, प्लीज.. यापुढे आपण अपघात हाच शब्द वापरु या.>>>>>>
दिनेशदा, हेच आपण बदलायला पाहिजे. अपघात चुकुन होतो, बलात्कार हा शब्द कटु वाटला तरी जबरदस्ती आणि मनाविरुद्ध केलेला तो बलात्कार असेच हवे. फारतर अत्याचार म्हणू शकतो.

हा काहि फक्त रेपचा प्रश्न नाहि. त्या मुलीला तीन autoवाल्यांनी auto नाकारली असे प्रार्थमिक चौकशीत पुढे आले.
देशाच्या सिस्टिमला पडलेले भगदाड हा खरा प्रश्न आहे - मग ते कायदा, सुव्यवस्था, पोलिस, सार्वजनिक वहातुक - काहिहि असो.

अमा, उत्तम पोस्ट Happy

मुंगेरीलाल, तुमची युक्तीही चांगली आहे. तिखट, सेफ्टीपिन, पेपर स्प्रे, स्विस नाईफ अशा यादीत भर पडली

अरुंधती कुलकर्णी यांनी कुठून तरी ते कॉपी पेस्ट केलं आहे. त्या वेळी त्यांना लक्षात आलं नसेल. त्यांना एखादवेळी कसलाच प्रॉब्लेम येणार नाही त्यातली भाषा चुकीची आहे हे अ‍ॅक्सेप्ट करायला. तुम्ही कशाला वाद घालायला आलाय मधेच ? तुमच्या कुठल्या आधीच्या पोस्टबदद्ल मला प्रॉब्लेम आलाय ?

------ बैल छाप जर्दा यांच्याशी सहमत... अशा नाजुक परिस्थितीतही धाडस दाखवल्यावद्दल अभिनंदन. इंग्रजीतले cut paste पोस्ट अरुंधती कुलकर्णी यांच्या कडुन आले म्हणुन थोडे आष्चर्य वाटले तसेच दु:खही झाले.

तिरकस भाष समजू शकतो... असे ५० काय ५०,००० मार्गही सुचवता येतील पण त्याने काय फरक पडणार आहे ? असे पोस्ट वाचुन भावी घटना टळतील असे वाटत असेल तर आपल्याला अशा घटनांचे गांभिर्य नाही आहे असे म्हणावेसे वाटते.

अनावश्यक पोस्ट मुळे बाफ भरकटतो आहे याचे दु:ख होते :अरेरे:. भावी घटना कशा टाळता येतील, काय सावधानता बाळगणे गरजेचे आहे आणि दुर्दैवाने अशी एखादी घटना घडलीच तर त्यातील पिडीताला भविष्यात कशा प्रकारे प्रश्नांना सामोरे जावे लागते, समाजाची जबाबदारी काय बनते यावर चर्चा होणे गरजेचे वाटते.

महत्त्वाचे म्हणजे अजाण बालिका कोणावरही विश्वास ठेवतात. १२ वयाखालील. मी कुत्रे चालवायला नेते तेव्हा कायम आंटी आम्ही तुमच्या घरी येतो कुत्र्यांशी खेळायला म्हणून पत्ता शोधून घरीच येऊन धडकतात. आता मी आहे म्हणून ठीक पण कोणी वाइट मानसिकतेचा बाप्या असला तर ह्या अश्यामुली निरागस पणे घरीच आल्यावर काय काहीही होऊ शकते. अगदी मुलीचा फोटो काढणे ही चूकच आहे.
घरच्यांनी थोडे स्ट्रिक्ट होउन काहीतरी ह्या बाबतीत प्रोटोकॉल मुलींना समजावून सांगितला पाहिजे.

मुलींना फिरवणे, त्यांना पटवणे, प्रेगनंट करणे हे किशोरवयीन मुलांचे केआर ए असू शकतात व त्याला मुली फसू शकतात. साध्या डेटवर गेलेल्या १५ वर्शाच्या किशोरीचा, सायकल फिरवणार्‍या मित्रांनी सायकल पार्टस देतो म्हणून लालूच दाखविल्यावर त्यांच्या घरी गेलेल्या १२ वयाच्या मुलीचा खूनच केला गेला आहे. अश्या केसेस याहू वर वाचल्या आहेत. ( उसगावात, यूके मध्ये) पण भारतातही अश्या व याहूनही भयानक केसेस घडत आहेत.

स्वप्नाळू अननुभवी मुलींना आईवडिलानी एकत्र बसून ह्या बाबतीत माहिती द्यायला हवी.
शेजारचे काका, पार्क मधील आजोबा, वर्गमित्र, भावाचे मित्र हेच कल्प्रिट होण्याची शक्यता जास्त असते
हत्यारे वापरून अ‍ॅसिड फेकून मैत्रीण लग्नाला राजी होणार नाही हे समजाविण्यासाठी मुलग्यांना काउन्सेलिन्ग द्यायला हवे. जीव देण्याची, विचित्र, पजेसिव वागण्याची धमकी दिल्यावर मुलगी प्रेमात पड्ते असे टीव्हीवर, सिनेमात नेहमी दाखवितात परंतू ते तिथेच असते. मुलीच्या काँसेट शिवाय नाते पुढे नेऊ नये हे कुठून तरी, शाळेत, कॉलेजात, घरी काउन्सेलिग मिळायला हवे मुलग्यांना.

@अश्विनीमामी
"मुलीच्या काँसेट शिवाय नाते पुढे नेऊ नये हे कुठून तरी, शाळेत, कॉलेजात, घरी काउन्सेलिग मिळायला हवे मुलग्यांना".
>>
सिनेमे आणि सिरियल्समधून काँसेन्ट मिळविण्यासाठी कट कारस्थाने करून वापरलेले नवे नवे मार्ग, निदान कांही काळ तरी त्यांचे यशस्वी होणे इत्यादींमुळे चांगल्या कौसिंलिंगचे तीन तेरा होऊ नयेत याचीही काळजी घ्यायला हवी

@योगी०३०८६८ | 23 December, 2012 - 15:26
............... जाहीर माफीनामा ....................
....................................................................
>>
हा माफीसाठीचा अर्ज चुकून माबोवर आलेला दिसतोय! स्त्रियांनी तुम्हाला माफ काय म्हणून करावे? गुन्हेगारांना फाशीची शिक्षा कायम झालेली असतांना त्यांना माफी दिली गेली तेव्हा गप्प राहिलेल्या स्त्रिया [आता तरी संवेदनशील होऊन] फाशीच्या शिक्षेचा आता आग्रह धरताहेत. त्यांच्या या मागणीला माझा जोरदार पाठींबा.
योगीराज, तुम्ही हा माफीचा अर्ज महामहीम राष्ट्रपतींकडे पाठवा. तेथे तुम्हाला निश्चितच माफी मिळेल.
इथे फक्त घटना होऊ नयेत म्हणून प्रतिबंधक उपाय सुचवा. माफ्या वगैरे मागून धागा भरकटवू नका अशी माझीही तुम्हाला कळकळीची विनंती आहे.

मी-भास्कर, भावना समजवून घ्या साहेब. तुमच्या सारखे तज्ञ आहेतच की प्रतिबंधक उपाय सुचवणारे! मी इथे वाचलेल्या, स्त्रीवर्गाने सुचविलेल्या उपाययोजना बऱ्याच अंशी योग्य आहेत, कदाचित त्यांना आलेल्या अनुभवामुळे असतील. त्यांच्या प्रतिक्रियांचा मी आदर करतो. त्यांच्या वाट्याला काय येत असेल त्याची तीव्रता पुरुषांना कळणे कठीण आहे. मी राष्ट्रपतींना माफीनामा का पाठवावा? मी (अत्याचारी) गुन्हेगार म्हणून माफी मागत नसून स्त्रियांवरील अत्याचार न थांबविता येणारा हतबल (गुन्हेगार) म्हणून त्यांची माफी मागतोय. प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तींनाही (तो पुरुष असला तरी) भावना असतात. त्याचा अनादर तरी करू नका. नाही पटले तर सोडुन द्या.

@योगी०३०८६८ | 24 December, 2012 - 10:49नवीन
मी-भास्कर, भावना समजवून घ्या साहेब. तुमच्या सारखे तज्ञ आहेतच की प्रतिबंधक उपाय सुचवणारे! मी इथे वाचलेल्या, स्त्रीवर्गाने सुचविलेल्या उपाययोजना बऱ्याच अंशी योग्य आहेत, कदाचित त्यांना आलेल्या अनुभवामुळे असतील. त्यांच्या प्रतिक्रियांचा मी आदर करतो. त्यांच्या वाट्याला काय येत असेल त्याची तीव्रता पुरुषांना कळणे कठीण आहे.
>>
सहमत

>> मी राष्ट्रपतींना माफीनामा का पाठवावा? मी (अत्याचारी) गुन्हेगार म्हणून माफी मागत नसून स्त्रियांवरील अत्याचार न थांबविता येणारा हतबल (गुन्हेगार) म्हणून त्यांची माफी मागतोय. प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तींनाही (तो पुरुष असला तरी) भावना असतात. त्याचा अनादर तरी करू नका. नाही पटले तर सोडुन द्या >>

तुम्हीही मी असे जे लिहिले आहे त्यामागील उपरोध समजाऊन घ्यावा.

वैयक्तिक तुम्ही अपराधी आहात असे मला मुळीच म्हणायचे नाही. मी तुमच्याच मताचा आहे. गैरसमज नसावा.

ह्या धाग्यात काही जणांनी खूप चांगले उपाय (प्रतिबंधक) सुचविले आहेत जे कायदेशीर पण असतील - उ.दा. - शिटी बाळगणे, छोटे blade बाळगणे इत्यादी. फक्त त्या उपायांचे(च) संकलन करून एका वेगळ्या पानावर (शिर्षकासहित) देता येईल का? (बाकीची उद्बोधक चर्चा वगळून?)
कोणत्या उपायाचा कोणाला कधी उपयोग होईल (संरक्षणासाठी ) सांगता येत नाही. दिल्ली आता खरच दूर नाही.

आकाश नील
वेगवेगळे उपाय वेगवेगळ्या परिस्थितीत उपयोगी पडू शकतील, त्यामुळे तूमच्याशी पूर्ण सहमत!

न्यायमूर्ती वर्मा समितीनं महिलांच्या सुरक्षेशी संबंधीत गुन्हेगारी कायद्यात दुरूस्तीसाठी सूचना मागवल्या आहेत. आपल्या सूचना ५ जानेवारी २०१३ पूर्वी justice.verma@nic.in या इमेल पत्यावर पाठवाव्यात किंवा ०११-२३०९२६७५ या नंबरवर फॅक्स कराव्यात.

न्या. वर्मा समितीवरील अन्य सदस्य - न्यायमूर्ती लीला सेठ (हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश) आणि श्री गोपाल सुब्रमणियन (भारताचेमाजी सॉलिसिटर जनरल)

चर्चा आणि सूचना यातून फारस काही साध्य होईल अस वाटत नाही,आतापर्येंत किती आंदोलन झाली आणि त्याचे परिणाम सर्वांनाच माहिती आहे, वर्मा समिती काय आणि आनखी कोण केवळ तापलेल वातावरण थंड करण्यासाठी लोकांना नादविण्याचा प्रयत्न आहे,अत्याचारासाठी फाशी ही केवळ अशक्य गोष्ट आहे,आजपर्यंत ज्या प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा सूनाविण्यात आलेली आहे (फक्त सुनाविण्यात आली अंबलबजावणी नाही) त्यामध्ये अत्याचाराबरोबर खून करण्याचा प्रयत्न , खून करणे व इतर गंभीर गुन्हे एकाच वेळी दाखल करण्यात आलेले आहेत व त्यानुसार न्यायलयात खटले चालले आहेत,
अत्याचाराच्या प्रकारात आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी पोलीसांची प्राथमिक भूमिका आणि मेडीकल रिपोर्ट या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.
मेडीकल रिपोर्टमध्ये केवळ त्या घटनेमुळे झालेले तात्पुरते शारिरीक बदल यांचा सामवेश असतो मात्र अशा पीडीत व्यक्तीस कालांतराने काही वेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते ज्यामध्ये मानसिक व जनुकीय सुदधा असण्याची शक्यता असते ,शरेराचे काही भाग कायमचे निकामी होण्याची शक्यता असते या सर्व गोस्टी मेडीकल रिपोर्ट मध्ये आल्यास त्यानुसार आरोपीवर आरोपपत्र दाखल करणे तेवढेच गरजेचे आहे त्यातही वर्दीवाल्यांची भूमिका पारदर्शक असणे गरजेचे.

ABP (स्टार) माझा वर "देशातल्या महिला कशा सुरक्षित होतील?" असे चर्चासत्र सुरु झाले आहे. पहिला भाग आज!

खरंतर ही पोष्ट आधी टाकायची होती पण भरकटत चाललेला बाफ पाहून इच्छाच झाली नाही पण अखेरीस टाकतोच.

साडेतीन-चारवर्षे सेल्फ डिफेन्स अ‍ॅकेडमी नावाच्या संस्थेसोबत लहान काळाची शिबीरं झाली त्यात ज्या गोष्टींचे ट्रेनिंग दिले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी. केवळ स्त्रियाच नाही पुरूषांनाही उपयोगी पडू शकतील अश्या.

१ ) कधीही समोरच्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर प्रतिकारापेक्षा माघार घेणं उपयुक्त अर्थात याचा अर्थ थेट पळायला सुरूवात करणं असा नाही, यात तुम्ही दमाल आणि आयतेच हाती सापडाल.
२ ) सर्वात आधी परिस्थिती/वातावरणाचं बारकाईनं निरीक्षण करत रहायला हवं अनेकदा संभाव्य धोका लक्षात येतोच.
३ ) समोरच्या व्यक्तींमधल्या म्होरक्या किंवा लिडरकडे आधी लक्ष द्या, (काही सेकंदातच तो लक्षात येतो ) आपलं पहिलं लक्ष्य त्यालाच करा. आता कसं ? ते पुढे
४) पायात जर हिल्स असतील तर त्यांचा आघात गुडघ्याच्या बाजूच्या भागावर करा, लक्षात घ्या संवेदनशील भागावर हल्ला होणार या तयारीत समोरची व्यक्ती असते तीथे प्रहार वाया जाईल. गुडघ्याचा बाजूचा भाग हा देखील विक पॉइंटच असतो तिथला मार सहन होत तर नाहीच पण त्यानंतर काहीकाळ पायही टेकता येत नाही.
५ ) डोळे हा अतिमहत्वाचा भाग त्याला लक्ष्य करा
६ ) पेन, डोक्यातली क्लिप ही उपयुक्त हत्यारं आहेत त्यांचा वापर करा, यांच्यासाठी हाताचा कोपराजवळचा भाग, तळहाताचा मागचा भाग, कान, त्याच्या मागच्या सॉफ्ट टिश्युज यांना लक्ष्य करा
७ ) पाठीमागुन पकड घातल्यावर ताबडतोब हताश होऊ नका ( सामान्यपणे इथेच आपण गडबडतो ) पायाच्या टाचेचा आघात मागच्या व्यक्तीच्या पायाच्या नडगीवर करा आथवा हातातला पेन, पीन मागच्या व्यक्तीच्या कानाच्या आसपास मारा.
८ ) दातांचा वापर करा मात्र हात किंवा दंड यांच्या बाबत माणूस सहनशील असू शकतो, त्यांचा वापर कान आथवा मानेवर करा.
९ ) दगड हे उत्तम शस्त्र आहे, अंतर मिळालं तर हमखास वापर करा
१० ) हे सगळं करण्यासाठी, मनात बेडरता आणि क्रूरता येण्याची गरज आहे त्याचसोबत सवयही लागण्याची गरज आहे. शक्य झाल्यास कुणीतरी पार्टनर घेऊन नॉनफेटल प्रॅक्टीस करा.
११ ) प्रतिकार करायचाच आहे याची खूणगाठ बांधून शरीर शिथील ठेवण्याची सवय करून घ्या.

आणखी काही उपाय आहेत पण हे पटले तर पुढे काही....

कवडीचाफा छान मुद्दे... अजुन वाचायला आवडतील.

वर कुठेतरी जोरांत आवाज करणारी शिट्टी हा 'अहिंसक' प्रकारही आवडला. पॅनिक बटन असणारे (दाबल्यावर जोरांत आवाज करणारे.... आणि करतच रहाणारे) मनगटावर किंवा खांद्याला लावायचे आणि सहजरित्या हनुवटिने (हात बंदिस्त असतील तर) दाबता येणारे. काही सेकंद खिळवुन ठेवणे पण उपयोगाचे ठरू शकते...

Pages