सिंहशोकांतिका... अर्थात् सिंहाची शोकांतिका... (एक अत्यंत टुकार गद्यकविता)

Submitted by चैत रे चैत on 4 December, 2012 - 11:48

सिंहशोकांतिका... अर्थात् सिंहाची शोकांतिका...

रानात दूरवर कुठेतरी सिंहाने एक डरकाळी फोडली...
नंतर दुसरी, नंतर तिसरी...
असे करत करत सर्व डरकाळ्या फोडून संपल्या. एकही डरकाळी फोडायला शिल्लक राहिली नाही...
मग त्याने विचार केला की ह्या फुटलेल्या डरकाळ्या जोडून परत फोडूयात.
तेवढ्यात त्याला चौथी 'ई'च्या वर्गातल्या फळ्यावरचा सुविचार आठवला, 'तोडणे सोपे, जोडणे अवघड'
म्हणून तो नाक शिंकरून झोपायला निघून गेला...

-- इतरत्र पूर्वप्रकाशित
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटते यात एक खूप खोल अर्थ दडला आहे...तो सिंह (सिंग नव्हे) समाजाच्या अस्वस्थतेचे प्रतिक आहे..त्याची एक एक डरकाळी ही प्रस्थापित राजकारण्यांविरुद्ध फडकवेले बंडाचे निशाण आहे...
एका पाठोपाठ एक सगळी बंडाची निशाणे उभी करून सुद्धा सिंहाला त्याचे नक्की काय करायचे ते समजत नाही म्हणून त्याला अण्णा गुरुजींनी शिकवलेला धडा आठवतो...
समाजाला तोडणे सोपे आहे...जोडणे अवघड....
त्यामुळे मग तो त्याचे आम नागरिकासारखेच असलेले नाक शिंकरून झोपायला जातो....
नक्की सांगा ही कविता तुम्ही केजरीवाल यांच्यावर रचलेली आहे ना.....

कविता माझ्यामाहितीप्रमाणे केजरीवालांपेक्षा जुनी आहे. कवीवर भविष्यदर्शीत्वाचा आरोप सिद्ध व्हावा काय ?

विनोद (पीजे) धाग्यावरून साभार :

मी_केदार | 11 December, 2012 - 16:14 नवीन

एक सिंहाने जर तीन वेळा डरकाळी फोडली .........
तर त्या नंतर काय होईल......
.
.
.
.
.
.
.
........
तुम्हाला माहित आहे..
.
.
.
.
आठवा....आठवा......
.
.
.
.
अरे simple ....
.
.
TOM & JERRY चालू होईल...

भविष्यदर्शीत्वाचा आरोप सिद्ध व्हावा काय ?>>>>>>>>>>>>>>>>>>
केजरीवाल वरून आठवले ....................
नाँस्त्रेदमस नावाचा एक भविष्यवेत्ता होता (१५-१६ व्या शतकात )त्याने म्हणे म्हटले आहे की भारत महासत्ता होणार आहे २०२० साली !.....तेव्हा भरताचा नायक जगाचा नायक असेल त्याच्या नावात हिन्स्त्र प्राण्याचे नाव असेल सिन्ग वगैरे त्यावरून सिन्ह हा तोच प्राणी असे समजून सिन्ह =केसरी=केजरी (अपभ्रन्श) या न्यायाने केजरीवाल जगाचे नेतृत्त्व करतील की काय कोण जाणे !

नाँस्त्रदमस काय म्हणाला होता ताचा अधिक तपशील इथे पहा .........
http://www.maayboli.com/node/32561

रिक्षा फिरवली आहे हे चाणाक्ष माबोकराना वेगळे सांगणे न लगे Wink

Pages