बोटांच्या ठश्यांद्वारे पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स आणि करीयर मॅपिंग टेस्ट

Submitted by विनार्च on 20 November, 2012 - 06:17

बोटांच्या ठश्यांद्वारे पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स आणि करीयर मॅपिंग टेस्ट" याबद्द्ल काही माहिती आहे का ? कोणी करुन घेतली आहे का ही टेस्ट ?
माझ्या लेकीच्या शाळेत "ब्रेन स्केच सोल्युशन्स" ह्याच्यातर्फे ही टेस्ट करुन घेणार आहेत. फीज आहे ५०००रु...... अजूनतरी नाव नोंदवल नाही आहे...... ह्या टेस्टची विश्वासर्हता (बरोबर लिहीले आहे ??ऑथेनटिसिटी) माहित नाही आहे आणि अशाप्रकारच्या टेस्टची फी इतकीच असते का?

(नितीनचंद्र यांच्या "मल्टीपल इंटेलिजन्स" या धाग्यावर हा प्रश्न विचारला होता पण काहिच उत्तर न मिळाल्यामुळे इथे विचारत आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> पण हे ज्योतिष शास्त्रच किंवा हस्त सामुद्रिकच मुळात काही लोकांनी बांधलेल्या आडाख्यांवर आहे . <<< Lol
हे म्हणजे अगदि अस वाटले की पुण्यातील काहि पेठी पेन्शनर तळ्यातल्या गणपतीचे दर्शन घेऊन म्युन्शिपालटीने ठेवलेल्या बागेतल्या सिमिटाच्या बाकावर अंमळ विसावले अन मग शिळोप्याच्या गप्पा मारता मारता त्यांनी "हे असले आडाखे बांधले" ... Lol Rofl
तर सांगायचा मुद्दा असा की त्या आडाखे वाल्या "लोकांना" ऋषिमुनि म्हणतात, त्यांनी शेकडो वर्षांपूर्वी बांधलेल्या आडाख्यांचे ग्रंथ आत्ताही तुम्हाला नेटवर पीडीएफ मधे मिळू शकतील. Happy
त्यांचे आडाखे खोटे ठरवायचे, तर ते ते ग्रहयोग, त्या त्या घटना, त्या त्या व्यक्ति यांची सांगड घालुन सांख्यिकी अभ्यास करायला हवा. तितका तो करायची कोणाची इच्छा नाही, सोय नाही, उपलब्धता नाही.
त्यापेक्षा हे सर्व खोटे आहे, थोतांड आहे हे बोलणे फार सोप्पे आहे, चालु इनथीम आहे, स्वतःस "पुरोगामी" ठरविण्याचा हुकमी एक्का आहे... नै का? Wink

लिंब्या लिंब्या ऋषिमुनी की रे झालास ? Happy
(बाल्या बाल्या, बालिस्टर की रे झालास च्या चालीवर)

हे मात्र अगदी खरे आहे की बहुसंख्य लोकांना पुर्वसुरींनी सांगितलेल्या मार्गावर जाऊन अभ्यास करायचा नसतो. तेवढा पेशन्स नाही राहिलाय, फार इम्पेशन्ट झाले आहेत लोक.

विवेकानंदांच्या "राजयोग" पुस्तकात सुरूवातीलाच त्यांनी लिहिले आहे की, अध्यात्म, योग, प्राणायाम हे पुर्णपणे वैज्ञानिक आहे. ऋषी मुनी हे याचे वैज्ञानिक होते.
जर तुम्हाला एखाद्या शास्त्रद्नाने काही सांगितले तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवण्यासाठी काय कराल ?
तो प्रयोग त्या शास्त्रज्ञाने सांगितलेल्या स्टेप्सनुसार करून बघाल आणि तसा रिझल्ट आला तर विश्वास ठेवाल.
मग अध्यात्म, योग, प्राणायाम याबाबत असेच आहे. त्याचा अगदी तंतोतंत मनोभावे अभ्यास केल्यास रिझल्टस मिळणारच हमखास. हेच ज्योतिष शास्त्राला देखील बर्याच प्रमाणात लागू आहे.

मग ज्योतिषांनी सी ए लोकांसारखी संस्था स्थापन करावी. परीक्षा घेऊन मेंबरशिप.द्यावी. नियम करावेत. भविष्य चुकल्यास नुकसानभरपाईही द्यावी.

मग अध्यात्म, योग, प्राणायाम याबाबत असेच आहे. त्याचा अगदी तंतोतंत मनोभावे अभ्यास केल्यास रिझल्टस मिळणारच हमखास.
<<
Rofl

विवेकानदांनी सांगितलेलं ज्योतिषालाही लागू होत हे विवेकानंद म्हणताहेत का? की हेही पुलंनी तमसा तटी म्हणलेल्या मनाच्या श्लोकांसारखंच?

मयेकर, चांगली लिन्क आहे. पण मी लिहिलेले तुम्ही निट वाचलेले दिसत नाही. Sad
>>अध्यात्म, योग, प्राणायाम याबाबत असेच आहे. त्याचा अगदी तंतोतंत मनोभावे अभ्यास केल्यास रिझल्टस मिळणारच हमखास.
==> हा भाग राजयोग पुस्तकात आहेच आहे १०१%
>>हेच ज्योतिष शास्त्राला देखील बर्याच प्रमाणात लागू आहे.
==> हे माझे मत आहे आणि त्यात सुद्धा मी "बर्याच प्रमाणात" असे म्हणले आहे, "पुर्णपणे" नाही.

महेश आणि लिंब्याचे प्रतिसाद वाचुन हसावं की रडावं तेच कळत नाही.

लिंब्या लका पुन्यांदा तळतळाट भोवंल आन अ‍ॅंक्झायटीनं आडवा व्हशित.

भम,

तुम्ही अगदी योग्य वेळी व खणखणीत टोले मारता. त्याबद्दल तुमचं जाम कौतुक वाटतं.

पण देवाच्या नावावर छूमंतर करणारी व त्यांना "शास्त्रीयतेचा" मुलामा देणारी लोकं आहेत ही. लहान मुलांना ठोसे मारण्यासाठी एक बिनबुडाची भावली असते ना? तशी. कितीही दणके दिले, तरी परत तेच ते बोलत राहतील..

Pages