बोटांच्या ठश्यांद्वारे पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स आणि करीयर मॅपिंग टेस्ट

Submitted by विनार्च on 20 November, 2012 - 06:17

बोटांच्या ठश्यांद्वारे पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स आणि करीयर मॅपिंग टेस्ट" याबद्द्ल काही माहिती आहे का ? कोणी करुन घेतली आहे का ही टेस्ट ?
माझ्या लेकीच्या शाळेत "ब्रेन स्केच सोल्युशन्स" ह्याच्यातर्फे ही टेस्ट करुन घेणार आहेत. फीज आहे ५०००रु...... अजूनतरी नाव नोंदवल नाही आहे...... ह्या टेस्टची विश्वासर्हता (बरोबर लिहीले आहे ??ऑथेनटिसिटी) माहित नाही आहे आणि अशाप्रकारच्या टेस्टची फी इतकीच असते का?

(नितीनचंद्र यांच्या "मल्टीपल इंटेलिजन्स" या धाग्यावर हा प्रश्न विचारला होता पण काहिच उत्तर न मिळाल्यामुळे इथे विचारत आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनार्चजी,

माफी असावी. माझी या विषयावरची काही वेगळी मते आहेत. हाताच्या बोटावरुन पर्सनॅलीटी समजु शकते यावर माझा विश्वास आहे परंतु हा विषय Dermatoglyphs या सदरात मोडतो. मल्टीपल इंटेलिजन्स शोधण्याचा हा खात्रीशीर मार्ग आहे का याबाबत मी लिहु शकत नाही.

Dermatoglyphs चा हस्त सामुद्रीक ह्या विषयाशी निकटचा संबंध असावा. मग त्याला जोडुन भविष्य हा विषय येतो आणि भविष्य वर्तवता येते किंवा नाही यावर अनेक मते आहे.

हॉवर्ड गार्डनरची मल्टीपल इंटेलिजन्स थेअरी जरी जगमान्य असली तरी भारतात त्याची माहिती फारशी नाही असे माझे मत आहे. त्यात Dermatoglyphs जोडुन आणखी गोंधळाची स्थिती नको म्हणुन मी प्रतिक्रिया टाळत होतो.

याची फी रु ५०००/- आहे हे या साईटवरच लिहले आहे. तुम्हाला हवी असल्यास ह्या साईटची ती लिंक आहे.

http://www.inmuin.com/IMI-centres.html

५००० रुपये टेस्ट साठी ? त्यापेक्षा तेवढ्या पैशात लायब्ररी लावा मुलीला, अन ती स्वतःहून वाचण्याच्या वयाची असेल तर वर्षाला ५० तरी नॉन फिक्शन पुस्तके वाचली पाहिजेत ( आठवड्याला एक पेक्षा कमीच ) अशी अट घाला . एकेका नॉन फिक्शन पुस्तकामागे पाहिजे तितकी फिक्शन वाचू देत.

शाळेचे नाव हे लिहिल्यानंतर पाहिले. शाळेतल्या लोकांशी बोलून पहा. काय माहितीच्या आधारावर ते अशा टेस्टस शाळेत करू देतात ते विचारा. अशा नव्या टेस्ट एकदा बालमोहनसारख्या शाळेत केल्या गेल्या की या कंपनीला मोठेच प्रशस्तिपत्र मिळेल. बाकीच्या शाळांची रांग लागायला हरकत नाही त्यांच्या दारात.

हायला, माझ्या एका जवळच्या मित्राची बायको गेल्या दोन वर्षांपासून अचानक एकटीच थायलंड सिंगापूर वार्‍या करू लागली. अचानक पैसे मिळवू लागली. कोणी विचारले तर 'मी असे असे ठश्यांवरून सांगते' म्हणायची. आता ऑफीस काढलेले आहे. लोक येतात. काहींचे अनुभव वगैरेही ऐकले. आत्ता उलगडा झाला. एवढी फी आकारली जाते होय? मग नोकरी करायची कशाला?

विनार्च माझ्यामते हे फार ताणलेले वाटते. त्यातून तुझी लेक माझ्या मते खूप लहान आहे, अजून ती वाढते आहे, बदलते आहे, प्रगल्भ होते आहे. त्यामुळे "पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स आणि करीयर मॅपिंग टेस्ट" करण्याच्या वयात ती आहे असे मलातरी वाटत नाही. त्यातून ११वी, बारावीत तिचा इक्यू, आयक्यू इत्यादी करणे शक्य आहे. तर आतापासून हे कशाला?
फक्त शाळेचे नाव वाचून मी विचारात पडलेय Uhoh इतक्या चांगल्या शाळेत हे होतेय त्या मुळे थोडा अजून विचार करावा. शक्य असेल तर ही टेस्ट ११ वी १२ वीत करता येईल का हे विचारावे. पण या स्टेजला मला तर नो नो वाटतय. उगाचच खूप लहानपणापासून आपण मग त्यांच्याबद्दल दिशा अन अपेक्षा करायला लागतो.
खूप स्पष्ट लिहिलेय, राग आल्यास क्षमस्व !

बोटाचे ठसे माणासासहित सर्व primates आणि इतर काही सस्तन प्राण्यांमधे असतात (जसे कुवाला). वस्तु हतातुन निसटू नये यासाठी त्यांचा वापर होतो. बोटाचे ठसे आणि पर्सनॅलिटी/इंटेलिजन्सचा संबंध असेल असं वाटत नाही. (नाहितर सर्व कंपन्यांनी मुलाखती घेणं बंद केलं असतं. Light 1 )
असो, माहिती घेण्यासाठी थोडी शोधाशोध केली...
विकीमधे सांगितल्याप्रमाणे ठश्यांचा संबंध जनुकीय बिधाडाशी (Genetic disorders) असु शकतो. पण म्हणुन पर्सनॅलिटी/इंटेलिजन्सशी संबंध लावणं जरा अति होइल.
बाकी अनेक साईट्स सापडल्या पण सगळ्या प्रचारकी वाटल्या. टाइम्स ऑफ इंडिआ च्या लेखात याचा संबंध Theory of Multiple Intelligences शी देखिल लावला आहे.
पण एकंदर हे पटत नाही... याला शास्त्रीय आधार नसेल तर शाळेतर्फे असं काही केलं जाणं कितपत बरोबर आहे?? Sad

मेधा +१, अवल + २ आणि सॅम + ३.

भंपकपणा वाटतोय. आणि शाळेचं नाव वाचून खरंच आश्र्चर्य वाटतंय....५००० रु. आजकाल इतके स्वस्त झालेत का की शाळा असे कार्यक्रम राबवायला लागलीय?? खरं अशा प्रकारांना सर्व पालकांनी मिळून प्रतिसाद न देणे जास्त उचित ठरेल. कुणाची तरी तुंबडी भरणं सुरू असेल व्हाया पालक....

अवल + १००००००
टेस्ट करून फायदा काय आहे? कंपल्सरी आहे का टेस्ट करणं?
नावं नोंदवायला लावून शाळा आम्ही तुमच्या पाल्याच्या प्रगतीचा कित्त्ती विचार करतो हे दाखवणार... शिवाय जास्ती डोनेशन उकळायला प्रॉस्पेक्टस/ ब्रोशर मध्ये घुसडायला एक जास्तीचा पॉईंट मिळाला...
किती बर्डन आहे आजकाल शिक्षण म्हणजे.. Sad

हे मागच्या वर्षी माझ्या नवर्‍याच्या ऑफिसमध्ये सुद्धा आले होते. तेव्हा डिस्काऊंट धरुन २५००/- फी होती.
त्याची उपयुक्तता वगैरेबद्दल काही माहिती नाही.

दक्षिणा, कंपल्सरी नाही आहे फक्त ज्यांची इच्छा आहे त्यांनी करुन घ्या असं म्हटलय (मल्टी टॅलेंटेड मुलांसाठी कशी उपयुक्त आहे वै. पटवून सांगत होते )
अवल >> संपूर्ण पटलं तुझं मत. मला ह्या टेस्ट विषयी अधीक माहिती समजून घ्यायची होती म्हणून इथे विचारला हा प्रश्न Happy
हातांच्या रेषा बघून अस सांगितल तर त्याला अंधश्रद्धा म्हणतात>>>> बागुलबुवा Proud
माझ्या नवर्‍याचही असंच मत आहे (इतक्या पैशात एखादा ज्योतिषी रोज भविष्य सांगेल तिच तेही घरी येऊन Happy )
शास्त्रीय आधार नसेल तर शाळेतर्फे असं काही केलं जाणं कितपत बरोबर आहे?? >>>> सॅम खरच विचार करण्याची गोष्ट आहे ही Sad

बेसिक प्रश्न --- हातावरच्या रेषा कालांतरानी बदलतात नाही का? मग पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स आणि करीयर मॅपिंग टेस्ट -- वगैरे कस शक्य आहे?

विनार्च बामो Sad
अवलशी सहमत.
ह्या वयात ही टेस्ट म्हण्जए जरा अतीच वाटतय. आतापासुनच मुलांवर बर्डन नको.
पण शाळेने कंपल्सरी केलेले नसेल तर मग तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्यावा.

पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स आणि करीयर मॅपिंग टेस्ट यासाठी एखाद्या चांगल्या काउंसलर कडे नेणे उत्तम आणि ते ही १० वीत किंवा त्यानंतर.

लहान मुलांच्या हातावरच्या रेषा वय वाढेल तशा बदलतात. त्यामुळे पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स आणि करीयर मॅपिंग टेस्ट ह्या गोष्टी दहावी नंतर केल्या तर उत्तम.

मला तरी या टेस्ट बद्दल शंका आहे. त्यामुळे सध्या तरी या पेक्षा दुसर्‍या महत्वाच्या गोष्टींवर ५०००/- खर्च केले तर उत्तम.

*जाहिरात*
मला पैशाची नितान्त गरज आहे.
मी ४५०० रुपयांत हवे त्या प्रकारचे म्यापिंग करून देण्यास तयार आहे.
वेबसाईटही तयार करून ठेवलेली आहे.
४५०० रुपयांची मनी ट्रान्स्फर (अकाऊंटनं. विपुने सांगतो) व विरोपाने हाताच्या ठशाचे व मुलांचे फोटू पाठवावेत. ३ कार्यालयीन दिवसांत करियर/पर्सन्यालिटी/हुशारी इ. चा म्याप, तसेच भविष्यात मूल अतीशय बुद्धीवान व तल्लख तसेच एनर्जेटिक होण्यासाठी आवश्यक असा सिक्रेट फार्म्युला तुम्हास पोहोचविण्यात येईल.
-इब्लिस करियर म्यापिंग अ‍ॅण्ड गायडन्स कन्सल्टन्सी.
हे.ऑ. प्यारिस, (फ्रान्स)

I don't understand how to write Marathi in this column so I have pasted image. All of you are requested to go through my comments in the image. All of you who have commented on above subject are requested to take google search on DERMATOGLYPHICS and also visit www.brainsketch.in

Maayboli.jpg

Mr.Vinarch,
I am surprised to see your comment/ question and the further discussion above. Please take google search about "DERMATOGLYPHICS" (This is correct spelling). We get so much scientific information about the subject. This is one of the branch of Anthropology and has been studied for past 100 plus years. Harold Cummins is called Father of Dermatoglyphics.
I have got Brainsketch's Personality Intelligence and Career Analysis for my sons and this detailed Analysis and the guiding session thereafter has helped me a lot in grooming my Boys.
Its absolutely scientific and accurate as well.

माझ्या मते शाळा अश्या प्रकारचे उपक्रम राबवत नाही. शाळेतर्फे अश्या प्रकारच्या टेस्ट केल्या जात नाही. त्यात सहभागी होऊ इच्छिणारे पालक/विद्यार्थी आपापल्या जबाबदारीवर सहभागी होतात. अश्या संस्था आपण स्वत: शाळेशी संपर्क साधतात आणि शाळेतर्फे केवळ माहिती दिली जाते.

विनार्च, शाळेशी संबंधित व्यक्ती पटवून सांगत होत्या की "ब्रेन स्केच सोल्युशन्स"ची माणसं पटवून सांगत होती?

मी 'बालमोह्न विद्यामंदिर' मध्ये कम्युनिटी स्कूल विभागाची प्रमुख आहे. सर्व प्रथम या विभागातर्फे मी हे सांगू इच्छिते की 'ब्रेन स्केच सोल्युशन्स प्रायव्हेट लिमीटेड' तर्फे शाळेत केली जाणारी इंटेलिज़न्स, पर्सनॅलिटी आणि करियर मॅपिंग टेस्ट ही कोणत्याही प्रकारचे भविष्य वर्तवित नाही. आमच्या विभागाने ह्या चाचणीच्या वैज्ञानिक बाबींची तपासणी केली असून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पालकांना मार्गदर्शक ठरू शकेल ह्या उद्देशाने शाळेत हा उपक्रम सुरू केला आहे.

ही चाचणी नक्की काय करते जाणून घ्या.
इंटेलिज़न्स, पर्सनॅलिटी आणि करियर मॅपिंग टेस्ट - ही चाचणी म्ह्णजे हाताच्या बोटांच्या ठश्यांचे परीक्षण करून त्यावरून व्यक्तिमत्त्व आणि बुद्धिमापन करण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे. याला 'डरमॅटोग्लायफिक्स' (Dermatoglyphics) असे म्ह्णतात.

हे कसे शक्य आहे? ह्या चाचणीमध्ये प्रथम बोटांचे ठसे घेऊन त्यावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, शिकण्याची आणि काम करण्याची उपजत क्षमता यांचे मापन करण्यासाठी विश्लेषण केले जाते.

बोटांच्या ठश्यांचे परीक्षण करण्याचे कारण काय? आपल्या बोटांचे ठसे कायमस्वरूपी असतात. ते बदलत नाहीत तसेच प्रत्येक बोट हे उजव्या आणि डाव्या मेंदूच्या वेगवेगळ्या भागांशी संबंधित असून ते विविध क्षमतांचे निर्देशक आहेत.

ह्या विश्लेषणाचा उपयोग व्यक्तिमत्त्व विकासासाठी कसा होतो? हे विश्लेषण नवजात बालकापासून मोठ्यांपर्यंत कोणीही करून घेऊ शकतो. यात व्यक्तीच्या जन्मजात क्षमतांचा आलेख मांडला जातो ज्यावरून त्या व्यक्तीच्या विविध क्षमता समजणे शक्य होते. यात दिलेल्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या सूचनांचा अवलंब करून आपण आपले ज्ञानसंपादन आणि व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावीपणे घडवू शकतो.

विद्यार्थ्यांसाठी ह्या विश्लेषणांतून त्यांच्या कलागुणांना वाव देत पालक योग्य त्या प्रशिक्षण मार्गाचा अवलंब करू शकतात. ह्यात विद्यार्थी कोणत्या पद्धतीने चांगला अभ्यास करू शकतो हे समजते. ह्यासारख्या अनेक गोष्टींचा उपयोग पालकांना आणि शाळेला विद्यार्थ्यांच्या योग्य मार्गदर्शनासाठी होऊ शकतो.

ह्याबद्दल वैज्ञानिक माहिती तुम्ही www.brainsktetch.in हया वेबसाइटवर मिळवू शकता. किंवा Dermatoglyphics टाइप करून गुगलवर ह्यासंबंधी माहिती मिळेल.

ही चाचणी विद्यार्थ्यांसाठी सक्तीची नाही. पालकांनी अधिक आणि योग्य माहितीसाठी शाळेच्या कार्यालयात श्रीमती संगीता सोमण, समन्वयक, कम्युनिटी स्कूल, मराठी माध्यम ह्यांच्याशी संपर्क साधावा.

विद्यार्थ्यांसाठी हितावह उपक्रम आयोजित करण्यासाठी 'बालमोहन विद्यामंदिर' सतत कार्यशील आहे.

मादाम किमया,

तुमच्या ह्या एक्स्प्लनैशन बद्दल खूप खूप धन्यवाद.
मी एक पालक आहे. माझी मुलगी चौथी मध्ये पार्ले विद्यालयात शिकत आहे. आणि माझ्या समोर देर्मातोग्ल्य्फिच्स टेस्ट ह्या विषयावर जे काही प्रश्न होते ते सर्व सुटले आहेत. ऋणी आहे.
मी ह्या विषयावर गुगल केले आणि माझे ही पोसीतीव मत झाले आहे. मी ब्रेन स्केच कंपनी ला ह्या वीक मध्ये अप्पोइन्त्मेन्त साठी फो न करीन. बालमोहन सारखे प्रगत विचाराची शाळा दादर वासी ना लाभली आहे.

विजय

सौ. /कु. किमया भेंडे,

आपण दिलेल्या लिन्क्स वाचल्या तसेच गुगल देखील केल्या. त्यावरुन मत बनवण्याआधी आपल्या लिखाणातील काही गोष्टी जाणून घेणे आवडेल.

<<सर्व प्रथम या विभागातर्फे मी हे सांगू इच्छिते की 'ब्रेन स्केच सोल्युशन्स प्रायव्हेट लिमीटेड' तर्फे शाळेत केली जाणारी इंटेलिज़न्स, पर्सनॅलिटी आणि करियर मॅपिंग टेस्ट ही कोणत्याही प्रकारचे भविष्य वर्तवित नाही. आमच्या विभागाने ह्या चाचणीच्या वैज्ञानिक बाबींची तपासणी केली असून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पालकांना मार्गदर्शक ठरू शकेल ह्या उद्देशाने शाळेत हा उपक्रम सुरू केला आहे. >>

हि विधाने परस्परविरोधी आहेत.

<< ही चाचणी नक्की काय करते जाणून घ्या. इंटेलिज़न्स, पर्सनॅलिटी आणि करियर मॅपिंग टेस्ट - ही चाचणी म्ह्णजे हाताच्या बोटांच्या ठश्यांचे परीक्षण करून त्यावरून व्यक्तिमत्त्व आणि बुद्धिमापन करण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे. याला 'डरमॅटोग्लायफिक्स' (Dermatoglyphics) असे म्ह्णतात. >> ह्या सो कॉल्ड शास्त्रीय आणि आपल्या हस्तसामुद्रीक शास्त्रात नक्की काय फरक आहे ? ही शास्त्रीय पद्धत असल्याचे नक्की काय सर्टिफिकेशन आहे ? विकिमॅपिया फक्त जेनेटिक डिसॉर्डर्सविषयी बोलतोय. एकाही ऑथेन्टिक साईटवरती ह्याला शास्त्रीय आधार असल्यावे पुरावे नाहीत. जिथे तिथे आहेत त्या फक्त जाहिराती.

<<हे कसे शक्य आहे? ह्या चाचणीमध्ये प्रथम बोटांचे ठसे घेऊन त्यावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, शिकण्याची आणि काम करण्याची उपजत क्षमता यांचे मापन करण्यासाठी विश्लेषण केले जाते.
बोटांच्या ठश्यांचे परीक्षण करण्याचे कारण काय? आपल्या बोटांचे ठसे कायमस्वरूपी असतात. ते बदलत नाहीत तसेच प्रत्येक बोट हे उजव्या आणि डाव्या मेंदूच्या वेगवेगळ्या भागांशी संबंधित असून ते विविध क्षमतांचे निर्देशक आहेत.

ह्या विश्लेषणाचा उपयोग व्यक्तिमत्त्व विकासासाठी कसा होतो? हे विश्लेषण नवजात बालकापासून मोठ्यांपर्यंत कोणीही करून घेऊ शकतो. यात व्यक्तीच्या जन्मजात क्षमतांचा आलेख मांडला जातो ज्यावरून त्या व्यक्तीच्या विविध क्षमता समजणे शक्य होते. यात दिलेल्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या सूचनांचा अवलंब करून आपण आपले ज्ञानसंपादन आणि व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावीपणे घडवू शकतो.

विद्यार्थ्यांसाठी ह्या विश्लेषणांतून त्यांच्या कलागुणांना वाव देत पालक योग्य त्या प्रशिक्षण मार्गाचा अवलंब करू शकतात. ह्यात विद्यार्थी कोणत्या पद्धतीने चांगला अभ्यास करू शकतो हे समजते. ह्यासारख्या अनेक गोष्टींचा उपयोग पालकांना आणि शाळेला विद्यार्थ्यांच्या योग्य मार्गदर्शनासाठी होऊ शकतो. >>

वरील सर्व वाक्य बोट या ऐवजी हात हा शब्द वापरल्यास हस्तसामुद्रिकाविषयीच सांगतात. हस्तसामुद्रिका विषयी बोलायचे झाल्यास ब्रेनस्केचपेक्षा कितीतरी पटीत अनुभव असलेले ज्योतिषी उपलब्ध आहेत.

<< ह्याबद्दल वैज्ञानिक माहिती तुम्ही www.brainsktetch.in हया वेबसाइटवर मिळवू शकता. किंवा Dermatoglyphics टाइप करून गुगलवर ह्यासंबंधी माहिती मिळेल. >>

ह्या वेबसाईटवर मेंदूचे कार्य, डर्मॅटोग्लायफिक्सचा चार ओळीतला ईतिहास आहे. शास्त्रीय माहिती नाही. जे काही आहे ते त्यांची जाहिरात याव्यतिरीक्त काही नाही. तसे असण्यास हरकतही नाही. पण जेव्हा बालमोहनसारखी शाळा एखाद्या संस्थेचे नाव रेकमन्ड करते त्यावेळी कोणत्याही जागरुक पालकांना नक्कीच फरक पडतो.

<< ही चाचणी विद्यार्थ्यांसाठी सक्तीची नाही. पालकांनी अधिक आणि योग्य माहितीसाठी शाळेच्या कार्यालयात श्रीमती संगीता सोमण, समन्वयक, कम्युनिटी स्कूल, मराठी माध्यम ह्यांच्याशी संपर्क साधावा. >>>

इथे विचारलेल्या प्रश्नांचे ईथेच उत्तर मिळेल याची खात्री आहे. जेव्हा गरज निर्माण होईल तेव्हा योग्य ती पावले उचलली जातीलच.

<< विद्यार्थ्यांसाठी हितावह उपक्रम आयोजित करण्यासाठी 'बालमोहन विद्यामंदिर' सतत कार्यशील आहे.>>

बालमोहन या नावाविषयी आदरच आहे. म्हणूनच हा सर्व लेखनप्रपंच.

एकूण नेटवरुन अभ्यास केल्यास Dermatoglyphics (from ancient Greek derma = "skin", glyph = "carving") is the scientific study of fingerprints. व तत्सम शास्त्रीय माहिती कुठेही ह्या अभ्यासाचा "इंटेलिज़न्स, पर्सनॅलिटी आणि करियर मॅपिंग टेस्ट" साठी उपयोग होतो हे सिद्ध करताना दिसली नाही.

रवि१३, आपण दिलेल्या माहिती(?)चा काहिही उपयोग नाही कारण बहुतांशी ती शास्त्रीय माहिती नसून निव्वळ जाहिरात आहे.

Pages