बोटांच्या ठश्यांद्वारे पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स आणि करीयर मॅपिंग टेस्ट

Submitted by विनार्च on 20 November, 2012 - 06:17

बोटांच्या ठश्यांद्वारे पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स आणि करीयर मॅपिंग टेस्ट" याबद्द्ल काही माहिती आहे का ? कोणी करुन घेतली आहे का ही टेस्ट ?
माझ्या लेकीच्या शाळेत "ब्रेन स्केच सोल्युशन्स" ह्याच्यातर्फे ही टेस्ट करुन घेणार आहेत. फीज आहे ५०००रु...... अजूनतरी नाव नोंदवल नाही आहे...... ह्या टेस्टची विश्वासर्हता (बरोबर लिहीले आहे ??ऑथेनटिसिटी) माहित नाही आहे आणि अशाप्रकारच्या टेस्टची फी इतकीच असते का?

(नितीनचंद्र यांच्या "मल्टीपल इंटेलिजन्स" या धाग्यावर हा प्रश्न विचारला होता पण काहिच उत्तर न मिळाल्यामुळे इथे विचारत आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि माझी शरम काढणारे तुम्ही कोण ट्टिकोजीराव?

जणु मी तुम्हालाच उद्देशुन लिहिले आहे असे तुम्ही व्यक्ती गत घेतलेत.

अरे बापरे भयानक धागा, अंधश्रध्दा ह्या फक्त अशिक्षितांतच असतात हे पुन्हा खोटे ठरले. सुशिक्षित हा शब्द बदलुन फक्त शिक्षित हाच शब्द येथे योग्य राहिल.

तुम्ही कुणालाही उद्देशून लिहीलेले असेना का, तो प्रतिसाद थर्ड क्लास आहे हे तर बदलत नाही.
दुनियेत फक्त महामूर्खांनाच इतरांना अक्कल नाही असे वाटत असते. आपण इतरांची अक्कल काढल्याने ती शंका फिटली आणि जातो/ते जातो/ते/ म्हणणारे तसे करून दाखवत नाहीत याचाही ताबडतोब प्रत्यय आला. आता तुमची कुवत कळाल्याने तुम्ही गेलात काय, न गेलात काय काहीही फरक पडत नाही. तेव्हां काळे केले नाहीत तरी चालेल.

याबद्दल सांगायचे तर ११ वर्षांपासुन fingerprints वर काम करतांना जे थोडेफार ज्ञान मिळाले त्याच्या basis वर
<<

बाप्रे!

चक्क ११ वर्षांपासून तुम्ही या प्रकारे लोकांना उल्लू बनवत आहात?

हात बघुन कुडमुड्या ज्योतिष्याने काही सांगितलं तर ती अंधश्रद्धा, आणि तेच कोणी ठसे घेउन, संगणकावरच्या प्रोग्रॅमच्या साह्याने, चकचकित कागदावर छापुन दिले तर ते शास्त्र.. Wink

कारण कुडमुड्यांनी ठसे दूरवरच्या ग्रहगोलांच्या उंचवट्यांशी जोडलेत त्यांच्या शास्त्रात. ह्या्नी ठशांची नाळ जवळच्याच मेंदूवरच्या उंचवट्यांशी का कशाशी जोडलीय ह्यांच्या सायन्समधे. जवळ पडतं ना! अजून कुठले कुठले उंचवटे नी खाचखळगे शोधा नी भरपूर पैसे कमवा.

एक मुद्दा, हातावरच्या रेषा/उंचवटे खळगे,यांंमुळे भविष्य "घडत/बनत/बिघडत" नसते, तर मनुष्य त्याच्या वाट्याला आलेल्या कोणत्या देह/विचार/आत्मा यांच्या शक्तिंचा वापर कसा करेल हे दिसुन येते. असे माझे मत.
व्यक्तिचे प्राक्तन/प्रारब्ध हातावरील रेषांमधे स्पष्ट दिसुन येतेच, कुंडलीमधेही दिसते. इतकेच काय, पूर्वीच्या स्त्रीया/पुरुष, व्यक्तिच्या "चालण्याच्या चालीवरुनही" व्यक्तिचे स्वभाव वैशिष्ट्ये सांगु शकायचे.
यामागित तत्व एकच आहे, की व्यक्तिच्या आत्म्याने/चेतनेने/जीवाने देह धारण केला की प्रत्यही तो त्या देहाचा वापर करीत स्वतःच्या पूर्वसंचिताप्रमाणे "व्यक्त" होऊ पहात असतो. आधुनिक विज्ञान प्रयोगशाळेमार्फत व्यक्त होण्याच्या बहुधा केवळ पंचेंद्रियांना समजतील इतक्याच शक्यता विचारात घेते, पण त्या घेऊनही, समोरची व्यक्ति कितीकसे हातवारे करते, कशी चालते या पंचेंद्रियातिल दृष्टीला दिसणार्या बाबीतुनही व्यक्तिचे "व्यक्त" होणे प्रकट होत असते या तथ्यावर विज्ञान नामक आधुनिक सायन्सचा विश्वास नसतो हे आश्चर्यच नव्हे काय?

तर व्यक्तिने देहामार्फत व्यक्त होणे केवळ हातवारे/चालणे/उठणे बसणे/बोलणे स्वर सूर/बघणे इत्यादीतुनच होत असते असे मानले जात नाही, तर शरिराचे सर्व अवयवांमार्फत / सर्व उत्सर्जनांमार्फत व्यक्ति व्यक्त होत असते, अन मग त्यातच हातापायाची बोटे, त्यांचे आकार उकार, त्यावरील रेषा, त्यांची ठेवण इत्यादी सर्व बाबी येतात.
अर्थात "अतिहुशार" लोक या सगळ्या गोष्टी बुर्झ्वा/बोगस्/ढोंग मानित असल्याने त्यांना काही सांगु पहाणे म्हणजे "गाढवापुढे वाचलि गीता, कालचा गोंधळ होता बरा" असे म्हणण्याचि पाळी असते... Proud

Limbu, did you study science? If not, why do you make foolish statements about science? If you did, why do you make foolish statements about science?

> तर व्यक्तिने देहामार्फत व्यक्त होणे केवळ हातवारे/चालणे/उठणे बसणे/बोलणे स्वर सूर/बघणे इत्यादीतुनच होत असते असे मानले जात नाही, तर शरिराचे सर्व अवयवांमार्फत / सर्व उत्सर्जनांमार्फत व्यक्ति व्यक्त होत असते, अन मग त्यातच हातापायाची बोटे, त्यांचे आकार उकार, त्यावरील रेषा, त्यांची ठेवण इत्यादी सर्व बाबी येतात.

स्टिफन हॉकिंग याचे उत्तम उदाहरण आहे. त्या बिचार्‍याची व्यक्तता कशातून होते आणि काय होते. पहायलाच पाहिजे हॉकिंगच्या हातापायांचे ठसे.

>>> आणि हात पाय नसलेल्या (क्वाड्रिप्लेजिक) लोकांचं काय होतं? <<<< त्यांचा त्रिशंकू झालेला असतो. Proud
अशिक, हो, नक्कीच बघायला हवे, मला उत्सुकता आहे. Happy
अनॉय्ड, तुमची पोस्ट कळली नाही. Happy तरीही, माझा सायन्स विषयाशी दहाव्वीनंतर संबंध तुटला आहे. Happy मी कॉमर्स साइडचे शिक्षण घेतलय. अन आता जी काय सायन्सची ओळख होते आहे ती "डिस्कव्हरी सायन्स " या व डिस्कव्हरीच्या इतर अनेक टीव्ही चॅनेल्समार्फत होते आहे. अन या धाग्यावर जसे एकतर्फी विरोधाकरता विरोध म्हणुन सायन्सलाही खुंटीवर टांगुन आक्षेप्/टीका/टवाळ खिल्ली मांडली जाते, तशी तिथे डिस्कव्हरीवर चुकुनही बघायला मिळत नाही. असो. Happy तुमची पोस्ट कळली नाहि ती नाहिच....

>>>> Limbu, did you study science? If not, why do you make foolish statements about science? If you did, why do you make foolish statements about science? <<<<
दोन दिवस विचार केल्यावर यातले थोडे थोडे कळले, अन हेच वाक्य/प्रश्न मला बर्याच नाठाळांना असेही विचारता येतिल असे वाटते.. की,
अमकेतमके नाठाळ, are you Hindu? If not, why do you make foolish statements about हिंदुइझम? If you are, why do you make foolish statements about हिंदुइझम? Proud

Polite Ghost® | 9 June, 2016 - 23:02

याबद्दल सांगायचे तर ११ वर्षांपासुन fingerprints वर काम करतांना जे थोडेफार ज्ञान मिळाले त्याच्या basis वर
<<

बाप्रे!

चक्क ११ वर्षांपासून तुम्ही या प्रकारे लोकांना उल्लू बनवत आहात?

>>>

लिहिलेले वाचा हो आधी. नसेल समजले तर तोंड ऊघडायची गरज आहे का? मी fingerprint recognition वर काम करतो भविष्यावर नाही.
---
कानडा

प्रकाशराव, चांगली बातमी आहे, "भोंदू" लोकांविरुद्ध तक्रार नोंदविण्याचे धाडस श्री दाते यांनी दाखविले याबद्दल त्यांचे अभिनंदन.

आमच्या "हिंदू गूढ अध्यात्मिक शास्त्रांच्या" क्षेत्रातिल शब्दशः "कुत्र्याच्या छत्रीपणे" उगवलेल्या व या शास्त्रांशी कसलिही निष्ठा न ठेवता, पुरेसा अभ्यास न करता, त्यांचा केवळ बुवाबाजी करीत पैसा कमाविण्याकरता वापर करणार्‍यांचि संख्या रस्त्यावरिल पाणीपुरीच्या ठेल्यांप्रमाणे वाढली आहे तिच्यावर अशा प्रसंगातुन आळा बसेल अशी आशा करावी का?

अर्थात, अशा घटनांमुळे व या भोंदू बुवाबाजीमुळे, "माकडांच्या हातात कोलित" या म्हणीप्रमाणे अन्निसवाल्यांच्या हातात हिंदू धर्मश्रद्धांबाबत गरळ ओकण्यास आयते कोलित मिळते हा धोका दुर्लक्षुन चालत नाहीच. Proud

पण शेवटी काये? "अर्धः त्यज्यति पंडितः" अशा शब्दांची कैतरि संस्कृत म्हण आहे ना? त्याप्रमाणे धरुन चालावे लागते.... ! कुणाच्या का काठीने होईना, भोंदू बुवाबाजीचा साप ठेचला गेला पाहिजे हे महत्वाचे! नै का?

तरी अन्निसवाले "सुक्याबरोबर ओलेही पूर्ण जाळू पहातात" हे वास्तव कायमस्वरुपी असणारच आहे, तिथे अर्धः त्यज्यति वगैरे बयादि देखिल चालणार नाहीतच ... Wink कारण त्यांच्या अतिविज्ञानवादी/नास्तिक दृष्टिकोनातुन श्रद्धा/विश्वास वगैरे गोष्टी अस्तित्वातच नसतात, तर देव धर्म, जगन्नियंता वगैरेंचे अस्तित्व ते कुठुन मानणार? अन अशांचे अस्तित्व मानणार्‍यांना ते विरोधच करीत रहाणार. असो.

शेवटी काये? कलियूग हो हे, घोऽर कलियुग....

<<तरी अन्निसवाले "सुक्याबरोबर ओलेही पूर्ण जाळू पहातात" हे वास्तव कायमस्वरुपी असणारच आहे,>>
------ अशी म्हण येथे लावता येत नाही. कारण या क्षेत्रात ओले असे काही नाहीच आहे... सर्वच सुके आहे.

हातावरच्या रेषेवरुन भविष्याबाबत भाष्य करता येत नाही. कष्टाने कमावलेले पैसे असतील तर एक दमडीपण मोजू नका या बोगस शास्त्रावर. सर्व बनवा-बनवी आहे.

>>> Tumhi ch var samarthan karat hotat na ya bhondu pana che? <<<
माफ करा, पण मी या विषयातील "तथ्याचे" समर्थन करत होतो, अजुनही करतोच.
पण अर्धवट ज्ञानावर, अपुर्‍या माहितीवर, अपुर्‍या अनुभव्/अनुभुतीवर विसंबुन "गिर्‍हाईकाच्या" भविष्याबाबतच्या उत्सुकतेचा गैरफायदा उठवित अवाच्च्यसवा फिया आकारीत कोणत्याही पद्धतीने थातुरमातुर भविष्य वर्तविण्यास माझाही विरोधच असेल. Happy
मी तुम्हा कुणासारखा "सब घोडे बारा टक्के" असे धरुन एकुणच (कोणत्याही पद्धतीने/साधनाने) भविष्य कथन म्हणजे थोतांडच असे मानित नाही.

<<मी तुम्हा कुणासारखा "सब घोडे बारा टक्के" असे धरुन एकुणच (कोणत्याही पद्धतीने/साधनाने) भविष्य कथन म्हणजे थोतांडच असे मानित नाही.>>
------ हाताच्या रेषा बघुन भविष्य कथन करणे चक्क थापा असतात हे तुम्ही माना किव्वा मानू नका. फि किती आकारावी हा मुद्दाच नाही आहे. नाममात्र १ रु आकारा किव्वा ११,००० रु त्याने असत्यतेत काही फरक पडत नाही. अनेक ठोकताळ्यान्पैकी काही दगडे लागण्याची शक्यता असते... पण तेव्हढेच. हे ठोकताळे तर हात न बघताही सहजपणे सान्गता येतात.

या थापेबाजीला शास्त्र असे दुरान्वयेही म्हणता येत नाही.

आहे आहे आहे !!!
हे व्यवस्थित शास्त्र आहे ज्यावरून शक्यता कळू शकतात.
ज्याचा अभ्यास चांगला आणि दांडगा, तसेच चित्तवृत्ती अतिशय शुद्ध त्याने संगितलेल्या शक्यता या अचूकतेच्या जास्त जवळ जातात. ध्यानाची बैठक असेल तर अजुन जास्त. पैसे किती काय याचा काही संबंध नाहीये.
उगाच स्वतःला काही कळत नाही म्ह्णुन उडवून लावणे हाच मोठा भोंदूपणा आहे.

मायबोलीवर उमटणार्‍या अक्षरांच्या ठशांवरुन ते उमटवणार्‍या व्यक्तिची पर्सनॅलिटी इंटॅलिजन्स ओळखता येतो.

<<ज्याचा अभ्यास चांगला आणि दांडगा, तसेच चित्तवृत्ती अतिशय शुद्ध त्याने संगितलेल्या शक्यता या अचूकतेच्या जास्त जवळ जातात. ध्यानाची बैठक असेल तर अजुन जास्त. >>
---- तुमचे बालपण खुप कष्टात गेले, कुठलेही यश हे तुम्हाल सहजा सहजी मिळालेले नाही आहे (बहुतान्श प्रत्येक व्यक्तीला आपली भुतकाळातली वाटचाल कष्टप्रद झालेली आहे असे वाटत असते - कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळालेली नसते - किती सुखावह वाटते असे एकायला).

तुम्हाला किव्वा तुमच्या घरात अगदी जवळच्या व्यक्तीला गुडघ्याचा आजार (घरात कुणाला तरी पाठिचे, गुडघ्याचे, हृदयाचे देखणे असतेच) होता... स्टॅटिस्टीकली ८० % घरटी (घरात ४ वयस्कर व्यक्ती आहेतच- जरी एकत्र रहात नसले तरी) एकाला हे आजार असतातच. गोळी बरोबर लागायची शक्यता ८० %. याला नाही अशी मान डोलावली तर "आठवुन पहा... तुम्ही घरी गेल्यावर आईसाहेबान्ना विचारा, त्या जरुर हो सान्गतिल याची मला खात्री आहे - नाही उत्तर आल्यास मी धन्दा बन्द करतो."

बाळाने/ बाळीने अभ्यास खुप केला तर मार्क नक्कीच मिळणार, शिक्षण तर खुप आहे पण कष्ट अफाट घ्यावे लागतील.

मग कुठलातरी आकडा काढुन ३० व्या (कुठ्लाही आकडा घ्या ४२, २५...) वर्षी मोठा अपघात होणार आहे, किव्वा अत्यन्त बिकट अशा आर्थिक समस्या उद्भवणार आहेत... हे सन्कट टळले तर पुढे काही विशेष त्रास नाही. अपघात होतच असतात. नोकरीतही मोठे अव्हान असतेच... गोळ्या व्यावस्थित लागतात.

या सर्व सन्वादात हात बघणारी व्यक्ती भरपुर माहिती पुरवते... तिच मिळालेली माहिती भविष्यकार एका साचेबद्ध पद्धतीने परत करतो.

माणसाच्या चालण्यावरुन स्वभाव ओळखणे हे तर एकदम १००% थाप आहे- असे असते तर अमेरिकेने विमानताळान्वर यान्ना मोठ्या पगाराच्या नोकरीस ठेवले असते.... चालण्याची लकब (किव्वा हस्ताक्षर बघायचे) बघायची आणि माणसाचे चित्त जाणायचे.

ते तुम्ही लिहिलेले आहे, ते फालतू लोकांचे डायलॉग आहेत पैसे मिळवण्याच्या उद्देशाने थातुरमातुर काहीतरी सांगणार्‍या.

मायबोलीवर उमटणार्‍या अक्षरांच्या ठशांवरुन ते उमटवणार्‍या व्यक्तिची पर्सनॅलिटी इंटॅलिजन्स ओळखता येतो. >>> Happy Wink

>>> मायबोलीवर उमटणार्‍या अक्षरांच्या ठशांवरुन ते उमटवणार्‍या व्यक्तिची पर्सनॅलिटी इंटॅलिजन्स ओळखता येतो. ़़<<<< Lol
हो हो, ड्युप्लिकेट आयडीज लग्गेच ओळखतात तिकडचे काही एक्स्पर्ट्स....

मायबोलीवर उमटणार्‍या अक्षरांच्या ठशांवरुन >>
चूक्. पाऊलखुणा म्हणा.
मायबोली ची टॅग लाईन ही आहे - "मायबोलीशी नातं सांगणार्‍या जगभरच्या पाऊलखुणा"... Biggrin

पण अर्धवट ज्ञानावर, अपुर्‍या माहितीवर, अपुर्‍या अनुभव्/अनुभुतीवर विसंबुन "गिर्‍हाईकाच्या" भविष्याबाबतच्या उत्सुकतेचा गैरफायदा उठवित अवाच्च्यसवा फिया आकारीत कोणत्याही पद्धतीने थातुरमातुर भविष्य वर्तविण्यास माझाही विरोधच असेल >>

पण हे ज्योतिष शास्त्रच किंवा हस्त सामुद्रिकच मुळात काही लोकांनी बांधलेल्या आडाख्यांवर आहे . कोणाचा अनुभव अपुरा, ज्ञान तोकडे अन कोणाचे नाही हे कोण ठरवणार ? प्र्त्येक जण दुसर्‍या ज्योतिषाला नावे ठेवणार

हातावरच्या रेषा किंवा जन्म वेळेची नक्षत्र स्थिती यात आणि आयुष्यात घडलेल्या घटनांमधे थोडेफार ( बरेच वेळेस वीक ) कोरिलेशन असले तरी त्यात कॉझॅलिटी आहे याला काही आधार नाही.

पण तरिही अमकी पूजा करा, तमका विधी करा मग दोष निवारण होईल असे सांगून पैसे उकळणारे आहेतच

हात पाय नसलेल्या (क्वाड्रिप्लेजिक) लोकांचं काय होतं?
<<
माझ्या माहितीप्रमाणे क्वाड्रुप्लेजिक म्हणजे चारी पायांची ताकत गेलेला. हात पाय नसलेला = टोटल अमेलिया.

(Amelia (from Greek ἀ- "lack of" plus μέλος (plural: μέλεα or μέλη) "limb") is the birth defect of lacking one or more limbs. It can also result in a shrunken or deformed limb. For example, a child might be born without an elbow or forearm.)

तर हात पाय नसलेल्या लोकांना काही भविष्य नसतं. Wink

- गूगल वरून साभार.

Pages