बोटांच्या ठश्यांद्वारे पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स आणि करीयर मॅपिंग टेस्ट

Submitted by विनार्च on 20 November, 2012 - 06:17

बोटांच्या ठश्यांद्वारे पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स आणि करीयर मॅपिंग टेस्ट" याबद्द्ल काही माहिती आहे का ? कोणी करुन घेतली आहे का ही टेस्ट ?
माझ्या लेकीच्या शाळेत "ब्रेन स्केच सोल्युशन्स" ह्याच्यातर्फे ही टेस्ट करुन घेणार आहेत. फीज आहे ५०००रु...... अजूनतरी नाव नोंदवल नाही आहे...... ह्या टेस्टची विश्वासर्हता (बरोबर लिहीले आहे ??ऑथेनटिसिटी) माहित नाही आहे आणि अशाप्रकारच्या टेस्टची फी इतकीच असते का?

(नितीनचंद्र यांच्या "मल्टीपल इंटेलिजन्स" या धाग्यावर हा प्रश्न विचारला होता पण काहिच उत्तर न मिळाल्यामुळे इथे विचारत आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे!भयंकर आहेत ही सगळीच थोतांडं !!
ही वरच्य व्हिडिओतली बाई तर बेफाम सुटलीय नुस्ती ! Lol काय ते वाट्टेल ते दावे !

बाप रे!भयंकर आहेत ही सगळीच थोतांडं !!
ही वरच्य व्हिडिओतली बाई तर बेफाम सुटलीय नुस्ती ! हाहा काय ते वाट्टेल ते दावे !>>>> +१

मित्र मैत्रीणींनो.....

मी कुठेही गायब नव्हते. किंवा गायब व्हायची इछ्छा ही नाही. मी जास्त माबो वर नसते. रादर मी जास्त नेट वर ही नसते. ह्या प्रकारात अनेक संशोधन झालेली आहेत. अनेक सँपल स्टडी आहेत. काही रेफरन्स पण आहेत. ह्यात काही भारतिय तर काही परदेशी जर्नल्स आहेत. काही सँपल्स ह्या सिद्धांताला पुष्टी देतात, काही नाही. वानगी दाखल काही रेफरन्स खाली दिले आहेत. जाण्कारांनी जरुर वाचावे.

बाकी मी आधीच सांगीतले आहे ही माझी रिक्षा नाही. मला माबो वर कोणतीही जाहिरात करायची गरजच नाही. मी माबो वरच्या फक्त २-३ माणसांना पर्सनली ओळखते. ती ही ओळख तशी पुसटच आहे. माझ्या कडे माबो वरच्या फक्त काही माणसांचे नंबर आहेत. ( त्यातले काही मी माबो च्या आधीपासु न ओळखीचे आहेत)

कोणा काय समज करुन घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ह्या मागे कोणतेही भविष्य, भाकित वगैरे नाही. मी आधी माझा व नवर्‍याचा रीपोर्ट केला जवळ जवळ ८५% जुळला. म्हणुनच मग काही सँपल केले. मग पुढे गेले. ह्या मागे काहीतरी विज्ञान आहे हे मात्र नक्की. नीदान खालचे संदर्भ वाचले तरी लक्षात येइल.

बाकी मग ज्याचा त्याचा प्रश्न.

शब्द हे तलवारी सारखे असतात हे मात्र पटले. आपण एखाद्यावर केवळ समोर नाही म्हणुन जीभ सुटल्या सारखे वाट्टेल ते लिहावे म्हणजे खरच खुप दु:ख दायक आहे. हे वर्च्युअल जग खरच फार जालिम आहे हे नक्की. इतके दिवस माबो वर भांडणे होतात, वाट्टेल ते लिहितात हे ऐकुन होते. आपण्हुन कोणत्याच वादात पडले नव्हते. आताही पडणार नाही. पडायची इच्छा नाही.

तरीही प्रतिक्रियां बद्दल धन्यवाद.!!!!!

http://www.ajol.info/index.php/jmbs/article/viewFile/108303/98122

http://genetic-test.ru/pub/litres/4_Lakshmi.pdf

http://csjournals.com/IJCSC/PDF6-2/24.%20Oindri.pdf

[1]. Penrose L.S (1969). Effects of additive genes at many loci compared with those of a set of alleles at one locus in parent-children
and sib correlation. Annals of human genetics.33: 15-21
[2]. Penrose L.S and Ohara P.T (1973). The development of the epidermal ridges .Journal of Medical Genetics 10: 201-208
[3]. Nora J.J and Fraser F.C (1989). Medical genetics: Principles and Practice.3rd edition. Philadelphia : Lea Febiger
[4]. Cannon T.D (1997).The nature and mechanism of obstetric influence in schizophrenia: A review and synthesis of epidemiologic
studies
[5]. Schaumann, B.A and Alter , M (1976). Dermatoglyphics in medical disorders. New York: NY Springer-Verlag.
[6]. Rajangam, S, Thomas L.M and Janakiram S.(1995). Dermatoglyphics in Down’s syndrome. Journal of Indian Medical Association
93: 10-30.
[7]. Babler W.J (1991). Embryonic development of epidermal ridges and their configurations. Birth Defects Original Article Series.
27:95-112.
[8]. Brown A.S, Schaefer C.A, Wyatt R.J, Goetz R.B, Gorman J.M. and Susser E.S(2000). Maternal exposure to respiratory infections
and adult schizophrenia spectrum disorder: A prospective birth cohort study. Schizophrenia Bulletin. 26: 287-295.
[9]. Rossa A, Gutierrez B, Arias B and Fananas L. (2001) Dermatoglyphics and abnormal palmar flexion creases as markers af early
prenatal stress in children with idiopathic intellectual disability. Journal of Intellectual Disability Research. 45: 416-423.
[10]. Cummins H, and Midlo C. (1943). Finger prints, palms and soles. New York:Blakinson.
[11]. Gardner H. (1999). Intelligence Reframes: Multiple intelligences for the 21st
century. New York: Basic Books.
[12]. Armstrong T. (1994). Multiple intelligence in the class room. Virginir: ASCD.
[13]. Okajima M. (1975). Development of dermal ridge in the fetus. Journal of Medical genetics. 12: 243-250.
[14]. Mostaf Najafi, MD.(2009)Association between finger patterns of Digit II and intelligence quotient level in adolescents. Iran J
Pediatr sep 2009;vol 19 (No 3).277-284.
[15]. Reed T, Young RS. Genetic analysis of multivariate fingertip dermatoglyphic factors and comparison with corresponding individual
variables. Ann Hum Biol. 1979 Hul-Aug;6(4):357-362.

मोहन की मीरा,

तुमच्या मूळ पोस्टला मी प्रतिसाद दिला होता आणि तुम्ही साफ खोटी माहिती देत आहात असे तीन प्रमुख मुद्दे मांडले होते. तुम्ही त्याला बगल देऊन प्रतिसाद दिला आहे ज्यात मला अनुभव आला म्हणून मी फ्रॅन्चाईझी घेतली वगैरे अ‍ॅमवे, जापान लाइफ गादीछाप युक्तीवाद केले आहेत जे वैज्ञानिक दृष्टीने विषयाकडे पहाण्यासाठी फारसे उपयुक्त नाहीत.

तीन अनुत्तरीत मुद्दे

१) हाताच्या दहा बोटांच्या रेषांचा मेंदूच्या दहा भागांशी वेगवेगळ्या बुद्धीमत्तांचे थेट डायग्नॉसिस वा मापन करता येईल असा संबंध सिद्ध करणारे ठोस संशोधन. तुम्ही दिलेल्या संदर्भांमध्ये हे नाही.

२) डॉ. गार्डनर यांच्या नावाचा दुरुपयोग - <<< आपल्या बोटां वरील रेषा ज्याला आपण फिंगर प्रिंटस म्हणतो ..... पण ह्याबद्दल खरे संशोधन करुन त्याचा वापर बुद्धी वा मेंदुशी जोडुन मल्टीपल इंटेलिजन्स ची थीअरी आणली डॉ. हावर्ड गार्ड्नर ह्यांनी. >>> असे तुम्ही आणि या व्यवसायातील अनेक जण म्हणतात. डॉ. गार्डनर यांचे मल्टिपल इंटेलिजन्सचे काम प्रसिद्ध आहे. ते अ‍ॅप्टिट्यूड टेस्टच्या मार्गाने जाणारे आहे. त्यांनी वरील क्र. १ प्रमाणे संशोधन केले आहे हे साफ खोटे आहे. तसे नसल्यास कृपया ते दाखवा.

३) <<<हॉर्वर्ड युनिव्हर्सीटी मधे ह्या विषयाचा स्वतंत्र विभाग आहे...>>> विद्यापीठाच्या स्वतंत्र विभागाची वेबसाईट तर असणारच. कृपया लिंक द्या.

------------------------------------------------------------------------------

मला काही तुमच्याशी भांडण्याची इच्छा नाही. पण तीन गोष्टींनी मी लिहायला प्रवृत्त झालो.

१) सुरुवातीला हा विषय मी लाईटली घेउन धागाकर्त्याला केवळ एका ओळीचा हलका फुलका प्रतिसाद दिला होता. पण मायबोलीसारख्या साईटवर तसा उच्चशिक्षितांचा वावर असतो, आणि त्यातले कितीतरी याला बळी पडत आहेत हा माझ्यासाठी एक धक्काच होता म्हणून मी तुम्हाला सविस्तर प्रतिसाद दिला आणि तुमच्या प्रामाणिक प्रतिसादाची अपेक्षा होती/आहे.

२) तुम्ही हार्ट सर्जरी, लेप्रोस्कोपिक सर्जरी, एपिड्यूरल अशी उदाहरणे देउन वारंवार हे सगळे सायंटिफिकआहे, लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे असे म्हटले आहे. त्यामुळे तत्वज्ञान, राजकारण साहित्य, धार्मिक वगैरे विषयांसारखे ज्यांना,पटतेय त्याम्नी करा, नाही पटत त्यांनी नका करू अशी पळवाट काढता येणार नाही. तंत्रज्ञान हे कलाशाखेसारखे सब्जेक्टिव्ह नाही. ते असेल तर आहे असे दाखवून द्या नाही तर नाही असे मान्य करा.

३) तुम्ही मुद्दाम केली असे मला म्हणायचे नाही, पण तुमच्याकडून ४२ जणाची फसवणूक झाली आहे. किमान तशी शक्यता आहे हे लक्षात घेउन तुम्ही या विषयाकडे गंभीरपणे बघून उत्तरे शोधयला हवीत आणि द्यायलाही हवीत. तुम्ही फ्रॅण्चाइझी आहात, तुम्ही स्वतःच या कंपनीची रिपोर्ट करण्याची प्रोसेस आणि मार्केटिंग मटेरिअल याकडे ऑडिट करण्याच्या नजरेने पाहिले तर रेड फ्लॅग्ज तुम्हाला स्वतःलाच दिसतील.

जीएस, स्मायल्या टाकल्या की प्रतिसाद वाचायचा दृष्टिकोन बदलतो (निदान माझा तरी), हसून गडाबडा लोळणारी स्मायली असेल तर फारच वेगळ्या मूडने प्रतिसाद वाचला (मनात नोंदवला) जातो.
ही वरची पोस्ट मी नीट वाचली.

हा धागा चालू झाला तेव्हा विरोधी विचार मांडणार्याने काही काळानंतर आपल्या पाल्याची ही टेस्ट करून घेतली होती म्हणून खरंतर मला प्रचंड उत्सुकता वाटून राहिली होती. मोकीमीच्या पोस्टमुळे दोन्ही बाजू नीट समजतील असं वाटत होतं पण इथे वेगवेगळ्या विरोधकांची नेहमीचीच लठ्ठालठ्ठी चालू झाली आहे.

दुसरी बाजू नीट न समजल्याने काही प्रश्न विचारले होते. ते विचारायचे नाहीयेत का ? तसे असल्यास संपादीत करण्यात येईल. फक्त त्यात काय चुकीचे आहे तेव्हढे मोठ्या मनाने समजावून सांगावे ही नम्र विनंती,

<<एक शंका : हि टेस्ट करण्यासाठी व्यक्ती स्वतः असावा लागतो का की त्याच्या fingerprints चालतात?>>
----- कानडा, फिन्गर प्रिन्ट त्या व्यक्तीची असायलाच हवी असे नाही... आई-वडिलान्ची चालायला हरकत नाही, पण मग अभ्यास जास्त करावा लागतो म्हणुन चार्जेस पण जास्तच आकारावे लागतात. आई-वडिलान्ची प्रिन्ट नसली तर अगदी शेवटचा उपाय म्हणुन शेजारच्या व्यक्तीच्या बोटाचे ठसे पण चालतात... अर्थात मग चार्जेस... Happy

थोडक्यात तुमच्याकडे पैसा असेल तर प्रिन्ट न बघताही अत्यन्त अचुक निदाने मिळतील... माझ्यासारखे कफल्लक असाल, तुमच्याकडे पैसाच नसेल तर मग ह्या रेषा कितीही ठसठशीत असल्या तरी काही बोलतच नाहीत.

फिन्गर प्रिन्ट त्या व्यक्तीची असायलाच हवी असे नाही... आई-वडिलान्ची चालायला हरकत नाही, पण मग अभ्यास जास्त करावा लागतो म्हणुन चार्जेस पण जास्तच आकारावे लागतात. आई-वडिलान्ची प्रिन्ट नसली तर अगदी शेवटचा उपाय म्हणुन शेजारच्या व्यक्तीच्या बोटाचे ठसे पण चालतात... अर्थात मग चार्जेस... स्मित

थोडक्यात तुमच्याकडे पैसा असेल तर प्रिन्ट न बघताही अत्यन्त अचुक निदाने मिळतील... माझ्यासारखे कफल्लक असाल, तुमच्याकडे पैसाच नसेल तर मग ह्या रेषा कितीही ठसठशीत असल्या तरी काही बोलतच नाहीत.

Happy

मला खरे तर "जाणकारांकडुन" ऊत्तर हवे आहे.
१. टेस्ट ची repeatability / reproducibility काय आहे?
२. Cross-sensor matching / Prediction बरोबर असते का?

---
कानडा

> डॉ स्किझो फ्रेनिआ

आवडलं

ही परिक्षा करुन घेणारे १०० टक्के डोकं गहाण ठेवणारे असतात. तरीही त्यांचे निकाल गाऊसीयन असतात. म्हणजेच ते 'शास्त्र' खोटं असलं पाहिजे. QED

GS +100.
Aschig Happy
These people are teaching unscientific approach to their kids through their pseudo scientific actions. Though they may not realize, it has consequences.

Corelation does not imply causation +100

Uday Lol

> १. टेस्ट ची repeatability / reproducibility काय आहे?

पुन्हा पैसे द्या - तेच रिझल्ट पुन्हा देऊ. या पेक्षा जास्त रिपिटेबिलिटी काय असु शकते?

Aschig Lol

मोकीमी, उत्तम माहिती.

लोकांना लाथाळ्या करायला एक कुरण हवे असते, आणी अतिशय विषादाने म्हणावे लागते की माबोचे असे कुरण केलेले आहे.

माबो वावर कमी होतोच आहे, तो पुर्ण बंद होइल की काय अशी शंका येवु लागली आहे.

अभ्यास कमी, अनुभव कमी आणी कुटाळक्या करायला रिकामा वेळ (हापिसच्या पैशाने अमाप) अशी स्थिती आहे.

शिवाय, धागाकर्ती ने आधीच विचारले होते की ज्यांना काही माहिती असेल ति त्यांनी द्यावी.

ते राहिले दुरच, वर माहिती देण्यार्‍यांना, अस्भ्य शब्दात उल्लेख करणे हे त्रासदायक आहे. ज्यांना स्वताचे नाव सांगण्याची लाज वाटते आणि आय डी सुद्धा टगेगिरी करणारे ( पहिले हाकलुन दिले म्हणुन दुसरे घेतलेले). अशांवर योग्य कारवाइ झालीच पाहिजे.

प्रेत्येक चर्चेच्या ठिकाणी हे येणार, काड्या करणार, धागा भरकटविणार, हे प्रकार थांबले पाहिजेत

लोकांना लाथाळ्या करायला एक कुरण हवे असते, आणी अतिशय विषादाने म्हणावे लागते की माबोचे असे कुरण केलेले आहे. >>> बरं. माबो सुधारण्यासाठी काय त्वरीत पावले उचलणार आहात हे कळवावे.

माबो वावर कमी होतोच आहे, तो पुर्ण बंद होइल की काय अशी शंका येवु लागली आहे. >>> याच्याशी इतरांचा काय संबंध ? तो पूर्णपणे तुमचा प्रश्न आहे. तुम्ही आलात तरी स्वागत नाही गेलात तरी दु:ख नाही.

अभ्यास कमी, अनुभव कमी आणी कुटाळक्या करायला रिकामा वेळ (हापिसच्या पैशाने अमाप) अशी स्थिती आहे. >> खरे आहे. इथे प्रत्येकजण तुमच्याइतका विद्वान असेल नाही. पण हापिसच्या पैशाने मी जसा नेट वापरत नाही तसेच आणखीही असतील. तुमचा रोख कुणाकडे आहे कल्पना नाही.

शिवाय, धागाकर्ती ने आधीच विचारले होते की ज्यांना काही माहिती असेल ति त्यांनी द्यावी. >>> धागाकर्तीचे काही म्हणणे नाही, तुम्ही इतके तडकण्याचे कारण कळालेले नाही.

ते राहिले दुरच, वर माहिती देण्यार्‍यांना, अस्भ्य शब्दात उल्लेख करणे हे त्रासदायक आहे. ज्यांना स्वताचे नाव सांगण्याची लाज वाटते आणि आय डी सुद्धा टगेगिरी करणारे ( पहिले हाकलुन दिले म्हणुन दुसरे घेतलेले). अशांवर योग्य कारवाइ झालीच पाहिजे. >>> तुम्हाला कुणीही अडवलेले नाही. तुम्ही कारवाई करा.

प्रेत्येक चर्चेच्या ठिकाणी हे येणार, काड्या करणार, धागा भरकटविणार, हे प्रकार थांबले पाहिजेत >>> पुढाकार घ्यावा.

धागाकर्ती ने आधीच विचारले होते की ज्यांना काही माहिती असेल ति त्यांनी द्यावी.>>
ही टेस्ट बकवास आहे आणि ती करा सांगणारे चलाख आहेत हे सांगणं "माहिती देण्यात" येत नाही का?
अस्चिग सारख्या शास्त्रज्ञ असलेल्या (नासा मध्ये ना?) माणसाने वेळात वेळ काढून इथे काही लिहिले त्याचा हेतु समजुन न घेता त्यावर "अभ्यास कमी, अनुभव कमी आणी कुटाळक्या करायला रिकामा वेळ (हापिसच्या पैशाने अमाप)" अशी शेलकी विशेषणं लावणार्‍याने इतरांना "लाथाळ्या करायला कुरणात आलेत" म्हणणं फारच मस्त. वरचे लोक निदान काही "कॉज" साठी करताहेत, तुम्ही कशासाठी करताय?

जीएस नी ही अगदी बरोबर प्रश्न विचारले आहेत. त्यावरही या तज्ञांकडून उत्तर आलेले नाही.

पर्स्नली इथे कुणाला काही फायदा होणारे का या टेस्टविरोधी लिहून हा तरी विचार करायचा. तेच या टेस्ट च्या बाजुने लिहिणर्‍यांचा व्यवसाय आहे हा, हे दिसतंय ना? तरी तुमच्या तक्रारी अशांच्या विरुद्ध ज्यांना काहीही फायदा-नुकसान नाहिये, जे प्युअरली सायंटिफिक काय ते सांगताहेत आणि सहानुभुती व्यावसायिकेला. वाहवा! लॉजिकमध्ये इत्क्या गंडलेल्या लोकांसाठी अजुन दोन-चार अशा टेस्ट काढून रग्गड पैसा कमवावा असं वाटू लागलंय.

जाणकार मंडळी : माझ्या शंकांच निरसन करा की.

कि तुम्ही हे मान्य करताय की तुमच्या या "शास्त्राला" या वैज्ञानिक संज्ञा माहित नाहित?

बाकी : अभ्यास कमी, अनुभव कमी आणी कुटाळक्या करायला रिकामा वेळ (हापिसच्या पैशाने अमाप)

याबद्दल सांगायचे तर ११ वर्षांपासुन fingerprints वर काम करतांना जे थोडेफार ज्ञान मिळाले त्याच्या basis वर वरील प्रश्न उपस्थीत केले आहेत. आणि आमच्या science मधे we are always open to accept any new "scientifically provable" technology.

माझ्यामते प्रत्येक सुशिक्षित व्यक्तिने आपल्या ज्ञानाचा ऊपयोग समाजाच्या भल्यासाठी करायला हवा. Dissemination of knowledge is one of the foremost aspects of research.

---
कानडा

मुधानंद का कोण ते फालतू आयडी, तुमच्या थर्ड क्लास प्रतिसादाला सभ्य भाषेत दिलेले उत्तर समजत नसेल तर तुम्हाला समजेल असा प्रतिसाद देत आहे..

नाव न घेता थर्ड क्लास भाषेत प्रतिसाद देताना लाज कशी वाटली नाही ? शरम असेल तर तोंड काळे करा आणि पुन्हा येऊ नका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे.

इथे फिन्गरप्रिन्टस तज्ञांनी टेस्ट्बद्दल शंका व्यक्त केली आहे, पण अर्थातच फिन्गरप्रिन्टस तज्ञांना फिन्गरप्रिन्टस मधले काही कळत नाही.

टेस्ट ब्रेनसंदर्भात आहे, इथले डॉक्टर्स म्हणत आहेत की सगळे बकवास आहे, पण अर्थातच डॉक्टर्सना ब्रेन वा शरीरशास्त्रातले काय कळणार ?

सायन्समधले तज्ञ, संशोधक म्हणत आहेत की ही टेस्ट साफ खोटी आहे हे दहावी शास्त्र शिकलेलल्या माणसालाही कळायला हवे.

पण त्यांनाही यातले काहीच कळत नाही कारण हे एवढे उच्च विज्ञान आहे की यातले कुठलेच क्वलिफिकेशन नसलेल्या व्यक्तीने एखाद्या बोगस कंपनीची पैसे भरून फ्रॅन्चाईझी घेतली तरच ते समजू शकते !!!
हेमाशेपो.
(स्वसंपादित)

Pages