बोटांच्या ठश्यांद्वारे पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स आणि करीयर मॅपिंग टेस्ट

Submitted by विनार्च on 20 November, 2012 - 06:17

बोटांच्या ठश्यांद्वारे पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स आणि करीयर मॅपिंग टेस्ट" याबद्द्ल काही माहिती आहे का ? कोणी करुन घेतली आहे का ही टेस्ट ?
माझ्या लेकीच्या शाळेत "ब्रेन स्केच सोल्युशन्स" ह्याच्यातर्फे ही टेस्ट करुन घेणार आहेत. फीज आहे ५०००रु...... अजूनतरी नाव नोंदवल नाही आहे...... ह्या टेस्टची विश्वासर्हता (बरोबर लिहीले आहे ??ऑथेनटिसिटी) माहित नाही आहे आणि अशाप्रकारच्या टेस्टची फी इतकीच असते का?

(नितीनचंद्र यांच्या "मल्टीपल इंटेलिजन्स" या धाग्यावर हा प्रश्न विचारला होता पण काहिच उत्तर न मिळाल्यामुळे इथे विचारत आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोटाच्या ठश्यांचे महत्व आपल्याला फोरेन्सीक किंवा व्हीजा वगैरे साठी माहित आहेच कारण ते अजिबात बदलत नाहीत म्हणुनच

मोकिमी, चांगली पोस्ट. Happy

जुना धागाहे हा....
मला सहज सुचले, इथे या धाग्याला/विषयाला /विषयावर वाट्टेलते आक्षेप घेणार्‍या काही व्यक्तिंच्या आयडीज आता अस्तित्वात नाहीत, तर त्या त्या व्यक्तिंचे बोटाचे ठसे घेउन आयडी रहाणे/जाणे याबाबत काही संबंध लावता येतोय का याचा अभ्यास व्हायला हवा होता, नै? Wink

मोहन की मीरा, तुम्ही हे गंभीरपणे लिहिताय ? Rofl Rofl

हाताच्या दहा बोटांच्या रेषांचा मेंदूच्या दहा भागांशी वेगवेगळ्या बुद्धीमत्तांचे थेट डायग्नॉसिस वा मापन करता येईल असा संबंध !!!! सर्व न्युरोलोजिस्ट्ना ताबडतोब रस्त्यावर आणेल असे महान संशोधन आहे हे !!! तुम्ही म्हणता तसे सायंटिफिक वगैरे असेल तर हे कोरिलेशन सिद्ध करणारे पेपर सायंटिफिक जर्नल्समध्ये नक्कीच प्रसिद्ध झाले असतील. तुम्ही काही संदर्भ देउ शकाल काय ?

>>>>>>
१. आपल्या बोटां वरील रेषा ज्याला आपण फिंगर प्रिंटस म्हणतो, त्या साधारण वयाच्या ६ ते ८ व्या महिन्यात निश्चित होतात. बहुतेकांच्या बोटा च्या रेषांचे पॅटर्न ५-६ प्रकारचे असतात. पण त्या रेषां मधील अंतर माणसागणीक बदलते. जसे आपले रुप माणसा गणीक बदलते तसेच.
२. ह्या बद्दल अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केले. अनेक थीअरी आज प्रचलीत आहेत. जशी हॉलंड थीअरी, मॅकेंझी थीअरी इ.इ.... पण ह्याबद्दल खरे संशोधन करुन त्याचा वापर बुद्धी वा मेंदुशी जोडुन मल्टीपल इंटेलिजन्स ची थीअरी आणली डॉ. हावर्ड गार्ड्नर ह्यांनी (https://en.wikipedia.org/wiki/Howard_Gardner).
>>>>>>>

हे साफ खोटे आहे. डॉ. गार्डनर यांनी मल्टीपल इंटेलिजन्सची थिअरी आणली आणि जरी ती सर्वमान्य नसली तरी करीअर कौन्सेलिंगसाठी वापरली जाते हे ठीकच. पण त्याचा फिंगरप्रिंटशी बादरायण संबंध जोडून एक सॉफ्ट्वेअर प्रोग्रॅम व फ्रॅन्चॅईझी मॉडेल याद्वारे मुलांबद्दल काळजीत असलेल्या पालकांना लुबाडायचे हे चीनी/ तैवानी स्कॅम आता भारतातही फोफावते आहे हे बघून धक्काच बसला.

यात नुसती आर्थिक फसवणूक नाही तर मुलांच्या आयुष्याशी खेळ आहे. हा १०० टक्के फ्रॉड आहे. इच्छुकांनी खोलात जाउन गुगलवर तपास करावा. न्युरोलॉजिस्ट, सायकिआट्रिस्ट्स यांच्याशी बोलावे म्हणजे हा केवढा भोंदूपणा आहे ते स्पस्ष्ट होईल.

>>हे काही भविष्य नाही. साधे सायंस आहे. त्याच्या मागे अनेक संशोधकां च्या आयुष्यभराची मेहेनत >>आहे. हॉर्वर्ड युनिव्हर्सीटी मधे ह्या विषयाचा स्वतंत्र विभाग आहे.... Rofl

असा कुठला विभाग आहे त्याची लिंक तुम्ही देऊ शकाल का ?

मंजूडी, तात्विक वा श्रद्धेचा विषय असला तर पटण्या न पटण्याचा प्रश्न येतो.

हाताच्या दहा बोटांच्या रेषांचा मेंदूच्या दहा भागांशी वेगवेगळ्या बुद्धीमत्तांचे थेट डायग्नॉसिस वा मापन करता येईल असा संबंध यात मला किंवा तुम्हाला पटण्याचा प्रश्न नाही. शास्त्रीय दृष्ट्या असे काही आहे की नाही असा प्रश्न आहे..

शास्त्रीय माहिती असे म्हणत त्यांनी धडधडीत खोटे लिहिले आहे. मी प्रमुख दोन-तीन मुद्दे कसे १००% टक्के खोटे आहेत ते वर दिलेच आहे की.

जी एस +१. शिवाय जी एस यांनी खिल्ली उडवली असे वाटत नाही.

>>आपल्या मेंदुच्या दोन्ही भागांना पच पाच लोब्ज असतात. (कंपार्ट्मेंटस) ते आपल्या हाताच्या बोटांशी जोडलेले असतात. ज्यांचा मेंदु जन्मतः वीक असतो वा मंद असतो त्यांच्या बोटांवर रेषा नसतात किंवा अती पुसट असतात.

वरील वाक्ये एकदम खटकली. मऊसूत पुरणपोळी खाताना अचानक मटनाचा वातड तुकडा दाताखाली यावा असे झाले. ही दोनीही वाक्ये अशास्त्रिय आहेतच. शिवाय काही जेनेटिक कारणाने ज्यांच्या बोटाचे ठसे पुसट आहेत अशांवर विनाकारण अन्याय करणारे आहेत.

रेल्वे स्टेशन वर वजन केल्यावर वजनाच्या मागे भविष्य ("आपके जीवन मे जल्दी ही एक सुंदर स्त्री आयेगी!") असते ते गंमत म्हणून वाचून सोडून देतो. इथे ही गंमत बरीच खर्चिक दिसते. शिवाय मुलांच्या आयुष्याशी खेळ!.

जीएस +४२

शुद्ध पहिल्या धारेचा खोटारडेपणा आहे. मी नाही त्यातली म्हणत म्हणत मस्त जाहिरातबाजी करून घेतली. आता कसले पुरावे अन कसल्या लिंका मागताय, गिऱ्हाइके जाळ्यात फसायला पण लागली.

कृपया असल्या जाहिरातबाजीच्या, खोटेपणाच्या नादी लागू नका, ही कळकळीची विनंती.

अशा पोस्टींना 'वा वा छान छान' म्हणण्याआधी निदान दहावीपर्यंत शिकलेल्या विज्ञानाचं स्मरण करा. Proud

<<कृपया असल्या जाहिरातबाजीच्या, खोटेपणाच्या नादी लागू नका, ही कळकळीची विनंती.

अशा पोस्टींना 'वा वा छान छान' म्हणण्याआधी निदान दहावीपर्यंत शिकलेल्या विज्ञानाचं स्मरण करा.>>

----- सहमत...

GS यानी खिल्ली उडवली आहे असे नाही वाटत...

Purna vaadh jhaalelya mansachya botanche thase gheun hyacha Kal khun, chori vagaire karnyakade aahe ka he Samjel na.
Politician Che thase baghun ha corruption, fraud Karnar nahi aani lokanchya aayushyala Vegala valan lavnar nahi asa Samjel ka.
He tar minority report chya hi Vartan thrilling aahe.

काय आहे की हल्ली मध्यमवर्गीय समाजात पैसे भरपूर खुळखुळताहेत (पूर्वीपेक्षा). पुन्हा बर्‍याच घरांतून एकुलती एक मुलं. आणि त्यातून पिअर प्रेशर. त्यामुळे हे सगळं करायला लागतंच असावं. पूर्वी कुणी ४,५ हजार द्या अशा टेस्ट करायला म्हटलं असतं तर पालकांकडे पैसे कुठे होते द्यायला? मग अशी दुकानं उघडलेल्यांचा बिझनेस ठप्प नसता बसला? जसं मार्केट तसा बिझनेस निघणार आणि चालणार.
नेटवर शोधून बघितल्यावर भारतात बर्‍याच जणांनी दुकानं उघडल्याचं दिसलं. कुणीतरी म्हणाल्याप्रमाणे सिंगापूरमध्ये सुरू झाल्याचं नेटवर तरी सापडलं नाही. तसंच चायनात काही ठिकाणी बॅन केल्याचं एका लिंकमध्ये म्हटलंय कारण टेस्ट कितपत विश्वसनीय आहे ह्याची हमी नाही म्हणून.

जीएस +४२ >> टग्या, ४२ हे तर सार्वकालीन उत्तर आहेच सगळ्या समस्यांवर. Happy खूप दिवसांनी आठवण झाली आज.
मूर्खपणा आहे. असतील शिते तर... सायो, पैसे असो की नसो लोकं बुवाबाजी कडे जायची थांबत नाहीत. विकेस्ट लिंक असतेच. Sad

>> सायो, पैसे असो की नसो लोकं बुवाबाजी कडे जायची थांबत नाहीत>> हो, पण ह्या केसमध्ये बिझनेस मांडून बसलेले फुकट करून तर देत नाहीत ना?

<<हो, पण ह्या केसमध्ये बिझनेस मांडून बसलेले फुकट करून तर देत नाहीत ना?>>
----२-४ हजार रुपये अक्कल खात्यात गेले तर पुन्हा परत येण्याची शक्यता असते, आणि ते परत येतातच. पण वाया गेलेला मौल्यवान असा वेळ कधिही परत येत नाही.

पालकान्ना आपण खुप काही केले याचे क्षणभर समाधान वाटेलही पण मुलान्चे भविष्याची दिशा कायमची बदलण्याचा मोठा धोका आहेच. नन्दिनी यान्ची पान दोन वरची सर्वात वरची पोस्ट वाचावी.

एखादी व्यक्तिच्या अंगठ्याच्या रेषा बघणे फार दुरची गोष्ट, निव्वळ अंगठ्याचा व त्याच्या नखाचा आकार, अंगठ्याच्या टोकाची गोलाई यावरुन व्यक्ति किती उताविळ, किती मानसिक / शारिरीक हमरातुमरी वर येणारी, किती विचारी, किती मागे मागे रहाणारी, वा उगाचच पुढे पुढे करणारी, किती व कशा प्रकारे ऑपोझिट सेक्स कडे आकर्षित होणारी वा न होणारी व असेच कैक बाबी सांगता येतात.

बोटाच्या अग्रावरील बारीक रेषांचा विचार मात्र मी कधी केला नव्हता, आता केला पाहिजे.
कारण मला यात तथ्य आहे असे जरुर वाटते आहे.

हस्तसामुद्रिकानुसार, प्रत्येक बोटावर एकेका ग्रहाचे अधिपत्य दिलेले आहे, व हातावर त्या त्या बोटाखालील त्या त्या ग्रहांचे उंचवटे/बारीक रेषा अभ्यासुन, त्याच व्यक्तिच्या कुंडलीत ते ते ग्रह "कमसर/बलिष्ठ/सौम्य/तटस्थ/युतिमधे" इत्यादी ताकदिंचे आहेत वा नाहीत हे आजमावता येते. मी क्युरॅसिटी म्हणून हे जरुर बघत असतो.
तर या प्रत्येक ग्रहास, जातकाचे "वागणूकीसंदर्भातुन" विशिष्ट कारकत्व दिलेले आहे, व बहुतांश वेळा, या ग्रह उंचवट्यांचे व हाताच्या तळव्यावरील ठळक रेषांची सांगड, त्या त्या व्यक्तिच्या "झाकलेल्या " (मुखवट्या आडच्या) व्यक्तिमत्वाचे दर्शन ढळढळीत पणे करुन देते. अर्थात वरील बाबी या उंचवटे, बोटांचे आकार व इतर रेषा यावर आधारीत आहेत.
मी अजुनही बोटांवरील अत्यंत सूक्ष्म रेषांद्वारे दिसणारे "शंख/चक्र/शुक्ती" इत्यादि आकारांचा अभ्यास केला नाहीये. वरील धाग्यावरुन, आता हा अभ्यास देखिल करावा , आजवर का केला नाहि, असे वाटते. Happy

अगदी अगदी. ज्योतिष "शास्त्रा" इतके तथ्य नक्कीच असेल त्यात. फक्त त्याला सायन्सच्या (आधी खरं शास्त्र होतं, ते संपादित केलंय) चौकटीत बसवण्याला आक्षेप आहे. दुकान उघडण्याला नाहीचे, असं करणं बेकायदा नक्कीच नाही तेव्हा अशा टेस्ट जरूर विकाव्या. फक्त न्युरोसायन्सच्या नावाखाली नको. स्युडो सायन्सची चौकट लावणे सगळ्यात डोक्यात जाते, ज्यांना समजत नाही ते बिचारे विश्वास ठेवतात, आणि फसतात.

>>>> फक्त त्याला खऱ्या शास्त्राच्या चौकटीत बसवण्याला आक्षेप आहे. <<<
अमितव, बरोबर. पण इथेही शब्दच्छल आहेच्चे.
शास्त्र हे शास्त्रच असते, राहिल.
सायन्स या शब्दाला "शास्त्र" म्हणत असुही, पण निव्वळ सायन्स हे जीव/रसायन/भौतिक या पंचेंद्रियांना जाणवणार्‍या बाबींवरच केवळ आधारीत आहे,
तर शास्त्र (खास करुन हिंदु धर्माधारीत शास्त्रे) ही याचेही व्यतिरिक्त पंचेंद्रियांना न जाणवणार्‍या बाबींवर आधारीत आहेत.
तेव्हा दरवेळेस, वा केव्हाही, "शास्त्रे"/शास्त्र विषय हे, "आधुनिक सायन्सच्या" चौकटीतच आहेत हे विनाकारण सिद्ध करीत बसण्याची गरज नाहीये. अशा कित्येक बाबी आहेत ज्या आधुनिक सायन्सच्याही आवाक्याबाहेरच्या आहेतच आहेत. अन हे समजुन घ्यायला दहाव्व्वी पर्यंतच्या शालेय विज्ञानाच्या अभ्यास पुरेसा नाहीच, पीयच्ड्या केल्या तरी तितकाहि अभ्यास पुरेसा नाही... Proud

पूर्ण मान्य. ज्या सायन्सचा अभ्यास पंचेद्रीयांना समजतो त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे असं म्हणू का? तसं म्हणतो. पण मग आधुनिक शास्त्रात काही नवीन शोध लागला की लग्गेच ते पुर्वज्यांना आधीच माहित होते त्याचं काय? पण ते राहूदे. आता हस्तरेषा आणि भविष्यावर बोलू.

{आता हा अभ्यास देखिल करावा , आजवर का केला नाहि, असे वाटते }

बरोबर आहे, लोकांना ज्योतिषाच्या नावाखाली येडा बनवायचा धंदा आधीपासुन करतोच आहे तर हा आर्थिक द्रुष्ट्या आकर्षक (लुक्रेटिव) भाग वगळुन कसं चालेल. मग हातावरच्या ०.१ मिलिमिटर जाडीच्या रेषांचा संबंध लाखो/करोडो किलोमिटर दुर असलेल्या ग्रहांशी जोडुन द्यायचा आणि शास्त्र शास्त्र म्हणत टिमक्या वाजवायच्या. क्या करे गंदा है पर धंदा है.

टग्यामहाशय, आपल्या पोटदुखीचे कारण कळतय हो मला.... Proud
काये ना की मी ज्योतिषी नसुन एखादा "डॉक्टर" अस्तो, अगदि स्पेशालिस्टही अस्तो, आधुनिक सायन्सचा अभ्यास करुन पेशी/जीव/जिवाणू/बॅक्टॅरिया ते आख्ख शरीर यांची चिरफाड करण्यात अन जोडण्यात तज्ञ अस्तो, अन म्हणूण तसे बनताना मी शिक्षणावर /देणग्या/टेबलखालचे असे खर्च केलेले कमित कमि पन्नास लाख रुपये, अन नम्तर दवाखाना थाटताना/मशिनरी वगैरेचे खर्च वसुल करण्याकरता, "कट प्रॅक्टिस" करीत, आलेले रुग्ण (गरज नस्तानाही) विशिष्ट चाचण्या करायला पुढे पाठवित माझेही उत्पन्न वाढवित अस्तो, जरा कुठे लचक/उसण भरुन पाठदुखीचा रुग्ण आला तर डायरेक्ट एक्सरे पासुन ते एमाराय पर्यंत चाचण्या करायला लावुन मग तुमच्या मणक्यात डिस्क "झिजल्यात" सांगत दुर्भिणीद्वारे "भोकाचे ऑपरेशन(?) " करायला लावुन पैका उकळला अस्ता.... तर ते चालले अस्ते कारण मी आधुनिक सायन्स मार्फत डॉक्टरी शिकुन मगच हे करीत अस्तो...... ते बरोबर... ..
अन हे शिन्चे ज्योतिषबितिष काये????? पुचाट भगवे ढोंग नुस्ते..... नै का? तुमच्या मते असेच आहे ना?

>>> मग हातावरच्या ०.१ मिलिमिटर जाडीच्या रेषांचा संबंध लाखो/करोडो किलोमिटर दुर असलेल्या ग्रहांशी जोडुन द्यायचा <<<
अहो त्या रेषा जातक बघु तरि शकतो, ग्रहतारेही बघु शकतो, अन होणारे/टळलेले परिणामही अनुभवु शकतो, पण इकडे काय? पाठीच्या मणक्यात म्हणे़ झीज झालीये..... कुणी बघितलीये???? Proud रोगी तर नाहीच बघु शकत..... अन मग त्या पेशी....... एकपेशी य जिवाणु, ... त्यांचे इन्स्फेक्शन की काय ते.... अन मग महाप्रचंड भिती रोग्याच्या बोडक्यावर... अन त्याचा खिसा खाली.....! असेच अस्ते ना? Wink खरे खोटॅ तुम्हालाच माहित असेल....

हा धागा ज्योतिष शास्त्राबद्दल चर्चा करण्यासाठी नसुन dermatoglyphics multiple intelligence test याबद्दल चर्चा करण्यासाठी आहे. त्यामुळे कृपया विषयाच्या अनुषंगानेच चर्चा करा.

हातावरच्या रेषांचा विषय असल्याने हस्त-सामुद्रिक हा उपविषय ओघाने येणारच चर्चेत. अगदीच अस्थानी नाही.

तुमचे लॉजिक वापरले तर - बोटांच्या ठशांचा विषय आहे तर फोरेंसिक सायन्स बद्दलही चर्चा करू शकतो, तेही अस्थानी होणार नाही Happy

असो, तुम्हाला या टेस्ट बद्दल असलेली माहिती शेअर करावी.

>>बोटांच्या ठशांचा विषय आहे तर फोरेंसिक सायन्स बद्दलही चर्चा करू शकतो, तेही अस्थानी होणार नाही
नक्कीच होणार नाही. उलट हा विषय देखील नक्कीच चर्चेत यावा.

>>तुम्हाला या टेस्ट बद्दल असलेली माहिती शेअर करावी.
सद्ध्या काही नाहीये, मिळाली कुठे काही तर शेअर करण्यात येईल.

आँ, हे डॉक्टरांचं टुमणं काय लावलंयस लिंब्या, हातावरच्या रेषांचं बोल.

आणि ज्योतिषबितिष पुचाट ढोंग आहेच्च मुळी, तिथे माझ्या मताचा काही प्रश्नच नाही.

Pages