बोटांच्या ठश्यांद्वारे पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स आणि करीयर मॅपिंग टेस्ट

Submitted by विनार्च on 20 November, 2012 - 06:17

बोटांच्या ठश्यांद्वारे पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स आणि करीयर मॅपिंग टेस्ट" याबद्द्ल काही माहिती आहे का ? कोणी करुन घेतली आहे का ही टेस्ट ?
माझ्या लेकीच्या शाळेत "ब्रेन स्केच सोल्युशन्स" ह्याच्यातर्फे ही टेस्ट करुन घेणार आहेत. फीज आहे ५०००रु...... अजूनतरी नाव नोंदवल नाही आहे...... ह्या टेस्टची विश्वासर्हता (बरोबर लिहीले आहे ??ऑथेनटिसिटी) माहित नाही आहे आणि अशाप्रकारच्या टेस्टची फी इतकीच असते का?

(नितीनचंद्र यांच्या "मल्टीपल इंटेलिजन्स" या धाग्यावर हा प्रश्न विचारला होता पण काहिच उत्तर न मिळाल्यामुळे इथे विचारत आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीअमी, मूळ विषयामधे बोटांच्या रेषांवरुन माणसाच्या व्यक्तिमत्वाचा काहि सुगावा लागतो का खरेच, असा आहे. अन असेल तर त्या टेस्ट्स विश्वासार्ह किति.
मी त्याबद्दल भाष्य करत नव्हतो. पण एकुण धाग्यावर, त्या विषयाला अगदीच तुच्छ/क्षौल्लक टाकाऊ लेखणार्‍या आगावु पोस्ट्स आल्या. म्हणून, त्या विषयातही तथ्य आहे (भले टेस्ट घेणारे/ प्रत्यक्ष टेस्ट अविश्वासार्ह असतीलही) हे सांगण्याकरता बोटे व हातांच्या रेषांचा अन्य "शास्त्रात" मनुष्याचा कल बघण्याकरताच होणारा स्वानुभवसिद्ध वापर सांगितला.
त्यावरुन बाकी काही ट्रोलिम्ग आयड्यांनी नेहेमीप्रमाणे विषयांतर करु पाहिले आहे. मी नाही.
माझा मुद्दा इतकाच, की कदाचित सध्या या प्रकारे टेस्ट घेणारे व टेस्टचे निकष/पद्धती कदाचित "अविश्वासार्ह" असतीलही, पण बोटांच्या रेषांवरुन मनुष्याचा "कल शोधणे' ही कल्पना अगदीच त्याज्य वा टाकावू अशी नाहीये. Happy फक्त यावर अजुन बराच अभ्यास व्हायला हवाय. Happy
तसेच, इतक्या लवकर, व फारशा अत्याधुनिक्/खर्चिक मशिनरी/तज्ञता वगैरे गरजेचि नसतानाहि रुपये पाच हजार (ही थोडी थोडकी रक्कम नाहीये) इतकी फी घेणेही अवास्तव/अचाट वगैरे आहे, असे माझे मत.
(च्यामारी, आयुष्याचा जोडीदार शोधतानाही कुंडली बघताना हार्डली दहा/वीस रुपड्या, जास्तीत जास्त पन्नास रुपये फेकतात... अन इकडे पाच हजार? Proud कैच्य्या कैच लुबाडणे हं..... Wink उगा पाच पन्ना पाचशे रुपये वगैरे फी ठीक आहे, पण त्यावरती जास्त घेणे ही लुबाडणूकच आहे असे माझे मत. )

लिंबूदा,
हे लोक ज्योतिष/हस्तसामुद्रिक यातले ज्ञानच त्याला विदेशी / विज्ञान असे लेबल लावून विकत असावेत का ? अशी शंका येत आहे. काही दिवसांनी जन्म तारीख आणि वेळ यावरून पुर्ण वैज्ञानिक काहीतरी सांगू असेही चालू होईल.

<<च्यामारी, आयुष्याचा जोडीदार शोधतानाही कुंडली बघताना हार्डली दहा/वीस रुपड्या, जास्तीत जास्त पन्नास रुपये फेकतात... अन इकडे पाच हजार? फिदीफिदी कैच्य्या कैच लुबाडणे हं..... डोळा मारा उगा पाच पन्ना पाचशे रुपये वगैरे फी ठीक आहे, पण त्यावरती जास्त घेणे ही लुबाडणूकच आहे असे माझे मत. >>
------ supply and demand....
कुन्डली 'शास्त्राच्या' तज्ञान्चा पुरवठा खुप आहे.... या सर्व कुन्डली तज्ञान्नी आपली शक्ती डॉक्टर होण्यासाठी वापरली तर मग डॉक्टरान्चा पुरवठा वाढेल आणि त्यान्चा चार्ज ५००० वरुन ३०० रुपयान्वर येईल.

असो. आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचे ज्ञान असणारे काही डॉक्टर (१० %, २५ % किव्वा तुमच्या समाधानासाठी अगदी ४० % समजा) त्यान्च्या पेशन्टना लुबाडतात हे मान्य करतो पण त्या विज्ञानशाखेमधे तथ्य आहे हे वारम्वार सिद्ध झालेले आहे, काही लोक ज्ञानाचा गैरफायदा घेतात जे चुकीचे आहे. तसे हाताच्या रेषान्च्या किव्वा कुन्डलीच्या बाबत म्हणता येत नाही... येथे सर्व हे सम्पुर्ण शास्त्रच थापा आणि केवळ थापाच आहेच, १०० % थापा.

>>येथे सर्व हे सम्पुर्ण शास्त्रच थापा आणि केवळ थापाच आहेच, १०० % थापा.
नाही अजिबात नाही. Angry
तुमचा हात किंवा कुंडली न पाहतासुद्धा मी सांगू शकतो की माझ्या या प्रतिसादावर तुमचे उत्तर लगेच येणार.

तुमचा हात किंवा कुंडली न पाहतासुद्धा मी सांगू शकतो की माझ्या या प्रतिसादावर तुमचे उत्तर लगेच येणार. >> अहो तोच तर त्यांचा पॉइंट आहे!!! Lol

<<तुमचा हात किंवा कुंडली न पाहतासुद्धा मी सांगू शकतो की माझ्या या प्रतिसादावर तुमचे उत्तर लगेच येणार.>>
----- होय.... आता हे अनुमान काढण्यासाठी तुम्हाला हात किव्वा कुंडली बघावी लागली नाही हे महत्वाचे आहे. जर आपण समोरा-समोर दोन तास बसलो तर तुम्ही मनुष्य स्वभावाचे अजुन खोल विश्लेषण करु शकाल... हे विश्लेषण बरोबर असु शकेल किव्वा क्वचित चुकेलही.

जस जसा तुमचा-माझा सन्वाद वाढेल तसे तुमचे अनुमान अचुक येत जाणार, अचुकता वाढणार. पण या अचुकतेचा आणि हाताच्या रेषेचा शुन्य सम्बन्ध असेल.

अशा पोस्टींना 'वा वा छान छान' म्हणण्याआधी निदान दहावीपर्यंत शिकलेल्या विज्ञानाचं स्मरण करा.>> Lol
मला ह्या टेस्टची फ्रँचायजी मिळेल का ? लोकांना एवढा पैसा खर्च करण्याची हौस आहे तर तो बिझनेस आपणच का मिळवु नये तेवढीच विडी-काडीची सोय होइल Wink , चिनुक्स लगे हात तु पण एक फ्रॅंचायजी घेऊन टाक. Proud

त्या ब्रेन स्केच साइटवर ही माहिती सापडली

1970 - USSR, Former Soviet Union. Using Dermatoglyphics in selecting the contestant for Olympics.

1980 - China carry out researching work of human potential, intelligence and talents in dermatoglyphics and human genome perspective.

1985 - Dr. Chen Yi Mou Phd. of Havard University research Dermatoglyphics based on Multiple Intelligence theory of Dr. Howard Gardner. First apply dermatoglyphics to educational fields and brain physiology.

2000 - Dr Stowens, Chief of Pathology at St Luke's hospital in New York, claims to be able to diagnose schizophrenia and leukaemia with up to a 90% accuracy. In Germany, Dr Alexander Rodewald reports he can pinpoint many congenital abnormalities with a 90% accuracy.

2004 - IBMBS- International Behavioral & Medical Biometrics Society. Over 7000 report and thesis published. Nowadays the U.S., Japan, China, Singapore, Malaysia & Taiwan apply dermatoglyphics to educational fields, expecting to improve teaching qualities and raising learning efficiency by knowing various learning styles.

किती खोटेपणा ! चायना अन सोव्हिएट युनियन ची ' माहिती' लिहिली आहे त्याचा पुरावा काय ? सोर्स काय ?

सेंट लु़कस हॉस्पिटल मधे पॅथोलॉजी चे डॉ स्किझो फ्रेनिआ चे निदान करणार ? कुठल्या पॅथॉलॉजिकल टेस्ट वरुन हे निदान करणार ? 90% accuracy कशाच्या कॅम्परिझन मधे ९० टक्के ?

असल्या थापेबाज कंपनीकडून आपल्या पाल्याबद्दल लोक माहिती मिळवणार अन त्याच्या आधारावर त्या मुलांच्या आयुष्यावर, त्यांच्या पर्सनॅलिटीवर, हॅपीनेसवर दूरगामी परिणाम होणारे निर्ण्य घेणार ? कठीण आहे

त्या किमया ताईंनी माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही

अरे सोप्पं आहे हे खरे की खोटे ते ओळखणे. ज्यांचा यावर विश्वास आहे त्यांच्या हातावरच्या रेषा मंद / पुसट आहेत का ते बघा. त्या असतील तर हे खरे आणि त्या रेषा पुसट नसतील तर हे शास्त्र खोटे. हाकानाका! Proud

>>>ब्लड टाईप पण बदलत नाही, क्रोमोसोम पण बदलत नाहीत. मग त्यांची चाचणी का नको ? केसांचा रंग पण ( पांढरे पडणारे सोडल्यास ) बदलत नाही ? त्यावरुन का परिक्षण करता येऊ नये ? <<

मेधा,

तुम्ही दुसर्‍यांना झोडण्याच्या ( इथे मोकीमींना बहुधा) नादात स्वतः पण जरा काय लिहिता त्याचा विचार करा ना.
तुम्ही इतकं विनोदी लिहू नका. उगाच नको ती उदाहरणं नको तो सबंध जोडून देवून नका.

तुमचा जो मुद्दा आहे ना, फक्त "बदलण्या" विषयी असेल तर सांगते,

क्रोमोसोम बदलतात. .. अगदी कुठलयाही वयात. म्युटेशन एकलच असेल की?
तुम्ही म्हातारे होता ना, ती सुद्धा क्रोमोसोम बदलण्याचीच एक प्रोसेस असते.

नाहितर चिरतरूण रहाणारे लोकं असती आणि काहीच डिसिजेस नसतेच जगात.

केसाचा रंग सुद्धा बदलतो. अगदी जन्मापासूनचा रंग हा बदलतच असतो. आणि शेवटचा तुम्हाला दिसतो ना ग्रे रंग ती सुद्धा रंग बदलण्याची प्रोसेस असते. अगदी काहींना दहा वर्षापासूनच पांढरे केस दिसतात.
बाकी , कुठल्या क्षणाला किती बदललं काय झालं, कशाने हे इथे सांगून उपयोग नाही. Happy

------------------------------------------------------------
इथे लोकं दुसर्‍यांना झोडण्याच्या नादात इतकं आक्रस्ताळी पोस्टी पाडतात व तुलना करतात एखादा शब्द घेवून तेच हास्यास्पद आहे. वर शेखी मिरवणे की कसं हाणून पाडलं.

नका करू ना टेस्ट, पण इतकं विनोदी लिहु नका. Wink

ता.क. : मी ह्या टेस्टच्या कुठल्याच बाजूला उभी नाही.

झंपी, कोणीतरी दुसर्याला बळच झोड्तय असा समज करुन घेऊन तुम्ही ते जे विधानं करतच नाहीयेत त्यावरुन त्यांना नका हो बळच झोडपायची घाई करु! दमानं घ्या. Lol
शोनू क्रोमोसोम्सच्या नंबर बदलत नाही म्हणत आहे आणि तुम्ही डिटिरियोरेशनबद्दल सांगताय.

क्रोमोसोम चेंज मुळे केसांचा रंग बदलतो असं विधान लगेच बदललंत ?

इथे लोकं दुसर्‍यांना झोडण्याच्या नादात इतकं आक्रस्ताळी पोस्टी पाडतात व तुलना करतात एखादा शब्द घेवून तेच हास्यास्पद आहे. वर शेखी मिरवणे की कसं हाणून पाडलं.>> हे मात्र आरशात पाहून लिहिलेलं दिसतंय.

खरं तर डर्मॅटोग्लायफिक्सबरोबर एक मिड ब्रेन स्टिम्युलेशनची पण एजन्सी घ्यायला हवी.
म्हणजे जी मुले अभ्यासात विक दिसतात त्यांना मिडब्रेन स्टिम्युलेशन करून हुशार बनवता येईल. आणि जी खरेच हुशार आहेत त्यांना सुपरह्युमन बनवता येईल.
मग ती डोळ्यांवर पट्टी बांधून नोटांवरिल नंबर आणि कागदावरिल कविता ओळखायला लागली की भारताचा प्रचंड विकास होईल.
तो पण अगदी 'शास्त्रीय' पद्धतीने!
Wink

बाकी मेधाताई, तुम्ही या क्रोमोजोम आणि त्यांशी रिलेटेड आजार की अश्याच काहिश्या विषयांत पाश्चात्य विज्ञानात काहितरी संशोधन करता म्हणे.
पण तुम्ही सायंटिफिक संशोधन करता आणि या सगळ्या डर्मॅटोग्लायफिक्स आणि मिडब्रेन स्टिम्युलेशनकरता स्युडोसायंटिफिक संशोधनाची गरज आहे.
तेव्हा शक्यतो या विषयावर लिहिताना जरा विचार करा, तुम्ही ते लिहायला खरेच सक्षम आहात का?
(मी बघा आजार/बिजारांविषयी धागे असले तर हल्ली शक्यतो 'पास' करते. कारण डॉक्टर सोडून सगळे त्याबद्दल ऑथॉरिटीने लिहिण्यास सक्षम असतात. Wink , त्यांच्यापुढे माझी लायकी नाही.)

अरेरे, कुठून हा धागा वाचला ! इतके दिवस मी किती सुखात होतो.

हल्ली सहीवरून स्वभाव , मुलांचा कल इत्यादी जाणून घेता येतं म्हणे. आमचे डॉक्टर हस्ताक्षरावरून इंटेलिजन्स टेस्टबद्दल गेले वर्षभरापासून खुबीने सांगताहेत. त्यांच्याकडे मुलांच्या समस्यांना चांगले उपचार मिळत असल्याने त्यांना सुरूवातीला विरोध केला नाही. पण नंतर दर रविवारी या कसल्या सोसायटीकडून घेण्यात येणा-या कार्यक्रमांचे एसएमएस येऊ लागले. डॉक्टर सुरूवातीला दर वेळेला विचारत एसएमेस मिळाला का ? आम्ही काहिच न बोलण्याचे धोरण ठेवले. शेवटी ते कंटाळले.

विरोध न करण्याची कारणे -
डॉक्टरसारखी व्यक्ती जर सांगू लागली तर तिच्याशी काय वाद घालणार ?
उठसूठ गूगल सर्च करून मुद्दे सिद्ध करत बसलो तर आयष्याचे गूगल होऊन जाईल.

शाळेत देखील हल्ली अशा काही स्कीम्स येऊ लागल्या आहेत. काही ठिकाणी थेट विरोध करणे जमत नाही. आमच्या भागात आयसीएसई अभ्यासक्रमाची चांगली शाळा नाही. याचा गैरफायदा घेऊन काही वेळा पटत नसेल तर शाळा सोडून जाऊ शकता असे ऐकवले जाते. त्यामुळे विरोध न करता त्यांच्या स्कीम्सकडे दुर्लक्ष करणे श्रेयस्कर ठरते.

एक एअर फोर्स मधून रिटायर झालेले अधिकारी शाळाशाळातून विद्यार्थ्यांच्या मल्टीपल इंटेलिजन्स बद्दल भाषणे देत फिरतात. अगदी खरं सांगायचं तर पुतणीच्या केजीच्या वर्गात मी सुद्धा प्रभावित झालो होतो. शाळा इम्प्रेस गार्डन झालीच होती. त्या अधिका-याचे व्यक्तीमत्त्व, प्रेझेंटेशन स्कील याचा महत्वाचा भाग होता. त्यांनी उदाहरणे देताना अभिमन्यूसारखी उदाहरणे दिली. हे शक्य आहे असं म्हणाले. इंटेलिजन्स आईच्या पोटातच ठरतो. तुम्ही जर आईच्या पोटात असतानाच संस्कार केले तर मूल जन्मल्यानंतर वेद सुद्धा म्हणू शकतो असे अचाट दावे त्यांनी केले. त्यांचा आत्मविश्वास पाहून कुणालाही प्रश्न विचारायची हिंमत होत नव्हती. शिवाय प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या सायंटिस्टचे नाव घेणे, फेमस कोट्स पेरणे यामुळे पालक गपगार पडले होते.

त्यांनी सांगितलं की आमच्या कडे सीनीयर केजीचा मुलगा रॉकेट सायन्सबद्दल बोलतो, पाचवीतला मुलगा रोबोटिक्सचे डिजाईन्स बनवतो. हे पहायचं असेल तर अमूक नंबर वर फोन करा. यांची संस्था कोरेगाव पार्कला आहे. या गोष्टीला पंधरा वर्षे झाली. तेव्हां फोन केला होता. फीज फक्त ६०००० रूपये होती. (तेव्हांचे साठ हजार).
छोटे छोटे पॅकेजेस होते. पण आता ते लक्षात नाही. बालाजी तांबेंचं गर्भसंस्कार पण असंच काहीतरी आहे असं ऐकून आहे. आणखी एक हवाई दलातून निवृत्त झालेले उच्चाधिकारी सध्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आव्हान देत फिरताहेत. गूढ शक्तीमधे कसे सायन्स आहे हे सांगत फिरत असतात. अशांच्या हुद्द्याची छाप पडत असते. शिवाय लोकांकडे पडताळणीसाठी वेळ आणि ते कसं करायचं याची माहिती नसते.

त्यामुळे या गोष्टींना सहज मार्केट मिळत असावे.

मोहन कि मीरा

तुम्ही या टेस्टस बद्दल कुणाला आपणहून सांगत नाहीत हे आवडले. पण ज्या टेस्टस तुम्ही केल्या आहेत त्याबद्दल तुम्ही इथे लिहील्याने तुम्हाला त्याबद्दल प्रश्नांची उत्तरे इथेच द्यावी लागतील. कारण या टेस्ट्स ख-या आहेत असा दावा तुम्ही केला आहे. दावा केल्यामुळे त्याबद्दलची शास्त्रीय माहिती तुम्ही इथे द्यावी हे तुम्हाला मान्य होईल अशी आशा वाटते. प्रत्येक गोष्ट समोरच्याने गूगल करून तपासावी हे शक्य नाही हे देखील तुम्हाला पटेल हा विश्वास वाटतो.

बोटाच्या फिंगप्रिंट्सचे पॅटर्न्स आणि त्याचा मेंदूशी असलेला संबंध याबद्दल आकृत्या काढून / देऊन तुम्ही समजावू शकाल का ? त्याबद्दल कुठे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत, मेडीकल सायन्सच्या कुठल्या मॅगेझिन मधे ते प्रसिद्ध झाले, त्यावरील चर्चा आणि ते कसे सिद्ध झाले याबद्दलची माहिती थोडक्यात मिळेल का ?

तुम्ही त्याबद्दलची शास्त्रीय माहिती तपासलेली असल्याने या अपेक्षा फार नसाव्यात असे वाटते.

मेधा, अरेरे खूपच वैतागले दिसता व पाहिजे ते समज आहेत तुमचे.

मी इथे कुठे लिहिलेय क्रोमोसोम मुळे केसांचा रंग बदलतो? ते आधी दाखवा. माझी पोस्ट आधी नीट वाचा.

हो पण क्रोमोसोम मुळे काय काय बदलतं ह्याची माहीती घ्याच.
ते बदल कसे, कधी होवु शकतात.

तुम्ही दोन मुद्दे लिहिलेत ना, क्रोमोसम पण बदलत नाही... आणि केसाचा रंग पण बदलत नाही तेव्हा मी त्यावर लिहिलेले सलग एकत्र वाचायची घाई करु नका.

आणि मुद्दा हाच होता ना तुमचा की, क्रोमोसोम बदलतच नाही तेव्हा त्यावर लिहिलेय. उगाच कोलांट्या मारू नका.

पण तुम्हाला कळणं कठीण आहे दिसतय. तुम्ही स्वतः आरशात बघून लिहिता म्हणून दुसर्‍यांना असे म्हणता का हो?

दुसर्‍याकडे पुरावे मागायच्या आधी स्वतः बेधडक विधाने करु नका.

कै च्या कै अपेक्षा आहेत तुमच्या जख्मी.

मोहन की मीरा यांनी अगदी दहावी नापास झालेल्यांना देखील समजेल आणि त्यांचा विश्वास बसेल अशा शास्त्रशुद्ध भाषेत भली मोट्ठी पोस्ट आधीच लिहिली आहे. तरीही तुमच्या मनात शंकाकुशंका असतील तर तो फक्त तुमच्या अकलेचा दोष आहे. तसेही तुमच्यासारख्या बुप्रावादी, सिक्युलर, कम्युनिस्ट, नक्षली लोकांना महान प्राचीन हिंदू संस्कृतीला उठसूट झोडपण्याशिवाय दुसरे काही कामधंदे नाहीत.

मुळात मेडिकल सायन्स(?) कसे बोगस आहे हे महान लिंबूशास्री याने वर सप्रमाण आणि निर्विवादपणे सिद्ध केलेच आहे. त्यामुळे आधी त्याच्याशी काय तो वाद घाला आणि मगच शोधनिबंध का काय ते मागायचा हक्क तुम्हाला मिळतो.

एनी वे मोहन की मीरा सध्या मायबोलीवरच्या नवीन जातकांच्या टेस्ट करण्यात बिझी आहेत. नंतर या मूर्खांना, आय मीन जातकाना टॅरो कार्ड वगैरे सायन्स समजावण्यात वेळ जाईल. फुकट केलेल्या मदतीला काहीच अर्थ नसतो म्हणून केवळ तत्वाखातर काही हजाराची मामुली रक्कम फुल ना फुलाची पाकळी म्हणून घेण्यात येईल.
इथे आता दलदल झालीच आहे तेव्हा धंदा मंद झाल्यावरच इथे येण्याचे होईल तोपर्यंत लिंबूबरोबर फुगड्या घालत बसा. खूप दमलो तरी कुठे पोचलो का नाही असा प्रश्न मात्र मनात येऊ देऊ नका.
जय राम श्री राम जय जय राम।

{शास्त्र हे शास्त्रच असते, राहिल.
सायन्स या शब्दाला "शास्त्र" म्हणत असुही, पण निव्वळ सायन्स हे जीव/रसायन/भौतिक या पंचेंद्रियांना जाणवणार्‍या बाबींवरच केवळ आधारीत आहे,
तर शास्त्र (खास करुन हिंदु धर्माधारीत शास्त्रे) ही याचेही व्यतिरिक्त पंचेंद्रियांना न जाणवणार्‍या बाबींवर आधारीत आहेत.
तेव्हा दरवेळेस, वा केव्हाही, "शास्त्रे"/शास्त्र विषय हे, "आधुनिक सायन्सच्या" चौकटीतच आहेत हे विनाकारण सिद्ध करीत बसण्याची गरज नाहीये. अशा कित्येक बाबी आहेत ज्या आधुनिक सायन्सच्याही आवाक्याबाहेरच्या आहेतच आहेत. अन हे समजुन घ्यायला दहाव्व्वी पर्यंतच्या शालेय विज्ञानाच्या अभ्यास पुरेसा नाहीच, पीयच्ड्या केल्या तरी तितकाहि अभ्यास पुरेसा नाही }

{>>> मग हातावरच्या ०.१ मिलिमिटर जाडीच्या रेषांचा संबंध लाखो/करोडो किलोमिटर दुर असलेल्या ग्रहांशी जोडुन द्यायचा <<<
अहो त्या रेषा जातक बघु तरि शकतो, ग्रहतारेही बघु शकतो, अन होणारे/टळलेले परिणामही अनुभवु शकतो, पण इकडे काय? पाठीच्या मणक्यात म्हणे़ झीज झालीये..... कुणी बघितलीये???? फिदीफिदी रोगी तर नाहीच बघु शकत..... अन मग त्या पेशी....... एकपेशी य जिवाणु, ... त्यांचे इन्स्फेक्शन की काय ते.... अन मग महाप्रचंड भिती रोग्याच्या बोडक्यावर... अन त्याचा खिसा खाली.....! असेच अस्ते ना? डोळा मारा खरे खोटॅ तुम्हालाच माहित असेल....}

हे वरचे लिम्बुभाउन्नी लिहिले असेल तर (जोडाक्षरे त्यांच्याप्रमाणे) ते एक चान्गले व्यावसायीक आहेता असे म्हणता येत नाही. त्यांन्नी ताबडतोब पाच हजारात पंचवीस वर्षे भविष्य (ए एम सी आणि वॉरण्टी सहीत) अशी स्कीम आमच्याकडे आहे असे सांगितले असते तर त्यान्चा जास्त धन्दा झाला असता. आता हे नवीन शास्त्र त्यान्चा धन्दा बसवनार.

पुणे येथील न्यूरोलॉजी सेंटरच्या संचालिका अंकशास्त्र तद्न्य मानसी काळे दोन दिवसांच शिबिर औरंगाबादला मधुरांगणतर्फे घेणार आहे. यात स्वाक्षरी, जन्मतारीख, रंग, नंबर याच्या माध्यमातून स्वभावातील गुणदोष व करिअर कोणते निवडावे ... अशी जाहिरात वाचण्यात आली.

>>>>पुणे येथील न्यूरोलॉजी सेंटरच्या संचालिका अंकशास्त्र तद्न्य मानसी काळे..... Rofl

न्यूरोलॉजी आणि न्यूमरोलॉजी मध्ये थोडासा फरक असावा असे मला वाटते.

न्यूमरोलॉजीचा वापर करून न्यूरोलॉजीचे प्रश्न दूर करता येतात हो. हस्तरेषा, अक्षर, चेहेरा, पायाचे ठसे, फोटो, पडलेला केस, वापरलेला कपडा, यानेही. जग कुठे आहे आणि तुम्ही कुठे?
आमच्या शाळेत ते लोणावळा वाले येत कायतरी रंगीत दिवा घेऊन. तो विद्यूत दिवा कायतरी ८-१० रंग दाखवायचा एकामागूम एक. मग शेवटी कुठला दिसला त्यावर कायतरी निष्कर्ष होते. काय ते आठवत नाही पण सगळं फुकट होतं. ज्यांना अधिक माहीती वा निष्कर्ष हवेत त्यांच्यासाठी पैसे देऊन कायतरी होतं. पण आमचे पालक असे सुशिक्षीत नव्हते. त्यांनी विश्वास नाही ठेवला. ठेवला असता तर आम्हीही डॉक्टर इंजिनीअर ऐवजी मस्तं रॉकेट सायंटीस्ट नायतर राष्ट्रपती झालो असते की नाही? चंद्र, गुरू, शनि, एवढच काय, दुसर्या आकाशगंगेत पण बंगले बांधले असते की नाही? आता आमच्या मुलांसाठी तरी आम्ही हे उपाय करणार व त्यांच्यातर्फे आम्ही करू शकलो नाही ते करून घेणार.

Pages