प्रकाशचित्रांचा झब्बू - असावे घरकुल आपुले छान!!

Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 14:16

घर! घर देता का कुणी घर? ही आर्त हाक असते प्रत्येक सजीवाची. मग ती मानवजातीची असो वा प्राणीसृष्टीची.
वास्तव्य कायमचे असो वा तात्पुरते, चिऊकाऊचे असो वा राजाचे, स्वप्नातले असो वा खरे--- घरकुल आपुले हे हवेच!
तर लोकहो, बांधा झब्बू आपल्या तुपल्या घरकुलांचे!!!

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.

आजचा विषय :- असावे घरकुल आपुले छान.


gharkulCollage1.jpg

प्रकाशचित्र : शुगोल,चिन्मय कामत,तोषवी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

DSC00011.jpg

आहाहा..किती गोड, जागु..दिवाळीतला किल्ला का???

हे माझ्या लेकीचं आवडत बॉक्सच घर.... घरात कोणती नविन वस्तू आली की तिचा आनंद गगनात मावत नाही कारण तिला नविन घर मिळत ना.... Happy
DSCN0360_1.JPG

हे विनार्च माझी श्रावणी पण अशीच खेळते. कोणती मोठी वस्तू घरात आली की तिच्या बॉक्सच तिच घर होत.

वर्षुताई, ब्रुसली च्या घराच्या फोटो बद्द्ल धन्यवाद! नवर्‍याच आराध्य दैवत आहे तो Happy

हे विनार्च माझी श्रावणी पण अशीच खेळते. कोणती मोठी वस्तू घरात आली की तिच्या बॉक्सच तिच घर होत.>>>>>>>आता ती नाही खेळणार. Wink Proud

विनार्च, तुमचा तो पानाच्या घराचा फोटो पाहून मला कोकणची फारच आठवण आली>>>> शोभा अलिबाग येथील फोटो आहे तो पण कोकणात खूप दिसतात अशी मुंग्यांची घर Happy
थॅन्क यु ,मामी Happy

वळणावर नसलेलं पण वळून वळून बघावसं वाटणारं वळलेलं घर. नीस ते कान (फ्रान्स) च्या वाटेवर :

विनार्च, तू त्या फिनिक्स मिलमधला वाळूच्या किल्ल्याचा फोटो टाकलायस तो माझ्याकडेही आहे. Happy

कोकणात खूप दिसतात अशी मुंग्यांची घर>>>>काय कल्पकतेने बांधतात ना? Happy

Pages