प्रकाशचित्रांचा झब्बू - असावे घरकुल आपुले छान!!

Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 14:16

घर! घर देता का कुणी घर? ही आर्त हाक असते प्रत्येक सजीवाची. मग ती मानवजातीची असो वा प्राणीसृष्टीची.
वास्तव्य कायमचे असो वा तात्पुरते, चिऊकाऊचे असो वा राजाचे, स्वप्नातले असो वा खरे--- घरकुल आपुले हे हवेच!
तर लोकहो, बांधा झब्बू आपल्या तुपल्या घरकुलांचे!!!

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.

आजचा विषय :- असावे घरकुल आपुले छान.


gharkulCollage1.jpg

प्रकाशचित्र : शुगोल,चिन्मय कामत,तोषवी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Killa.JPG

ghar.jpg

माझे एकेकाळचे घर... ३ वर्षाच्या ३ अपार्टमेंटसपैकी सगळ्यात जास्त चांगल्या आठवणी असलेले अपार्टमेंट. २५ जेम्सटाऊन, मिलेज अ‍ॅव्हेन्यू
(कधी नव्हे ते अ‍ॅयथेन्स, जॉज्या मधे बर्फ पडला त्यामुळे नवलाईने बरेच फोटु मारले होते!)

JT25.jpg

100_6299.JPG

h8.jpg

सॉल्लिड ! एकसे एक घरं आहेत. कोकणातली विनार्च आणी जिप्सीनी टाकलेली घरं तर अतीशय मनमोहक, निसर्गरम्य आहेत. बाकी पण मस्तच. छोटुकल्यांची पण घरे छानच.

अरे वाळवंटातील घरं नाहीत का कुणाजवळ्?:अओ:

खेकड्यांची घरे तर धमाल आहेत. मस्त तुरुतुरु पळत जाऊन घरात लपतात. ( प्रत्यक्षात कधी पहायला मिळेल देव जाणे )

Pages