हितगुज २०१२ दिवाळी अंकाकडून वाचकांच्या अपेक्षा काय?

Submitted by संपादक on 15 September, 2012 - 01:03

श्री गणरायाच्या आगमनाच्या तयारीत मग्न असतानाच एकीकडे चाहूल लागते दिवाळीची आणि अर्थातच दिवाळी अंकाची.

हितगुज दिवाळी अंकाचं यंदाचं हे तेरावं वर्ष. या वर्षीचा दिवाळी अंकदेखील आजवरच्या मायबोलीच्या वाचनीय दिवाळी अंकाच्या परंपरेला साजेसा असावा, हीच तुम्हां-आम्हां प्रत्येक मायबोलीकराची इच्छा! 'वाचकांच्या पसंतीस उतरेल' असा दिवाळी अंक प्रकाशित करण्याच्या कामात सर्वात मोलाचा सहभाग हा अर्थातच आपणा वाचकांचाच ...

एक रसिक, सूज्ञ वाचक आणि कलाउपासक या नात्याने आपण 'ह्या दिवाळी अंकामध्ये तुम्हांला काय वाचायला, ऐकायला आणि पहायला आवडेल? या अंकाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आणि या अंकात कोणत्या गोष्टी टाळाव्यात?' ह्याबाबतची तुमची मत कृपया इथे मांडा ही मनापासून विनंती.

येत्या दिवाळी अंकात कोणकोणत्या विषयांवर साहित्य असावे याबद्दलच्या आपल्या अपेक्षा संपादकांपर्यंत पोचवण्याची अखेरची तारीख आहे - रविवार, दिनांक २३ सप्टेंबर.
त्यानंतर हा बाफ लिखाणासाठी बंद करण्यात येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उगीच काहीतरी वेगळं इतकंच, थोडी मजा! म्हणजे अ‍ॅक्च्युअली एकाच विषयावर दोन विरुद्ध बाजूंनी ठरवून लिहायचे, असेही एक मनात आले होते.

समजा त्या दोघींनी 'आजची वाचन संस्कृती' हा विषय निवडला तर ती व्यवस्थित आहे असे एकांनी पटवून द्यायचे आणि नाही असे दुसर्‍यांनी. तत्सम काहीतरी...

अर्थात ते करण्यासाठी कट ऑफ ची गरज नाही हे मान्यच, पण जो मुद्दा निघाला आहे की 'नवे आणि जुने' त्यातून काहीतरी चांगले मिक्सिंग होईल असे आपले वाटले

मुद्दामहून विरुद्ध लिहायचं असं म्हणत आहे, नवे जुनेच असे नाही, पण नवे जुने इतक्याचसाठी म्हणालो की नवे आणि जुने असे काही आहे असा विचार ठळकपणे केला जातो असे काहीवेळा दिसते, म्हणून, बाकी काही नाही.

नवे जुने या वादावरच होऊ देत की मग चर्चा.
त्या चर्चेचाच एक विभाग असूदेत. एकदाच काय ते समज गैरसमज निघून जाऊदेत.

नवे जुने या वादावरच होऊ देत की मग चर्चा.
त्या चर्चेचाच एक विभाग असूदेत. एकदाच काय ते समज गैरसमज निघून जाऊदेत.
<<<

दिवाळी अंक आहे ना! म्हणून! दिवाळं अंक असेल तेव्हा तसंही करता येईल.

'आजची वाचन संस्कृती' >>>> असले जड विषय उदाहरणादाखलही देऊ नका प्लीज. कोणीतरी मनावर घेऊन यावर निबंध लिहितील .... Proud

एव्हाना, इतक्या सुचना ऐकून संपादक मंडळाचं डोकं भंजाळलं असणार. Happy

नको नको. कोणी यावर खरंच लिहिलं तर वाचणं नशिबी येईल. आता वयापरत्वे असे शब्दबंबाळ विषय झेपत नाहीत. Happy

खुप करमणुक होते आहे. काही काही सुचना एकदम भारी.

१. मागील अंक / धागे ह्या मधुन काही निवडक लेख एकत्र करुन त्यांचा एक विभाग करता येइल.
२. एखादा विषय देवुन, येणार्‍या लेखातुन निवडक ३/४ लेख छापता येतिल.
३. प्रकाशचित्र आणि प्रवास वर्णन ह्यांचा एखादा भाग ठेवता येइल. पण तो जरा हटके असावा. म्हणजे एखाद्या नेहेमीच्या मायबोली कराने काही हटके प्रवास केला असेल, वा अत्ता पर्यंत चे त्याचे अनेक अनुभव त्याने/तिने लिहावेत. जे नेहेमीच्या प्रचिं पेक्षा हटके असतिल. ह्यात मग एखादी छोटी फिल्म असेल तरी चालेल.
४. एखादा परीसंवाद वा मत प्रदर्शन विभाग विषय साधारण " मायबोलीने मला काय दिले?" वा इतर काहीही माबो शी नीगडीत.
५. कथा आणि मुलाखत ही नेहेमीची हिट सदरे. पण कथा सुध्धा ५-६ पेक्षा जास्त नकोत. एखादी गुढ कादंबरी.
६. विभागांची नावं सरळ साधी.
७. प्रतिक्रिया द्यायची सोय आणि त्यामधुन उत्क्रुष्ठ प्रतिक्रियांना क्रमांक तो स्वतः लेखक देइल. असे किंवा ह्यासम काहितरी. कधी कधी माबो वर च्या प्रतिक्रियाच जास्त वाचनिय असतात.
८. चांगले बाल साहित्य सभासदांकडुन मागवुन त्यातले २/३ लेख/ कविता लहान मुलांच्या आवाजात
९. निवडक कविता / गजल कविच्याच आवाजात. काही लोक जे नेहेमी काव्य संमेलनात भाग घेतात त्यांना कविता वाचनाचा चांगला सराव आहे.
१०. संपादक मंडळींचा परिचय व त्यांचे हे काम करताना आलेल्या अनुभवांचे कथन. ( हा एक थँक लेस जॉब आहे )

मला असे वाट्ते की नवे -जुने असा वाद बाजुला ठेवुन नव्या लेखकांनी केलेल्या कथांना योग्य तो प्रतिसाद सर्वांनीच द्यावा, तरच नव्यांना ही संधी मिळेल आणि जुन्यांचा मोठे म्ह्णुन अनुभव कळेल ,नव्यांचे कुठे चूकते हे कळेल, आणखी एक दिवाळी अंकासाठी लेखन क से निवड्ता?

परिसंवादाच्या कल्पनेला अनुमोदन. मात्र ते सालाबादाच्या साहित्य संमेलनांत असतात तशा जड आणि शब्दबंबाळ विषयांवर (ज्यांचा शेवट अत्यंत भंपक आणि वाईट किंवा अचानक राजकारणी लोक व्यासपीठावर आल्याने अत्यंत विनोदी होतो. आजवर कुठच्याही परिसंवादातून निष्पन्न काही नाही, हे आणखी वेगळंच) नको. परिसंवादांच्या विषयांसाठी कल्पनाशक्तीला भरपूर वाव आहे.

परदेशात राहतात हे त्यांच्या लिखाणावरुन व्यक्त व्हावे इतके सजीव ..यतार्थ लेखन हवे. >> आं ? लेखक किंवा लेखिका कुठे रहातात हे त्यांच्या प्रत्येक लिखाणातून व्यक्त व्हावे अशी का अपेक्षा ?

टण्याने परदेशात असताना वारीचे भाग लिहिले होते ते काही सजीव/ यथार्थ नव्हते का ?

श्रिनी , बेटी इत्यादी आता चांगले लेखक झाले आहेत हे कशावरुन ? आधी, जेंव्हा मायबोलीवर नियमित लिहित होते तेंव्हा चांगले लेखक नव्हते का ते ?

संकल्पनेवर लेखन करणे हे काही लोकांना जमणार नाही , पण वेळोवेळी पावसावर येणार्‍या कविता, तरही गजला , तत्कालिक घटनांवर येणारे वैचारिक लेखन यांची संख्या पाहता तरी घे विषय अन कर लेखन असे जमणारे मायबोलीकर बरेच आहेत . अगदी अलिकडे, चित्रपटांवर तर फारसे कधी न लिहिणार्‍यांनी पण भरभरून लेखन केले आहे. त्यामुळे संकल्पना नकोच असे मी तरी म्हणणार नाही.

मायबोलीकरांकडून त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्याची कल्पना आवडली.

प्रत्येक लेखनाखाली फेसबूक सारखी लाइकची सोय असली तरी चालेल. प्रत्येक वाचक मी ही गोष्ट अशी लिहिली असती , ते यमक तसे जुळवले असते टाइपची प्रतिक्रिया देऊ इच्छीत नाही. अशांना पटकन लाइक बटण क्लिक करणे सोपे जाईल.

नवे / जुने हा फरक अन त्या अनुषंगाने होणारे वाद मात्र अनाठायी आहे. ज्यांना मधु मागशी माझ्या सख्या परि मधु घटचि रिकामे उरती घरी वाटतंय त्यांना न लिहायचं स्वातंत्र्य आहेच की. सब घोडे बारा टक्के असे कशाला.

मेधाच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक लेखाखाली फक्त लाईकचीच सोय द्यावी बस्स (फार तर किती लोकांनी हा लेख वाचला/चाळला तो काऊंट दाखवता आला तर बरे! ऊदा. २३(लाईक्स)/४७ (विजिट्स).
तसेच प्रत्येक लेखाखाली प्रतिक्रिया देण्याची सोय असावी पण महिनाभर तरी त्या प्रतिक्रिया कुणाला दिसू नयेत.
महिन्यानेच त्या एकदम प्रदर्शित कराव्यात आणि तेव्हा प्रतिक्रिया देण्याची सोय बंद करावी. असे केल्याने प्रत्येकाची स्वतःची खरीखुरी मते/ अभिप्रायच येतील. दिवाळी अंक काही वाद घालण्याची जागा नव्हे. माझी प्रतिक्रिया ही दुसर्‍याच्या प्रतिक्रियेवर न येता, फक्त मूळ लेख आणि लेखकाबद्दलच असावी.

मायबोलीवर नेहमी दिसणारं चित्रं, लेखाचा विषय आणि लेख लिहिणारा दोघेही बाजूला पडून नुसती असंबंध प्रतिसादांचीच राळ ऊडवली जाते, बोलाचालीत विषय भरकटून विषयाशी पूर्णपणे असंबंधित प्रतिसाद येत राहतात.
ह्या ऊपायाने हे चित्र टाळता येईल. अतिऊत्साही वाचक लेखकाशी वैयक्तिक संपर्क साधून (दिवाळी अंकापुरती लेखकाशी चर्चा एका अप्रकाशित पानावर करावी, आणि हे पानसुद्धा महिन्याभरानंतर प्रकाशित करावे . 'लेखक्-वाचक चर्चा' 'वन-टू-वन, मॅन-टू-मॅन' तीही ठराविक मुदतीतच)

प्रत्येक लेखकाने आपल्या लेखाची जबाबदारी घेऊन वाचकाने त्याला लिहिलेल्या ऊत्तर अपेक्षित असलेल्या प्रत्येक अभिप्रायाबद्दल/ विचारलेल्या प्रश्नांबद्दल समाधानकारक रित्या त्याचे विचार त्याची मते अप्रकाशित धाग्यावर लिहित रहावी. (एखाद्या वाचकाशी हाताबाहेर चाललेली चर्चा चालू ठेवण्यास लेखक 'नाही' म्हणू शकतोच आणि ही चर्चा महिन्याभराने सगळ्यांना वाचायला मिळणार आहे हेही ओघाने आलेच)

जुन्यानी लिहा की नव्यानी त्या अन्कातून आयुष्याला काहीतरी नवीन मिळाले असे वाचून /ऐकून आम्हाला वाटले पाहिजे हे महत्त्वाचे !!.(निदान माझ्यासाठी तरी आहे बुवा......)
Happy

माझी प्रतिक्रिया ही दुसर्‍याच्या प्रतिक्रियेवर न येता, फक्त मूळ लेख आणि लेखकाबद्दलच असावी. > > चमन +१

थीम किंवा विषय (एक वा अनेक) असणार असेल तर त्यावरच्या लेखांसाठी (कथा व कविता सोडून) आधी अ‍ॅब्स्ट्रॅक्ट/ सारांश/ थोडक्यात मुद्दे असं मागवून त्यातून पहिली निवड करता येईल का? जेणेकरून एकाच बाजूवरचे, एकाच संदर्भाचे दोन लेख टाळता येतील. तसेच काही भर टाकणे/ कमी करणे हे ही योग्य वेळेस सुचवले जाईल आणि वेळेत होईल. थीम/ विषयाच्या संदर्भाने संपादक मंडळाला काय फोकस हवाय ते निश्चित करायलाही याचा उपयोग होईल. आणि कुठल्या बाजूचे लेख नाहीयेत त्याचा अंदाज वेळेत येऊन कुणाला त्यावर प्रकाश टाकणारा लेख लिहायची विनंती करायलाही पुरेसा वेळ मिळेल.

प्रिय मेधा, माझा म्हणण्याचा उद्देश जसा तू तिरका घेतलास तसा नव्हता. तू एक वाक्य गाळलेस एक घेतलेस. मग कसा बरे अर्थ लागेल!

परत एकदा:

#बेटी, श्रिनी सारखे हरवलेले सभासद खूप छान लिहायचे. अशा हरवेलेल्या सभासदांना शोधून त्यांचे साहित्य अंकामधे घ्यावे.

# इतके वर्ष भारताबाहेर राहणारे मायबोलिकर भारतात राहत आहेत असे त्यांच्या लिखाणावरुन वाटते. आपण जिथे राहतो तिथले पडसाद आपल्या लिखाणात उतरायला हवेत असे माझे मत आहे.

# टण्याची वारी मी पुर्ण वाचली. नाही आवडली. प्रांजळ प्रतिक्रियांचा आदर असावा.

Pages