हितगुज २०१२ दिवाळी अंकाकडून वाचकांच्या अपेक्षा काय?

Submitted by संपादक on 15 September, 2012 - 01:03

श्री गणरायाच्या आगमनाच्या तयारीत मग्न असतानाच एकीकडे चाहूल लागते दिवाळीची आणि अर्थातच दिवाळी अंकाची.

हितगुज दिवाळी अंकाचं यंदाचं हे तेरावं वर्ष. या वर्षीचा दिवाळी अंकदेखील आजवरच्या मायबोलीच्या वाचनीय दिवाळी अंकाच्या परंपरेला साजेसा असावा, हीच तुम्हां-आम्हां प्रत्येक मायबोलीकराची इच्छा! 'वाचकांच्या पसंतीस उतरेल' असा दिवाळी अंक प्रकाशित करण्याच्या कामात सर्वात मोलाचा सहभाग हा अर्थातच आपणा वाचकांचाच ...

एक रसिक, सूज्ञ वाचक आणि कलाउपासक या नात्याने आपण 'ह्या दिवाळी अंकामध्ये तुम्हांला काय वाचायला, ऐकायला आणि पहायला आवडेल? या अंकाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आणि या अंकात कोणत्या गोष्टी टाळाव्यात?' ह्याबाबतची तुमची मत कृपया इथे मांडा ही मनापासून विनंती.

येत्या दिवाळी अंकात कोणकोणत्या विषयांवर साहित्य असावे याबद्दलच्या आपल्या अपेक्षा संपादकांपर्यंत पोचवण्याची अखेरची तारीख आहे - रविवार, दिनांक २३ सप्टेंबर.
त्यानंतर हा बाफ लिखाणासाठी बंद करण्यात येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त सजेशन सागर Happy मजा येईल.
नाहीतर पुरंदरे म्हणतात तसे तरी करता येईलच.
प्रत्येक लेखाखाली प्रतिक्रिया द्यायची सोय नको, त्यापेक्षा अशी 'संक्षिप्त प्रतिसादाची' सोय देता येईल.
सविस्तर प्रतिक्रिया पूर्ण अंकालाच योग्य वाटते.

नेहमीच्या मायबोलीपेक्षा (वातावरण, लेखन, प्रतिक्रिया इत्यादी) दिवाळी अंकाचं वेगळेपण राहावंच, असं वाटतं. दिवाळी अंक ही वर्षातून एकदाच होणारी गोष्ट आहे, त्यामुळे त्यात असणारे लेख, विभाग, उपक्रम(असल्यास), सादरीकरण यात काहीतरी वेगळेपण असावंच!

नीधप आणि ललिता, मी मायबोलीच्या दिवाळी अंकातील लेखनाबद्दल लिहिलेय. मायबोलीवरच्या नेहमीच्या लेखनाबद्दल नाही. या अंकांबद्दलची मायबोलीकरांची भावना बाजारातील छापील अंकांबद्दल असते, त्यापेक्षा वेगळी असावी असा माझा समज आहे. (तो चुकीचा असू शकेल.) प्रतिसाद देण्याची नैतिक जबाबदारी नसली तरी आपुलकीच्या भावनेतून वाचल्याची किमान नोंद होणे कठीण नसावे.

एखादा विषय वगैरे नका घेऊ, एकसूरी होतो अंक. स्वातंत्र्य असू द्या.
बाहेरचे लेखकही नकोत, मायबोलीचे सभासद हि किमान अट असावी. तसेच मायबोलीवरचे नविन सभासद लिहितील, तर जास्त चांगले. ( जून्यांनी आता प्रतिसादापुरते असावे ! )

<< दिनेशदांना पुर्ण अनुमोदन

अंकाला मध्यवर्ती संकल्पना हवीच, हे रैनाचं मत पटलं नाही. मध्यवर्ती संकल्पना असली तर लिखाणावर खूप बंधनं येतात. ती संकल्पना सगळ्यांच्या आवडीची नसली तर फारसे वाचकही फिरकणार नाहीत. अंकाचं ध्येय काहीतरी चांगलं वाचायला द्यायचं हे आहे की संपादकांच्या डोक्यात आलेल्या संकल्पनेवर जमेल तसं पाडलेलं साहित्य द्यायचं हे आहे? त्यामुळे संकल्पना ठेवायचीच असेल तर तिचा वेगळा विभाग करा ही नीरजाची सूचना आवडली!

दिवाळीमधे कंटाळवाण्या, शेवट नसलेल्या , उगाचं वैचारीक वगैरे कथा वाचायला फार बोरं होतं हे प्राजक्ता_शिरीनचं म्हणणं पटलं!

'मा बो वरीलच कोणा कलाकाराच्या वादनाची (उदा. चैतन्य दिक्षीत -बासरीवादन) ऑडिओ फाईल किंवा "दाद" चे तिच्याच आवाजातले तिच्या लेखाचे वाचन अशा ऑडिओ स्वरुपातलं काही - अशा गोष्टींचा समावेश करता येईल का या दिवाळी अंकात ? ' ही शशांक पुरंदरेची सूचना आवडली. मी पुढे जाऊन असं ही म्हणेन की एखाद्या विषयावर कुणी व्हिडिओ डॉक्युमेंटरी (व्हिडिओ नाट्य केलं तर सोन्याहून पिवळं) केली तर उत्तम होईल. हे व्हिडिओ यूट्यूबवर टाकून ते इथल्या पानांवर एम्बेड करता येतील म्हणजे पान लोड व्हायला फारसा वेळ लागणार नाही.

दिनेशचं 'जून्यांनी आता प्रतिसादापुरते असावे' हे म्हणणं पटलं नाही. जुन्यांना उरलो प्रतिसादांपुरता अशी भूमिका का घ्यायला सांगताय? नवे जुने सोडून फक्त चांगलेच घ्यावेत! फक्त नव्यांचे लेख घ्या हे म्हणणं मला मागासवर्गीयाला थर्ड क्लास मिळाला तरी तो फर्स्टक्लास समजावा असं म्हंटल्यासारखं वाटतं. 'इथे म्हणजे चांगले लेख यायची मारामार. नवेजुने करत बसायचे म्हणजे अजूनच आनंद.' हे रैनाचं म्हणणं फारच पटलं!

मामीच्या 'दिवाळी अंकातले लेख, कविता इ. दिवाळी अंकातच बांधून राहतात. गणेशोत्सवातील लेखांप्रमाणे त्यांचे वेगवेगळे धागे नसल्याने ते सगळे आतच राहतात. हे लेख वेगवेगळ्या धाग्यांच्या स्वरूपात करून त्याखाली प्रतिसादाची सोय व्हायला हवी. ' या म्हणण्याला अनुमोदन! 'देव भावाचा भुकेला'च्या चालीवर लेखक प्रतिसादाचा भुकेला असतो. शिवाय दिवाळी अंकातले लेख त्या त्या लेखकाच्या लेखनाखाली पण दिसायला हवेत.

लली आणि आगाऊचं वर्गीकरण कम स्टॅटिस्टिक्स लै भारी. Happy

प्रत्येक लेखाखाली प्रतिक्रिया द्यायची सोय नको, त्यापेक्षा अशी 'संक्षिप्त प्रतिसादाची' सोय देता येईल.
सविस्तर प्रतिक्रिया पूर्ण अंकालाच योग्य वाटते. >>>> हे ही योग्य वाटतंय. Happy

पुरंदरे यांनी सुचवलेली कल्पना फार्फार आवडली.

(अनेकदा असं होतं, की लेख/कथा आवडल्याचे प्रतिसाद येतात, पण न आवडल्याचं कुणी सांगत नाही, आणि आवडलं नाही, तर त्याची कारणं काय - हे ही स्पष्ट होत नाही.)

दिवाळी अंकातले लेख त्या त्या लेखकाच्या लेखनाखाली पण दिसायला हवेत. >>> ही सूचना देखील फारच पटली.

[अवांतर -
'शेवट नसलेल्या कथा' - असं सरसकट वर्गीकरण करणं अगदीच 'हे' आहे. पण या मुद्द्याचा प्रतिवाद करण्याची ही जागा नव्हे. तेव्हा योग्य जागी आणि योग्य वेळी तो करण्यात येईल. Proud ]

आजावर तरी माझ्या मनातील सकस लेखनाच्या वाचनानंदाची अपेक्षा मायबोलीच्या अंकाने पुर्ण केलीच आहे.
इथुन पुढेही पुर्ण होइल ह्याची खात्री आहे. Happy
मला फक्त मल्टिमेडिया फाइल (द्रुकश्राव्य माध्यम) ह्यातील काहि गोष्टी बघता, ऐकता येत नाहीत. त्याला नाइलाज आहे. हापिसात बॅन असतो आणि घरी नेट नाहिये. पण त्याबद्दल माझी तक्रारही नाहिये.
नवीन जुने सर्वानीच लेखन करावे आणि मला भरपुर काही वाचायला मिळावे.
बरेच जण चित्र काढते व्हावेत ह्या निमित्ताने अशी वैयक्तीक इच्छा. ( उदा. फ आणि निलु ह्यांची अनेक महिन्यात कुठलीच चित्रं मायबोलीवर प्रकाशीत झालेली आठवत नाहियेत. ह्या निमित्ताने त्यानाही उत्साह येइल अशी अपेक्षा.)

>>बरेच जण चित्र काढते व्हावेत ह्या निमित्ताने अशी वैयक्तीक इच्छा>> मायबोलीवर अभिप्रा, वर्षा, कंसराज यांची ड्रॉईंग्ज अप्रतिम आहेत. त्यांनीही सहभागी व्हावे ही विनंती.

एकच मध्यवर्ती ( द्विरूक्ती) संकल्पना असलेले दिवाळी अंक वाचायला मजा देत नाहीत. फ्रि फ्लो असेल तर मजा येईल असे मला वाटते. संकल्पना विशेषांक कधीही काढता येतो. असे अंक मायबोलीवर पण एक दोनदा निघालेले आहे. (दिवाळी अंक सोडून) मग परत दिवाळी अंकालाही तेच बंधन का? मला संकल्पनेवर लेख पाडता येत नाही. कारण आगाऊ म्हणतो तसे माझे लिखान उत्स्फूर्त मध्ये मोडते. आले मनात लिही लेख. तसे असताना जर मनात भलताच विषय चालू असताना, " सिलेंडराचे भाव २०० रू ने वाढले, महागाई" ह्या संकल्पनेवर लेख लिहा असे म्हणाल्यावर अनेकांना लिहिता येत नाही.

फ्रि फ्लो ठेवा, ज्याला जे वाटेल ते लिहू देत. मग त्याचे वर्गीकरण संपादक मंडळाला करता येईल.

>> अजून एक सूचना की अंकाची रंगीत तालिम असायला हवी. ज्यांना साहित्य कळते त्यांना अंक दोन दिवसापुर्वी दाखवावा आणि त्यांच्या काय सूचना आहेत त्या बघाव्यात. रंगीत तालमिला ज्यांना साहित्य, कला, अंक, भाषा, शब्द, सुलभीकरण, आवाका, रचना वगैरे कळतं त्यांनाचं तो अंक आधी द्यावा.

संपादक मंडळात साहीत्य "कळणारे" लोकंच निवडले जातात असा माझा तरी समज आहे .. दोन दिवस आधी आणखी कोणाला अंक दाखवून त्यांच्या पसंतीस तो उतरला नाही तर दोन दिवसांत परत काय करायचं मग? केव्हढ्या टीम्स् काम करतात अंकावर .. त्या सगळ्यांच्या प्रयत्नांनां वाचकांच्या प्रतिसादांतून अभिप्राय मिळत असतातच किंवा मग मौनातूनही .. मग आणखी रंगीत तालीम कशासाठी हे कळत नाही ..

नवे-जुने मुद्दाही अजिबात पटत नाही .. संपादक मंडळ हे काही उद्देश मनात ठेवूनच निवडलेले असते आणि ते "चांगलं" साहित्यच अंकात घेण्याचा प्रयत्न करतात असा स्वानुभव आणि निरीक्षण आहे .. मग ह्यात आणखी वेगळा "मायबोलीवरचं वय" हा निकष कशासाठी? आणि नक्की कुठली फूटपट्टी लावून ठरवायचं की अमुक तमुकने फक्त प्रतिसादच द्यावेत आणि अमुक तमुक ने फक्त लेखन करावं? चांगलं साहित्य, उत्तम तांत्रिक बांधणी, सुंदर मुखपृष्ठ आणि सजावट, सुलभ वाचन आणि दिवाळी सारख्या सणाच्यावेळी आनंद आणि अनुभूती वाढवणारा अंक असावा हीच अपेक्षा ..

नवे-जुने मुद्दाही अजिबात पटत नाही >> जुन्यांनी नवीन आयडी बनवून लेख दिला तर ? नवे-जुने ह्या मुद्द्यामधे काही अर्थ वाटत नाही.

अंकाची (शक्य तेव्हढ्या भागाची) pdf बनवून अंकाबरोबर लगेच उपलब्ध करता आली तर उत्तम ठरेल.

वा! मुळात पूर्वतयारीसाठी वाचकांच्या अपेक्षा विचारण्याच्या कल्पनेचेच मनापासून कौतुक! चुकांतून शिकणं म्हणजे हे. Happy
नव्यांना संधी द्या आणि जुन्यांनी प्रतिसादापुरते रहा हे किती प्रकारे तथ्यहीन आहे हे वर ज्या अनेक जणांनी सांगितले त्या सर्वांना अनुमोदन. संधी द्यायला मुळात त्यांच्यावर कोणते निर्बंध आहेत? लिहा की. एक मात्र खरं, ज्याला मायबोलीवर कुठेतरी काहीतरी लिहीण्याचा अनुभव आहे तोच दिवाळी अंकासाठी 'साहित्य' वगैरे पाठवण्याचे धाडस करतो. याला कारण मायबोलीच्या दिवाळी अंकाची दर्जैदार परंपरा. हे ही तितकंच खरं की अनेक जण इथे येऊन लिहूनच बर्‍यापैकी उत्तम लिखाण करु लागले आहेत. त्यांना संधी 'द्यायची' कधीच गरज पडली नव्हती.
बी, संपादकीय 'छापील' नसावे असे लिहून तुला नक्की काय म्हणायचे आहे? संपूर्ण दिवाळी अंकाच्या प्रक्रियेचा प्रमुख शिवाय एक सामान्य मायबोलीकर या दुहेरी नात्याने कोणताही संपादक ते लिहीत असतो. आभार प्रदर्शन, ऋणनिर्देश, दिलगिरी व्यक्त करताना थोडीशी औपचारिकता येणारच. तसे म्हटले तर इथल्या ऐंशी टक्के पोस्ट्स 'छापील'च असतात. असो.

विविध लेख, कवितांवर प्रतिसाद देण्याची सोय हवीच. Happy

अजून एक कल्पना,

लेखाच्या (काव्याच्या) बरोबरच, त्याच्या वाचनाची क्लीप जोडली तर? ( ते लेखकानेच केलं तर अतीउत्तम )
हे अशासाठी की बर्याचदा, सगळं वाचायचं असतं आणि संगणाकावर एवढं सगळं वाचणं डोळ्यांना नको वाटतं. तर हेड फोन लावून निवांत ऐकता येईल. ( आणि भावही चांगले पोचतील )

आणि दृकश्राव्य गोष्टींबरोबर त्याचं स्क्रीप्ट जोडलं तर?
हे अशासाठी की असे कार्यक्रम बर्याचदा पाककृती, ट्युटोरिअल, नाट्यप्रवेश अशा टाईपचे असतात आणि ऑफिसमधून बघता आले नाहीत तरी त्यांचा आस्वाद घेता येतो.

या मध्ये संयोजक मंडळावर कामाचा ताण येईल खरा पण usability नक्कीच जास्त होईल.

या वर्षीच्या संपादक मंडळाने वाचकांना काय आवडेल हे आधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला हेच खूप छान वाटलं Happy
मला सुधा दिवाळी अंकाला एक थीम मधे बांधून ठेवायला नको असं वाटतं.
प्रत्येक वाचकाला एका ठरवलेल्या थीम बद्दल आवड असेलच असे नाही. त्यामुळे सर्वतोपरी वेगवेगळ्या विषयावरचे वाचायला, बघायला, ऐकायला आवडेल.
काही हलकेफुलके लेखन पण अंकात वाचायला मिळावे..
प्रत्येक लेखावर प्रतिसाद द्यायची सोय करता आली तर छान होईल.
बाकी नवे जुने मुद्दाही बिल्कुल पटला नाही. फक्त चांगले साहित्य हाच एक निकष बरोबर वाटतो.
संपादक मंडळ चांगलेच साहित्य सादर करेल हा विश्वास आहेच!

गणपती उत्सवाच्या वेळी जशा कलाकुसरींच्या वस्तू बनवलल्या जातात उदा: टाकाऊतून टीकावू स्पर्धा, तसे दिवाळी म्हणलं की किल्ला डोळ्यासमोर येतो. आपल्या घरी, कॉलनीत, बनवलेल्या किल्ल्यांचे फोटो, आकाशदिव्यांचे फोटो टाका किंवा त्यांची स्पर्धा घ्या.

वाचनाची क्लीप जोडली तर?
आणि दृकश्राव्य गोष्टींबरोबर त्याचं स्क्रीप्ट जोडलं तर?
गोळाबेरीज एकच होणार की !!

नव्या-जुन्यांचा मुद्दा पटला नाही.

ललिता-प्रीति आणि आगाऊचे स्टॅट्स लई भारी.

त्याचबरोबर प्रतिसाद (मग ते छान, आवडली,...) टाइपचे असतील तरी ते दिले जावेत असंही वाटतंय. प्रत्येकचवेळी तोंडभरून प्रतिसाद देणं अनेक कारणांनी शक्य नसतं. पण निदान वाचल्याची पोच मिळाली तरी नव्याने (किंवा नेहमी) लिहिणार्‍याला उत्साह येईल असं वाटतं.
निदान लेखांखाली किती जणांनी वाचलाय ह्याचा आकडा आला तरी चालेल. (हे माबोवर इतरत्रही करता येईल का ? :अओ:)

मध्यवर्ती संकल्पना ठेवलीच तर त्याचा वेगळा विभाग असावा ह्याला अनुमोदन.

(१) “शुद्धलेखनाच्या, व्याकरणाच्या, वाक्यरचनेतल्या किंवा तपशिलाच्या चुका 'लेखकाची शैली' म्हणून खपवलेल्या नसाव्यात.”
(२) “या अंकांबद्दलची मायबोलीकरांची भावना बाजारातील छापील अंकांबद्दल असते, त्यापेक्षा वेगळी असावी असा माझा समज आहे. (तो चुकीचा असू शकेल.) प्रतिसाद देण्याची नैतिक जबाबदारी नसली तरी आपुलकीच्या भावनेतून वाचल्याची किमान नोंद होणे कठीण नसावे.”

(३) “अंकाला एक मुख्य थीम असली तरी थोडेसे अवांतरही वाचायला आवडेल.” >>>

भरत मयेकरांच्या वरील तीनही मुद्यांशी सहमत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखन कोणी केलंय यापेक्षा कसं केलंय याला मनापासून महत्त्व दिलं गेल्यास,
नवा/जुना सभासद हा प्रश्नच उरणार नाही.

दिवाळी अंकाच्या रचनेत आपला प्रत्यक्ष सहभाग असला/नसला तरी हा अंक आपल्या मायबोलीचा अंक आहे
ही भावना मनात ठेऊन अंकातील अधिकाधिक लेखन वाचून त्यावर प्रांजळ (प्रसंगी परखडही) प्रतिसाद देण्याचा प्रयत्न प्रत्येक सभासदाने करण्यातच या अंकाच यश सामावलेलं आहे असं मला वाटतं.

१. मुद्रीतशोधन करणार्‍याने केवळ मुद्रितशोधनच करावे. लेखाचे/ कथेचे संपादन करणे ही एक वेगळी गोष्ट आहे आणि वेगळे कौशल्य आहे. मुद्रितशोधन करणार्‍याने तो अधिकार स्वतःकडे घेऊ नये.
केवळ शुद्धलेखनाचा/ प्रमाणभाषेचा नियम म्हणून वाट्टेल तसे बदल करू नयेत.

२. मुद्रीतशोधन करणार्‍याला माहित नसलेले शब्द, वाक्प्रचार म्हणजे चुका नव्हेत.

<लेखाचे/ कथेचे संपादन करणे ही एक वेगळी गोष्ट आहे आणि वेगळे कौशल्य आहे.>

संपादक मंडळाने लेखकाशी याबाबत संवाद साधून गरज पडेल तिथे पुनर्लेखन करून घ्यायला हवे.

कधी कधी लेखकाने लिहिलेले हे योग्यही असू शकते. मुशो करणार्‍याने हे लक्षात ठेवावे.
उदाहरण म्हणून माझ्या एका लेखासंदर्भातल्या विनोदी सुचवण्या मी इथे टाकू शकते पण विनाकारण नाही ते वाद होतील तेव्हा ते असो.

ते मुशो करणार्‍यांनी लक्षात ठेवायचंय...
मुशो करणारे लेखकाने लिहिलेलं चूकच असणार आणि आपण आता त्या लिखाणाचा उद्धार करणार आहोत असे मनात धरून मुशो करत असावेत अशी शंका घेता येईल असा एका उपक्रमाच्या वेळेसचा अनुभव आहे माझा.

मी जे लिहिते त्यात कुठे मुशोच्या चुका असू शकतात आणि कुठले शब्द योग्य असतात ह्याबद्दल मला खात्री असल्याने मी अनेक चुकीचे बदल अमान्य केले. माझ्या लेखाचे मुशो करणार्‍याला (कोण व्यक्ती/ आयडी ते मला माहित नाही) अनेक शब्द अश्याही प्रकारे चालू शकतात हे ही माहित नव्हते. त्यामुळे मीच चुकीचे वापरले आहे असे छातीठोकपणे त्यांनी सुचवले.
उदाहरणार्थ बाहुले हा एकारांती शब्द नपुसकलिंगी चालतो आणि त्याचे अनेकवचन बाहुली होते. याची मुशो करणार्‍यास कल्पना नव्हती. त्याच्यामते बाहुली हा स्त्रिलिंगी शब्द आणि बाहुल्या हे अनेकवचन एवढेच योग्य. हे फारच बेसिक आहे आणि मुशो करणार्‍यास इतपत तरी माहित हवे.

एखादा लिहिणारा अश्या सुचवणीला बळी पडून स्वतःचं योग्य ते लिहिलेलं बदलून टाकू शकतो. परिणाम संपूर्ण अंकावर...

व्हॉट इज मुशो?

(अवांतर - प्रोफेसर साहेबांकडून प्रूफं तपासून घेता येतील, आवश्यकता पडली तर)

दिवाळी अंक रंगीबेरंगी, विविध साहित्य व कलाकृतींनी नटलेला, विषयाचे बंधन नसलेला आणि 'एक जुना सदस्य एक नवा सदस्य' अश्या पेअर्सनी कॉमन लेखन केलेल्या कही ललितांनी युक्त असावा अशी अपेक्षा

(कविता विभागात काही काम असल्यास हक्काने सांगावेत)

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

उदाहरणार्थ, पाच वर्षे हा कट ऑफ मानला तर:

पौर्णिमा व भारती बिर्जे यांनी एकाच विषयावर आपापले लेख लिहून ते 'एक धागा' म्हणून संपादकांनी प्रकाशित करायचे.

Pages