हितगुज २०१२ दिवाळी अंकाकडून वाचकांच्या अपेक्षा काय?

Submitted by संपादक on 15 September, 2012 - 01:03

श्री गणरायाच्या आगमनाच्या तयारीत मग्न असतानाच एकीकडे चाहूल लागते दिवाळीची आणि अर्थातच दिवाळी अंकाची.

हितगुज दिवाळी अंकाचं यंदाचं हे तेरावं वर्ष. या वर्षीचा दिवाळी अंकदेखील आजवरच्या मायबोलीच्या वाचनीय दिवाळी अंकाच्या परंपरेला साजेसा असावा, हीच तुम्हां-आम्हां प्रत्येक मायबोलीकराची इच्छा! 'वाचकांच्या पसंतीस उतरेल' असा दिवाळी अंक प्रकाशित करण्याच्या कामात सर्वात मोलाचा सहभाग हा अर्थातच आपणा वाचकांचाच ...

एक रसिक, सूज्ञ वाचक आणि कलाउपासक या नात्याने आपण 'ह्या दिवाळी अंकामध्ये तुम्हांला काय वाचायला, ऐकायला आणि पहायला आवडेल? या अंकाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आणि या अंकात कोणत्या गोष्टी टाळाव्यात?' ह्याबाबतची तुमची मत कृपया इथे मांडा ही मनापासून विनंती.

येत्या दिवाळी अंकात कोणकोणत्या विषयांवर साहित्य असावे याबद्दलच्या आपल्या अपेक्षा संपादकांपर्यंत पोचवण्याची अखेरची तारीख आहे - रविवार, दिनांक २३ सप्टेंबर.
त्यानंतर हा बाफ लिखाणासाठी बंद करण्यात येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अपेक्षा मांडाव्या अशी मागणी संपादक मंडळानेच केल्याने अपेक्षा सांगत आहोत.
त्यात काहीनी इतके चिडायचे कारण आहे का?

अपेक्षा आहेत की नवे-जुने अशी फूट पाडून भांडणे लावणे आहे?
असं डावललं जातंच असं नव्यांना वाटू शकतं की यातून.

हो आरोप न करता हे बरोबर आहे.
मी फक्त माझ्या नव्यानाही संधी मिळावी या पोष्टच्या अनुशंगाने बोलतेय लोकहो, आधीच्या नाही.
मला खरंच नेहमी विशेष न लिहिणार्या आयडींनी काही चांगलं लिहिलं तर आवडेल.

मजकूर अस्स्लेल्या पानावर जास्त सजावट नको हे तर माझ्या मनातलंच.

दिवाळी अंकातले लेख, कविता इ. दिवाळी अंकातच बांधून राहतात. गणेशोत्सवातील लेखांप्रमाणे त्यांचे वेगवेगळे धागे नसल्याने ते सगळे आतच राहतात. हे लेख वेगवेगळ्या धाग्यांच्या स्वरूपात करून त्याखाली प्रतिसादाची सोय व्हायला हवी. काहीतरी उपाय काढायला हवाय यावर. कारण खास दिवाळी अंकासाठी आलेलं उत्तमोत्तम लिखाण वाचनासाठी सहज उपलब्ध व्हायला हवं.

मुख्यपृष्ठ इंटरॅक्टिव्ह करता आले तर फार छान! (जसे गूगल होमपेजवर काही खास दिनांनिमित्त इंटरॅक्टिव्ह चित्रे असतात. त्या त्या चित्रावर माऊसचा कर्सर नेला की ते चित्र हालते, आवाज करते इ. इ. Proud मध्यंतरी स्टार ट्रेक थीमवर बनवलेले होमपेज लै भारी होते, मला आवडले!) या साठी तांत्रिक आवश्यकता काय असते वगैरेबद्दल माझे घोर अज्ञान आहे. पण असे काही शक्य झाले तर मला तरी मजा येईल.

मायबोलीचा वाचकवर्ग सर्व तर्‍हांची आवड जपणारा आहे, त्यामुळे दिवाळी अंकात विविध प्रकारच्या व विषयांवरच्या साहित्याचा समावेश असावा.

ऑनलाईन मराठी शब्दकोडी हा प्रकार कधी बघण्यात आलेला नाही. किंवा चित्रकोडीदेखील! तसे काही ठेवता येईल का? (फराळ खाऊन सुस्तावलेल्या मेंदूला तेवढीच चालना! ;-))

मला खरंच नेहमी विशेष न लिहिणार्या आयडींनी काही चांगलं लिहिलं तर आवडेल.>>>> सातीचं हे वाक्य महत्त्वाचे आहे.

उगाच नवीन आणि जुने असा गोंधळ घालताय.. त्याला काहीही अर्थ नाही...

त्यापेक्षा नेहमीपेक्षा वेगळ्या लेखकांकडूनही काहीतरी चांगले वाचायला मिळेल हे जास्त रास्त ठरेल..

संपादक मंडळ आहे म्हणल्यावर त्यांच्यामते जे चांगले लेख असतील तेच घेणार ना ते.. नाही तर मग त्या दिवाळी अंकाला काय अर्थ राहिला... तसे लेख तर माबोवर लिहिणारे सगळेच जण लिहीतातच की...

>>दिनेशदा | 15 September, 2012 - 08:25
सायो, जून्यांची वर्णी लावावीच असा नियम आहे का कोण जाणे, नव्यांचे चांगले लेख डावलले जातात अशाने.
(पडद्यामागची उदाहरणे माहीत आहेत म्हणूनच तसे लिहिलेय ! )

>>>>>
मी फक्त माझ्या नव्यानाही संधी मिळावी या पोष्टच्या अनुशंगाने बोलतेय लोकहो, >>>>>>

हे कोट केलेले प्रतिसाद वाचून गंमत वाटली. यासंदर्भात मी माझंच उदाहरण देईन - पहिल्यांदा माझी कथा २००८ सालच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेली होती. त्यावेळी माझा मायबोली सदस्य झाल्याचा कालावधी १ वर्ष आणि काही महिने एवढाच होता, म्हणजे मी त्यावेळी तुलनेने नवीन मायबोलीकर होते. तरीही माझी कथा घेतली गेली होती. तसेच माझ्या आगेमागे मायबोलीकर झालेल्यांपैकी पुढील आयडींचे लेख मायबोली दिवाळी अंकात वाचल्याचे मला पक्के आठवते आहे -
साजिरा, आशूडी, अगो, नंदिनी, ललिता_प्रिती, कविता नवरे, केदार१२३, अरुंधती कुलकर्णी, पक्क्या भटक्या (सेनापती), ऋयाम, अश्विनीमामी, प्रवीणपा, मंजिरी सोमण, रुणुझुणू, अमित देसाई (बागुलबुवा), अनीशा, बागेश्री, गंगाधर मुटे, अवल. (हे आयडी म्हणाजे उदाहरण आहे, जे नवीन मायबोलीकर आहेत आणि ज्यांची नावे मी इथे लिहिली नाहीयेत त्यांनी माझ्यावर रागवू नये अशी नम्र विनंती!)

त्यामुळे काही सूचना करायच्या आधी जुने मायबोली दिवाळी अंक जरूर वाचावेत असं मी सुचवेन.

दिवाळी अंकातले लेखन सुटेसुटे वाचायची आणि त्यावर सुट्यासुट्या प्रतिसादांचीही सोय नको असे माझे मत आहे. दिवाळी अंक हे सांघिक कार्यशक्तीचे (!) फळ आहे. ते तसेच घेतले पाहिजे. अंकाच्या निर्मितीमागे चांगलीच मेहनत असते, वाचताना थोडी मेहनत घेण्याएवढी आपुलकी मायबोलीच्या दिवाळी अंकाबद्दल सगळ्यांनाच वाटणार.
[याचे आणखी एक तिरसट कारण : गेल्या वर्षीच्या अंकावरील प्रतिसाद वाचताना जाणवले की ज्यांचे लेखन दिवाळी अंकात समाविष्ट झाले आहे, अशा काही (मोजक्याच) मंडळींनी अंकातील इतर मजकुराबद्दल अक्षरही लिहिलेले नाही. त्यांना स्वतःच्या लेखनावरील प्रतिसाद शोधण्यासाठी का होईना , संपूर्ण अंकावरील प्रतिसाद तरी वाचावे लागावेत. (एक वाद संपलेला नसतानाच दुसर्‍या वादाल तोंड फोडतोय का?)]

शुद्धलेखनाच्या, व्याकरणाच्या, वाक्यरचनेतल्या किंवा तपशिलाच्या चुका 'लेखकाची शैली' म्हणून खपवलेल्या नसाव्यात.

अंकाला एक मुख्य थीम असली तरी थोडेसे अवांतरही वाचायला आवडेल.

मायबोलीला आता दिर्घ परंपरा आहे. अनेक प्रकारचे उत्तम साहित्य मायबोलीत आहे. नव्यांनी (आणि बर्‍याचदा जून्यांनीही) ते वाचलेले नसते. संपादक मंडळाने खाणकाम करून असे दर्जेदार साहित्य शोधून ते दिवाळी अंकात दिले तर खूप मस्त वाटेल. मायबोलीवरच असल्याने प्रताधिकाराचे उल्लंघन होऊ नये असे वाटते.

हिम्सला अनुमोदन.
नेहमीपेक्षा वेगळ्या लेखकांकडूनही काहीतरी चांगले वाचायला मिळावे ही अपेक्षा आहे.

(जसे, 'गाथाचित्रशती' स्पर्धेत अनेक सभासद सहभागी झाले होते, जे इतरवेळेस विशेष लिहित नाहीत.)

प्रत्येक लेखाला स्वतंत्र प्रतिसादांची सोय - याला अनुमोदन. (प्रतिसाद मॉडरेट करण्याचीही सोय ठेवावी.)

माधवची सूचनाही स्वागतार्ह आहे. एक 'अर्काईव्ह्ज' असा विभाग करून त्यात काही देता आलं तर वाचायला आवडेल. (माझ्यासारखे अनेक आहेत, की जे जुन्या मायबोलीच्या रचनेशी मुळीच परिचित नाहीत. त्यामुळे तिथले लेखन शोधणे हे जिकिरीचे काम वाटते. मी मागे एकदा काही वेळा तसा प्रयत्न करून नाद सोडून दिला होता. आता इथे-तिथे जुन्या मायबोलीच्या लिंक्स दिसल्या की जाऊन पाहते फक्त.)

माझ्या सुचना:

१) अंकातील विभागांची नावे अतिशय सोपी ठेवावी. नावे वाचून ह्या विभागात काय असेल हे लगेच कळावे. कविता विभात, ललित विभाग, कथा विभाग, कादंबरी विभाग अशी सोपी नावे असावीत.

२) चांगल्या आणि दुर्मिळ लेखांकडून लेख मिळावेत म्हणून जास्तित जास्त प्रयत्न करण्यात यावे. उदा: टुलिप, बेटी, श्रिनी हे आता दुर्मिळ नि चांगले लेखक झाले आहेत.

३) संपादकीय स्वच्छ मनमोकळे आणि आतून आलेले असावे. छापिल नको!

४) मायबोलीच्या बाहेरुन आलेले लिखाण अवश्य घ्यावे पण त्यांचा विभात वेगळा असावा जेणेकरुन त्यांची प्ळख त्यातून व्यक्त होईल.

५) मुखपृष्ठावर पणती.. लक्ष्मीचे चित्र असावे.

६) बहुसंख्य मायबोलीवर परदेशात राहतात हे त्यांच्या लिखाणावरुन व्यक्त व्हावे इतके सजीव ..यतार्थ लेखन हवे.

७) प्रत्येक लेखनावर प्रतिक्रिया देण्याची सोय हवी.

एक वाद संपलेला नसतानाच दुसर्‍या वादाल तोंड फोडतोय का? <<
हो. कधीकधी मौन हा पण प्रतिसाद असतो. दिवाळी अंकात लिखाण आलं म्हणजे इतरांचे लिखाण वाचून त्यावर प्रतिक्रिया देण्याची नैतिक जबाबदारी शिरावर आहे असे नव्हे.

नवे-जुने सदस्य असे काहीही नसते. तसे करणे बरोबर आहे की नाही- हा मुद्दा दूरच, पण नवे-जुने असे काही भेद करता येणे संपादक, संयोजक, आयोजक यांना शक्यही नसते. नव्या लोकांना चुकीचा संदेश जाणार नाहीत याची काळजी इथे आणि इतरत्र कुठेही (अगदी गप्पांच्या पानांवरही) घ्यावी, ही नम्र विनंती.

दिवाळी अंक म्हणजे खुली स्पर्धा किंवा खेळ म्हणता येणार नाही. 'दर्जा सुधारावा, टिकवावा' असं एका बाजूला जेव्हा अनेक लोक म्हणत असतात (आणि ते बरोबरही आहे, आपल्या अंकाच्या वाट्याला याआधी पारितोषिके, सन्मान आणि कौतुक आले आहे, हे सर्वांना माहिती आहेच) तेव्हा दुसर्‍या बाजूला नवे-जुने असा नवीन विषय सुरू करणे बरोबर नाही. जुनेच फक्त दर्जेदार असं कुणीही ठरवलेलं नाही. त्या त्या वेळच्या जुन्या-नव्या मायबोलीकरांनी मिळूनच आजवरचे अंक नटवले सजवले आहेत, आणि ते सुंदरही झाले आहेत.

याहीपुढची गोष्ट म्हणजे, मुळात संपादक मंडळातच फक्त जुने लोक असावेत, असंही ठरलेलं नाही. (फारतर मुख्य संपादक जुने असावेत- थोडा अनुभव असावा- असं असतं). उदाहरणच द्यायचं झालं, तर मी संपादक मंडळात होतो, तेव्हा माझं मायबोली वय होतं फक्त सहा महिने!

नव्या मायबोलीकरांनी संयोजन, संपादन तसंच कार्यक्रमांत, लिहिण्यात भाग घ्यावा यासाठी कधी कधी तर खास प्रयत्नही करावे लागतात. नवे लोक वर्षाविहाराला आले, गणेशोत्सवाच्या धाग्यावर, गाथाचित्रशतीत / रसग्रहण स्प्रधेत लिहिताना दिसले, माध्यम प्रायोजकांच्या नवीन उपक्रमांवर भरभरून बोलताना दिसले की खरंच आनंद होतो. तसे आता ते दिवाळी अंकातही दिसले तर आनंद होईलच, पण मध्ये संपादक आहेत. इतर उपक्रमांना फक्त 'नावनोंदणी' / हजेरी महत्वाची असते. इथे फक्त आणि फक्त लिखाणाच्या पात्रतेचे निकष आहेत, आणि ते संपादक ठरवतात.

तेव्हा आता या बाफवरच्या विषयाकडे वळूया. विषयांतराबद्दल माफ करा. Happy

प्रत्येक लेखावर प्रतिक्रीया द्यायची सोय नकोच... .. "माझ्या लेखाला काहीच प्रतिसाद आले नाहीत.. मग पुढच्या वर्षी पण द्यायचा का लेख.. ", "माझा लेख इतका वाईट वाटला की एकही प्रतिक्रिया येऊ नये, इतरांना तर भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे" की माझा लेख कोणीच वाचत नाहीये" असले एकसोएक फंडे निर्माण होऊ शकतात..

प्रतिक्रिया ही सबंध अंकावर अपेक्षित आहे.. त्यातील ठराविक लेखावर प्रतिक्रिया देणारे आहेतच आणि ते देतातच...

प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया जर ठेवली तर मग सगळे लेख संकलित करुन दिवाळी अंक कशाला तयार करायचा.. प्रत्येक लेखकाला वाटेल तेव्हा तो त्याचे लेखन असेही करतच असतो की...

एखाद्या किंवा बहुतेक सर्वच लेखांचे विषय हे स्वतंत्र चर्चा होऊ शकते असे असतात. एकत्रित प्रतिक्रियांमधे प्रत्येक लिखाणाबद्दल जास्तीत जास्त १-२ ओळी येऊ शकतात. पुढे काही घडत नाही.
लिखित अंकामधे वाचक-लेखक इंटरअ‍ॅक्शन अश्या प्रकारे शक्य नसते पण इंटरनेटवर तर शक्य आहे. तर या माध्यमामुळे मिळू शकणारी सोय असायलाच हवी ना.

१) अंकातील विभागांची नावे अतिशय सोपी ठेवावी. नावे वाचून ह्या विभागात काय असेल हे लगेच कळावे. कविता विभात, ललित विभाग, कथा विभाग, कादंबरी विभाग अशी सोपी नावे असावीत. >> +१००. abstract शिर्षक असलं की नक्की काय आहे कळतं नाही त्या विभागात.

प्राजक्ते धन्यवाद. सहसा माझ्या मतांशी कुणी सहमत होत नाही इथे Sad असो!!!

अजून एक सूचना की अंकाची रंगीत तालिम असायला हवी. ज्यांना साहित्य कळते त्यांना अंक दोन दिवसापुर्वी दाखवावा आणि त्यांच्या काय सूचना आहेत त्या बघाव्यात. रंगीत तालमिला ज्यांना साहित्य, कला, अंक, भाषा, शब्द, सुलभीकरण, आवाका, रचना वगैरे कळतं त्यांनाचं तो अंक आधी द्यावा.

नीरजाला अनुमोदन.
मुळात लेखाला प्रतिसाद नाहीत, म्हणजे लेख कुणीच वाचलेला नाही - हे गृहितकच चुकीचं वाटतं मला.

१०० जण लेख पाहतात, त्यातले ७५ क्लिक करून ते पान उघडतात, त्यातले २० नुसतं स्क्रोल करून नजर फिरवून, लेख चाळून निघून जातात, उरलेले ५५ सुरूवातीपासून शेवटपर्यंत लेख वाचतात, त्यातल्या ३० जणांच्या मनात प्रतिसाद देण्याचा विचार येतो पण ते कंटाळा करतात, उरलेले २५ जण प्रतिसाद देण्याचं नक्की करतात, त्यातले १२ तेवढ्यात अन्य काही काम निघाल्यामुळे ते पेज (नाईलाजास्तव) बंद करतात (आणि पुन्हा कधीच उघडत नाहीत, कारण लेख तर वाचून झालेलाच असतो), उरले १३, त्यातले ६ जण ठरवतात, की प्रतिसाद द्यायचाच आहे, पण जरा विचार करून उद्या देऊ (जे कधीही प्रत्यक्षात उतरत नाही, कारण लेख तर वाचून झालेलाच असतो)
... आणि अशा तर्‍हेने अखेर त्या लेखावर उरलेल्या ७ जणांचे प्रतिसाद प्रत्यक्षात पहायला मिळतात Proud

विषयांतराबद्दल क्षमस्व, पण हे अनेक दिवस लिहायचं होतं मला. Wink

भरत मयेकरांना अनुमोदन +१००००
बी ला अनुमोदन +१००००

@ललिता-प्रीति
मोजक्या शब्दात नेमके मांड्ले आहे. Happy

नव्या-जुन्यांनी नाही तर सर्व माबोकरांनी दिवाळी अंक दर्जेदार आणि सकस बनावा यासाठी संपादक मंड्ळाला योग्य सुचना कराव्यात. अंकाला प्रतिसाद देता यावेत

मायबोलीला आता दिर्घ परंपरा आहे. अनेक प्रकारचे उत्तम साहित्य मायबोलीत आहे. नव्यांनी (आणि बर्‍याचदा जून्यांनीही) ते वाचलेले नसते. संपादक मंडळाने खाणकाम करून असे दर्जेदार साहित्य शोधून ते दिवाळी अंकात दिले तर खूप मस्त वाटेल. >>>>> माधव यांच्या या मताला अनुमोदन.... +१०

दिवाळी अंकात नव्या (मायबोलीवर नव्या नव्हे, तर आधीच्या दिवाळी अंकात न दिसलेल्या) लोकांचे लिखाण दिसावे ही अपेक्षा रास्त असली तरी अनेकदा लोक उत्स्फूर्त लिहिणारे असतात, 'चला आता दिवाळी अंकासाठी लेख लिहू' असे करु शकणारे कमीच. त्यामुळे इतरवेळी माबोवर उत्तम लिहिणारे सगळेच त्या 'डेडलाईन'च्या आत लेख देउ शकतीलच असे नाही.

लले, क्लासिफिकेशन भारीये!!!
याच्या उलटही प्रोसेस आहे- लेखावर १०० प्रतिक्रिया येतात, त्यातल्या २५ फक्त स्माईली असतात, २५ स्माईली +सहीये,भारीये,जबरी असतात, १५ रिक्शा फिरवल्याने येतात, १५ कुणी लिहीले आहे तेवढेच वाचून येतात, १० त्याने प्रतिसाद दिलाय मग माझाही टाईप्स, ५ लेख खरोखरी वाचून आलेल्या.
तस्मात, मुळात लेखाला प्रतिसाद नाहीत, म्हणजे लेख कुणीच वाचलेला नाही हे जसे चूक तसे ढीगभर प्रतिक्रिया आल्या, म्हणजे लेख खरेच वाचला आहे हे ही चूक!!!

ऑनलाईन फटाके किंवा आतिषबाजी जरूर ठेवा. (सध्या चालू आहे तसली नव्हे! दिवाळीच्या फटाक्यांचं अ‍ॅनिमेशन करा)

प्रतिसादाकरता - ठीक, छान, सुरेख, उत्तम अशी वर्गवारी करुन त्यात टीक करायची सोय करावी - लेखकाला आपला लेख / कविता वगैरे किती जणांना आवडला हे कळण्याकरता.... बाकी सविस्तर प्रतिक्रिया वि पू तून देता येईलच की. पण प्रतिसाद देणे / मिळणे महत्वाचे वाटते.

पुरंदरे शशांक>>> +१.

प्रत्येक लेख किती वेळा वाचला गेला ह्याचा आकडा (no. of reads) लेखावर मिळाला तरी छान होईल.

प्रतिसादाकरता - ठीक, छान, सुरेख, उत्तम अशी वर्गवारी करुन त्यात टीक करायची सोय करावी>>>>अनुमोदन +१०००

प्रतिसादात वर्गवारी करण्याऐवजी लेखाखाली/कवितेखाली वेगवेगळे अ‍ॅनिमेटेड फटाके ठेवा.
फुलबाजी, भुईनळा, सुतळी बाँब इत्यादी. त्यावर क्लिक केल्यास ते फुटतील अशी सोय असावी.

साहित्य आवडले काय किंवा नावडले काय,
फटाके भरपूर फुटतील आणि जंगी दिवाळी साजरी होईल !! Wink

Pages