नमस्कार मित्रानो ,
थोड्याच दिवसात क्रिकेट टी २० २०१२ विश्वचषक सुरू होतोय .
या वेळी जवळ ज॑वळ सगळ्याच टीम "फेवरीट" आहेत अन नाहीत ही .
नेहमीचे ताकदवान लोक थोडे ढासळलेत , ऑस्ट्रेलीया सावरायचा प्रयत्न करतेय , इंग्लंड KP एपिसोड मधे गंडलय ,
भारताकडे पहिले ४ गोलंदाजच नाहीत , सगळेच 5th bowlers
त्याचवेळी नेहमी कमकुवत समजले जाणारे विंडीज आणी न्युझिलंड (कागदावर तरी) चांगले दिसतायत .
पाकिस्तान नेहमीप्रमाणेच कसा खेळेल हे त्या दिवसापर्यंत कुणीच सांगू शकत नाही
एकूणच सुपर ८ च्या मॅचेस ना धमाल येणार आहे (माझ्या मते गट १ , गट २ पेक्षा थोडा कमकुवत असला तरी)
त्यामुळे थोडा या स्पर्धतला Interest वाढला होता .
आणी त्याचवेळी उदयन यांच्या धाग्यावरील देवचार यांची पोस्ट पाहिली आणी कॉलेज ला असताना खेळलेल SuperSelector आठवल . दिवस दिवस वेगवेगळ्या stratergy वापरून आणी Calculation करून (काय करणार एकूण Points मर्यादीत असतात ना , अर्थात हीच तर त्यातली खरी मजा आहे ) बनवलेल्या टीम्स , वेळोवेळी केलेली substitutions , माझी टीम ढापलीस म्हणून मित्राबरोबर केलेली भांडणे , अमुक एक खेळाडू घेण्यामागच माझ Logic कस बरोबर होत यावरून झालेले वाद (जाता जाता Travis Freind नावाचा एक Zimbabwe चा allrounder होता , खूप कमी किमतीत खूप गुण मिळवून दिले त्याने ) , रोजच प्रत्येकाच लीगमधल आणी एकूण रँकींग बघण , सगळ सगळ आठवल .
नंतर झाल काय तर , दोन टीम्स मधे सीरीज असेल तरी SuperSelector असायच , त्यामुळे त्यातली मजाच निघून गेली .
आज बर्याच दिवसानी तिथे गेलो तर एकदम भारी वाटल . एक म्हणजे पर्याय इतके आहेत की तुम्ही एका दमात काय १०-१२ वेळा प्रयत्न करूनही स्वतःलाच Perfect वाटेल अशी टीम करू शकणार च नाही . प्रत्येक वेळी कुणी ना कुणी तरी राहीलाच अस वाटेल . मी जवळ जवळ ३ तास डोक खर्च करून माझी टीम बनवली आणी मग वाट्ल की आपल्या माबोकरांचीही एक लीग तयार करावी .
यासाठी मी MaayboliT20 नावाची लीग तयार केली आहे .
League PIN: 5303 आहे .
तुमचीही टीम तयार करा आणी या लीग मधे सामील व्हा . पाहूया कुणाची अंदाज आणी Stratergy बरोबर ठरतेय ते
नियम
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=101
स्कोरींग
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=103
आज संध्याकाळपासूनच स्पर्धा सुरू होतेय . शक्य झाल्यास त्या आधीच टीम बनवा .
अर्थात भरपूर संघ असलेल्या स्पर्धेत थोड्या उशिरा सामील झाले तर फारसा फरक पडत नाही (उदा : माझ्या टीममधे एक ही लंका किंवा झिम्बाब्वेचा खेळाडू नसल्याने आजच्या मॅचचा मला डायरेक्ट फरक पडत नाही)
तरीही सुरूवातीपासूनच असलेले कधीही चांगलेच .
तेव्हा शक्य तितक्या लवकर टीम बनवा आणी सामील व्हा
माझ्या मते, श्रीलंका (१),
माझ्या मते,
श्रीलंका (१), न्यूझिलंड (२), पाकिस्तान (१) नि भारत (२)
विडीज फारच बेभरवशाची आहे . आणी माझा भारताच्या चांगले असण्यापेक्षा ऑसीजच्या फॉर्मात नसण्यावर विश्वास आहे . अफ्रिकेला सेफाची अॅलर्जी आहे
गेल, सॅम्युअल्स, पोलार्ड
गेल, सॅम्युअल्स, पोलार्ड किंवा रसेलपैकी एकटा जरी साताठ ओव्हर्स टिकला तरी पुरे. शिवाय ब्राव्हो, सॅमी वगैरे आहेतच. मला नाही वाटत विंडीज कुठल्याही मॅचमध्ये १६० पेक्षा कमी करतील. प्रॉब्लेम बोलिंगचा येऊ शकेल कदाचित पण खूपच पर्याय आहेत.
मला न्यूझीलंड त्यातल्यात्यात बेभरवशाची वाटते. ब्रेण्ड्या किंवा लुटेरू चालला तर अजिंक्य वाटतात ते! यातला एक फेलला तर साफ माती!
लंका नक्की सेफा.
आपल्या ग्रुपमध्येही तीच गत. पाकडे नक्की पोहोचणार सेफाला. निव्वळ अजमल, आफ्रिदी नि हाफीजच्या बळावर. कागदावर आपण (नेहमीप्रमाणे) शेर आहोत पण आपले तेज गोलंदाज म्हणजे आनंदीआनंदवनभुवनी आणि वॉट्सन, हसी, डिव्हिलियर्स, अमला, अकमल्स इ. स्पिन सुंदर खेळणारे फलंदाज आपल्यासमोर आहेत. तेव्हा
रोहीतविराटौ सुरेशयुवराजौ च।
अधिभारवाहकौ भारतीयसंघस्य॥
वीरेंद्रगौतमौ केवल दर्शकपीडा।
यदि 'स्कोरतः' तौ 'बोनस'प्राप्ति: दृढा॥
पीचेस कसे वागणार आहे ह्यावर
पीचेस कसे वागणार आहे ह्यावर कोण सरकेल पुढे हे ठरेल, ते जोवर नीट कळत नाही तोवर सांगता येणे अशक्य आहे. जर टिपीकल लंकन पीचेस असतील तर भारताला थांबवणे कठीण आहे. फक्त फिरकी खेळता येण्यापेक्षा फिरकी बॉलर्सना turner pitches वर उचलून मारू शकतील अशांची गरज आहे.
नेटवर बसायलाच वेळ नाहीये!
नेटवर बसायलाच वेळ नाहीये!
आता मॅच सुरूही झाली... त्यामुळे बदल करून काहीच फायदा नाही..
बांग्ला धुतय... साकिब आणि
बांग्ला धुतय... साकिब आणि रहिम जोरात.. आणि दोघेही टीम मध्ये.. बांग्लाचे किमान दोनशे तरी होतील असं वाटतय.. ह्या स्पीडनी... मग मज्जा येईल..
हायस्कोअरींग गेम.. हिम्सकूल
हायस्कोअरींग गेम.. हिम्सकूल चांदीये!
बांग्ला चांगलच पेटलय राव . पण
बांग्ला चांगलच पेटलय राव . पण फक्त जिंकूनपण फायदा नाहीये त्याना
इम्रान नझीर पेटलाय.. नशीबानं
इम्रान नझीर पेटलाय.. नशीबानं त्याला घेतलोय टीममध्ये.. अजमल आणि उमर गुलनं निराशा केली.
सुपर ८ साठी बी.मॅकमुलम ला
सुपर ८ साठी बी.मॅकमुलम ला घ्यावे की कुमार संगकारा. ज्याम गोंधळ उडतोय. कारण दोघेही विकेट किपर आहेत एकालाच घेता येईल. बी.मॅकमुलम फार्मात आहे आणि कु.संगकाराला होम पीच चा फायदा.....????
माबोकरांची लीग (1st round) चे
माबोकरांची लीग (1st round) चे वीजेते.
Ravindra Ogale : ४४७४
Kedar Jadhav : ४४२६
Kavita Jadhav : ४२५०
मनःपुर्वक अभिनंदन...
धन्यवाद सुजीत
धन्यवाद सुजीत
IMPORTANT: मित्रहो , पहिल्या
IMPORTANT:
मित्रहो ,
पहिल्या राऊंड मधे खरोखर मजा आली . पहिल्या ५ मध्ये तर अगदी कांटे की टक्कर
आपल्यापैकी काही लोकाना पहिल्या काही मॅचेसमधे बदल कसे करावे हे न कळल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला .
पण आता माझ्या मते सर्व लोकांना बर्यापैकी अंदाज आला असेल की बदल कसे आणी केव्हा करावे . आता तर १२ मॅचेसमधे केवळ १२ बदल आहेत
तर सर्वाना Equal Level ला आणण्यासाठी माझ मत अस आहे की येथे मोजताना सुपर ८ मधले रँकींग आणी गुण सुपर ८ स्टेज लेवललाच मोजावेत . (अर्थात आपले Overall Point and Ranking आपण कधीही मोजू शकतो) म्हणजे सगळेच पुन्हा एकदा शर्यतीत येतील आणी मजा वाढेल .
तुम्हा सर्वांच काय मत आहे याबद्दल ?
चालू शकेल केदार.. मी पार
चालू शकेल केदार..
मी पार गाळातूनच वरती आलो ह्या राउंडला.
हो हो.. फेजनुसारच क्रमवारी
हो हो.. फेजनुसारच क्रमवारी असू दे. आणि शेवट दोन्ही.
बाकी पहिली राऊंड मस्त झाली. एकदम कांटे की टक्कर. उमर गुलनं विकला केदारला नाहीतर पहिला तोच यायचा होता आणि त्यात नासिर जमशेदनं आम्हाला १०० पॉईंट दिले.
पुढल्या फेरीसाठी सर्वांना शुभेच्छा.
पूण फेजमधे एकही बदल न करता
पूण फेजमधे एकही बदल न करता जाय होईल बघायचेय का ?
उमर गुलला बडवायला हवे, मला मायनस करून गेला
हो हो, फेजनुसार...मी बराच
हो हो, फेजनुसार...मी बराच उशीरा आलो लीगमध्ये
अभिनंदन रविंद्र आणि
अभिनंदन रविंद्र आणि केदार....
आता सुपर ८ साठी कुणाकुणाची काय काय स्ट्रॅटेजी?
>>फेजनुसारच क्रमवारी असू दे
ते कसे ट्रॅक करायचे?.... तसा काही ऑप्शन आहे का crickinfo वर?
हे राहूनच गेले मघाशी, अभिनंदन
हे राहूनच गेले मघाशी, अभिनंदन रविंद्र आणि केदार.
I had a feeling that pretty
I had a feeling that pretty much team that you select upfront will mor eor less stay as your core team. You may want to get "reliable" players as your core team and then play around with others to maximize utility value for points. What are the chance people selecting Jeevan Mendis as AR slot ?
At some point we have squeeze in Watson.
हो स्वरूप , रँकिंगमधे Drop
हो स्वरूप ,
रँकिंगमधे Drop Down Box वर क्लिक करून आपण बघू शकतो .
प्राची कुलकर्णी , स्वागत आहे
प्राची कुलकर्णी , स्वागत आहे
सुपर ओव्हर !!!
सुपर ओव्हर !!!
एकदमच कल्ला.... दिलशानला
एकदमच कल्ला.... दिलशानला कॅप्टन करता करता मॅकॅल्लमला केला मी..
सुपर ओव्हर मधला परफॉर्मन्स
सुपर ओव्हर मधला परफॉर्मन्स धरणार का इकडे...
दिलशानला कॅप्टन करता करता
दिलशानला कॅप्टन करता करता मॅकॅल्लमला केला मी >> मी टेलरला केला. आणि निकोलला काढून दुसर्याला घेतला :-(. तरी दिलशानला घेतलो होतो म्हणून बरे
मी कोणाला केलेले तेच आठवत
मी कोणाला केलेले तेच आठवत नाही
फेज चे पॉईंटस पुर्ण टिमचे
फेज चे पॉईंटस पुर्ण टिमचे एकाच वेळेस कसे बघायचे? तक्ता फक्त एकुण पॉईंटस दाखवतोय, फेजवाईज बघायचे तर वेगवेगळे बघावे लागताहेत.
बादवे क्रिस गेल सध्यातरी जोरात आहे
न्युझीलंड अगदी निराशा केली, शेवटी शेवटी आपटी खाल्ली
दिलशान ने मात्र दिल खुश केला
फेज चे पॉईंटस पुर्ण टिमचे
फेज चे पॉईंटस पुर्ण टिमचे एकाच वेळेस कसे बघायचे? >> माबो लीगमधे जा नि तिथे जो तक्ता आहे त्यात वर drop down आहे तो वापरा.
गेल सुटलाय ....
झाला आऊट गेल, पण किमान २८४
झाला आऊट गेल, पण किमान २८४ पॉईंट्स देणार
पूर्णपणे न्यू लूक रँकींग टेबल
पूर्णपणे न्यू लूक रँकींग टेबल
Manager Team Name Pts
1 Swapnil Ghayal Ghayal's Warrior 618
2 Prachi Kulkarni Smart11 552
3 Asmita Bapat Challangers 540
4 Himanshu Kulkarni HRK's 11 510
5 prafulla shimpi KhiladiT20 496
6 Sujit Pande Galli Team 472
7 Manish Patil Manish XI 462
8 Kavita Jadhav Kavitas Team 449
9 Ravindra Ogale Ravstarz2023 436
9 Bipin Chaudhari asami 436
11 Nachiket Joshi XIRiders 435
12 Swaroop Kulkarni Swaroop's Team 431
13 Kedar Jadhav Kedar's Eleven 407
14 Prash Patil Prashhhhh 256
15 uday inadmar ALIVE ONE 229
16 Gautam Bagade GDBInt11 155
17 Ashish Phadnis Pune Warriors 124
Pages