क्रिकेट टी २० २०१२ विश्वचषकासाठी "फँटसी लीग"

Submitted by केदार जाधव on 13 September, 2012 - 03:08

नमस्कार मित्रानो ,
थोड्याच दिवसात क्रिकेट टी २० २०१२ विश्वचषक सुरू होतोय .
या वेळी जवळ ज॑वळ सगळ्याच टीम "फेवरीट" आहेत अन नाहीत ही .
नेहमीचे ताकदवान लोक थोडे ढासळलेत , ऑस्ट्रेलीया सावरायचा प्रयत्न करतेय , इंग्लंड KP एपिसोड मधे गंडलय ,
भारताकडे पहिले ४ गोलंदाजच नाहीत , सगळेच 5th bowlers Happy
त्याचवेळी नेहमी कमकुवत समजले जाणारे विंडीज आणी न्युझिलंड (कागदावर तरी) चांगले दिसतायत .
पाकिस्तान नेहमीप्रमाणेच कसा खेळेल हे त्या दिवसापर्यंत कुणीच सांगू शकत नाही
एकूणच सुपर ८ च्या मॅचेस ना धमाल येणार आहे (माझ्या मते गट १ , गट २ पेक्षा थोडा कमकुवत असला तरी)
त्यामुळे थोडा या स्पर्धतला Interest वाढला होता .

आणी त्याचवेळी उदयन यांच्या धाग्यावरील देवचार यांची पोस्ट पाहिली आणी कॉलेज ला असताना खेळलेल SuperSelector आठवल . दिवस दिवस वेगवेगळ्या stratergy वापरून आणी Calculation करून (काय करणार एकूण Points मर्यादीत असतात ना , अर्थात हीच तर त्यातली खरी मजा आहे ) बनवलेल्या टीम्स , वेळोवेळी केलेली substitutions , माझी टीम ढापलीस म्हणून मित्राबरोबर केलेली भांडणे , अमुक एक खेळाडू घेण्यामागच माझ Logic कस बरोबर होत यावरून झालेले वाद (जाता जाता Travis Freind नावाचा एक Zimbabwe चा allrounder होता , खूप कमी किमतीत खूप गुण मिळवून दिले त्याने ) , रोजच प्रत्येकाच लीगमधल आणी एकूण रँकींग बघण , सगळ सगळ आठवल .
नंतर झाल काय तर , दोन टीम्स मधे सीरीज असेल तरी SuperSelector असायच , त्यामुळे त्यातली मजाच निघून गेली .

आज बर्याच दिवसानी तिथे गेलो तर एकदम भारी वाटल . एक म्हणजे पर्याय इतके आहेत की तुम्ही एका दमात काय १०-१२ वेळा प्रयत्न करूनही स्वतःलाच Perfect वाटेल अशी टीम करू शकणार च नाही . प्रत्येक वेळी कुणी ना कुणी तरी राहीलाच अस वाटेल . मी जवळ जवळ ३ तास डोक खर्च करून माझी टीम बनवली आणी मग वाट्ल की आपल्या माबोकरांचीही एक लीग तयार करावी .
यासाठी मी MaayboliT20 नावाची लीग तयार केली आहे .
League PIN: 5303 आहे .
तुमचीही टीम तयार करा आणी या लीग मधे सामील व्हा . पाहूया कुणाची अंदाज आणी Stratergy बरोबर ठरतेय ते Happy

नियम
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=101
स्कोरींग
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=103

आज संध्याकाळपासूनच स्पर्धा सुरू होतेय . शक्य झाल्यास त्या आधीच टीम बनवा .
अर्थात भरपूर संघ असलेल्या स्पर्धेत थोड्या उशिरा सामील झाले तर फारसा फरक पडत नाही (उदा : माझ्या टीममधे एक ही लंका किंवा झिम्बाब्वेचा खेळाडू नसल्याने आजच्या मॅचचा मला डायरेक्ट फरक पडत नाही)
तरीही सुरूवातीपासूनच असलेले कधीही चांगलेच .
तेव्हा शक्य तितक्या लवकर टीम बनवा आणी सामील व्हा Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असामी,
माझ्यामते ३-४लोकांची कोअर टीम करावी . (उदा : कोहली ) त्याना सहसा बदलू नये . उरलेल्यात सहसा एका मॅच मधे २-३ बदल करावेत . जनरली प्रत्येक मॅच होत असताना आपले ३-४ खेळाडू त्यात असावे .

Manager Team Name Pts
1 Ravindra Ogale Ravstarz2023 2847
2 Kedar Jadhav Kedar's Eleven 2822
3 Kavita Jadhav Kavitas Team 2789
4 Swaroop Kulkarni Swaroop's Team 2455
5 Bipin Chaudhari asami 2225
6 Prash Patil Prashhhhh 1629
7 Sujit Pande Galli Team 1472
8 prafulla shimpi KhiladiT20 1453
9 Manish Patil Manish XI 1370
10 Swapnil Ghayal Ghayal's Warrior 1201
11 Nachiket Joshi XIRiders 1197
12 Ashish Phadnis Pune Warriors 1079
13 Gautam Bagade GDBInt11 981
14 Himanshu Kulkarni HRK's 11 893
15 Asmita Bapat Challangers 844
16 uday inadmar ALIVE ONE 550

ज्यांचे पॉइंट आतापर्यंत कमी अहेत खास त्यांच्यासाठी
अजून काहीही बिघड्लेले नाही कारण :
१. एखादा खेळाडूही एकाच मॅचमध्ये ३००-४०० पॉइंट मिळवू शकतो (तो जर कॅप्टन असेल तर दुप्पट म्हणजे ६००=८०० पॉइंट मिळवू शकतो) . एका मॅच मधे एकूण १००० पॉइंटही मिळू शकतात
२ . तुमचे १५-२२ बदल शिल्लक आहेत , आनंदयात्री , हिम्सकूल वगैरेचे तर २२-२२ शिल्लक आहेत , ते तुम्ही पुढच्या ६ मॅचेसमधे वापरू शकता . म्हणजे तुम्ही एकेका मॅचला ४-५ बदल ही करू शकता
३ . त्याचवेळी २००० पेक्षा जास्त पॉइंट असलेल्या आम्हा लोंकाचे १०-१५ बदलच शिल्लक आहेत , त्यामुळे आम्ही साधारण एका मॅचला २-३ च बदल करू शकतो.

तेव्हा चला तर मग चालवा डोके , करा बदल , The only way is Way Up now .

अजुन एक ट्रीक म्हणजे पुढच्या दोन तीन लढती बघून खेळाडू बदलायचे म्हणजे कमीत कमी बदल करायला लागतील..... आज मला ऑफिसमध्ये असल्यामुळे दुसर्‍या मॅचसाठी कॅप्टन बदलता आला नाही Sad

असो अजुन बरीच स्पर्धा शिल्लक आहे..... काहीही होउ शकते.... स्ट्रॅटेजीबरोबर लक पण चालले पाहिजे!

स्ट्रॅटेजीबरोबर लक पण चालले पाहिजे!>>हो, मला दर मॅचमधे एक तरी टोणगा नडतोय Sad

उद्या गेल वर घोडा लावावा का ? प्रेमदासामधे आहे खरय पण गेलला शॉर्ट पिचवर प्रोब्लेम येउ शकतो. गेलपेक्षा वॉर्नर कसा वाटतोय ?

उद्या पहिली मॅच झाली कि दोन टिम पूर्णपणे बाहेर काधून बरीच मोकळी जागा होईल.

असामी , माझ्या मते तरी तुमचा एकच बदल शिल्लक असेल तरी गेलला घ्यावा . Happy
तो कदाचित फेल जाईलही . पण जर बसला तर ......................

स्ट्रॅटेजीबरोबर लक पण चालले पाहिजे! > +१०० स्वरूप .
आता शाकीब पे़क्षा नेथन मकॅलम आणी स्वानपेक्षा समित पटेल चांगला खेळेल हे कुणी तरी Predict करू शकेल का ?
But then Again , त्यातच तर मजा आहे Happy

माझ्या टीममध्ये आजच्या मॅचसाठी अजंता मेंडीस घेतलाय पण तो बहुतेक इंज्युअर्ड आहे Sad

>>तुमचा एकच बदल शिल्लक असेल तरी गेलला घ्यावा .
अगदी अगदी!

पाउस पडला तर त्या मॅचमधे केलेले बदल धरतात का ? आणी scheduled start चे प्रकरण पाऊस पडल्यावर कसे हाताळतात ?

>>पाउस पडला तर त्या मॅचमधे केलेले बदल धरतात का ?
हो

माझ्या टीममध्ये तर दोन्हीचे मिळुन ६ खेळाडू आहेत.... मॅच व्हायलाच पाहिजेल!

एबी ने थोडाफार हात दिला..... आता कॅलीसची बॉलिंग चालली पाहिजेल आणि दिल्शानचा मटका लागला पाहिजेल Happy

पावसामूळे curtail झालेल्या सामन्यांसाठी थोडी सवलत द्यायला हवी राव. बॅटींग ऑर्डर बदलते. संगा कदाचित बॅटींगलाही येणार नाही आत्ता. एक तर सकाळी ६ ला सुरू होते म्हणून वेदर किंवा लेटेस्ट ईंजरी रिपोर्ट न बघता आधीच ठरवून ठेवावे लागते. मेंडीस काल पर्यंत ठिक होता आज सकाळी उठलो तर injured. Sad

डि वीलीय्र्स काय खेळला राव. मोठ्या ground वर पण कसले खेचलेत. डुमिनीचा शेवटचा सिक्स लाजवाब होता.

चला पुढच्या सामन्यासाठी तयारी करुन ठेवतो.

भरवश्याच्या म्ह्शीला अजून किती..... बसणार

दिलशान गेला , कॅप्टन केला होता त्याला. पण लगेच गेला, पुर्ण गुंतवणूक वाया गेलीच आता किती -ve होते ते पहायचे, शेवटचा नंबर मिळाला नाही म्हणजे झाले.

बादवे, वेस्ट ईंडीज साठी गेल व्यतिरिक्त कोण फेव्हरीट आहे?

रमिझ राजा काहीही बोलतो राव. आफ्रिकन्स short balls टाकताहेत तसे लंकेने टाकले नाहीत वगैरे. अरे भल्या माणसा स्पीड गन कडे बघ ना. स्टेन, मॉर्केल्चा पेस काय असतो नि परेरा मलिंगाचा काय असतो short balls टाकताना ? मलिंगाची wicket taking delivery काय आहे ?

वेस्ट ईंडीज साठी गेल व्यतिरिक्त कोण फेव्हरीट आहे? >> मी नरेनला पण घेतलय. bravo, smith चांगले बेट्स आहेत.

Pages