नमस्कार मित्रानो ,
थोड्याच दिवसात क्रिकेट टी २० २०१२ विश्वचषक सुरू होतोय .
या वेळी जवळ ज॑वळ सगळ्याच टीम "फेवरीट" आहेत अन नाहीत ही .
नेहमीचे ताकदवान लोक थोडे ढासळलेत , ऑस्ट्रेलीया सावरायचा प्रयत्न करतेय , इंग्लंड KP एपिसोड मधे गंडलय ,
भारताकडे पहिले ४ गोलंदाजच नाहीत , सगळेच 5th bowlers
त्याचवेळी नेहमी कमकुवत समजले जाणारे विंडीज आणी न्युझिलंड (कागदावर तरी) चांगले दिसतायत .
पाकिस्तान नेहमीप्रमाणेच कसा खेळेल हे त्या दिवसापर्यंत कुणीच सांगू शकत नाही
एकूणच सुपर ८ च्या मॅचेस ना धमाल येणार आहे (माझ्या मते गट १ , गट २ पेक्षा थोडा कमकुवत असला तरी)
त्यामुळे थोडा या स्पर्धतला Interest वाढला होता .
आणी त्याचवेळी उदयन यांच्या धाग्यावरील देवचार यांची पोस्ट पाहिली आणी कॉलेज ला असताना खेळलेल SuperSelector आठवल . दिवस दिवस वेगवेगळ्या stratergy वापरून आणी Calculation करून (काय करणार एकूण Points मर्यादीत असतात ना , अर्थात हीच तर त्यातली खरी मजा आहे ) बनवलेल्या टीम्स , वेळोवेळी केलेली substitutions , माझी टीम ढापलीस म्हणून मित्राबरोबर केलेली भांडणे , अमुक एक खेळाडू घेण्यामागच माझ Logic कस बरोबर होत यावरून झालेले वाद (जाता जाता Travis Freind नावाचा एक Zimbabwe चा allrounder होता , खूप कमी किमतीत खूप गुण मिळवून दिले त्याने ) , रोजच प्रत्येकाच लीगमधल आणी एकूण रँकींग बघण , सगळ सगळ आठवल .
नंतर झाल काय तर , दोन टीम्स मधे सीरीज असेल तरी SuperSelector असायच , त्यामुळे त्यातली मजाच निघून गेली .
आज बर्याच दिवसानी तिथे गेलो तर एकदम भारी वाटल . एक म्हणजे पर्याय इतके आहेत की तुम्ही एका दमात काय १०-१२ वेळा प्रयत्न करूनही स्वतःलाच Perfect वाटेल अशी टीम करू शकणार च नाही . प्रत्येक वेळी कुणी ना कुणी तरी राहीलाच अस वाटेल . मी जवळ जवळ ३ तास डोक खर्च करून माझी टीम बनवली आणी मग वाट्ल की आपल्या माबोकरांचीही एक लीग तयार करावी .
यासाठी मी MaayboliT20 नावाची लीग तयार केली आहे .
League PIN: 5303 आहे .
तुमचीही टीम तयार करा आणी या लीग मधे सामील व्हा . पाहूया कुणाची अंदाज आणी Stratergy बरोबर ठरतेय ते
नियम
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=101
स्कोरींग
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=103
आज संध्याकाळपासूनच स्पर्धा सुरू होतेय . शक्य झाल्यास त्या आधीच टीम बनवा .
अर्थात भरपूर संघ असलेल्या स्पर्धेत थोड्या उशिरा सामील झाले तर फारसा फरक पडत नाही (उदा : माझ्या टीममधे एक ही लंका किंवा झिम्बाब्वेचा खेळाडू नसल्याने आजच्या मॅचचा मला डायरेक्ट फरक पडत नाही)
तरीही सुरूवातीपासूनच असलेले कधीही चांगलेच .
तेव्हा शक्य तितक्या लवकर टीम बनवा आणी सामील व्हा
नाही हिम्सकूल , खूप गडबड करून
नाही हिम्सकूल , खूप गडबड करून चालणार नाही . २४ आकडा खूप वाटत असला तरी तसा तो खूप कमी आहे . सुरूवातीलाच सगळे substitution सम्पले तर नंतर आहे त्या टीमने खेळावे लागेल .
२४ सब्स्टिट्युशन्स आहे लीग
२४ सब्स्टिट्युशन्स आहे लीग स्टेजला. त्याचा पुरेपूर वापर करणे हीच किल्ली आहे >> एक्झाक्टली..
हिम्या.. खेळाडू बदलला तरी गुण जात नाहीत म्हणून तर २४ बदल करायला परवानगी आहे. प्रत्येक मॅचचा विचार न करता पुढच्या ३-४ मॅचेसचा विचार करून टीम बनवायची
प्रफुल्ल शिंपी , आपली टीम
प्रफुल्ल शिंपी , आपली टीम अॅड केली आहे
चला दिलशानचे ६४ पॉईंट्स जमा
चला दिलशानचे ६४ पॉईंट्स जमा झाले!
ALIVE ONE माझी टीम विराट
ALIVE ONE माझी टीम
विराट कोहली, माईक हसी, चांदीमाल, डुमीनी, ए बी डिव्हिलिर्स, शाहीद आफ्रीदी, के ओब्राईन, अश्विन, नारेन, गुल, रसल
पॉइंटस अपडेट कधी होतात?
पॉइंटस अपडेट कधी होतात?
अर्रर्र.... अजंता मेंडिस
अर्रर्र.... अजंता मेंडिस घ्यायला पाहिजे होता आज.... पोत्याने पॉइंट्स मिळाले असते!
मला सामिल करून घेणे
मला सामिल करून घेणे
आशुचँप , सामील केले आहे
आशुचँप , सामील केले आहे
मायबोली लीगची आजची रँकिंग
मायबोली लीगची आजची रँकिंग :
Manager Team Name Batting Pts Bowling Pts Fielding Pts Pts
1 Gautam Bagade GDBInt11 111 185 10 318
2 Ravindra Ogale Ravstarz2023 154 15 40 224
3 Kedar Jadhav Kedar's Eleven 62 45 40 211
4 Manish Patil Manish XI 10 15 40 83
5 Swaroop Kulkarni Swaroop's Team 64 15 0 79
6 Bipin Chaudhari asami -2 15 40 71
7 Himanshu Kulkarni HRK's 11 8 0 10 36
8 prafulla shimpi KhiladiT20 0 15 0 15
9 Prash Patil Prashhhhh 0 0 0 0
9 Kavita Jadhav Kavitas Team 0 0 0 0
Ashish Phadnis Pune Warriors 0 0 0 0
स्वरूप , पोत्याने पॉईंट
स्वरूप , पोत्याने पॉईंट आपल्यात फक्त गौतमला मिळालेत
सर्वांनी टिमच्या नावामधे
सर्वांनी टिमच्या नावामधे माबोचा आयडी टाका रे, कोणाची काय तिम आहे ते कळायला समीकरण सोडवायला लागतात
जयवरधने, टेलर नि मलिंगा ह्या आमच्या भरवशाच्या म्हशींना टोणगे झाले
जयवरधने, टेलर नि मलिंगा ह्या
जयवरधने, टेलर नि मलिंगा ह्या आमच्या भरवशाच्या म्हशींना टोणगे झाले डोळा मारा > सेम हिअर .
दिलशानला कॅप्टन केल्यामुळे त्याचे दुप्पट गुण (१२८) मिळाले एवढीच जमेची बाजू
आज २ मॅच असल्यने रात्री ७:३०
आज २ मॅच असल्यने रात्री ७:३० च्या आधी कॅप्टन बदलावा लागेल. तसच प्लेअरपण ७:३० च्या आधी बदलले तर पॉईंटसपण जास्त मिळतील. आज सेहवागला घेतलतर चालंल, काय म्हणता लोकहो?
सो ३:३० नंतर आणि ७:३० च्या आधी
गौतम , आयडीया चांगली आहे . पण
गौतम , आयडीया चांगली आहे . पण सगळे २४ पहिल्या काही मॅचेस मधे संपणार नाहीत याची काळजी घ्या
खरंय, पण १२ मॅचमध्ये २४
खरंय, पण १२ मॅचमध्ये २४ चेंजेस अलाऊड आहेत, सो परमॅच २ चेंजेस केले सुपर ८ पर्यंत तरी चालतय ना.
आणि सुपर ८ ला १२, सेमी व फायनलला ४ चेंज करु शकतो. म्हणुन आत्ता तरी २४ चेंज १२ मॅचमध्ये तसे कमीपण नाहीत आणि जादापण...पण जपुन वापरायला हवे हेही खरे.
तसंच कॅप्टन चेंज कायम अनलिमिटेड आहेत (निवडलेल्या ११ मधुनच
)
You can also make up to 24 team changes during the Group Stages, up to 12 team changes during the Super Eights and up to up to four team changes between the first semi-final and the final.
पहिल्या मॅचला मेंडीसचा चांगला मटका लागला
आज हवामान ढगाळ आहे, मॅच होणार का??
केदार, लेटेस्ट रॅकींग
केदार, लेटेस्ट रॅकींग धाग्याच्या सुरुवतीला टाकता आले तर बरे होईल!
मी पण अप्लाय केलंय. टीमचं नाव
मी पण अप्लाय केलंय.
टीमचं नाव - XIRiders
अरे माझी टीम का अॅड केली
अरे माझी टीम का अॅड केली नाही.
आनंदयात्री , आपली टीम अॅड
आनंदयात्री ,
आपली टीम अॅड केली आहे
मी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या
मी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या टीम सिलेक्शनमध्ये भाग घेतलाय. कृपया माझी टीम बघून सांगाल का, की यात काही मुख्य अडचण होणार नाही ना?
केदार........माझी पण अॅड
केदार........माझी पण अॅड कर..
आनंदयात्रीजी , तुमची टीम
आनंदयात्रीजी , तुमची टीम चांगली आहे .
आपल्याला २४ बदल या स्टेजला केले तर चालतात .
फक्त दर २-३ मॅचेस नंतर ज्या टीमच्या मॅचेस असतील त्यातील खेळाडू घेण्याचा प्रयत्न करा (अर्थात २४ ची मर्यादा लक्षात ठेऊनच) म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त पॉईंट मिळतील .
उदयनजी , आपली टीम challengers
उदयनजी , आपली टीम challengers आहे ना ? अॅड केली आहे .
माझी.....ALIVE ONE
माझी.....ALIVE ONE आहे..केदार...रिक्वेस्ट पाठवली आहे
उदयन , टीम अॅड केली आहे .
उदयन , टीम अॅड केली आहे .
शेन वॅटसन आज ज्या टीम्समध्ये
शेन वॅटसन आज ज्या टीम्समध्ये आहे त्यांना फायदा जोरात आहे
माझ्या ऑल राऊंडरनी आज हात
माझ्या ऑल राऊंडरनी आज हात दिला फक्त.. हसी ढेपाळला...
केविन ओब्रायनही पावला
केविन ओब्रायनही पावला
पण टिम बदल करतांना मला माझे
पण टिम बदल करतांना मला माझे खेळाडू काढावे लागतात आणि किमंतीचा पण ईश्यू होतो. ते कसे हाताळावे? ट्रान्सफर नेमके कसे करावे?
Pages