क्रिकेट टी २० २०१२ विश्वचषकासाठी "फँटसी लीग"

Submitted by केदार जाधव on 13 September, 2012 - 03:08

नमस्कार मित्रानो ,
थोड्याच दिवसात क्रिकेट टी २० २०१२ विश्वचषक सुरू होतोय .
या वेळी जवळ ज॑वळ सगळ्याच टीम "फेवरीट" आहेत अन नाहीत ही .
नेहमीचे ताकदवान लोक थोडे ढासळलेत , ऑस्ट्रेलीया सावरायचा प्रयत्न करतेय , इंग्लंड KP एपिसोड मधे गंडलय ,
भारताकडे पहिले ४ गोलंदाजच नाहीत , सगळेच 5th bowlers Happy
त्याचवेळी नेहमी कमकुवत समजले जाणारे विंडीज आणी न्युझिलंड (कागदावर तरी) चांगले दिसतायत .
पाकिस्तान नेहमीप्रमाणेच कसा खेळेल हे त्या दिवसापर्यंत कुणीच सांगू शकत नाही
एकूणच सुपर ८ च्या मॅचेस ना धमाल येणार आहे (माझ्या मते गट १ , गट २ पेक्षा थोडा कमकुवत असला तरी)
त्यामुळे थोडा या स्पर्धतला Interest वाढला होता .

आणी त्याचवेळी उदयन यांच्या धाग्यावरील देवचार यांची पोस्ट पाहिली आणी कॉलेज ला असताना खेळलेल SuperSelector आठवल . दिवस दिवस वेगवेगळ्या stratergy वापरून आणी Calculation करून (काय करणार एकूण Points मर्यादीत असतात ना , अर्थात हीच तर त्यातली खरी मजा आहे ) बनवलेल्या टीम्स , वेळोवेळी केलेली substitutions , माझी टीम ढापलीस म्हणून मित्राबरोबर केलेली भांडणे , अमुक एक खेळाडू घेण्यामागच माझ Logic कस बरोबर होत यावरून झालेले वाद (जाता जाता Travis Freind नावाचा एक Zimbabwe चा allrounder होता , खूप कमी किमतीत खूप गुण मिळवून दिले त्याने ) , रोजच प्रत्येकाच लीगमधल आणी एकूण रँकींग बघण , सगळ सगळ आठवल .
नंतर झाल काय तर , दोन टीम्स मधे सीरीज असेल तरी SuperSelector असायच , त्यामुळे त्यातली मजाच निघून गेली .

आज बर्याच दिवसानी तिथे गेलो तर एकदम भारी वाटल . एक म्हणजे पर्याय इतके आहेत की तुम्ही एका दमात काय १०-१२ वेळा प्रयत्न करूनही स्वतःलाच Perfect वाटेल अशी टीम करू शकणार च नाही . प्रत्येक वेळी कुणी ना कुणी तरी राहीलाच अस वाटेल . मी जवळ जवळ ३ तास डोक खर्च करून माझी टीम बनवली आणी मग वाट्ल की आपल्या माबोकरांचीही एक लीग तयार करावी .
यासाठी मी MaayboliT20 नावाची लीग तयार केली आहे .
League PIN: 5303 आहे .
तुमचीही टीम तयार करा आणी या लीग मधे सामील व्हा . पाहूया कुणाची अंदाज आणी Stratergy बरोबर ठरतेय ते Happy

नियम
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=101
स्कोरींग
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=103

आज संध्याकाळपासूनच स्पर्धा सुरू होतेय . शक्य झाल्यास त्या आधीच टीम बनवा .
अर्थात भरपूर संघ असलेल्या स्पर्धेत थोड्या उशिरा सामील झाले तर फारसा फरक पडत नाही (उदा : माझ्या टीममधे एक ही लंका किंवा झिम्बाब्वेचा खेळाडू नसल्याने आजच्या मॅचचा मला डायरेक्ट फरक पडत नाही)
तरीही सुरूवातीपासूनच असलेले कधीही चांगलेच .
तेव्हा शक्य तितक्या लवकर टीम बनवा आणी सामील व्हा Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो.......आताच बंद झाले.........मी टीम बदलली आणि बंद झाले Sad कॅप्टन बदलायचा होता Sad

कॅप्टन कुणाला करु यात अडकलोय.....गेल चा भरोसा नसतो..दिलशान आणि जय वर्धणे बॉलिंग करत नाहीत...... Sad
मॅथ्यु बे भरोसा आहे

कॅप्टन कुणाला करु यात अडकलोय.....गेल चा भरोसा नसतो..दिलशान आणि जय वर्धणे बॉलिंग करत नाहीत...... अरेरे
मॅथ्यु बे भरोसा आहे >>> +१
दिल बोलताय सॅम्युअल्स को कर , पर दिमाग गेल कोईच सपोर्ट करताय Happy

आज धनंजय ला घ्यायला हवा.......पण मोठ्या अंतीम सामन्यात नवख्या मुलाला संधी देणार नाहीत

आयला.............धनंजय ला घेतला..........हुर्रे............माझे १० च्या १० खेळाडु खेळणार..क्रिस्टीन (ऑसी) ठेवावा लागला.....४ च बदल असल्याने......

माझ्याच बॉलर ने माझ्याच बॅटस्मन ला उडवले........ रामपॉल ने दिलशान ला........आणि धनंजय ने सॅम्युअल ला .. Sad
.
.कधी नाही ते मलिंगाला विश्वास ठेवला....... नालायकाने ४ ओवर्स मधे ५४ रन्स दिल्या..:राग:

सॅम्युअल्स कॅप्टन आहे आपला >> मटका लागला रे तुला. काल बसून बद्री कि सॅम्युअल्स ह्यावर डोके फोड करून शेवटी बद्रीला घेतला (कारण मागच्या लंकेच्या विरुद्ध मॅचमधे सॅम्युअल्स तडफडला होता स्पिनर्ससमोर. आजही मलिंगा नसता तर ... Wink )

1 Prachi Kulkarni Smart11 887 885 130 250 2152
2 Kedar Jadhav Kedar's Eleven 874 795 100 200 1969
3 Bipin Chaudhari asami 391 1005 110 100 1606
4 prafulla shimpi KhiladiT20 556 775 110 150 1591
5 Sujit Pande Galli Team 973 155 160 250 1538
6 Manish Patil Manish XI 539 745 100 150 1534
7 Himanshu Kulkarni HRK's 11 605 610 80 100 1395
8 Ravindra Ogale Ravstarz2023 598 515 110 100 1323
9 Kavita Jadhav Kavitas Team 567 505 80 150 1302
10 uday inadmar ALIVE ONE 628 345 100 200 1273
11 Swaroop Kulkarni Swaroop's Team 491 335 120 150 1096
12 Nachiket Joshi XIRiders 403 570 40 50 1063
13 Ashish Phadnis Pune Warriors 227 575 60 50 912
14 Asmita Bapat Challangers 351 225 80 0 656
15 Prash Patil Prashhhhh 216 195 0 50 461
16 Gautam Bagade GDBInt11 120 0 30 50 200
17 Swapnil Ghayal Ghayal's Warrior 24 60 0 0 84

Pages