क्रिकेट टी २० २०१२ विश्वचषकासाठी "फँटसी लीग"

Submitted by केदार जाधव on 13 September, 2012 - 03:08

नमस्कार मित्रानो ,
थोड्याच दिवसात क्रिकेट टी २० २०१२ विश्वचषक सुरू होतोय .
या वेळी जवळ ज॑वळ सगळ्याच टीम "फेवरीट" आहेत अन नाहीत ही .
नेहमीचे ताकदवान लोक थोडे ढासळलेत , ऑस्ट्रेलीया सावरायचा प्रयत्न करतेय , इंग्लंड KP एपिसोड मधे गंडलय ,
भारताकडे पहिले ४ गोलंदाजच नाहीत , सगळेच 5th bowlers Happy
त्याचवेळी नेहमी कमकुवत समजले जाणारे विंडीज आणी न्युझिलंड (कागदावर तरी) चांगले दिसतायत .
पाकिस्तान नेहमीप्रमाणेच कसा खेळेल हे त्या दिवसापर्यंत कुणीच सांगू शकत नाही
एकूणच सुपर ८ च्या मॅचेस ना धमाल येणार आहे (माझ्या मते गट १ , गट २ पेक्षा थोडा कमकुवत असला तरी)
त्यामुळे थोडा या स्पर्धतला Interest वाढला होता .

आणी त्याचवेळी उदयन यांच्या धाग्यावरील देवचार यांची पोस्ट पाहिली आणी कॉलेज ला असताना खेळलेल SuperSelector आठवल . दिवस दिवस वेगवेगळ्या stratergy वापरून आणी Calculation करून (काय करणार एकूण Points मर्यादीत असतात ना , अर्थात हीच तर त्यातली खरी मजा आहे ) बनवलेल्या टीम्स , वेळोवेळी केलेली substitutions , माझी टीम ढापलीस म्हणून मित्राबरोबर केलेली भांडणे , अमुक एक खेळाडू घेण्यामागच माझ Logic कस बरोबर होत यावरून झालेले वाद (जाता जाता Travis Freind नावाचा एक Zimbabwe चा allrounder होता , खूप कमी किमतीत खूप गुण मिळवून दिले त्याने ) , रोजच प्रत्येकाच लीगमधल आणी एकूण रँकींग बघण , सगळ सगळ आठवल .
नंतर झाल काय तर , दोन टीम्स मधे सीरीज असेल तरी SuperSelector असायच , त्यामुळे त्यातली मजाच निघून गेली .

आज बर्याच दिवसानी तिथे गेलो तर एकदम भारी वाटल . एक म्हणजे पर्याय इतके आहेत की तुम्ही एका दमात काय १०-१२ वेळा प्रयत्न करूनही स्वतःलाच Perfect वाटेल अशी टीम करू शकणार च नाही . प्रत्येक वेळी कुणी ना कुणी तरी राहीलाच अस वाटेल . मी जवळ जवळ ३ तास डोक खर्च करून माझी टीम बनवली आणी मग वाट्ल की आपल्या माबोकरांचीही एक लीग तयार करावी .
यासाठी मी MaayboliT20 नावाची लीग तयार केली आहे .
League PIN: 5303 आहे .
तुमचीही टीम तयार करा आणी या लीग मधे सामील व्हा . पाहूया कुणाची अंदाज आणी Stratergy बरोबर ठरतेय ते Happy

नियम
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=101
स्कोरींग
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=103

आज संध्याकाळपासूनच स्पर्धा सुरू होतेय . शक्य झाल्यास त्या आधीच टीम बनवा .
अर्थात भरपूर संघ असलेल्या स्पर्धेत थोड्या उशिरा सामील झाले तर फारसा फरक पडत नाही (उदा : माझ्या टीममधे एक ही लंका किंवा झिम्बाब्वेचा खेळाडू नसल्याने आजच्या मॅचचा मला डायरेक्ट फरक पडत नाही)
तरीही सुरूवातीपासूनच असलेले कधीही चांगलेच .
तेव्हा शक्य तितक्या लवकर टीम बनवा आणी सामील व्हा Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार.... इतके बदल कुठे उधळलेस?
मी एक पण पाकडा घेणार नाहिये.... निदान लीग मॅचेस मध्ये तरी.... मग भले काही पॉइंट्स हुकले तरी चालतील!

आपला तर कामरान अकमल कॅप्टन Happy मकॅलमला बाहेर ठेवायच म्हणजे रिस्क आहे पण तरीही , कभी कभी दिनाग से पहले दिल की भी सुननी चाहिये Happy

आपल्या मॅच साठी कॅप्टन युवराज आणि आधीच्या मॅच साठी मॅकलम..

माझ्या टीम मध्ये आज फक्त आज होणार्‍या मॅच मधलेच खेळाडू आहेत आता.. काल वॅट्टोनी जबरी हात दिल्याने बर्‍यापैकी वर आलोय.. आज बघुया काय होतय ते..

हिम्सकूल काय राव ,
आपले ४ बॅट्समन घेऊनही त्यात सेहवाग नाही . अपमान आहे हो त्याचा Happy
आम्ही याचा णिशेद करतो Happy
पण टीम बाकी झकास आहे आजच्या मॅचेससाठी !!

हिम्या, टीम भारी.... आज खोर्‍याने पॉइंटस कमावणार तू Happy

आपली मदार पहील्या मॅचमध्ये मॅकलम, फ्रँकलीन आणि साउदीवर!

अजमल आणि हफीजला बहुतेक सगळ्यांनीच घेतलाय आज... फारच फेव्हरीट दिसताहेत...

मिल्स झोपला आज.. नशीब मायनस पॉइंट्स नाहीत...

अजमल आणि हफीजला बहुतेक सगळ्यांनीच घेतलाय आज... फारच फेव्हरीट दिसताहेत... >> अजमल बद्दल वादच नाही . हाफिज हा bargain buy आहे .ओपेनिंग आणी ३-४ ओव्हर .
आनंदयात्री , पुढच्या ३ मॅच मधे स्कोर होणारा प्रत्येक गुण तुम्हाला मिळालाच पाहिजे . १७ बदल Happy

१७ बदल >> मायबोली सोडा मी overall leader होईन एव्हढे बदल मिळाले तर Wink

India vs Eng मधे कोणाला कप्तान करायचे ?

गंभीर, कोहली तरी चाललेत आत्ता... युवी आणि रैना काय करतात ते बघायचं... कॅप्टन युवीला केलय..

सेहवाग आणि झहीर न घेणे फायद्याचे ठरले.. युवीला कॅप्टन करुन काहीच उपयोग होईल असं दिसत नाहीये... बहुतेक त्याला बॉलिंग मिळणार पण नाही...

भावानो ,
भज्जी पावला रे Happy
, स्वरूप , माझ्या टीम मध्ये फक्त कोह्ली आणी अश्विन होता भारताचा .
तो खेळत नाही म्हटल्यावर मग म्हट्ले आता भज्जीवर जुगार खेळावा .

एव्हढे जण drop केले म्हणून घाई घाईत टिम बदलत इग्लंड वर मटका लावला होता. पण भारत जिंकल्याचे समाधान आहे Happy

धोनीबाबाची पुढच्या वेळी बोंब आहे. भज्जीला घ्यावे तरी फटके असणार आहेत नि नाही घ्यावे तरी फटके Happy दिंडा नि बालाजीने जी सुरूवात केली होती ती बघून चारच बॉलर का घ्यावेत ह्याबद्दल शंका उरली नव्हती Lol

धोनीबाबाची पुढच्या वेळी बोंब आहे > अगदी अगदी .
एकतर रोहित असा खेळतोय की ५ बॉलर खेळवावे की नाही हा पहिला प्रश्न आहे . त्यानंतर ते ४ किंवा ५ कोण तो .

सेहवाग अश्विन ना घेवून काहीच उपयोग नाही झाला. आता पुढच्या २ सामन्या मधे काय पॉइंट्स मिळतात ते बघायचं... आजच्या मॅचेससाठी गेल ला कॅप्टन ला केलय..

कालच्या मॅचचा बल्ल्या वाजल्यामुळे सगळा घोळ झालाय.. तरी गेल नी थोडे फार पॉईंट्स दिले.. बाकीचे सगळे बदल वाया.. आजच्या मॅच साठी घाऊक बदल केलेत... बघुया किती फरक पडतोय ते... आफ्रीदीला कॅप्टन केलाय..

भारी टीमै हिम्सकूल

आजच्या सामन्यानंतर जोरदार उलथापालथ होणारशी दिसत्ये! Happy

पुढल्या फेरीला १२ सामन्यांना केवळ १२ सब्स.. बहुत नाइन्साफी हय..

पुढल्या फेरीला १२ सामन्यांना केवळ १२ सब्स.. बहुत नाइन्साफी हय..

>>> हो पण सुपर ८ चालू होण्याआधी अमर्यादित बदल करायला परवानगी आहे त्यामुळे श्येड्यूल पाहून त्यानुसार टिम बदल करता येतील.

हो पण सुपर ८ चालू होण्याआधी अमर्यादित बदल करायला परवानगी आहे त्यामुळे श्येड्यूल पाहून त्यानुसार टिम बदल करता येतील > येक्ज्याक्ट्ली आय से Happy

हो तरी १२ सामन्यांना १२ बदल नि तेही ८ रेग्युलर्स खेळत असताना जरा कमी वाटताहेत. Happy

बाकी सेफासाठी विंडीज (१), श्रीलंका (२), पाकिस्तान (१) नि ऑस्ट्रेलिया (२) जाणार. काय मत? (करंट फॉर्म बघता आपण पाकिस्तानला हरवू शकूसं वाटत नाही. पण त्यादिवशी आपला खेळ उंचावलाच आपल्या खेळाडूंनी तर बल्ले बल्ले! Happy

Pages