क्रिकेट टी २० २०१२ विश्वचषकासाठी "फँटसी लीग"

Submitted by केदार जाधव on 13 September, 2012 - 03:08

नमस्कार मित्रानो ,
थोड्याच दिवसात क्रिकेट टी २० २०१२ विश्वचषक सुरू होतोय .
या वेळी जवळ ज॑वळ सगळ्याच टीम "फेवरीट" आहेत अन नाहीत ही .
नेहमीचे ताकदवान लोक थोडे ढासळलेत , ऑस्ट्रेलीया सावरायचा प्रयत्न करतेय , इंग्लंड KP एपिसोड मधे गंडलय ,
भारताकडे पहिले ४ गोलंदाजच नाहीत , सगळेच 5th bowlers Happy
त्याचवेळी नेहमी कमकुवत समजले जाणारे विंडीज आणी न्युझिलंड (कागदावर तरी) चांगले दिसतायत .
पाकिस्तान नेहमीप्रमाणेच कसा खेळेल हे त्या दिवसापर्यंत कुणीच सांगू शकत नाही
एकूणच सुपर ८ च्या मॅचेस ना धमाल येणार आहे (माझ्या मते गट १ , गट २ पेक्षा थोडा कमकुवत असला तरी)
त्यामुळे थोडा या स्पर्धतला Interest वाढला होता .

आणी त्याचवेळी उदयन यांच्या धाग्यावरील देवचार यांची पोस्ट पाहिली आणी कॉलेज ला असताना खेळलेल SuperSelector आठवल . दिवस दिवस वेगवेगळ्या stratergy वापरून आणी Calculation करून (काय करणार एकूण Points मर्यादीत असतात ना , अर्थात हीच तर त्यातली खरी मजा आहे ) बनवलेल्या टीम्स , वेळोवेळी केलेली substitutions , माझी टीम ढापलीस म्हणून मित्राबरोबर केलेली भांडणे , अमुक एक खेळाडू घेण्यामागच माझ Logic कस बरोबर होत यावरून झालेले वाद (जाता जाता Travis Freind नावाचा एक Zimbabwe चा allrounder होता , खूप कमी किमतीत खूप गुण मिळवून दिले त्याने ) , रोजच प्रत्येकाच लीगमधल आणी एकूण रँकींग बघण , सगळ सगळ आठवल .
नंतर झाल काय तर , दोन टीम्स मधे सीरीज असेल तरी SuperSelector असायच , त्यामुळे त्यातली मजाच निघून गेली .

आज बर्याच दिवसानी तिथे गेलो तर एकदम भारी वाटल . एक म्हणजे पर्याय इतके आहेत की तुम्ही एका दमात काय १०-१२ वेळा प्रयत्न करूनही स्वतःलाच Perfect वाटेल अशी टीम करू शकणार च नाही . प्रत्येक वेळी कुणी ना कुणी तरी राहीलाच अस वाटेल . मी जवळ जवळ ३ तास डोक खर्च करून माझी टीम बनवली आणी मग वाट्ल की आपल्या माबोकरांचीही एक लीग तयार करावी .
यासाठी मी MaayboliT20 नावाची लीग तयार केली आहे .
League PIN: 5303 आहे .
तुमचीही टीम तयार करा आणी या लीग मधे सामील व्हा . पाहूया कुणाची अंदाज आणी Stratergy बरोबर ठरतेय ते Happy

नियम
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=101
स्कोरींग
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=103

आज संध्याकाळपासूनच स्पर्धा सुरू होतेय . शक्य झाल्यास त्या आधीच टीम बनवा .
अर्थात भरपूर संघ असलेल्या स्पर्धेत थोड्या उशिरा सामील झाले तर फारसा फरक पडत नाही (उदा : माझ्या टीममधे एक ही लंका किंवा झिम्बाब्वेचा खेळाडू नसल्याने आजच्या मॅचचा मला डायरेक्ट फरक पडत नाही)
तरीही सुरूवातीपासूनच असलेले कधीही चांगलेच .
तेव्हा शक्य तितक्या लवकर टीम बनवा आणी सामील व्हा Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! बर्‍याच टीमा गोळा झाल्या!

वॉट्सन जोरात पावला, कोहली पण जोरात पावलाय.. आता पठाण्/अश्विन पावोत.

बादवे - Ravstarz आपली टीम बर्का. Happy

आपल्याला वॉटसन पावला , आणी तो कॅप्टन ही होता . इसकूच बोलतेय घी मे शक्कर Happy
स्वरूप , घरच्या नेटवर्क वरून इमेज अ‍ॅड होत नाहीये नीट , उद्या करतो Happy

आता २-३ दिवस मी कमीत कमी बदल करणार आहे.

आजची मॅच बघून आपल्या ग्रुपमधे बांग्लादेश वगैरे नाहीत ह्याचे बरे वाटले. झहिर ऐवजी कोणाला घेणार ? तो जेव्हढे रन्स देतोय ते बघून तेवारीला खेळवा, काहीच नाही तर ८ बॅट्स्मन होतील Wink

हुश्श.... पहिल्यांदा बदल केलेत, हळूहळू पचनी पडतेय, पण मजा येतेय.

अ‍ॅनॅलिसीस करतांना आधी खुप सोपे वाटते पण करतांना देश, किंमत, एकुण किंमत आणि टिमचा ताळमेळ (बॅटसमन, बॉलर, ऑलराऊंडर ई) घालतांना फे फे ऊडते आणि ट्रान्सफर्स कमी होतात ते वेगळे

थ्रिलिंग आहे एकंदरीत.

एक शंका, जर गुण मिळविलेला खेळाडू काढला तर तो गुण सोबत घेऊन जातो की आपल्या टिमकडेच राह्तात?

prafullashimpi ,
जर गुण मिळविलेला खेळाडू काढला तर तो गुण सोबत घेऊन जातो की आपल्या टिमकडेच राह्तात? >>
गुण आपल्याकडेच राहतात .

अ‍ॅनॅलिसीस करतांना आधी खुप सोपे वाटते पण करतांना देश, किंमत, एकुण किंमत आणि टिमचा ताळमेळ (बॅटसमन, बॉलर, ऑलराऊंडर ई) घालतांना फे फे ऊडते आणि ट्रान्सफर्स कमी होतात ते वेगळे

थ्रिलिंग आहे एकंदरीत. >> +१

ज्या ज्या लोकांनी युवराज ला घेतला त्याना सलाम . मी भारताला खूप Overestimate केल . मला वाटल सेहवाग , गंभीर आणी कोहली सोडून इतर कुणाला बॅटींग मिळणारच नाही फारशी Happy
सेहवाग ला मी नेहमी का घेतो हे माझ मलाच कधी कळत नाही Sad

आनंद्यात्री पहिल्यांदाच खेळताना २ मॅचेसमध्ये ९७१ ! नॉट बॅड
मटके बसले म्हणायचं! Wink

आता बदल करायला हवेत टीममध्ये... Happy

वॅटसन पावल्याने एवढे तरी गुण मिळाले. काल माझ्या SAच्या खेळाडूंना खेळायलाच मिळाले नाही Happy

आज रॉस टेलर पावला पाहिजे.. Happy

कमीत कमी बदल करायला हवेत टीममध्ये. २७ मॅचेस आहेत आणी २४ बदल करायला वाव आहे. मी ६ (Galli team) बदल केलेत.

मकॅलम माझ्या टीमचा कॅप्टन आहे
सुजित , अहो माझे फक्त १२ बदल राहिलेत

====> आ ता कसली बदलाची गरज आहे? ??? पोत्याने गुण मिळतील ते सुपर ८ पर्यंत आरामात पुरतील Happy

मॅक्कलमला घेता घेता मी बजेट पाहिले आणि कोणाला काढायचे त्यात गोंधळ उडाला आणि मॅक्कलम ही उडाला.
पुढच्या वेळेस नीट लक्षात ठेवावे लागेल

माझ्या टीममध्ये SA अथवा ZIM चं कुणीच नव्हतं.. त्यामुळे झोळी रिकामी राहिली.. आज फ्रँकलिन होता, मॅक्लम राहून गेला... Sad

क्लोज फाईट होते आहे. आजच्या ल्युक राईटच्या झंझावातानंतर कविता जाधवही टॉप-२ मध्ये येणारसं दिसतंय.

एकूण लै मझा येतो आहे! Happy

राईटचं शतक व्हायला हवं होतं.. ९९ नाबाद. इंग्लिश फलंदाजांची खासियत दिसते.. मागं एकदा हेल्स आता राईट. दोनेक वर्षांपूर्वी इयन बेलही ९९ नाबाद राहिला, पण तो काऊंटी सामना होता.

तुम्हाला काय वाटते ?
१. प्रत्येक मॅचच्या आधी २ बदल करावे.
२. मह्त्वाच्या की मॅचेस मधे २ पेक्षा जास्त बदल करून कमी मह्त्वाच्या मॅचेसमधे अधिक बदल करावेत ?
३. मिनो टिमच्या विरुद्ध मॅचेसमधे established टिमच्या बाजूने झुकणारे २ पेक्षा अधिक बदल करावेत ? नि की मॅचेसमधे कमीत कमी बदल करावेत ?
४. अजिबात बदल न करता आपली मूळ टिम किती पावली ते बघावे ? Happy

४............. मी इज्जतीत खेळतो.....बदल नकोच.......;)

सरकारी कर्मचारी आहे.........:)

Pages