माझे आवडते पदार्थ मला असे (खायला) आवडतात....

Submitted by बाळू जोशी. on 20 July, 2012 - 00:40

हा विलक्षण 'चवीचा' बीबी आदिमायबोलीकार 'आर्च' यांनी २००५ मध्ये जुन्या मायबोलीवर सुरू केला होता. २००७ पर्यन्त तो व्यवस्थितपणे चालू होता नन्तर बहुधा मायबोलीत तांत्रिक बदल झाल्याने तो एखाद्या पुरातन शहरासारखा 'गाडला' गेला. मात्र त्याची आठवण नव्या मायबोलीवर वेगवेगळ्या बीबीवर निघत होती .त्यावरून तो पुन्हा शोधून काढलेला आहे . मायबोलीवरील रसिक, खवय्ये, आणि 'प्रयोगशील' मंडळींच्या दृष्टीने हा बीबी पुन्हा चालू होणे आवश्यक असल्याने ह्या धाग्याचे पुनरुज्जीवन करीत आहे. दरम्यान बरेच नवीन सदस्य नवीन आले आहेत त्याना जुन्या सदस्यांच्या 'कर्तृत्वाचा' परिचय करून देता यावा व स्वतःच्या 'प्रयोगशीलतेचा' अविष्कार करता यावा , तसेच जुन्याना पुनःप्रत्ययाचा आनन्द लुटता यावा म्हणून हा प्रपंच !!!

वि.सू:-
१) हा बीबी वाचताना जेवण करून बसले असले तरी पुनः भूक लागते असे जुन्या सदस्यांचे अनुभव आहेत
२)वाचताना एखाददुसरे लाळेरे सोबत असणे उत्तम...
३) कार्यालयात वाचणे शक्यतो टाळावेच. लई तडफड होते Proud

मूळ बीबीचा दुवा:-
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/81146.html?1109737808

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

५ मिन मावेत काय ठेवायचं ???>>>> केक च मिश्रण कॉफी मग मध्ये घालुन मावे करायच.. प्रत्येकाला एक मग केक त्यावर आईस्क्रीमचा एक स्कूप... फस्त करायच.

आमच्याकडची पद्धत -
Chocolate केक मावे मध्ये गरम करायचा . Chocolateजरा पातळ झाल कि vanilla icecream टाकून just गरम करायचे .
बास . खायचे .

१. थंडी किंवा पावसाळ्यात तिखट गरम शेव भाजीत पोळीचे तुकडे टाकून चमच्याने काढून खाणे.:) (हाताने पोळी बुडवून खाल्यास हात भाजतात म्हणून चमच्याने.)
२. एक पाकीट मॅगी मध्ये कोणालाही वाटेकरी न करता गरम गरम वर टोमेटो सॉस थोडा घालून.
३. दिवाळीत खार्‍या शंकरपाळ्यांना मध्ये बरोबर गोल छिद्र पाडून ती बोट चहात टाकून त्यात चहा भरल्यावर चमच्याने बाहेर काढून खाणे.
४. अगदी मऊ गरम गरम भात थोडे तूप मेतकूट आणि यावर साबुदाणा बटाटा मावे मध्ये भाजलेले पापड चुरडून. (एकदम सीनफुल्ल.)

१ मसाल्याचे शेंगोळे
२ वरणफळे
३ आईच्या हातची गरम भाकरी त्यावर अर्धीवाटी तूप अन चिमुटभर मीठ
४ कळण्याची भाकरी
५ साबुदाणा खिचड़ी विदर्भ स्टाइल (लाल तिखट घालुन केलेली)
६ साबुदाणा थालीपीठ
७ अदल्या दिवशीचा रसा उरलेला असल्यास त्या रश्यातच भात लावायचा! बेस्ट बिरयानी सुद्धा झक मारल त्याच्या म्होरं

मला चहासोबत चकली फार आवडते. मस्त कपभर गरमागरम चहा घ्यायचा, त्यात चकल्यांचे तुकडे टाकायचे आणि गट्टम करायचे. तो उरलेला मसालेदार चहा पण काय मस्त लागतो. Happy तसे चहात बुडवुन थालीपीठ, शीळे वडे (चिकन्/मट्न सोबत खातात ते) पण मस्त लागतात.

चपाती किंवा ज्वारीची शिळी भाकरी चे तुकडे फेटलेल्या अंड्यात बुडवुन आॅमलेट सारखे फ्राय करायचे आणि शेजवान साॅस बरोबर गट्टम........टाॅमॅटो साॅस ने मज्जा नै येत.....
आणि तांदळाची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यांसोबत अस्ले एक्स्पेरिमेंट करु नयेत... अंडी व तेल फुकट जाते

चहा चकलीमध्ये नंतर मसाला चाय प्यायला जास्त मजा येते.
तिखट शेवचेही असेच.
दोन्ही एकत्रही धमाल.
शेव तरंगणारी आणि चकली बुडणारी असेल तर वेगवेगळे खाता येते.
शेवगाठीची साधी फरसाणही चहातून चांगली लागते.
त्यात लिमडा-कडीपत्ता काय ते असेल तर त्याचाही फ्लेवर चांगला ऊतरतो.
खारी-बटर यासारखे पदार्थही चहात बुडवण्यापेक्षा कुस्करायला जास्त मजा येते. खारीचा शेवटचा चुरा मी असाच संपवतो.
दिवाळीला मजा असते. शेवचकलीसह शंकरपाळ्याही चहात टाकायच्या. तसेच रव्याची करंजी चहात बुडवून खायलाही मजा येते.
अय्यंगार बेकरीतले बिन अंड्याचे केक सुद्धा चहात बुडवून मस्त लागतात.
तसेच केक टोस्ट सुद्धा आवडतात. पण ते चहापेक्षा कॉफीबरोबर जास्त आवडतात.
बाकी कॉफीपेक्षा चहातच असे विविध प्रकार बुडूक बुडूक करून खायला जास्त मजा येते.
नशीब मुलींबरोबर डेटला जाताना कॉफी प्यायची पद्धत आहे. अन्यथा चहा सोबत मिसळपाव मागवला, भरले फरसाण पावात आणि बुडवला पाव चहात असे झाले असते ..
आणि पहिल्याच दिवशी खाण्यापिण्याच्या सवयीवरून नकार पदरी पडला असता Happy

ऋन्मेषा , अरे एका स्वतंत्र धाग्याचा विषय होइइल तो... चहा व त्यातील डुबडुबे .

हे अर्जुना , उचल तुझा कीबोर्ड आणि पाड एक धागा.

आमच्याकडे उडदाला मोड आणून मग ते आधी तव्यात भाजून नंतर हातावर/सुपात चोळून त्यांची साल काढली जाते आणि त्याची फोडणीची आमटी केली जाते. अशा प्रकारे आमटीसाठी तयार करून ठेवलेले (मोड आणून --> भाजून --> साल काढून) उडीद असले चवदार लागतात की आमटी राहू दे, तसेच संपवावे वाटतात.

आब्यांच्या दिवसांतः
ज्वारीची भाकरी, पांढर्‍या-जांभळ्या वांग्याचे कालवण आणि सोबत पिकलेल्या हापूस अथवा दशेरीच्या फोडी, हा एक माझा आवडीचा बेत.

जिरे,खोबरे,हिरवी मिरची व लसूण एकत्र वाटून केलेले पातळ पिठले ,ज्वारीची भाकरी आणि खर्डा एकदम फर्स्ट क्लास बेत. मला अगदी जीव-की प्राण आहे.
तसेच चरचरीत लसणाची फोडणे घातलेली अंबाडीची किंवा मेथीची गोळा भाजी आणि ज्वारीची भाकरी.

भार्री धागा आहे आणि सगळ्याचे पदार्थ पण भन्नाट आहेत.

मला सुद्धा चहात फरसाण, भजी, चकली खायला आवडते.
खरवस भरपूर खोबरं घातलेला ( तोंपासु)

भडंगावर ( कुरमुर्यांचा चिवडा) मुगाची किंवा मटकीची उसळ बारीक चिरलेला कांदा आणि शेव ... लैच भारी
सामोस्याचं आवरण काढून खायला जाम मज्जा येते.

भार्री धागा आहे आणि सगळ्याचे पदार्थ पण भन्नाट आहेत.>>> मी हा धागा बुकमार्क करून ठेवतोय. नंतर सावकाश वाचणार आहे. लई भारी धागा आहे. वाचतानाच तोंडाला पाणी सुटतंय.

कोथिंबिरीच्या वड्या
पालक पुरी
गरमागरम मॅगी नुडल्स
मिश्र पिठाचे थालीपीठ टोमॅटो सॉस सोबत
गरमागरम साबुदाणा खिचडी
फोडणीचा भात
भोपळ्याचे थालीपीठ

Pages