..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ स्वप्ना मॅडम, काहितरी बक्षीस द्या की Happy

०४/८७ >> नाही माधव. तिसरं चित्र नीट पहा. या आधी एका कोड्यात त्याचा वापर केला होता. Happy

०४/८८>>>

चांद रात तुमहो साथ, क्या करे जी अब ये दिल मचल मचल गया
दिलका ऐतबार क्या, .......

सिनेमा "हाफ टिकट"

०४/८३ - २

आपली मामी तशी बुद्धीवादी आहे. पण भाजपाच्या "मंदिर वही बनायेंगे " या घोषणेने त्या काळात भारावली
होती. तर त्या काळात एकदा ती व्हॅटीकनला गेली होती. निळ्या काठाची पांढरी साडी नेसून ती, तिथे गेली तर
सगळ्यांना दुर्मिळ असल्याचे, पोप चे दर्शन तिला अनपेक्षितपणे झाले. आयतेच गिर्‍हाईक समोर आलेले
बघून, पोपचे भाट तिला धर्माबद्दल लेक्चर देऊ लागले. पोप ला सगळे प्रेमाने पापा म्हणतात, त्याच्याकडे
काहिही मागितले तरी मिळते. जगातले सर्वच देव त्याच्याठायी एकवटलेले आहे, असे लेक्चर ऐकून
मामीने पोपलाच, गाण्यातून खडा सवाल केला. तो कोणता ?

उत्तर :

हे रोम रोम मे बसनेवाले राम
जगत के स्वामी, हे अंतर्यामी
मै तूझसे क्या मांगू ?

निळ्या काठाची पांढरी साडी - "नीलकमल" साडी. त्याच चित्रपटातले गाणे.

ओ स्वप्ना मॅडम, काहितरी बक्षीस द्या की >>> हो ना जिप्सी, बक्षिसं नाही द्यायची म्हणजे काय? हल्ली काही जणं तर बक्षिसाच्या नावाखाली काहीतरी थातूरमातूर देऊन वाटेला लावतायत म्हणे. असं कोणी केलं तर माझ्यासमोर घेऊन या त्या व्यक्तीला!

दिनेशदा, तुम्ही हे कोडं घालणार हे बहुतेक त्या 'अंतर्यामी' पोपला कळलं असावं म्हणून त्याने राजीनामा दिला. Proud

०४/९०

puzzle_2.jpg

स्वप्ना,
अजून नवा निवडला नाही. आज माझी सेक्रेटरी काळा धूर / पांढरा धूर असे काहीतरी सांगत होती. बाकी राजीनाम्याची घटना मात्र पहिलीच म्हणे... ( मामीच्या सवालाला घाबरला कि काय ? )

ओह्...मला निळ्या काठाची पांढरी साडी, मौशमी चॅटर्जीबाईंची आठवत होती.>>>>>आर्या, "डाका डाले तेरी बन्सी" वाली का? Happy

८७ : बादल, परबत, घरोंदा?, पंछि/चिडिया, आणि ते तिसरं चित्रं काय आहे? खिळा?>>>>

चला मीच उत्तर सांगुन टाकतो.

००४/८७

थोडीसी जमीं थोडा आसमा
तिनको का बस इक आशियां

तिसरे चित्रः थोडीसी (a pinch of .....salt etc.) Happy

आज माझी सेक्रेटरी काळा धूर / पांढरा धूर असे काहीतरी सांगत होती>>> हो हे वाचलय डॅन ब्राउनच्या "एंजल्स & डेमन्स" मधे!!!!

ए, जिप्स्या...तेच्यात चिमण्या कश्या काय आल्या मग?>>>>>त्या चिमण्या तुम्हाला फसवायला Proud त्याच चित्रातील "तिनके" अपेक्षित होते. Happy

०४/०९१ दमयंतीबाई माहेराकडून आनंदीबाई पेशव्यांच्या माहेरच्या वंशातल्या. त्यामुळे त्यांना राघोभरारी पेशव्यांबद्दल फारच जिव्हाळा. आपल्या मुलाचं नाव त्यांनी राघोबा ठेवलं. नाव राघोबा असली तरी पोटापाण्याचा प्रश्न त्याला चुकवता आला नाही. भरारी मारायची हिंमतही नव्हती. स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर होण्याइतपत भरारी मात्र त्याने मारली. ट्रेनिंगच्या वेळी त्याने उत्तरप्रदेशातून आलेल्या सारिकाशी सूतही जुळवले. पण राघोबाचे पोस्टिंग दक्षिण भारतातल्या एका लहानशा नगरातील शाखेत तर सारिकाचे महानगरी कोलकत्त्यातील एका शाखेत झाले. असे असले तरी त्यांचे प्रेम मात्र कायम राहिले. दोघे कोणते गाणे म्हणत असतील?

त्या चिमण्या तुम्हाला फसवायला त्याच चित्रातील "तिनके" अपेक्षित होते. >>> वा वा. आणि मी 'दो पंछी दो तिनके लेके' चा विचार करत होते. पण ती चिमुट 'थोडीसी' सापडत नव्हती. Happy
मस्त गाणं Happy

०४/०९१:

एक डाल पर तोता बोले, एक डाल पर मैना
दूर दूर बैठे है लेकिन प्यार तो फिर भी है ना

शाखा - डाल, राघू - तोता, सारिका - मैना

Pages