"सत्यमेव जयते" भाग ५ (Is Love A Crime?)

Submitted by आनंदयात्री on 3 June, 2012 - 01:49

आज, ३ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
नेहमीचाच, पण जाहीर चर्चेसाठी थोडासा वेगळा असा विषय वाटतोय...

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आंतरजातीय विवाहामुळे जात नाहीशी होईल. एकसंध समाज निर्माण होईल. याचा अर्थ असाही नाही कि ठरवून आंतरजातीय किंवा आंतरधर्मिय विवाह करावा. कायद्यात म्हटलंय म्हणून करा संदेश अर्थ ना त्या एपिसोडमधून दिला गेला ना आम्ही घेतला.

जो आवडला\ली त्याला जीवनसाथी म्हणून स्विकारताना जात - धर्म आडवा न येणे इतका सोपा संदेश होता. आवडलेली व्यक्ती स्वजातीय असेल किंवा नसेल त्याने फरक नको पडायला. ज्येष्ठांचा सल्ला तरूण पिढीने नक्की घ्यावा. आणि ज्येष्ठांनी ही सल्ला देतांना आपण आता फक्त सल्ला देण्याचं काम करायचं आहे निर्णय त्यांचे त्यांनाच घेऊ द्यावेत याचं भान ठेवावं.

खाप पंचायतीप्रमाणे कसलंही उत्तरदायित्व नसलेल्या खापरपणजोबा झालेल्या जरठांच्या हाती निर्णयप्रक्रिया सोपवल्यावर किमान चार पिढ्यांचं अंतर पडणारच आणि अशा अशा केस मधे पूर्वी असा निर्णय झाला होता हे दाखले देत मध्ययुगातली व्यवस्था टिकून राहण्याचा धोका असतो. म्हणूनच अशा जरठांना निर्णयप्रक्रिया सोपवताना जबाबदारीही सोपवावी. ज्येष्ठ म्हणजे टाकाऊ असंही नाही. आपला देश ८०+ लोकच चालवतात. पण सत्तेबरोबरच जबाबदा-या / उत्तरदायित्व आल्याने आपोआप संतुलन होतं. खाप पंचायती मधे सत्तेबरोबर फक्त इगो येत असल्याने या समस्या निर्माण होत आहेत.

सती प्रथा जशी नेटाने धाक दा़खवून मोडून काढली गेली तसंच या बाबतीत करायला हवं. राजस्थानचं उदाहरण बोलकं आहे. प्रत्येक ठिकाणी प्रबोधन कामाला येत नाही .

जेनेटिक्सही त्याला मान्यता देते पण गोत्र व्यवस्थेत एक मोठ्ठा फरक आहे तो म्हणजे गोत्र व्यवस्था फक्त पित्याच्या वंशाकडेच बघते (त्यामुळे आत्ये-मामे भावंडं सगोत्र होत नाहीत).

एक्झॅक्टली... आणि म्हणुनच गोत्राचा विचार म्हणजे आपल्या संस्कृतीने जेनेटिक्सचा विचार केला आहे, आपला धर्म किती महान आहे, हा खोटा गळा काढू नये.

दोन सख्ख्या भावंडात जीन्स अगदेच सारखे असतात ( यांचे गोत्र सारखेच असणार, कारण आईबाप तेच.. अशा लग्नाला मान्यता नसतेच.)

दोन चुलत / मावस भावंडात जीन्स सारखे असणार, पण सख्ख्यापेक्षा कमी. ( चुलत असतील तर गोत्र तेच. मावस असतील गोत्र बदलले... काका - पुतण्या असे असेल तरी गोत्र तेच. मामा - भाचे जेनेटिकली तितकेच साम्य, पण गोत्र वेगळे.)

यापलीकडे कोणतेही नाते असेल तर साम्य आणखी कमी कमी होत जाते. ( यात गोत्र वेगळेच असण्याची शक्यता जास्त.)

( यासाठी इंग्रजीत फर्स्ट, सेकंड, थर्ड डिग्री असे मोजमाप आहे.. http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/8/87/CousinTree.svg/... . या पलीकडच्या अगदी लांबच्या नाते संबंधाला जेनेटिक्सही फारशी किंमत देत नाही.. दोन चार पिढ्यात कसलाही संबंध नाही, पण पत्रिकेत एकच गोत्र आहे, तर धर्म गोत्र एक आहे म्हणून मान्यता देत नाही.. पण अशा केसेस मध्ये रक्ताचा नाते संबंध दृश्य नसेल, फार लांबचा असेल तर जेनेटिक्स त्याला कन्सिडर करत नाही.. सारांश, गोत्र आणि जेनेटिक्सचा विचार यात बराच फरक आहे.. उगाच आपली संस्कृती किती वैज्ञानिक असा खोटा गळा काढू नये..... डिग्री सांगण्यात काही गफलत झाली असेल तर तज्ञानी त्यात दुरुस्त्या कराव्यात.. जेनेटिक्स वाचून लई वर्षे झालेली आहेत. Proud )

पण तरीही मुलीला ज्या वेगळ्या वातावरणात जाऊन रुजावं लागतं, तिला प्रत्येक वेळी सिद्ध करावं लागतं...हे पाहिलं की शक्यतो मुलीला आपल्यासारख्या पद्धती,संस्कार इत्यादि असणार्‍या घरात द्यावं असं मला वाटतं <<<

अमान्य. कुठेही मुलीलाच केवळ सिद्ध करावं लागतं. सजातीय असो वा आंतर जातीय/धर्मीय/प्रांतीय काहीही असो.
सासरचे मुलाला जन्म देऊन सिद्धच बनलेले असतात.

सगोत्र विवाहासंबंधी..

एक जंगल होतं. ते चारही बाजूंनी डोंगररांगांनी वेढलेलं असल्याने एक तटबंदी तयार झाली होती. तिथे सिंहांची वस्ती होती. संशोधकांना असं लक्षात आलं कि हे सिंह कधीही डोंगर ओलांडून बाहेरच्या जगात गेलेले नाहीत. या सिंहांची आणि डोंगररांगांच्या पलिकडच्या खुल्या जंगलातील सिंहांची तुलना केली असता खुल्या जंगलातले सिंह हे तंदुरुस्त, चपळ आणि हुषार होते.

तर उत्तम हवा, पाणी आणि शिकार असूनही घळईतले सिंह हे तुलनेने रोगट, सुस्त आणि कमी हुषार होते. हे असं का व्हावं हे संशोधकांच्या लक्षात येत नव्हतं.

त्यांनी एक प्रयोग केला. त्या घळईत बाहेरचे काही सिंह सोडले. यथावकाश त्यांचा संकर झाला आणि पुढची पिढी शक्तीमान, तंदुरुस्त आणि बुद्धीमान निघाली.

तात्पर्य : साचलेपण हे वंशाच्या प्रगतीसाठीही मारक असतं. यातूनच सगोत्र संबंध नाकारले जात असावेत. डीएनए तेव्हांच विकसित होईल जेव्हां वेगवेगळ्या वंशाचा संकर होईल. म्हणूनच निव्वळ सगोत्र कि अगोत्र याचा विचार न करता त्याही पलिकडे म्हणजेच आंतर जातीय आणि आंतरधर्मिय संकराकडे पहायला हवं.

समजा जर मुलाचे शिक्षण, वैचारीक पातळी, समजुतदार पणा, चारित्र्य, घरातील वातावरण सर्व चांगले असेल तर फक्त जात/ धर्म वेगळे आहे, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, या बाबींवर आंतरजातीय विवाहाला विरोध करणे कितपत योग्य आहे ?

फक्त तुमच्या डोक्यात असलेल्या ह्या भेदभावामुळे, तुमच्या अपत्यांच्या भावना पायदळी तुडविण्याचा अधिकार पालकांना दिला कोणी?

आयुष्यभर भेदभाव पाळत बसणार, ही विषव्रुल्ली जोपासत बसणार, जन्माच्या पायावर माणसांचे वर्गिकरण करणार, नाके मुरडणार, माणसाला माणसापासुन जात पात या सारख्या फालतु गोष्टींवरुन तोडत बसणार आणि आमच्या पुढच्या पिढीने पण तेच करावे अशी अपेक्षा करत बसणार. त्यासाठी पोटच्या गोळ्या ला आयुष्यभर न भरुन येणारी जखम देणार याला काय अर्थ आहे ?

दोन जीव जर या जात/ धर्म या पलिकडे जाउन एक सुद्रुढ समाज तयार करायला बघत आहेत तर त्याना, तुझा आणि आमचा संबंध संपला, आम्ही तुझ्यासाठी मेलो, असे काही करताना लाज नाही का वाटली, हेच धंदे करायला तुला कॉलेज ला पाठविले होते का?, घराण्याचे नाक कापलेस, कुळ बुडविलेस, आपल्या जातीत काय मुले/ मुली मेली आहेत का असले उद्योग करताना लाज नाही का वाटली हे सगळे ऐकवायचे.

तुम्हाला आजहि मानवी भावनां पेक्षा जात/ धर्म या सारख्या क्षुल्लक बाबी महत्वाच्या वाटतात??????????????

***** (अ) शुद्धलेखनाबद्दल क्षमस्व.*****

तुम्हाला आजहि मानवी भावनां पेक्षा जात/ धर्म या सारख्या क्षुल्लक बाबी महत्वाच्या वाटतात??????????????

काय लिहिलेत हे....? आता इथली खाप पंचायत तुम्हाला फाडुन खाइल

नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायात कसलीही पत नसलेले, थोड्या थोड्या लाभासाठी लाचार होणारे, शिव्या खाणारे लोक आपल्या अपत्याला खानदान कि इज्जत वगैरे सांगतात ते खूप शिकण्यासारखं असतं..

मुळात जात हा विषयच एवढा का उचलून घेतला जातोय?
आर्थिक विषमता हेही एक कारण असतच >>>>>>>>>

मुलगा गरीब असेल तर काय झालं. त्याची वैचारिक पातळी, विचारसरणी, समजूतदार पहे, घरातले वातावरण हे सर्व बघावे, हे सगळे योग्य असेल तर पैसा या गोष्टि ला काय महत्व? आणि हे सगळे योग्य नसेल तर पैसा कितीही असला तरी काय फायदा?

मुळात लग्न करायचे असताना, एक पवित्र बंधन जोडत असताना पैसा आड का येतो ??????

बिन्धास्त लग्न करा..........फक्त लग्न करताना रक्त तपासुन घ्या......... काही समान रक्त असणार्यांच्या अपत्यांमधे दोष निर्माण होउ शकतो..( असे वाचलेले आहे..खर माहीत नाही ..प्रकाश टाकावा)
.
.
आंतरजातीय , आंतरधर्मिय, आंतरदेशीय, लग्न करावे.....ज्याला ज्याला सांभाळता येते त्यांनी करावे....ज्यांना सांभाळता येत नाही......त्यांनी आपल्याच धर्मात जातीतली शोधत बसावी......... Happy

नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायात कसलीही पत नसलेले, थोड्या थोड्या लाभासाठी लाचार होणारे, शिव्या खाणारे लोक आपल्या अपत्याला खानदान कि इज्जत वगैरे सांगतात ते खूप शिकण्यासारखं असतं..>>>>>>

पहिल्या भागा मधला तो एक किस्सा आठवला ज्यात त्या एका रोजंदारी वर काम करणार्‍या माणसाने मुलगा हवा म्हणून बायको वर वंशाला दिवा पाहिजे म्हणून अत्याचार केलेले

फक्त लग्न करताना रक्त तपासुन घ्या......... काही समान रक्त असणार्यांच्या अपत्यांमधे दोष निर्माण होउ शकतो..( असे वाचलेले आहे..खर माहीत नाही ..प्रकाश टाकावा)>>>>>>>>

यालाच नाडी बघणे म्हणतात ना ?

रक्तगट वगैरेचा बाऊ करण्यात अर्थ नाही.
मात्र थॅलेसेमिआ सारखे काही रक्तदोष, एचआयव्ही, हिपॅटिटिस बी सारखे घातक संसर्गजन्य आजार यांच्या तपासण्या जोडप्यांनी लग्नाआधी करून बघायला हव्यात.

एक प्रश्नः
समजा तुमच्या मुला/मुलीचे प्रेम तुमच्या मोलकरणीच्या मुली/मुलावर बसले. तुम्ही समजा एखाद्या अपार्टमेंट काँप्लेक्स मधे रहाता. आणि तुमची मोलकरीण एखाद्या झोपडपट्टीत राहातेय. तुमची मुलगा/मुलगी उच्चशिक्षित (किमान पदवीधर) आहेत. आणि ज्यांच्यावर त्यांचे प्रेम बसलेय ती फारशी शिकलेली नाहीत(१०/१२ वी पास). या परिस्थितीत तुम्ही आनंदाने आपल्या मुला/मुलींची लग्ने करुन द्याल का?

मनस्मी, तरीही त्यांनी लग्न केलंच तर तुम्ही मोलकरणीच्या मुलाला/मुलीला जिवे माराल का?
समजा तुमच्या मुला/मुलीपेक्षा उच्चशिक्षित आणि सधन घरातला जोडीदार त्यांनी निवडला तर त्या जोडीदाराच्या घरच्या मंडळींनी तुमच्या मुला/मुलीला जिवे मारावं का? तुमच्यावर सामाजिक बहिष्कार टाकावा का?

किरण,

इझीयर सेड दॅन डन..

दुसर्‍याना सल्ले देणे हे फार सोपे असते. स्वतःवर गुजरली की कळते. असो.

मनस्मी
यातून गेल्यावरच बोलतोय. मुलांचं सुख कशात आहे ते त्यांना पाहू द्यात. मोलकरणीचं उदाहरण देऊन काय सिद्ध करायचं होतं ? खालची जात आणि मोलकरीण ही तुलना !
पण आजची मुलं एकाच क्षेत्रात असल्यावर प्रेमात पडतील कि मोलकरणीच्या मुलांच्या ? आयटीत तर सर्रास प्रेमविवाह होतात.

आता मला सांगा. एक आयटी कंपनीचा मालक खालच्या जातीचा आहे, उच्चशिक्षित आहे आणि तुमची मुलगी कमी शिकलेली असून त्याच्या प्रेमात पडली तर तुमचा निर्णय काय राहील ?

माझ्या प्रश्नाला उत्तर न देता मलाच प्रतिप्रश्न का विचारताय. मी एक टेस्ट केस विचारली आहे. त्याचे उत्तर द्या की कोणीतरी Happy

आमच्या मुला/मुलींच्या बाबतीत 'करून देऊ' ही परीस्थिती बहुधा येणार नाही. 'करू देऊ'तर अजिबातच येणार नाही. झोपडपट्टीच का, त्यांनी शोधलेल्या जोडीदारात काही प्रॉब्लेम्स दिसले तर नक्की त्यांना त्याची कल्पना देऊ. निवडलेला जोडीदार सुस्वभावी आणि होतकरू असेल तर सद्य आर्थिक परीस्थितीचा / शिक्षणाचा बाऊ करणार नाही.

आता प्रतिप्रश्नांची उत्तरं द्या. तुमचं 'अपार्टमेन्ट' ज्यांना झोपडपट्टीच्या लायकीचं वाटू शकतं अशा आर्थिक परीस्थितीतल्या उच्चशिक्षित जोडीदाराच्या कुटुंबियांनी तुम्हाला कसं वागवावं असं तुम्हाला वाटतं?

ते 'खाप'चं भुत पाकीस्तानात पण आहे म्हने http://www.esakal.com/esakal/20120604/5312504079295034073.htm

अश्या बाबतीत पाकीस्तान आपल्याला नेहमीच एकटं पाडत नाही. Happy
तात्पर्य : आमिर भारतसोबत पाकिस्तानतील जनतेचे प्रश्न सुध्दा मांडत आहे, हा छुपा अजेंडा तर नाही Happy

मनस्मि
या प्रकारच्या जर तर च्या प्रश्नाला प्रतिप्रश्न हेच उत्तर असतं. तुम्हाला स्वतःला दिशा हवी असेल तर प्रतिप्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यातच तुम्हाला मिळून जाईल.

माझ्या मित्राचा स्वतःच्या मालकीचा स्टील प्लांट आहे. २००० कोटी रू ची उलाढाल आहे. महाबळेश्वरला थ्री स्टार हॉटेल्स आहेत. हे सगळं त्याने झोपडपट्टीत राहून कमावलेलं आहे. त्याच्या बहिणीने एका मध्यमवर्गीय ब्राह्मण तरूणाशी लग्न केलंय.

तुम्हाला काय वाटतं त्याने बहिणीला विरोध करायला हवा होता कि नको ? म्हणजे पुढची कथा सांगतो.

लग्न कोणत्या घटकांमुळे यशस्वी होईल (म्हणजे काय? हा एक प्रश्न आहेच. आपण टिकून राहिलेलं लग्न इतकाच मर्यादित अर्थ घेऊयात) किंवा अयशस्वी होईल हे ठरवताना जे घटक नेहमीच्या सवयीच्या राहणीमानापेक्षा खूप वेगळे असतील ते घटक विचारात घेतले जातात. पण ते प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत वेगवेगळे असू शकतात. उदा. धर्म, जात, भाषा, आर्थिक स्थिती, शिक्षण, भौगोलिक स्थान, करीयर, करीयर मधले प्रॉस्पेक्टस, स्वभाव, आवडीनिवडी, घरातील वातावरण, खाण्यापिण्याच्या पध्दती इ. व्यक्तीसापेक्ष यातील महत्त्वाचे घटक बदलत असतात.

पण हे घटक पडताळून पाहण्याची संधी जशी अॅरेंज्ड मॅरेजमध्ये मिळते तशी प्रेमविवाहात मिळत नाही. कोण कोणाच्या प्रेमात पडेल हे सांगता येत नाही, त्यामुळे या अनेकविध घटकांपैकी एक किंवा अनेक परस्परविरोधी घटक एकत्र येऊ शकतात.

आता हे घटक एकत्र आले तरी त्यामुळे लग्न पुढे टिकून राहिल किंवा नाही हे पुन्हा पूर्णपणे इतर काही घटकांच्या संचावर अवलंबून असते. उदा. दोघांच्यातलं प्रेम, ते प्रतिकूल परिस्थितीतही टिकून रहाणे, एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती, मॅच्युरिटी, रंगवलेल्या स्वप्नात आणि सत्यात असलेल्या दर्‍या बुजवण्याकरता तडजोडीची तयारी आणि सातत्यता असे घटक त्या नव्या जोडप्याकडनं अपेक्षित असतात. तर आणखी काही घटक सर्वस्वी त्यांच्याही हाताबाहेरचे असतात. घरातल्या व्यक्तींचे स्वभाव, सर्वस्वी नविन व्यक्तीला स्वीकारण्याची मानसिक तयारी, अचानक उद्भवलेले आणीबाणीचे प्रसंग, आर्थिक बेरजेचं गणित, समाजाकडून मिळणारी वागणूक, नोकरीतील बदल इ.

काही प्रेमविवाहात मुळात प्रॉब्लेम येतो कारण आईवडिल, समाज इ.च्या अपेक्षा आणि मुलीच्या/मुलाच्या अपेक्षा या एकमेकांना छेदतात आणि संघर्षाला सुरूवात होते. अगदी लहान वयात जर मुलामुलींनी लग्नाचे निर्णय घेतले असतील आणि ते पालकांना मान्य नसतील तर त्यांना काही वर्षे थांबण्याचा उपाय असतो. असे प्रसंग पालकांनीच आक्रस्ताळेपणा न करता हाताळले तर त्याचा योग्य उपयोग होऊ शकतो. पण २५-३० वर्षांच्या मुलांना त्यांचे निर्णय घेण्यात तुम्ही किती आडकाठी करू शकता यावर शेवटी मर्यादा आहेत. सल्ले द्या आणि गप्प बसा.

आईवडिलांच्या भुमिकेतून हा प्रश्न पाहिला तर अक्राळविक्राळ वाटेलच. पण प्रेमात पडलेल्या मुलामुलींच्या भुमिकेतून विचार केला तर याची दुसरी आणि कदाचित अधिक सुंदर, उजळलेली बाजू दिसेल.

आमच्या मुला/मुलींच्या बाबतीत 'करून देऊ' ही परीस्थिती बहुधा येणार नाही. 'करू देऊ'तर अजिबातच येणार नाही. झोपडपट्टीच का, त्यांनी शोधलेल्या जोडीदारात काही प्रॉब्लेम्स दिसले तर नक्की त्यांना त्याची कल्पना देऊ. निवडलेला जोडीदार सुस्वभावी आणि होतकरू असेल तर सद्य आर्थिक परीस्थितीचा / शिक्षणाचा बाऊ करणार नाही.

>>>>>>>>>>>>> +१

निवडलेला जोडीदार सुस्वभावी आणि होतकरू असेल तर सद्य आर्थिक परीस्थितीचा / शिक्षणाचा बाऊ करणार नाही.>>>>>> +१

Pages