Submitted by आनंदयात्री on 3 June, 2012 - 01:49
आज, ३ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
नेहमीचाच, पण जाहीर चर्चेसाठी थोडासा वेगळा असा विषय वाटतोय...
सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरंच गंमत आहे. एकीकडे आपण
खरंच गंमत आहे. एकीकडे आपण समलिंगी संबंधाच्या मान्यतेबाबत सकारात्मक चर्चा करतो. एकीकडे लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या क्रांतिकारी कल्पनांविषयी चर्चा करतो आणि गाडी मुलांच्या प्रेमविवाहाकडे वळाली कि पुन्हा त्याच मध्ययुगीन मानसिकतेचं दर्शन घडवतो. आपण सगळे अंतर्बाह्य ढोंगी आहोत हे जोपर्यंत मनापासून कबूल करत नाही तोपर्यंत या वांझोट्या चर्चा केवळ वेबवरच्या सर्वरची जागा अडवून ठेवणारे काही मेगाबाईटस ठरत राहतील..
(No subject)
किरण, या सगळ्या बाबतींत विरोध
किरण, या सगळ्या बाबतींत विरोध करणारी मंडळी बहुधा तीच असतात.
मामी+१.
>> एकीकडे आपण समलिंगी
>> एकीकडे आपण समलिंगी संबंधाच्या मान्यतेबाबत सकारात्मक चर्चा करतो. एकीकडे लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या क्रांतिकारी कल्पनांविषयी चर्चा करतो
कुठे सकारात्मक चर्चा पाहिल्यात तुम्ही?
मला तरी या विषयांवरच्या चर्चा याच वळणाने गेलेल्या दिसल्या आहेत.
नीधप | 4 June, 2012 -
नीधप | 4 June, 2012 - 18:55
पण तरीही मुलीला ज्या वेगळ्या वातावरणात जाऊन रुजावं लागतं, तिला प्रत्येक वेळी सिद्ध करावं लागतं...हे पाहिलं की शक्यतो मुलीला आपल्यासारख्या पद्धती,संस्कार इत्यादि असणार्या घरात द्यावं असं मला वाटतं <<<
अमान्य. कुठेही मुलीलाच केवळ सिद्ध करावं लागतं. सजातीय असो वा आंतर जातीय/धर्मीय/प्रांतीय काहीही असो.
सासरचे मुलाला जन्म देऊन सिद्धच बनलेले असतात.<<<<
माझं म्हणणं अमान्य? का बरे?
आपण जे म्हणताय तेच मीही वर स्पष्टपणे म्हटलंय की ..
हवं तर अजून स्पष्ट करतो...म्हणजे...सासरी गेल्यावर तिथल्या लोकांची मर्जी संपादन करावी लागते...झालंच तर मुलगा जन्माला घालावा लागतो वगैरे वगैरे!
एकीकडे आपण समलिंगी संबंधाच्या
एकीकडे आपण समलिंगी संबंधाच्या मान्यतेबाबत सकारात्मक चर्चा करतो.
----- अशी सकारात्मक चर्चा कुठे केलेली आहे.
@ mansmi18 मला वाटत त्या
@ mansmi18 मला वाटत त्या मुलीच्या पालकांना नक्की वाईट वाटेल. पालक समजाऊन सांगू शकतात चांगल काय वाईट काय पण ह्या पुढे जर त्यांचा लग्नाचा विचार पक्का असेल तर तर मग माझी आई म्हणते तसं ...."मी जन्म देवू शकते पण कर्म नाही." असं विचार करून सोडून द्याव जास्त विचार करू नये.
एक वेगळा विचार केला तर पालकांना होणारा त्रास जरा कमी होईल.....आई, वडील, मुलगी, मुलगा, नवरा बायको, भाऊ, बहीण ह्या सगळ्या नात्यांच्या पुढे जाऊन जर विचार केला तर अस लक्षात येईल की There are universal standards that apply to all mankind throughout all time.
~Nature treats all mankind... that being all equal and independent . ~
John Locke
दक्षिणा, मामी, स्वातीताई,
दक्षिणा, मामी, स्वातीताई, १००% अनुमोदन.
जात, धर्म, ई. ई. वरील सर्व मुद्द्यांपेक्षा आपापसातील सामंज्यस्य खुपच गरजेचं आहे. मग तो विवाह समाजमान्य, पालकमान्य, कसा का असे ना.
आपण सगळे अंतर्बाह्य ढोंगी
आपण सगळे अंतर्बाह्य ढोंगी आहोत हे जोपर्यंत मनापासून कबूल करत नाही तोपर्यंत या वांझोट्या चर्चा केवळ वेबवरच्या सर्वरची जागा अडवून ठेवणारे काही मेगाबाईटस ठरत राहतील..>>>>

किरण हे बाकी बरोबर बोललास....मात्र असं स्वत:बाबत कबूल करायला हिंमत लागते.
मीही तुझ्या म्हणण्याला अनुमोदन देतो... मीही इतरांसारखाच एक सामान्य ’प्रवाहपतित’ माणूस आहे.
आत्मपरीक्षण केल्यास प्रत्येकाला हेच आढळेल की आपण रोजच कैक परस्परविरोधी गोष्टी करत असतो.
आपल्या उक्ती आणि कृतीत नेहमीच विसंगती आढळून येते....तरीही इथे असेच लोक जास्त भेटतील जे म्हणतील...तुम्ही असाल तसे, पण आम्ही नाही बॉ तसे...आम्हाला तुमच्यात मोजू नका.
सासरी गेल्यावर तिथल्या
सासरी गेल्यावर तिथल्या लोकांची मर्जी संपादन करावी लागते...झालंच तर मुलगा जन्माला घालावा लागतो वगैरे वगैरे!<<<
हे अगदी ठरवून बघून जात बित सगळं सेम असलेल्या लग्नातही होतच.
हे अगदी ठरवून बघून जात बित
हे अगदी ठरवून बघून जात बित सगळं सेम असलेल्या लग्नातही होतच.>>>
हो मग? नाही कुणी म्हटलंय?
लग्न कसंही करा..मुलीलाच सगळं भोगावं लागतं..म्हणूनच पालकांचा प्रयत्न असतो तिला कमीत कमी त्रास व्हावा...
इतकं करूनही त्रास होऊ शकतो...म्हणून शेवटी असंही म्हटलंय की हा एक जुगार आहे.
मग मुलीने स्वतःला काय झेपतंय
मग मुलीने स्वतःला काय झेपतंय याचा विचार करावा हे जास्त बरं पालकांनी मुलीसाठी विचार करण्यापेक्षा. शेवटी आयुष्य मुलीला जगायचं असतं.
याला सपोर्ट करणार्या विचारात चूक काय आहे?
>>> एक प्रश्नः >>> समजा
>>> एक प्रश्नः
>>> समजा तुमच्या मुला/मुलीचे प्रेम तुमच्या मोलकरणीच्या मुली/मुलावर बसले. तुम्ही समजा एखाद्या अपार्टमेंट काँप्लेक्स मधे रहाता. आणि तुमची मोलकरीण एखाद्या झोपडपट्टीत राहातेय. तुमची मुलगा/मुलगी उच्चशिक्षित (किमान पदवीधर) आहेत. आणि ज्यांच्यावर त्यांचे प्रेम बसलेय ती फारशी शिकलेली नाहीत(१०/१२ वी पास). या परिस्थितीत तुम्ही आनंदाने आपल्या मुला/मुलींची लग्ने करुन द्याल का?
हा फार अडचणीचा प्रश्न आहे. मी माझ्या काही मित्रांशी आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहाबद्दल बोललो. त्यांच्या विचारांचा सारांश असा आहे.
- मुलीच्या किंवा मुलाच्या संभाव्य सासरची आर्थिक व सामाजिक स्थिती ही आमच्या जवळपास बरोबरीची हवी. फार मोठी तफावत नसावी.
- जावई कमीतकमी मुलीएवढा किंवा तिच्यापेक्षा जास्त शिक्षित हवा. तिच्यापेक्षा खूप जास्त शिकलेला चालेल. पण सून मुलापेक्षा जास्त शिकलेली नको. त्याच्याएवढी किंवा थोडी कमी शिकलेली चालेल. पण फार जास्त तफावत नको. म्हणजे मुलगा द्विपदवीधर आणि सून फक्त १२ वी पास असे नको. ती किमान पदवीधर हवी.
- हिंदू धर्मांतर्गत आंतरजातीय विवाह करायला हरकत नाही. पण पहिल्या २ अटी पूर्ण व्हायला हव्यात.
- जैन, बौद्ध किंवा शीख सून किंवा जावई चालेल. पण पहिल्या २ अटी पूर्ण व्हायला हव्यात.
- भारतीय ख्रिश्चन चालणार नाही. ते बरेच कर्मठ असतात. ते लग्नाआधी धर्मबदलाबद्दल आग्रही असतात. पण अमेरिका, इंग्लंड सारख्या देशातला ख्रिश्चन चालेल. ते धर्माच्या बाबतीत फारसे कर्मठ नसतात. लग्न करताना धर्मबदलाचा आग्रह नसतो. त्यामुळे मुलीला किंवा मुलाला आपली हिंदू पाळेमुळे अबाधित ठेवता येतात.
- भारतीय किंवा परदेशातला मुस्लिम नको. ते बरेच कर्मठ असतात. ते लग्नाआधी धर्मबदलाबद्दल आग्रही असतात.
- चिनी, जपानी किंवा युरोपिअन चालतील, पण आफ्रिकन कृष्णवर्णीय नको.
पण आफ्रिकन कृष्णवर्णीय नको.
पण आफ्रिकन कृष्णवर्णीय नको. >> का त्यांनी काय घोडं मारलयं.
पण आता गंमत अशी आहे की सगोत्र
पण आता गंमत अशी आहे की सगोत्र विवाहांना बंदी घालायची आणि जातीबाहेर जायलाही बंदी घालायची ही केवढी डबल ढोलकी आहे. <<<
येक्झ्याक्टली!!
येक्दम मर्मावर बोट @ नीधप
इथे ना, प्रेमात पडलेली पिढी
इथे ना,
प्रेमात पडलेली पिढी विरुद्ध त्यांचे आईबाप असलेली पिढी, अगदी आईबापांनी प्रेमविवाह केलेला असला तरी, ती पिढी, अन ड्रायव्हरच्या प्रेमात पडलेली श्रीमंत बापाची १७ वर्षांची पोर, अन १८व्या वर्षी 'पळून' जाऊन केलेले लग्न, असा विषय हवा चर्चेला
प्रत्येक 'प्रेमाला' अन त्याच्या 'रियलायझेशन'ला 'केस बाय केस'च विचारात घेतले पाहिजे हे माझे मत आहे.
संपूर्ण समाजाचा / मानवसमूहाचा (समाज=जात असं झालंय आजकाल म्हणून) विचार करताना, तुमच्या विचारांचा स्कोप किती? हे ही महत्वाचे आहे.
माझ्या नात्यातल्या एका आज भयंकर मोठ्या पदावर असणार्या इंजिनियर/एम्बीए मुलाने त्याच्याच मामाच्या मुलीशी प्रेम विवाह केल्यावर काय काय गम्मत झाली, ते मला ठाऊक आहे. आज सगळे आलबेल आहे पण दोघे इकडे तिकडे पळत फिरत होते, अन साहेब एम्बिए नव्हते, अन प्रेमाखातर इंजिनियरिंगला गटांगळ्या खाऊन चुकले होते, तेव्हा दोन्ही बाजू झेलताना काय काय केले तेही ठाऊक आहे.
त्याच वेळी, दुसर्या एका अशाच 'प्रेमळ' प्रकरणात, परत मुलगाच माझ्या नात्यातला. मुलाला अन मुलीलाही समजावून, मुलीला प्रॉब्लेम येऊ न देता, ते प्रकरण बंद केल्याचे स्मरते आहे. साधे कारण. दोघेही अगदीच लहान होते हो. हीरो १९ चे अन हिरॉइनही १९ चीच. दोघांचे म्हणणे एकच. आम्ही स्वतंत्र भारताचे सज्ञान नागरिक!
आजकाल दोघे सज्ञान नागरिक सुखी आहेत 'आपापल्या' घरी.
मुद्दा:
प्रत्येक प्रकरण, 'Individual basis' वर evaluate करावे!
कोणीतरी वरती पारशी उदाहरण
कोणीतरी वरती पारशी उदाहरण दिलेय ते विनोदी वाटले<<<
विषय हा नाही पण हे विधान विनोदी वाटले म्हणोन.. उगाच एक सगोत्र शब्द घेवून लोकं ठोकतात.....
सगोत्र विवाहाविषयक इतके चाललेय तर मुस्लिमांमध्ये होतातच की असे विवाह.
सक्खी चुलत बहिणीशी करतात की मुस्लिमात लग्न.
मुस्लिमांमध्ये होतात का वेडी मुले पारश्यांपेक्षा ज्यास्त ह्याची तपासणी केलीय का? वरच्या विधानाप्रमाणे पारश्यामध्ये जितके डोक्याने कमी निपजतात सगोत्र विवाहाने(?) असे म्हणतात ते पुर्ण विवाहाचेच कारण नसते.
पारश्यांची लग्न हि उशीरा होतात बहुतेकदा. ४० नंतर जन्मणारे मूलाला काही प्रमाणात प्रॉबलेम हा असु शकतो. सगळ्यानाच नाही. त्यामूळे सुद्धा एक "पॉसिबिलिटी" असु शकते.
( इथे मायबोलीवर काही आयडी असा निर्बुद्ध युक्तिवाद करतील, की असे कुठे म्हटलेय की ३० च्या आतच मूल व्हावे चांगले अस्ते. एक जुनी चर्चा शोधा व त्यावर एका अतिहुशार मायबोली आयडीने केलेले विधान... )
गोत्र म्हणजे रक्तगट .
गोत्र म्हणजे रक्तगट .
लग्नाच्या आधी गोत्र, जात वगैरे विषयांना महत्व देणारे महाभाग महत्वाचे विषय विसरतात... मजा चाललीय..
शेवटी काय, जातीचा पुरस्कार करणारे लोकं कुठुनही काही घुसडतील...
>>>>.आपण सगळे अंतर्बाह्य
>>>>.आपण सगळे अंतर्बाह्य ढोंगी आहोत हे जोपर्यंत मनापासून कबूल करत नाही तोपर्यंत या वांझोट्या चर्चा केवळ वेबवरच्या सर्वरची जागा अडवून ठेवणारे काही मेगाबाईटस ठरत राहत>>>>.<<<
+१
प्रत्येक 'प्रेमाला' अन
प्रत्येक 'प्रेमाला' अन त्याच्या 'रियलायझेशन'ला 'केस बाय केस'च विचारात घेतले पाहिजे हे माझे मत आहे.<<
+१
झंपी, नीट वाचलंत काय लिहिलंय तर तुमचे तुमच्यावरच उपकार होतील.
ते बरेच कर्मठ असतात. हायला,
ते बरेच कर्मठ असतात.
हायला, कर्मठपणाची व्याख्या तरी काय? मुसलमान ख्रिश्चन नकोच म्हणणारे हिंदु जास्त कर्मठ का हिंदु मानसाला ख्रिश्चन मुसलमान करुन लग्न करणारे ते जास्त कर्मठ??
> या परिस्थितीत तुम्ही
> या परिस्थितीत तुम्ही आनंदाने आपल्या मुला/मुलींची लग्ने करुन द्याल का?
प्रश्न लग्न 'करुन देण्या' बाबतच आहे. स्वातीला अनुमोदन
आधीच जन्माला घालून एक 'चूक' केली (म्हणजे त्यांचा दोष नसतांना त्यांना या जगात आणले).
त्यांचे लग्नही तुम्हीच लावून देणार? की जन्मदेण्याचे पापक्षालन म्हणून नंतर मारून टाकायचे?
>> झंपी, नीट वाचलंत काय
>>
झंपी, नीट वाचलंत काय लिहिलंय तर तुमचे तुमच्यावरच उपकार होतील>><<
नीधप,
तुम्ही विषय काय आणि काय घुसडतात त्यासाठी होते ते. तुम्ही स्वतःवर आधी उपकार करा. ते बरं राहिल.
का तुमचे डोकं खराब आहे ह्याची नोंद कुठे करावी का? अनुमोदन इथेच मिळेल का?
का तुमचे डोकं खराब आहे ह्याची
का तुमचे डोकं खराब आहे ह्याची नोंद कुठे करावी का?<<<
तुमचा काय संबंध या गोष्टीशी? आणि अनुमोदन देणार्यांचाही काय संबंध?
झंपी, इथे प्रत्येक गोष्टीला
झंपी, इथे प्रत्येक गोष्टीला कुणी ना कुणी अनुमोदन देतोच.... तुम्हालाही त्याने दिले असते, पण तो आय डी बिचारा मेला.
जागो डॉलर प्यारे
डॉलर, ते वाक्याचा अर्थ नीधप
डॉलर, ते वाक्याचा अर्थ नीधप ह्यांना ज्यास्त समजेल की अनुमोदन कशासाठी हवय ते. तेव्हा तुम्ही नका पडू उगाच.
नीधप, लोकं कशी मुर्ख आहेत ह्याला अनुमोदन देण्याविषयी होत, तुम्हाला संदर्भ सांगायला नकोच.
काल अचानक दिवे गेले. मामींची
काल अचानक दिवे गेले. मामींची पोस्ट वाचलीच नव्हती. पुन्हा एकदा जोरदार अनुमोदन..
@स्वाती आंबोळे
मी त्या चर्चा वर वर वाचल्या आहेत. त्या वेळी कुणी काय भूमिका घेतली आणि आत्ता काय घेतली हे लक्षात नाही. मी ते विधान सरसकट सर्वांसाठी केलं आहे. त्यात माझा स्वतःचाही समावेश आहे.
लग्न यशस्वी होणं न होणं हा एक
लग्न यशस्वी होणं न होणं हा एक निराळा इश्यू आहे. नीधपना अनुमोदन.
या बाबतीत कुणीच भविष्य वर्तवू शकत नाही. अॅरेंज्ड मॅरेजदेखील अयशस्वी होतात आणि लव्ह मॅरेजेस देखील. इथेही सांजस्याचा आणि प्रगल्भतेचा अभाव हेच कारण आहे. मानलं तर सुख कुठेही आहे. आणि अॅडजस्टमेंटची तयारी ठेवली तर कुठलंही नातं यशस्वी होत असतं.. जगासाठी आपण लग्न करत नाही हे आजकालच्या पिढीला चांगलं ठाऊक आहे. आपण त्यांच्या डोक्यात पुन्हा आपल्या डोक्यातला भुसा भरण्यात अर्थ नाही.
पुन्हा एकदा नम्र विनंती ज्या
पुन्हा एकदा नम्र विनंती
ज्या आयड्यांना इतरांची अक्कल वगैरे काढायची आहे त्यांनी माझ्या कुठल्याही पोस्टला +१ देण्याचे टाळावे. गेल्या काही दिवसांपासून काही धाग्यांवर एका आयडीकडून हे होत असल्याने दखल घेत आहे. सरळ त्यांच्या मालकाचे नाव लिहीण्यात येईल याची कृपया नोंद घेण्यात यावी.
<मुलीलाच सगळं भोगावं
<मुलीलाच सगळं भोगावं लागतं..म्हणूनच पालकांचा प्रयत्न असतो तिला कमीत कमी त्रास व्हाव>
मुलीचे पालक आणि मुलाचे पालक या पूर्णपणे वेगवेगळ्या प्रजाती असून त्यातील एक बुधावरून तर दुसरी शनीवरून आलेली असते.
-----
मुलीचे पालक हे बहुतेक वेळा एखाद्या मुलाचे पालकही असतात. मुलाचे पालक ही भूमिका बजावताना आपण मुलीचेही पालक आहोत हे विसरण्याचा त्यांना जन्मसिद्ध हक्क असतो.
Pages