फूड प्रोसेसर / मिक्सर / ग्राइंडर / चॉपर कोणता घ्यावा

Submitted by शूम्पी on 29 May, 2012 - 10:20

HBFPGoodOld.jpg
मी गेले १० वर्ष हॅमिल्टन बीच चा वरच्या फोटोतल्यासारखा फूड प्रोसेसर वापरत होते. तो किती मस्त होता ते मला तो स्वर्गवासी झाल्यावर समजले. तो मी साधारण $३० च्या आसपास घेतला होता. आठवड्यातून ३-४ वेळा वापरत होते. कणिक भिजवणे , भाज्या चिरणे, दाण्याचे कूट करणे, लसणाची कोरडी चटणी फिरवणे, (आई आली की) पुरण फिरवणे अशा नाना प्रकारच्या कामांसाठी. वापरायला तो अत्यंत सोपा आणि कमी कटकटीचा आणि सुटसुटीत होता. एकच ८ कप आकाराचं भांडं, एकच झाकण, १ चॉपिंग ब्लेड(त्यानेच कणिक पण छान मळली जायची), आणि एकच स्लायसिंग/श्रेडिंग ब्लेड, सर्व गोष्टी डिश वॉशर मध्ये बिंधास्त टाकता यायच्या.
खरतर, तो फूड प्रोसेसर नीट चालू होता (म्हणजे बटण, मोटर वगैरे) फक्त त्याच्या ब्लेडला खाली असणारी प्लॅस्टिक ची चकती तुटली होती तर मी लगेच तो रिसायकल मध्ये टाकला. मी त्यांच्या वेबसाइट वरून नुस्तं ब्लेड मागवायला हवं होतं असो. आता अक्कल येवून काही फायदा नाही. घाईघाईने आधी काय ते उरकायचं आणि मग सवडीने पश्चात्ताप करायचा...
सध्या माझी फूड प्रोसेसर क्वेस्ट सुरू आहे.
आखुड शिंगी वगैरे वगैरे हवा आहे. वापरायला सोप्पा, कमी कटकटीचा
गेल्या ८ दिवसात २ वेगळे फु प्रो आणून एकदा वापरून परत केले आहेत.
त्यातला एक होता हॅमिल्टन चा नविन मॉडेल आणि दुसरा होता किचन एड चा ९ कपांचा मॉडेल. त्यांची कहाणी प्रतिसादात लिहिते.
.
.
.
शेवटी पहिल्या पानावर अगोने रेकमेंड केलेला हा फु प्रो मी घेतला आणि मी माझ्या खरेदीवर फार खुष आहे!
HBFoodPro500Wt.jpg

रोजची पोळ्याची कणिक ह्यातच मळते. डिशवॉशरला टॉप रॅकमध्ये धुवायला टाकते. नो कटकट फु प्रो आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रीती झोडियाकबद्दल कोणाला कल्पना आहे का? >>>> Me too eager to hear the feedback. We bought it and had to return, coz it was extremely noisy. Unbearable noise. Donno whether the specific piece was faulty or in general the model itself is noisy due to it's motor capacity. Reading the feedback on net, my husband is quite fascinated with Preethi F.P. and I am dead against due to noise level. We are unable to conclude for quite some time. We are happy users of Bajaj FX currently, but tired of using the same machine for the past 7 years.

धन्यवाद शूम्पी
मी पण Hamilton Beach ChefPrep 525-Watt Food Processor घेतला.
कणिक मळणे, गाजर पण छान किसले जाते मोठ्या प्रमाणावर, nut butter पण करते.
पाव भाजी ची भाजी पण बारीक चॉप होते.

मेधाने ही लिंक सुचवल्यावर इकडे आले.

मला फूड प्रोसेसर नको आहे. नुसता कोरड्या आणि ओल्या वाटणाला मिक्सर हवा आहे. यासाठी हँड ब्लेंडर - छोटे भांडे असलेला बरा होईल का?
आत्ता घरी फूड प्रोसेसर आणि एक मोठा मिक्सर आहे पण त्यात फक्त इडली डोशाचं पीठ होतं. कमी प्रमाणातलं काहिही होत नाही आणि गंधासारखं वाटण तर नाहीच नाही.
अ‍ॅमॅझॉन आणि फ्लिपकार्टवर काही बघितले पण रिव्ह्यूज खूप उलटसुलट आहेत.

सशल, त्यापेक्षा सुमीतचा घे. कॅनडात त्याची डीलरशिप असलेलं दुकान आहे. मला प्रीथी पेक्षा सुमीत खूपच चांगला वाटला. माझ्याकडे गेली १९ वर्ष आहे आणि बारीकसारीक दुरूस्त्या - ज्या मी घरीच केल्या - वगळता का ही ही
प्रॉब्लेम नाही.

धन्यवाद अंजली. Happy
न फुटणारा (काचेचा नसलेला) ग्राइंडर म्हणजे पर्वणीच की Proud
दळभद्री अर्धा फुटलेला फुप्रो, मॅजिक बुलेट आणि कॉफी ग्राइंडर ये तीनो काम एक ही करे तो ये सब लिया हुवा क्यो लिया होईल पण ठीके.

चिऊ , सशल माझ्याकडे नॅशनल पॅनॅसोनिकचा मिक्सर आहे. १० वर्षापुर्वी भारतातून आणलेला. चांगल्या प्रतिचा कन्व्हर्टर (ट्रान्स्फॉर्मर खरतर) वापरते इथे. इतका सुंदर मिक्सर आहे. अगदी गंधासारखे वाटण होते. खारकाची सुद्धा पीठासारखी पावडर होते. माझा बघून इतर ५/६ मैत्रिणींनी,बहिणीनी घेतला. तीन भांडी आहेत. पुर्वी तरी स्टीलची होती. आता कल्पना नाही. मी ४५०० ला सांगलीतून घेतलेला. सध्या काय किंमत आहे माहिती नाही.
कन्व्हर्ट्रर ३५ $ ला ऑनलाईन घेतलेला. तो मात्र अत्यंत जड आहे. पण चांगल्या प्रतिचा आहे.

गॉश.. हे एवढे लिहायला अर्धा तास लागला. Sad इंटरनेट एक्सोप्लोरर वापरत आहे. काय चुकतयं? Sad अक्षर उल्टीपाल्टी होताहेत .

धन्यवाद Happy
पॅनासोनिक आणि सुमीत दोन्ही बघते.
इथे एक-दोघींकडे न्युट्रिबुलेट आहे पण अनुभव की, बर्‍याचदा गाठी राहतात. त्यामुळे बुलेट प्रकारात जरा संभ्रमात आहे.

मॅगी मधे असला एक वापरला. ड्राय मसाले खूप छान होतात. पण पाणी अज्जिबात लागून चालत नाही. वेगळं होणारं भांडं नसल्याने वायर सांभाळून धुवावं लागतं. आणि धुतल्यावर पूर्ण कोरडे होणे अत्यावश्यक. साहजिकच वास मिक्स झालेला चालणार नाही असे मसाले पाठोपाठ नाही करता येत. नट्स वगैरे तर नाहीच कारण काही घरी नेहमी येणार्‍या मित्रांना अ‍ॅलर्जी आहे.

मॅगी,
माझ्याकडे असला एक ब्राउन चा आहे. तो फक्त कोरड्या पावडर चटण्या / मसाले यासाठी वापरते. व्हिनेगर मधे बुडवलेल्या पेपर टावेल ने पुसून थोडा वेळ उघडा ठेवला तर वास पुष्कळ कमी होतो.

मालवणी मसाला, गोडा मसाला , सांबार मसाला सर्व यातच करते मी.

नॅशनल पॅनॅसॉनिक, सुमीत आणि प्रीती या मिक्सर वापरणार्‍यांकरता प्रश्न

ओला नाऱळ, सुकं खोबरं याचं गंध वाटण होतं का ? १/२ कप किंवा कमी आलं लसूण पेस्ट करता येते का ? कॉफी बीन्स दळणे, दाण्याचं कूट करणे, धणे- जिर्‍याची पूड करणे या करता वापरता का ? ब्लेड्स ची धार किती वर्षे टिकते ? रीप्लेसमेंट ब्लेड सहज ( आणि स्वस्तात) मिळतात का ? एक्स्ट्रा जार पण सहज मिळतो का ?

आठवड्यातून साधारण किती वेळा मिक्सर वापरला जातो तुमच्या घरी ?

चटणी वाटून थोडा वेळ जार मधेच ठेवल्यास त्यातून पाणी गळतं का ?

चिऊ, अजिबात गाठी रहात नाहीत न्युट्रीबुलेटमधे. माहीत नाही त्या मैत्रिणींनी नक्की काय बारीक केले होते व किती वेळ ? पण त्यात अगदी कमी प्रमाणात करता येत नाही. निदान अर्धा-पाऊण वाटी तरी करते.

>>रीप्लेसमेंट ब्लेड सहज ( आणि स्वस्तात) मिळतात का >> अंजलीने दिलेल्या साईट वर सुमितच्या बेल्ड्स आणि इतर सर्व सुट्टे भाग कॅनडाहून शिप होऊन मिळतात. स्वस्त आहेत. (१०$)

ओला नाऱळ, सुकं खोबरं याचं गंध वाटण होतं का ?>>> हो. एकदम गंध वाटण होतं. प्रीतीमधे झालं नाही.

१/२ कप किंवा कमी आलं लसूण पेस्ट करता येते का ? >>>> हो.

कॉफी बीन्स दळणे, दाण्याचं कूट करणे, धणे- जिर्‍याची पूड करणे या करता वापरता का ? >>> एकदम सहजपणे होते.

ब्लेड्स ची धार किती वर्षे टिकते ? >>> मी गेली १९ वर्षे वापरते आहे. ब्लेडची धार चांगली आहे.

रीप्लेसमेंट ब्लेड सहज ( आणि स्वस्तात) मिळतात का ? एक्स्ट्रा जार पण सहज मिळतो का ? >>> हो. त्यांचं सेंटर आहे कॅनडात. तो माणूसपण एकदम हेल्पफुल आहे. गरज नसताना काही गळ्यात मारत नाही. बारीकसारीक दुरूस्त्या फोनवरून सांगतो (आणि त्या वर्क होतात Wink ).

आठवड्यातून साधारण किती वेळा मिक्सर वापरला जातो तुमच्या घरी ?>>> जवळ जवळ रोजच.

मात्र मी कधीही चटणी करून जारमधे ठेवली नाही. नॉट रेकमेंडेड.

प्रीती माझ्या मैत्रिणीकडे आहे. एका कार्यक्रमाच्यावेळी तिच्याकडे वापरण्यात आला होता, तेव्हा खरी सुमीतची किंमत कळली ;). खोबर्‍याचं वाटण खूप बारीक झालं नव्हतं. इथे मिळणार्‍या बाकी ब्लेंडर्सपेक्षा चांगला आहे, पण भारतीय स्वैपाकासाठी सुमीत बेस्ट असं माझं मत झालं आहे. तीन वेगवेगळे स्टीलचे जार्स असल्याने कमी क्वांटीटीसाठीपण वापरता येतो. तसंच दुसर्‍या एका मैत्रिणीनं भारतातूनच कन्व्हर्ट करून आणला होता पण त्याची पॉवर आणि एकंदरीत परफॉर्मन्स कमी वाटला.

सुमीत प्रीतीपेक्षा महाग आहे पण पूर्णपणे पैसावसूल चीज आहे. http://www.mcssl.com/store/sumeettraditional/asia-kitchen-machine हे मॉडेल जास्त चांगलं आहे, पॉवरपण जास्त आहे.

इथे मिळणारे ब्लेंडटेक आणि वायटामिक्सची पॉवर अर्थातच खूप आहे पण त्यांचे जार्स खूप मोठे आहेत. १/२ कपसाठी उपयुक्र नाही. काही मॉडेल्स मधे एकच जार मिळतो. किंमतीपण जास्त आहे.

टीपः मला सुमीत कडून काहीही कमिशन मिळत नाही. माझातरी अनुभव खूप चांगला आहे, म्हणून इथे लिहीले.

>> मला सुमीत कडून काहीही कमिशन मिळत नाही

Lol

थँक्यू अंजली.

तू बे एरियातलं पोस्ट बहुतेक इकडे कॉपी केलंस पण त्यातली हापयरलिंक कॉपी झाली नाही. तर तू ज्या कॅनेडियन एजण्ट की डीलरशिप ची लिंक दिली होतीस ती परत देतेस का?

तू हेच मॉडेल म्हणतेस का ३ जार्स असलेलं?

सशल, माझ्याकडे http://www.mcssl.com/store/sumeettraditional/asia-kitchen-machine हे मॉडेल आहे. एशिया किचन मशिन. मी घेतलं तेव्हा $१७५ होतं.

http://www.sumeet.net/ ही साईट.

http://www.sumeet.net/Blender.html इथे खाली स्क्रोल केलं की त्यांचा एक व्हिडीओपण आहे.

https://www.youtube.com/watch?v=a0yFz7oyyaU
https://www.youtube.com/watch?v=ZVBRMpJs4l4
https://www.youtube.com/watch?v=-EK3rvwG1ec

ओला नाऱळ, सुकं खोबरं याचं गंध वाटण होतं का ?>>> अगदी कापडामधून गाळता येईल एवढी बारीक चटणी होते. मध्यम जार किंवा लहान जार मध्ये.
१/२ कप किंवा कमी आलं लसूण पेस्ट करता येते का ? >>>> हो. सर्वात लहान जार मध्ये २ मिरच्या सुद्धा वाटता येतात.

कॉफी बीन्स दळणे, दाण्याचं कूट करणे, धणे- जिर्‍याची पूड करणे या करता वापरता का ? >>> अतिशय सुंदर पीठासारखी पुड करता येते. दाण्याचा कुट छान मोकळा होतो. चिकट होत नाही. काजु कतली अगदी विकत आणल्यासारखी होते यात कुट केला तर. (सर्वात मोठे भांडे न वापरता मधले वापरावे. मोठ्या भांड्यात थोडा चिकट होवू शकतो कुट म्हणुन.
ब्लेड्स ची धार किती वर्षे टिकते ? >>> मी गेली १० वर्षे वापरते आहे. पहिल्यासारखाच आहे.

रीप्लेसमेंट ब्लेड सहज ( आणि स्वस्तात) मिळतात का ? एक्स्ट्रा जार पण सहज मिळतो का ? >>>
एकदम निवांत मिळतो. जारची किंमत २००० पर्यंत आहे.

आठवड्यातून साधारण किती वेळा मिक्सर वापरला जातो तुमच्या घरी ?>>
भरपूर. पण सांगता नाही येणार नक्की किती दिवस.

चटणी वाटून थोडा वेळ जार मधेच ठेवल्यास त्यातून पाणी गळतं का ?>> मी कधी ठेवला नाही. आई ३५ वर्ष रिकोचा मिक्सर वापरत आहे . तिची सवय.

-

एकदम गंध वाटण होतं << सॉरी पण सुमीत.नेट साईट वरच्या फोटोत खोबर गंध वाटत नाही :प

मला त्या स्पाईस कन्टेनर्ची रिंग हवी होती पण वेगळी दिसत नाहीये विकायला.भांडच घ्याव लागेल :| . पाणी लिक होतय.

Pages