फूड प्रोसेसर / मिक्सर / ग्राइंडर / चॉपर कोणता घ्यावा

Submitted by शूम्पी on 29 May, 2012 - 10:20

HBFPGoodOld.jpg
मी गेले १० वर्ष हॅमिल्टन बीच चा वरच्या फोटोतल्यासारखा फूड प्रोसेसर वापरत होते. तो किती मस्त होता ते मला तो स्वर्गवासी झाल्यावर समजले. तो मी साधारण $३० च्या आसपास घेतला होता. आठवड्यातून ३-४ वेळा वापरत होते. कणिक भिजवणे , भाज्या चिरणे, दाण्याचे कूट करणे, लसणाची कोरडी चटणी फिरवणे, (आई आली की) पुरण फिरवणे अशा नाना प्रकारच्या कामांसाठी. वापरायला तो अत्यंत सोपा आणि कमी कटकटीचा आणि सुटसुटीत होता. एकच ८ कप आकाराचं भांडं, एकच झाकण, १ चॉपिंग ब्लेड(त्यानेच कणिक पण छान मळली जायची), आणि एकच स्लायसिंग/श्रेडिंग ब्लेड, सर्व गोष्टी डिश वॉशर मध्ये बिंधास्त टाकता यायच्या.
खरतर, तो फूड प्रोसेसर नीट चालू होता (म्हणजे बटण, मोटर वगैरे) फक्त त्याच्या ब्लेडला खाली असणारी प्लॅस्टिक ची चकती तुटली होती तर मी लगेच तो रिसायकल मध्ये टाकला. मी त्यांच्या वेबसाइट वरून नुस्तं ब्लेड मागवायला हवं होतं असो. आता अक्कल येवून काही फायदा नाही. घाईघाईने आधी काय ते उरकायचं आणि मग सवडीने पश्चात्ताप करायचा...
सध्या माझी फूड प्रोसेसर क्वेस्ट सुरू आहे.
आखुड शिंगी वगैरे वगैरे हवा आहे. वापरायला सोप्पा, कमी कटकटीचा
गेल्या ८ दिवसात २ वेगळे फु प्रो आणून एकदा वापरून परत केले आहेत.
त्यातला एक होता हॅमिल्टन चा नविन मॉडेल आणि दुसरा होता किचन एड चा ९ कपांचा मॉडेल. त्यांची कहाणी प्रतिसादात लिहिते.
.
.
.
शेवटी पहिल्या पानावर अगोने रेकमेंड केलेला हा फु प्रो मी घेतला आणि मी माझ्या खरेदीवर फार खुष आहे!
HBFoodPro500Wt.jpg

रोजची पोळ्याची कणिक ह्यातच मळते. डिशवॉशरला टॉप रॅकमध्ये धुवायला टाकते. नो कटकट फु प्रो आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉरी पण सुमीत.नेट साईट वरच्या फोटोत खोबर गंध वाटत नाही >>> नीट पहा, मी दिलेल्या लिंक्समधे खोबरं वाटलेलं नाहीये Wink

सुमीतचे प्रोडक्ट भारतात नाही मिळत का? आमच्या घरी पन पाहीजे होता मिक्सर ग्राईंडर..

फोटो वरुन चांगली वाटली कंपनी व प्रोडक्ट.. एकदम टिकाऊ आहे. व दणकट आहे आसे वाटले.

भारतात मिळत आसल्यास कोठे मिळेल व किंमत साधारन काय आसेल? व ऑनलाईन आसल्यास साधारन कितीला पडेल?

पुणे, मुंबई व महाराष्ट्रात मिळेल का?

सीमा आणि अंजली, खूप धन्यवाद.
आता सुमीत आणि पॅनॅसॉनिकमधला एक नक्की करेन.
प्रज्ञा९ ने दिलेल्या लिंकमधे बरेच सुमीत आहेत पण रिव्ह्यूजवरून चटकन कोणता चांगला ते कळत नाहिये. जरा अभ्यास केला पाहिजे. Happy

आई ३५ वर्ष रिकोचा मिक्सर वापरत आहे . तिची सवय.>> सीमा, दे ट्टा़ळी . आमच्याकडे पण रिकोच.

नव्या ऑस्टरच्या जार मधून अगदी १५-२० मिनिटे जरी ओलं वाटण जार मधेच राहिलं तर पाणी गळायला लागतं. :चिडचिडः

व्हायटामिक्स किंवा ब्लेंड टेक सुद्धा ५००-७०० वॉट्स च्या आसपास आहेत. प्रीती चा ५५० वॉट्स दिसतोय आणि सुमीत ७५०.

अंजली आणि सीमा - सविस्तर प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.

वायटामिक्स आणि ब्लेंडटेक १५०० वॉटस आहेत ना >> हो हो. बरोबर. , मी कुठल्यातरी दुसर्‍याच मॉडेल्सचे वॉटेज लक्षात ठेवलेले बहुतेक . मला व्हायटामिक्सचे जार फारच मोठे वाटतात.

सुमीतचा माझा अनुभव चांगला आहे, १५ वर्षं भरपूर वापरला. मग तो मोडल्यावर आता (मृणच्या सल्ल्यानुसार) निन्जा मॅजिक बुलेट वापरते आहे.

सुनिधी तुझा प्रतिसाद नजरेतून निसटला.
त्यानी छोले वगैरेची ग्रेव्ही केली होती. पण किती वेळ ते माहित नाही.
मी खरं मोठाच घ्यायचा विचार करते आहे म्हणजे आत्ता एक फक्त मोठ्या कपॅसीटीचा आहे तो रिटायर करता येईल.

अय्यो होच की! माझ्याही नाही लक्षात आलं!

http://www.amazon.in/s/ref=sr_in_-2_p_89_41?fst=as%3Aoff&rh=n%3A97644203...

हे दोनच ऑप्शन्स मिळाले, पण रिव्हूज फार चांगले नाहीत त्यातल्या एकाचे. आणि ओरिजनल/ ट्रॅडिशनल असाही बेद दिसतोय मॉडेल्सच्या नावातही. कळएना! Uhoh

ह्या सुमीत मिक्सरची बॉडी (म्हणजे मोटर(?) आहे तो भाग) इतका फ्लिम्जी किंवा फालतू, कचकड्याचा वाटतो. भारतीय ब्रँड्स ना म्हणावं जरा क्वालिटी चांगली करा त्याच्या बाह्य स्वरूपाची Happy

सुमीत हल्ली भारतात मिळतच नाही वाटतं. दुकानात दाखवत नाहीत. आधी खूप वापरला आहे. त्यामुळे परत हवा होता, पण नाही मिळाला.

सुमीत मिक्सरची बॉडी (म्हणजे मोटर(?) आहे तो भाग) इतका फ्लिम्जी किंवा फालतू, कचकड्याचा वाटतो. भारतीय ब्रँड्स ना म्हणावं जरा क्वालिटी चांगली करा त्याच्या बाह्य स्वरूपाची >> मी सुमीत घेऊया का म्हटल्यावर ग्रिंच अगदी हेच म्हणाला. व्हायटामिक्स तर जाऊ दे, अगदी साध्या कुझिनार्ट किंवा ऑस्टर चे प्रॉड क्ट्स सुद्धा कसे स्टर्डी असतात.

त्यामुळे सध्यातरी घरचा ऑस्टर अन भारतातून आणलेले छोटे जार झिंदाबाद.

मी मागच्या भारतभेटीत पॅनासॉनिकचा मिक्सर आणलाय. घरचा फूड प्रोसेसर आणि मिक्सर नीट चालू आहे पण मिक्सरवर खोबरं, कोरडे मसाले नीट वाटले जात नसल्याने नवीन मिक्सर घेतलाय, त्यात फूड प्रोसेसर नाही. मी पॅनासॉनिकवर खूश आहे. आईकडे ऑलमोस्ट ३७ वर्षं जुना सुमीत आहे, पण मला दुकानदाराने सांगितले की हल्लीचे भारतातले सुमीतचे पीसेस फॉल्टी असतात, खरं खोटं त्यालाच माहित Uhoh

पर्वा व्हायटामिक्सचा छोटा जार पाहिला. कॉस्टको मधे डेमो चालू होता. ड्राय ग्राइंडिंग साठी. अगदी छोटी क्वांटिटी सुद्धा छान ग्राइंड झाली.पण किंमत शंभर डॉलर होती जारची.त्यामुळे अजून विचारच सुरू आहे. थालिपीठ, चकलीची भाजणी चांगली दळली जाते असा फीडबॅक आहे.

विले पार्ले, सांताकृझ, अन्धेरी इथे भांड्या कुंड्याचा दुकानामधे ऑस्टर मिक्सर साठी जार म्हणून सांगितलं की मिळतात. बाकी ठिकाणी पण सहज मिळावेत, पण मला अनुभव नाही .

साधारण १०-१२ आउंस व्हॉल्यूम आहे.
डिशवॉशर मधे घालू नयेत.

थँक्यू प्रियान आणि मेधा.

सुमीत चं काही बरं वाईट झालं तर ह्या पर्यायाचा नक्की विचार करेन Happy किंवा कदाचित तोपर्यंत व्हायटामिक्स मध्ये पैसे घालायचा निर्णय पक्काही होऊ शकतो.

prady facebook var ek group ahe "Vitamix Enthusiasts - Blender Lady" त्याची जी अ‍ॅड्मिन आहे ती वायटामिक्स ही विकते. तिच्याकडे जार्स ५० डॉलरला असतात. तु छोटा जार कोणता पाहिलास? ३२ की त्याही पेक्शा कमी? माझ्याकडे ३२ ड्राय ग्राईंड साठी आहे पण तो ही मला मोठा वाटतो.
ड्राय जार मधे मी मसाले (मोस्ट्ली सांबार) करते मस्त होतात.

३२ च. वेट ग्राईंडिंग वालं भांडं इतकं उंच आहे की त्यापुढे हे बरंच छोटं वाटलं. फेसबुक पेज बघते. धन्यवाद माहिती करता.

@मेधा - थँक्यू ! पुढल्या ट्रिप ला आणेन नक्की Happy
सशल तुझ्या सुमीत चा रिव्ह्यू टाक जमेल तसं. ऑस्टर मध्ये इडली / डोसा पीठ अजिब्बात बारीक होत नाही !!
vitamix मला सुदधा हवाय, पण किम्मत Sad

ऑस्टर मध्ये इडली / डोसा पीठ अजिब्बात बारीक होत नाही !! >> आं ? मी अजूनही अडई, मिक्स्ड डाळ ढोकळा यांचं ऑस्टर वापरुनच वाटते. अल्ट्रा वेट ग्राइंडर घ्यायच्या आधी इडली, डोसा, उत्तप्पा पण ऑस्टरमधेच करत असे.

अंजलीचे वाचुन सुमीत छान आहे दिसतय. पण घेणार नाही, फार झालेत घरात. मोडतही नाहीत. वायटामिक्सवर नजर आहे पण महाग आहे त्यामुळे आणि इतर पसारा घरात असल्याने घेत नाहीये.

प्रियान, जास्तवेळ फिरवून पाहिले का न थांबता. १-२ मिनिट वगैरे? बारीक होईल.

वायटामिक्स च्या वेबसाईटवर छोट्या आकाराची भांडी स्प्रिंग २०१७ मध्ये येणार आहेत असे लिहले आहे. इडली-डोसाचे उत्तम पीठ इकडच्या इंडियन स्टोर मध्ये मिळायला लागल्या पासून घरी खूप कमी वेळा केले जाते. क्यूजनार्टचा फूडप्रोसेसर आणि न्यूट्रिबुलेट वर बाकी कामे चांगली सुरू आहेत.

Pages