मी गेले १० वर्ष हॅमिल्टन बीच चा वरच्या फोटोतल्यासारखा फूड प्रोसेसर वापरत होते. तो किती मस्त होता ते मला तो स्वर्गवासी झाल्यावर समजले. तो मी साधारण $३० च्या आसपास घेतला होता. आठवड्यातून ३-४ वेळा वापरत होते. कणिक भिजवणे , भाज्या चिरणे, दाण्याचे कूट करणे, लसणाची कोरडी चटणी फिरवणे, (आई आली की) पुरण फिरवणे अशा नाना प्रकारच्या कामांसाठी. वापरायला तो अत्यंत सोपा आणि कमी कटकटीचा आणि सुटसुटीत होता. एकच ८ कप आकाराचं भांडं, एकच झाकण, १ चॉपिंग ब्लेड(त्यानेच कणिक पण छान मळली जायची), आणि एकच स्लायसिंग/श्रेडिंग ब्लेड, सर्व गोष्टी डिश वॉशर मध्ये बिंधास्त टाकता यायच्या.
खरतर, तो फूड प्रोसेसर नीट चालू होता (म्हणजे बटण, मोटर वगैरे) फक्त त्याच्या ब्लेडला खाली असणारी प्लॅस्टिक ची चकती तुटली होती तर मी लगेच तो रिसायकल मध्ये टाकला. मी त्यांच्या वेबसाइट वरून नुस्तं ब्लेड मागवायला हवं होतं असो. आता अक्कल येवून काही फायदा नाही. घाईघाईने आधी काय ते उरकायचं आणि मग सवडीने पश्चात्ताप करायचा...
सध्या माझी फूड प्रोसेसर क्वेस्ट सुरू आहे.
आखुड शिंगी वगैरे वगैरे हवा आहे. वापरायला सोप्पा, कमी कटकटीचा
गेल्या ८ दिवसात २ वेगळे फु प्रो आणून एकदा वापरून परत केले आहेत.
त्यातला एक होता हॅमिल्टन चा नविन मॉडेल आणि दुसरा होता किचन एड चा ९ कपांचा मॉडेल. त्यांची कहाणी प्रतिसादात लिहिते.
.
.
.
शेवटी पहिल्या पानावर अगोने रेकमेंड केलेला हा फु प्रो मी घेतला आणि मी माझ्या खरेदीवर फार खुष आहे!
रोजची पोळ्याची कणिक ह्यातच मळते. डिशवॉशरला टॉप रॅकमध्ये धुवायला टाकते. नो कटकट फु प्रो आहे.
शूम्पी, मी Preethi वापरते.
शूम्पी, मी Preethi वापरते. ह्याच्या सर्वात छोट्या जारमधे , किंचित पाणी घालून आलं लसूण पेस्ट खूप छान होते.
अधी खूप वर्षं मी मॅजिक बुलेट वापरायचे. त्यात थोड्या प्रमाणात करायचा प्रॉब्लेमच यायचा. मोठ्या प्रमाणात करुन फ्रीज करायचे. थोड्यासाठी खलबत्ता.
माझा Preethi मी पुण्याहून आणला आहे. इथल्या व्होल्टेजवर चालणारा.
शूम्पी, पाणी घालायचे नाही
शूम्पी, पाणी घालायचे नाही म्हणून तेल (जरासे पुरते, आम्ही वायटामिक्स वापरतो) हळदीने टिकायला मदत होते. लसूण पण मी काॅस्टकोची सोललेली वापरते. ट्राय कर. मला महिनाभरापेक्शा जास्त पुरेल इतकी पेस्ट करतो.
हँड ब्लेंडर बद्दल ज्ञानदान
हँड ब्लेंडर बद्दल ज्ञानदान करा लोकहो
वर सान्गिलेल्या सुमीत मिक्सर
वर सान्गिलेल्या सुमीत मिक्सर मध्ये इडली चे पिठाचे वाट्ण होते का ?
हँड ब्लेंडर बद्दल ज्ञानदान
हँड ब्लेंडर बद्दल ज्ञानदान करा लोकहो---वापर कशासाठी करणार त्यावर कोणता हॅन्डब्लेंडेर घ्यायचा ते ठरेल. फक्त ताक, मिल्कशेक, धिरडी पीठ साठी एक प्रकार. बेकिंग साठी एक प्रकार, chopping पण करायचं असेल तर तशी attachment उपलब्ध असलेला प्रकार.
Philips HR1350/C 250-Watt Hand Blender https://www.amazon.in/dp/B009UORCGW/ref=cm_sw_r_wa_apa_i_BtstCbHDJWC9N
हा चांगला आहे.
मॉर्फी रिचर्डस् चा हॅंड
मॉर्फी रिचर्डस् चा हॅंड ब्लेंडरपण चांगला आहे.
पॅनासोनिकचा अनुभव लिहा आणि
पॅनासोनिकचा अनुभव लिहा आणि भारतातला की अमेरीकेतला अनुभव आहे ते सुद्धा लिहा आणि कुठुन ऑर्डर केला. धनय्वाद.
वायटामिक्स मश्ये इडली डोश्याचे वाटान गंधासारखे हतळ्ल्ल?
कमी प्रमाणात आलं लसुण पेस्ट
कमी प्रमाणात आलं लसुण पेस्ट करायची असल्यास मी बारीक छिद्रे असलेल्या खिसणीवर ते खिसून घेते.
माझ्याकडे पॅनॉसोनिकचा मिक्सर
माझ्याकडे पॅनॉसोनिकचा मिक्सर आहे. भारतातून सांगलीतून घेवून आली आहे. चौदा वर्ष झाली. इथे चांगल्या क्नव्हर्टरवर चालविते.
मी मागे पण लिहिलेला रिव्ह्यु कुठेतरी, अतिशय उत्तम मिक्सर आहे. अगदी गंधासारखे वाटन होते. उडीद डाळ अगदी कमी पाण्यात छान पेस्ट सारखी दळली जाते.
मी फक्त ४५०० ला घेतलेला. आता किंमती वाढल्या असतील.
इथे वापरणार असाल तर ट्रान्स्फॉर्मर/कन्व्हर्टृअ चांगला घेण अत्यंत महत्वाच आहे. तो पॉवरफुल नसेल तर मिक्सर नीट चालत नाही अस मैत्रिणींच्या अनुभवातून लक्षात आल.
धन्यवाद सीमा.
धन्यवाद सीमा.
माझ्या अमेरीकेतील मैत्रीणीला महीती हवी होती
झंपी, पुण्यात पासोड्या विठोबा
झंपी, पुण्यात पासोड्या विठोबा जवळील इलेक्ट्रीकलच्या दुकानात मला प्रीतिचा ३ जार असलेला , अमेरिकेतील व्होल्टेजवर चालणारा मिक्सर मिळाला. खूप छान चालतोय.
सशल आणि सीमा, ह्या
सशल आणि सीमा, ह्या धाग्यवरच्या तुमच्य अपोस्टी आणी बाकी बर्याच पोस्टी मी वाचल्या आहेत. माझा इश्यू असा आहे की मला अजून एक मिक्सर नाही घ्यायचा. मॅजिक्/न्यूट्री बुलेट आहे शिवाय तो ब्लेम्डटेक आहे. त्यामुले फक्त आलंलसूण पेस्ट साठी ऑप्शन शोधत होते.
शुम्पी, अगं नाही वाचला मी
शुम्पी, अगं नाही वाचला मी तुझा प्रश्न. मी ते झंपी ला उत्तर दिले.
आता वाचला.
आल्याची आणि लसणाची पेस्ट थोडीच करायची असते तेव्हा मी खलबत्ता वापरते . कॉस्ट्कोचा दगडी खलबत्ता आहे त्यात.
आणखी एक म्हणजे कॉस्टको मधून आले पेस्ट आणली आहे. अतिशय उत्तम आहे. आवडली मला. कधी कधी ती वापरते.
मी ते झंपी ला उत्तर दिले>> ओह
मी ते झंपी ला उत्तर दिले>> ओह
मी करीन एकदा कोस्टकोची पेस्ट
आ रा रा हँड ब्लेंडर बद्दल
आ रा रा हँड ब्लेंडर बद्दल
Braun-MultiQuick-7 असे गूगल करा. या मॉडेल मधे वेगवेगळे अटॅचमेंट्स आहेत .
एक बलून व्हिस्क आहे ते अंडी फेटणे, व्हिपड क्रीम करणे, दही घुसळणे याकरता वापरु शकता.
एक स्टीलचे साधारण एस आकाराचे ब्लेड असलेले अटॅचमेंट आहे ते चक्का/ साखर फेटणे, पालक, टॉमेटोची प्युरे करणे , ओटस्ची धिरडी करायची असतील तर त्या साठी असे वापरता येईल. ( मिश्र पावडरसची धिरडी करायची असतील तर याची गरज नाही . बेसन, तांदळाचे पीठ इत्यादी, ते साध्या फोर्कने पण नीट मिसळून येईल)
एक छोटे फूड प्रोसेसर टाइप आहे त्यात दाण्याचे कूट, हम्मस, कांदे किंवा टॉमेटो बारीक चिरून, सालसा साठी आंबे, पायनापल इत्यादी बारीक चिरणे , कोबी ( दाक्षिणात्य तोरण टाइप भाज्यांना लागतो तसा ) चिरणे, पावभाजी साठी फ्लावर, फरसबी, शिमला मिरची बारीक चिरणे या साठी मस्त आहे एकदम.
त्यातच नीडिंग ब्लेड घालून पीठ मळता येते ( म्हणे) . मी केले नाही कधी. माझ्याकडल्या ब्राउन ला एक नीडिंग हूक वेगळा होता. तो वापरून अनेक प्रकारचे केक अन कूकी बॅटर्स बनवता येत. सध्या तसला हूक MultiMix 5 Hand Mixer - HM 5130 या मॉडेल मधे आहे.
या मॉडेल मधे एक मॅशर अटॅचमेंट आहे . ते मी कधी वापरले नाही.
कुठल्याही ब्रँडचा हँडमिक्सर / ब्लेंडर घेताना जे अव्हेलेबल आहेत त्यात जास्तीत जास्त हॉर्सपावर असलेला घ्या. चक्का, पीठ मळणे , दाण्याचं कूट यासाठी ५०० वॉट तरी असलेला घेतलात तर बेस्ट. कुठला घेतला अन तो वापरुन काय काय केलंत ते लिहा(लच).
हँड ब्लेंडर बद्दल ज्ञानदान
हँड ब्लेंडर बद्दल ज्ञानदान करा लोकहो>>
ब्राऊनचा आई गेली बरीच वर्ष वापरत आहे. उत्तम चालू आहे. कांदा कापण्यासाठी, ताक करण्यासाठी, टोमॅटो चॉप करायला, आले लसणाची जाडसर पेस्ट करण्यासाठी वापरला जातो.
शुम्पी माझ्याकडे रेवेल चा हा
शुम्पी माझ्याकडे रेवेल चा हा ब्लेन्डर १० वर्श आहे एक लसुण पाकळी, एवढश आल टाइप एक चमच्याची पेस्ट सुद्धा काहीही लिक्विड न घालता निट होते, मी तेव्हा इन्दियन ग्रोसरीतुन ३२ $ ला घेतला होता , आता यात स्टिल फिनिश असलेले नविन प्रकार आलेत इथे आणी भारतात चाल्णारे, वहिनीला हवा होता म्हणून मी इन्डीयन ग्रोसरीतुन इन्डियात चलु शकेल असा पाठवला होता , प्राइझ थोडि वाढलिये पन एक अॅदिशनल जार पन आहे त्यात
२-३ व्यक्तिसाठिच लिमिटेड चटणी, आल-मिरची वाटण, ठेचा अगदी छान होत. (झाकण जपुन वापरावे लागते इट्स प्रेस न गो असल्याने)
https://www.amazon.com/Revel-CCM104-White-Coffee-Grinder/dp/B000K2NMIU/r...
ओके रेवेल आणून बघते आता
ओके रेवेल आणून बघते आता.धन्यवाद!
मी विकेंडला त्या ऑस्टर च्या
मी विकेंडला त्या ऑस्टर च्या छोट्या जार मध्ये केली आलं लसूण पेस्ट. तेल आणी मीठ घालून. तेल सढळ हस्ते घातलं. मस्त स्मूद पेस्ट झाली आहे. हळद नाही घातली मी रंग पिवळा नको म्हणून.
आता किती दिवस टिकते ते जरा लक्ष ठेवते.
धन्यवाद वेका.
नुकताच ऍमेझॉन सेलमध्ये https:
नुकताच ऍमेझॉन सेलमध्ये https://www.philips.co.in/c-p/HL7707_00/avance-collection-mixer-grinder हा मिक्सर ग्राइंडर घेतलाय. कोणाकडे असल्यास / वापरत असल्यास रिव्ह्यूज द्यावेत ही विनंती
आमचा 5 वर्षं जुना रोनाल्ड शॉक
आमचा 5 वर्षं जुना रोनाल्ड शॉक देत होता.तो रिपेअर करून आणला.एकंदर माणसाचे म्हणणे होते की मिक्सर ची भांडी गळतात आणि आतले रबर पार्ट झिजल्याने पाणी आत गळून शॉक येतो.मिक्सर बदला.पण आम्ही सध्या तयार नसल्याने 1100 रु देऊन दुरुस्त केला.काही दिवस चांगला चालून मग तो एक घुर्र करून बंद पडायला लागला.मग नवा घेतला.रोनाल्डच.
त्या माणसाने बर्याच वेळा 'आय टोल्ड यु सो' ही भावना व्यक्त करून काही वापर टिपा दिल्या.भांडी धुवून पालथी ठेवू नका, ओव्हर लोड करू नका, ग्राईंडर/ ब्लेंडर लावल्यावर आधी 2 चक्र पटकन टर्बो फिरवून मग साधे ऑन मोड वापरणे या मुख्य टिपा.
भांडी रात्रभर पाणी घालून भिजवून ठेवू नका ही टीप नेहमीचीच असते.
आधीच्या इनाल्सच्या फु.प्रो
आधीच्या इनाल्सच्या फु.प्रो.ला मिक्सर ग्राइंडर सुद्धा हग्र, जे वापरले जात नव्हते आणि फु प्रो युनिटला तडा गेला होता म्हणून फिलिप्सचा हा फुड प्रोसेसर घेतला.
याचं कणीक मळायचं पातं अगदीच मरतुकडं आहे. शिवाय ते ज्यात बसवायचं त्या उभ्या रॉडला खाचा असल्याने त्याला कणीक व्यवस्थित चिकटून बसते. एकदाही आधीच्या गुणी फू प्रो सारखी गुळगुळीत एक गोळा अशी कणीक मळली नाही. मग कोणाच्या तरी सांगण्यावरून स्टील ब्लेडच कणीक मळायला वापरलं. तुलनेने बरा रिझल्ट आहे.
याला स्पीडच्या दोनच लेव्हल्स आहेत. किसणी अॅटॅचमेंट चांगलं आहे. ज्यांना कणीक मळण्यासाठी हवा त्यांनी हा फु प्रो अजिबात घेऊ नका.
कणकेला नंतर नंतर कंटाळा येतो
कणकेला नंतर नंतर कंटाळा येतो.म्हणजे कणिक छान मळून होते. पण भांडं नीट स्वच्छ कानाकोपरे बघून धुवावं लागतं.अगदी छान कणिक मळली गेली तर भांड्याला काहीही न चिकटता धुणे सोपे पडणे अपेक्षित आहे.पण घाईत तसं होत नाही.
आम्ही त्या मोठ्या भांड्याचा वापर पराठ्याला मुळा किंवा कोबी किसायला, लोणी बनवायला करतो.
मध्ये एकदा केन स्टार 2 वर्षं होता.त्याला आमचं घर झेपलं नाही.लगेच मेला.रोनाल्ड आमच्यात चांगला नांदतो.
कणकेला नंतर नंतर कंटाळा येतो
कणकेला नंतर नंतर कंटाळा येतो.म्हणजे कणिक छान मळून होते. पण भांडं नीट स्वच्छ कानाकोपरे बघून धुवावं लागतं.अगदी छान कणिक मळली गेली तर भांड्याला काहीही न चिकटता धुणे सोपे पडणे अपेक्षित आहे.पण घाईत तसं होत नाही.
आम्ही त्या मोठ्या भांड्याचा वापर पराठ्याला मुळा किंवा कोबी किसायला, लोणी बनवायला करतो. +१११
भांड्याला बाजूंनी आणि
भांड्याला बाजूंनी आणि पात्याला तेल लावून कणीक मळली , पाणी बरोबर पडलं तर नाही चिकटायची (जुन्या फुक्षप्रोला)
अधूनमधून भांड्यात दोन ग्लास पाण्यात लिक्विड डिश सोपचे दोन थेंंब टाकून फु प्रो मशीनवर लावून चालवायचं. मग फार कष्ट पडत नाहीत.
मला नविन फूड प्रोसेसर घ्यायचा
मला नविन फूड प्रोसेसर घ्यायचा आहे. माझ्याकडे Bajaj FX 10 कि ११ prima आहे. पण सारखा सारखा दुरुस्त करावा लागतो आणि काल पुन्हा बन्द पडला म्हणुन लवकरात लवकर घ्यायचा आहे. तर खालीलपैकि कोणता घ्यावा?? मला विशेष करुन कणिक मळ्णे साठि हवा आहे सोबतच पालेभाजि चिरणे, खिसणे,बारिक वाटण, इडली डोसा पिठ पण करता आले तर उत्तम.
Bosch MCM3501M
Bajaj FX 11 600watt
Philips HL1661 700 watts
Usha FP 3811 1000 watt
Morphy richard Icon Supreb 1000 watt
प्रीती zodiac 750. डोळे मिटून
प्रीती zodiac 750. डोळे मिटून घ्या.
मी नुकताच https://www
मी नुकताच https://www.ushacook.com/product/food-processor-fp-3810 हा घेतलाय. यात ज्युसरही आहे.
दणकट आणि पॉवरफुल आहे.
मला साधा mixer grinder
मला साधा mixer grinder घ्यायचा आहे.. म्हणजे food processor नको.. तर preethi zodiac ऐवजी preethi galaxy MG 225 घ्यावा काय? कोणाला अनुभव आहे का?
माझाही मिक्सर आज बंद पडला
माझाही मिक्सर आज बंद पडला.मोटर जळली आहे.आताच्या परिस्थितीत दुरुस्ती होणार नाही.जवळच्या भांडीवाल्याकडे फक्त सुमित्,बजाज,जयपान आहेत.तेही दुकान आज बंद आहे.
माझ्याकडे रोज मिक्सर लागतो.फुप्रोचा अजिबात वापर नाही.पण जर पोळीवाली, लॉक्डाऊनमुळे येऊ शकली नाही तर रोजच्या वाटणासाठी,खोबरे कातायला आणि कणीक भिजवायला ऑल इन वन घ्यावा वाटू लागलेय.
Pages