फूड प्रोसेसर / मिक्सर / ग्राइंडर / चॉपर कोणता घ्यावा

Submitted by शूम्पी on 29 May, 2012 - 10:20

HBFPGoodOld.jpg
मी गेले १० वर्ष हॅमिल्टन बीच चा वरच्या फोटोतल्यासारखा फूड प्रोसेसर वापरत होते. तो किती मस्त होता ते मला तो स्वर्गवासी झाल्यावर समजले. तो मी साधारण $३० च्या आसपास घेतला होता. आठवड्यातून ३-४ वेळा वापरत होते. कणिक भिजवणे , भाज्या चिरणे, दाण्याचे कूट करणे, लसणाची कोरडी चटणी फिरवणे, (आई आली की) पुरण फिरवणे अशा नाना प्रकारच्या कामांसाठी. वापरायला तो अत्यंत सोपा आणि कमी कटकटीचा आणि सुटसुटीत होता. एकच ८ कप आकाराचं भांडं, एकच झाकण, १ चॉपिंग ब्लेड(त्यानेच कणिक पण छान मळली जायची), आणि एकच स्लायसिंग/श्रेडिंग ब्लेड, सर्व गोष्टी डिश वॉशर मध्ये बिंधास्त टाकता यायच्या.
खरतर, तो फूड प्रोसेसर नीट चालू होता (म्हणजे बटण, मोटर वगैरे) फक्त त्याच्या ब्लेडला खाली असणारी प्लॅस्टिक ची चकती तुटली होती तर मी लगेच तो रिसायकल मध्ये टाकला. मी त्यांच्या वेबसाइट वरून नुस्तं ब्लेड मागवायला हवं होतं असो. आता अक्कल येवून काही फायदा नाही. घाईघाईने आधी काय ते उरकायचं आणि मग सवडीने पश्चात्ताप करायचा...
सध्या माझी फूड प्रोसेसर क्वेस्ट सुरू आहे.
आखुड शिंगी वगैरे वगैरे हवा आहे. वापरायला सोप्पा, कमी कटकटीचा
गेल्या ८ दिवसात २ वेगळे फु प्रो आणून एकदा वापरून परत केले आहेत.
त्यातला एक होता हॅमिल्टन चा नविन मॉडेल आणि दुसरा होता किचन एड चा ९ कपांचा मॉडेल. त्यांची कहाणी प्रतिसादात लिहिते.
.
.
.
शेवटी पहिल्या पानावर अगोने रेकमेंड केलेला हा फु प्रो मी घेतला आणि मी माझ्या खरेदीवर फार खुष आहे!
HBFoodPro500Wt.jpg

रोजची पोळ्याची कणिक ह्यातच मळते. डिशवॉशरला टॉप रॅकमध्ये धुवायला टाकते. नो कटकट फु प्रो आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बे एरियात अंजली चा मिक्सर कदाचित इस्ट वेस्ट ह्या सनीवेल मधल्या एल् कमीनो वरच्या दुकानात मिळू शकेल. तिकडून शिप होणार हे माहित असतं तर अ‍ॅमेझॉन वरच्या शिपींग मधले काही पैसे वाचवता आले असते Wink

आज उद्घाटन झालं, तीळाच्या वड्यांकरता तीळकूट, खसखस इत्यादी छोट्या जार मध्ये वाटलं. रिझल्ट्स छान आहेत Happy

अंजली, तू डिशवॉशर मध्ये (वरच्या रॅक मध्ये) घालतेस का जार्स आणि झाकणं? मी आज हातानेच धुतला जार पण तुझा अनुभव नक्की सांग.

सशल,
मी मिक्सरचा कुठलाही पार्ट डिशवॉशरला लावत नाही. नॉट रेकमेंडेड.
हातानंच धुवून टाकायचा. कितीही कंटाळा आला तरी Wink

एक तक्रार नोंदवत आहे. सुमीत चं मॅन्युअल नीट वाचा वापरायच्या आधी. काही गोष्टी इन्ट्युटिव्ह नाहीत. Happy

मोठ्या जार मधलं ब्लेड अफिक्स करायला त्यांनीं एक टूल दिलं आहे ज्याच्या एका बाजूला स्पॅच्युला आहे आणि दुसर्‍या बाजूला ते टूल. मला अजिबात लक्षात आलं नाही. मी ब्लेड हातानेच फिरवून बसवलं. टोमॅटो च्या साराकरता मिश्रण वाटायला घेतलं आणि दोन तीन विचीत्र आवाज आले. अर्थातच ब्लेड नीट घट्ट बसलं नव्हतं. आयॅम होपिंग की त्याचे आटे सैल झालेले नाहीत. नाहीतर आता फॉलो-अप करणं आलं कम्पनी बरोबर, आणि कदाचित अजून थोडे पैसे घालणं Uhoh

अरे हा spatula अजून येतो का, खूप पूर्वी आईकडे पाहीला / वापरला होता.
तो blade काढायला लावायला वापरतात पण वापरताना जपून, त्याच्या अगदी मुळाशी धरावे नाहीतर टोकाचा spatula पकडून फिरवताना ते tool तुटते.

आयॅम होपिंग की त्याचे आटे सैल झालेले नाहीत. >> नसतील झाले. माझ्याकडून पण एकदा झालं होतं, पण नंतरही व्यवस्थित चालला.

मिक्सर खूपच मस्त आहे. चटणी, डोसे मस्त वाटले गेले. अजून वाटण केलं नाहीये पण तेही होईल Happy
जर कोरडे मसालेपण झाले तर कॉफी ग्राईंडरपण वापरावा लागणार नाही.
परत एकदा खूप खूप धन्यवाद.

इकडे कोणी Preethi Eco Twin Jar Mixer Grinder / Eco Plus मागवला आहे का? असल्यास अनुभव कसा आहे? डिशवॉशर सेफ आहेत का जार्स ?

पुन्हा इथे!
माझा फुप्रो मस्त चालू आहे (तोच तो वरचा हॅ बी चा) पण आता मॅजिक बुलेट (बहुधा नवऱ्याने) मोडला. इडली पिठ ओल्या चटण्या दाण्याचे कूट या बेसिक गरजांसाठी काय घेऊ? निन्जा बहुधा फक्त ओलं वाटण करतो मग ड्राय ग्राइंड वेगळं मशीन घ्यावं लागेल का?मग तसा कॉफी ग्राइंडर कोणता चांगला आहे?
न्यूट्री बुलेट कसा आहे? मॅजिक बुलेट पुन्हा घेणं हा ऑप्शनही आहे पण न्यूट्री बुलेट बेटर राहील का?

इकडे कोणी Preethi Eco Twin Jar Mixer Grinder / Eco Plus मागवला आहे का? >>> मी नुकताच घेतला हा अ‍ॅमेझॉन वरून. नंतर लक्षात आले की इथे काही इंडियन ग्रोसरीज मधेही मिळतो सहज.
आतापर्यन्त अनुभव मस्त. भांडी मी वरच्या रॅक मधे ठेवून धुतली. काही प्रॉब्लेम आला नाही. झाकणांची मला जरा भिती होती म्हणून मी ती हाताने धुतली.

कोणी घरगुती आटा चक्की वापरता का? कसा काय अनुभव आहे? कोणता ब्रँड, पोस्ट सेल्स सर्व्हिस चांगली. घेताना काय बघून घेऊ. खूप उपद्व्याप होतो का? प्लिज पूर्ण review द्या.

माझा बजाज एफ-एक्स १३ फूड प्रोसेसर फारच त्रास देत आहे. त्याच्या कामाच्या योग्यतेमुळे मला खरंतर हे प्रोडक्ट आवडत होतं पण त्या मशीन आणि मोटारचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. वापर फक्त गेली २ वर्षे केलाय पण वारंवार गरम होऊन बंद पडणे, वाटण वाटत असताना मध्येच वेगळा आवाज आणि व्हायब्रेशन होऊन मशीन टेबलावरून हलणे असा फार त्रास होतोय. बदलायच्या विचारात आहे तर भारतात इतर कुठल्या ब्रॅण्डचा बजाज एफ-एक्स १३ सारखीच सर्व अटॅचमेंट्स असणारा (मला ज्युसर -मिक्सर ग्राइंडर आणि फूड प्रोसेसर एकत्र हवं आहे )आणि तशीच कामे करणारा इतर ब्रँड चांगला आणि विश्वसनीय फूड प्रोसेसर कोणता घेऊ याबद्दल मदत करा.

रच्याकने बजाजच्या वेबसाईटवर किंवा इतर कुठेच बजाज एफ-एक्स १३ फूड प्रोसेसर दाखवत नाही मात्र फक्त विजय सेल्स मध्येच उपलब्ध आहे असे का असू शकते?

माझं मत इनाल्साला. माझ्याकडच्या फूड प्रोसेसर १७-१८ वर्षं झालीत. तेव्हा तो मायक्रोवेव्ह सोबत फुकट मिळाला होता.
https://www.inalsaappliances.com/collections/food-processing/food-processor
माझ्याकडच्याला चटणीचं भांडं आणि ज्यूसर ब्लेड नाहीए. पण आता सगळ्यांना दिसताहेत.

भरतजी आणि किल्ली, प्रतिसादाकरिता धन्यवाद.
भरतजी, इनाल्स पहिल्यांदाच ऐकतेय. ब्रँड, ड्युरेबिलिटी आणि सर्व्हिसिंग विषयी थोडी अजून माहिती द्याल का?
किल्ली, मॉडेल कोणते?

माझ्याकडे प्रीतिचा झोडियाक मिक्सर ग्राइंडर + फुप्रो आहे. चांगला आहे. ज्यूसरच्या भांड्याला नारळाचं दूधही काढण्याची सोय आहे. यूट्यूबवर व्हिडिओ आहेत.

इनाल्सा चांगला ब्रँड आहे. टोस्टरही वापरलाय.(तोही मिळालेला. विकत घेतला नव्हता)
फुप्रो ला सर्व्हिसिंगची गरज पडलेली नाही.
फक्त आमचा वेगळा मिक्सर असल्याने आम्ही याचा मिक्सर ग्राइंडर क्वचित वापरतो.

इनाल्सा बेस्ट आहे. आम्ही 97 साली घेतलेला ऑगस्ट2018 पर्यंत चालत होता. अजूनही मोटर छान आहे. बाऊल तुटला आणि जिथून घेतला तो दुकानदार अँडवान्स घेऊन 6+ महीने झाले तरी नवे बाउल देईना. मग भांडून पैसे परत मिळवले आणि बजाजचा फुप्रो+ मिक्सर आणला. मिक्सर फिलीप्ससारखा छान पटकन वाटण वाटत नाही. आणल्यावर दोन दिवसात ऑपरेटर नॉब निखळला. मग ते बदलून आणले. 3 दिवसांपूर्वी बेसवरच्या प्लॅस्टिक चे तुकडे झाले आणि मिक्सर, फुप्रो बंद पडला. आता विक एंडला परत वरात काढायला लागणार. इनाल्सा इज द बेस्ट. त्याचे बाउल मिळाले तर तो पुन्हा वापरायची तयारी आहे. नवीन घ्यायला गेले तेव्हा मार्केटमध्ये इनाल्सा दिसला नाही.

मी थोडी मागची पाने चाळली पण हवी ती गोष्ट मिळली नाही. मला एक सांगा अमेरिकेत राहणार्‍या लोकांनो, तुम्ही आलं लसूण पेस्ट करायला काय उपकरण वापरता?ते मनासारखं काही मला सापडलेलं नाही. ब्लेंडटेक फार मोठा आहे, मॅजिक बुलेट सुद्धा मोठाच पडतो आलं लसूण पेस्ट साठी.

शूम्पी, तुम्ही लोक घाऊकमध्ये आलं-लसूण पेस्ट बनवत नाही का? तशी केलीत तर मग कुठलाही मिक्सी चालावा. आम्ही थोडी हळद, तेल व मीठ घालून करतो. ट्राय कर.

शूम्पी माझ्याकडे ऑस्टरचा ब्लेंडर आहे. फार पूर्वी मेसीज मधे घेतलेला होता. तो २५ वर्षे चालला. तो मोडल्यावर टार्गेट्मधून परत एक ऑस्टर ब्लेंडरच घेतला . मुंबैत भांड्याकुंड्यांचा दुकानात ' ऑस्टर के लिये ब्लेंडर जार चाहिये ' म्हटलं तर इथल्या ऑस्टरला बरोबर फिट होणारे स्टीलचे जार मिळतात. साधारण ८ -१० आंउस कपॅसिटीचे असतात. मी एक जार कॉफी बियांसाठी आणि एक इतर मसाल्यांसाठी वापरते. गोडा मसाला, दाण्याची / तिळाची चटणी, पाणीपुरीच्या चटण्या, आले लसूण वाटण हे सर्व त्यात बेस्ट होतं. अगदीच २-३ पाकळ्या लसूण असेल तर दगडी खलबत्त्यात करते.

त्या जारमधे आले लसूण पेस्ट मी बहुतेक वेळा साधारण अर्धा - पाउण कप होइल इतकी बनवते.

मी इथे वर लिहिले आहे - प्रीति ( Preethi Eco Twin Jar Mixer Grinder) आहे माझ्याकडे २ वर्षापासून , आले लसूण मिर्च्या, मसाले वगैरे वाटणं त्यातच करते.

२-३ ते ७-८ लसूण पाकळ्या असतील तर मी पण खलबत्त्यातच करते.
मी वेका म्हणते तसं विकेंडला जास्ती प्रमाणावर म्हणजे २०-३० पाकळ्या + आलं असं करून ठेवायला विचारत आहे स्पेसिफिकली.
माझ्याकडे पण ऑस्टरायझरचा एक लहान जार आहे ४५६ औंसांचा. तो ऑस्टरायझरचा मिक्सर केवळ त्या जार साठीच ठेवला आहे. पण त्यात भरपूर लिंबूरस घातल्यावाचून आणि कंटाळा येइतो फिर्वल्यावाचून पटकन होत नाही अगदी गुळगुळीत पेस्ट. त्याचं वॉटेज ४५० आहे. तो मला अज्जिबातच आवडत नाही.

वेका मला शक्यतो हळद/तेल न घालता करायचं आहे. ते घातल्याने काय फायदा होतो? मीठ घालायला काहीच हरकत नाही, त्याने जास्ती टिकेल असं वाटतय.

शूम्पी, मीही लहान क्वांटिटी असेल तेव्हा खलबत्त्यात किंवा मग सुरीनेच बारीक कापून वापरते.
मोठ्या प्रमाणावर हवं असेल तेव्हा अंजली सुमीत च्या मिक्सर मध्ये. तो अंजलीनेच रेकमेण्ड केला होता Wink

फार गंध (म्हणजेच स्मूथ ना?) वाटणाची मला फारशी गरज पडलेली नाही. तेव्हा भरड झालं तरी चालवून घेतलेलं आहे. पण ह्या अंजली च्या मिक्सर मध्ये झकास होतात सगळ्या प्रकारची वाटणं. तीन जार्स आहेत टोटल. मला सहज कुठे त्या चर्चेची लिंक सापडली तर देते शोधून.

Pages