निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागूले अगं एवढी हुशार असते तर इथे नोटेशनच लिहून दाखवलं असतं. सोडलं असतं का? आँ?

पुर्वी सौंदर्याचे सगळे मापदंड निसर्गातलेच होते.
>>>>हो दिनेशदा...पुलं नी कुठंतरी म्हटलंय की "भाजी बाजारच भरला की काय?"

मांजरी आयूष्याचा ७५ टक्के वेळ आराम करण्यात, २० टक्के वेळ स्वत:ची साफसफाई करण्यात आणि
५ टक्के वेळ खाण्यात घालवतात !

देवा, मला मांजर कर.

जामो Lol

जामोप्या Lol

मानुषी - हेच गाण का ते ?
बिंबाधरा, मधुरा विनयादिगुणीं मनोहरा मधुरा ॥
ती सुंदरा । विगुणा वरा । घटिता विधि पी काय सुरा ॥

कवि कालिदास कृत देवी दशश्लोकी स्तुतिः -

कंबावतीव स विडंबा गलेन नव तुंबाग वीण सविधा
बिंबाधरा विनत शंबायुधादि निकुरुंबा कदंब विपिने |
अंबा कुरञ्ग मद जन्ताळ रोचिरिह लंबालका दिशतु मे
शम बाहुलेय शशि बिंब अभिराम मुख संबाधित स्तन भरा ||

दिनेशदा, सकाळीच उगवत्या सूर्याचा रंग अगदि लालभडक असतो, म्हणूनच त्यालाही 'सुर्यबिंब' म्हणत असतील का?
जमोप्या Happy

दा,जागुताई प्रचि मस्तच घरी विचारतो खापर्‍या लागल्या तर बुकिंग करायला तुझ्याकडेच देतो Wink Happy

शांकलीजी - मनिची पिल्ले गोडच आहेत Happy

जागू, उन्हाळा संपला आता, पण या खापर्‍या पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी पण चांगल्या. धातूच्या किंवा प्लॅस्टीकच्या थाळ्यांची पक्ष्यांना भिती वाटू शकते.

अर्रे इनमीनतीन............येस्स! हेच ते नाट्यपद!
शांकलीची मनीची पिल्लं गोडच आहेत.
हं.........मी या मातीच्या खापर्‍या आणून पाणी भरून गच्चीच्या कठड्यावर ठेवल्या तर काही दिवसांनी पक्ष्यांनीच बहुतेक खाली पाडून फोडून टाकल्या. २/३ वेळा असं झालं आता गच्चीत खालीच ठेवीन. इथे २५ रु. ला एक अशी खापरी विकतात कुंभारवाड्यात. त्यांना माहिती असतं....ते विचारतात...पक्ष्यांसाठी ना?

"भटकत होतास की लग्न वगैरे केलेस "".. जागु मलापण हीच शंका आलेली!!
जिप्स्या.. आम्हाला आमंत्रण न देता असलं काही कर्णार नाही.. हो नारे ??>>>>>>>>:हाहा:

मानुषी चाल इथे लिहून दाखव>>>>>>>>:हाहा:

तुमाखमै>>> म्हणजे काय?

हो दिनेशदा, मी त्या ज्योतिष्मतीच्या खाली पडलेल्या फुलाचा असाच हातावर ठेवून फोटो काढला होता तो स्पष्ट आला होता. पुढच्यावेळी हे नक्की लक्षात ठेवीन. आणि ती निळी-पांढरी फुलं बघून मला वांगीवृक्षाचीच आठवण झाली.

जागू, हो ते दिंड्याचंच झाड असेल. कारण हे नाव पण त्या लोकांनी सांगितल्याचं आठवतंय.

ईन मीन आणि मानुषी धन्यवाद. पिल्लं आवडली म्हणून.

हेम, त्या फळांचं बोटॅनिकल नाव आहे Diplocletia glauscens.

तुमाखमै, म्हणजे तुच माझी खरी मैत्रिण.

शांकली, नावं काय ठेवलीत, पिल्लांची ? (माझ्या लेकीकडच्या बोक्याचे नाव, इची )

माणिक-मोती हे मी ठेवलेलं नाव आहे. भाटी आहे ती मणिक आणि बोका आहे तो मोती. पण मुलींना नाही आवडलेली ही नावं. (ह्यांना मात्र मांजरं अजिबात आवडत नाहीत आणि आम्हाला तिघींना खूप आवडतात.) पूर्वी आमच्याकडे पिढ्या होत्या मांजरांच्या. भुरी - तिची पिल्लं केशू आणि उलुकी (ही अगदी घुबडासारखी दिसायची म्हणून ती उलुकी.) तिच्या मुली बेरकू आणि ठिपकू! मधे एकच असंच सोडलेलं पिल्लू आलं होतं ते हरणू. आणखी एक मनी यायची ती भामटी. तिच्या मुलीला आम्ही सुंदरी म्हणायचो. मागच्या वर्षी एक जखमी मनी आली होती. ४-५ महिने होती आमच्याकडे. नोव्हेंबरमधे ४-५ दिवस आम्ही कोकणात गेलो होतो तेव्हा बहीण तिला खायला-प्यायला द्यायची. पण आम्ही परत आल्यानंतर ३-४ दिवसांत ती समोरचा रस्त क्रॉस करून घरात येताना कार खाली सापडून गेली. :अरेरे:...............

..........तेव्हा पासून आम्ही ठरवलं होतं की घरात आत कुठलाही प्राणी पाळायचा नाही. पण ही पिल्लं कुणी तरी सोडली मग रहावलं नाही आणि मन धजावलं नाही त्यांना कुठेतरी सोडून देण्यासाठी. पण अजून थोडी मोठी झाली की सातारारोडवर पाषाण्कर शोरूम पाशी मासे विकायला तिथल्याच वस्तीतल्या बायका बसतात तिथे सोडून देऊ. आधीची मांजरं आम्ही मोठी झाल्यावर तिथेच सोडली होती.

मी खूप लांबण लावली ना!

छान आहेत नावे.
मलापण तशी मांजरे आवडत नाहीत, कुत्रे खुप आवडतात. त्यामूळे गुंतणे समजू शकतो.
आमच्या घरच्या कुत्रांची नावे बॉल, काळू, बॉबी आणि डिंपल... आता सध्या कुणी नाही.

हं...........हेच जास्त वाईट अस्तं! आणि हे सगळे प्राणी; मांजरं काय किंवा कुत्रं काय, अगदी अंगणात घरटं केलेले पक्षी काय खूप लळा लावतात. आणि त्यांच्यात गुंतणं हे फार त्रासदायक ठरतं आपल्यासाठी. जागूकडे जसे बुलबुल घरटी करतात तसेच सेम आमच्या अंगणात झाडा-वेलींवर अ‍ॅशी, बुलबुल,शिंपी,शिंजीर हे सगळे घरटी करतात. दोनदा ससे पण आणले होते. एकदा ह्यांनी साप आणला होता. होता गार्डन स्नेकच. पण तोही २-३ दिवसांचा पाहुणा म्हणून होता घरात. एकदा माझ्या बहिणीला आमच्या अंगणात छोटा साप दिसला; मी तो पकडून भोकं पाडलेल्या बाटलीत ठेवला होता. ह्यांनी मग घरी आल्यावर सोडून दिला होता. ती बहुधा पिल्लू धामण असावी. समोरच्या टेकडीवर गवतात सोडून दिला त्याला.

एकदा ह्यांनी साप आणला होता.होता गार्डन स्नेकच.
एकदा माझ्या बहिणीला आमच्या अंगणात छोटा साप दिसला; मी तो पकडून भोकं पाडलेल्या बाटलीत ठेवला होता. ह्यांनी मग घरी आल्यावर सोडून दिला होता. ती बहुधा पिल्लू धामण असावी. >>> काय घाबरवताय काय आम्हाला Wink

नाही रे नितीन, आमच्या घराच्या समोर आत्ता आत्ता वस्ती झालीये. माझी बहीण समोर रहायला आली तेव्हा तिच्या मागच्या बाजूला टेकडीचा उतार आहे. तिथे मोर यायचे. आणि आत्ताही टेकडीवर पाचगाव पर्वती हा वनविभागच आहे. वर जंगलच आहे. तिथे सापच काय,रानससे, हरणं,तरस, खोकड, साळिंदर,असे अनेक प्राणी आहेत. खरंतर आम्हीच इथे उपरे आहोत. मूळ जागा या प्राण्यांचीच आहे. आमच्या अंगणात नेहेमी साप दिसतात. सध्या ३-४ मुंगुसं असल्याने (म्हणजे त्यांनी अतिक्रमण केल्याने) साप फारसे दिसत नाहीत.

पण एक आहे; या कुठल्याही प्राण्याची भिती नाही वाटत. उलट त्यांची आठवणच येते. ते सगळे इतके निरागस आणि स्वाभाविक असतात ना की आपल्यामुळेच झाला तर त्यांना त्रास होईल; त्यांचा त्रास बिलकुल नाही होणार. (मात्र नाकतोडे, प्रेईंग मँटिस अशा किड्यांना मी खूप घाबरते.)

@ पावसाची चाहूल लागली !! मस्त फोटो आहेत. इथे सौदीत आता चांगलच तापायला लागल आहे. काल रात्री आठ वाजता अचानक जमीनी कडून समुद्राकडे वारे वाहू लागले अन बघता बघता तापमान ४० डिग्री सें पर्यंत गेल. समुद्रकिनार्‍यावरून मुकाट घरी परतलो . एक छान कविता फोटो पाहून आठवली......गडद निळे गडद निळे, जलद भरून आले !! http://www.marathiworld.com/newmw/?q=bborkar

माणिक-मोती, भुरी - तिची पिल्लं केशू आणि उलुकी, बेरकू आणि ठिपकू, हरणू, भामटी, सुंदरी......
बॉल, काळू, बॉबी आणि डिंपल.... मस्त नावे आहेत. आमच्या ईथे बोका होता, त्याचे नाव 'ढोंगी' ठेवले होते.

माझ्या भावाला प्राणी पाळायची खुप आवड होती. कुत्रा धार्जीन नाही म्हणुन आईने घरात कधीच कुत्र्याचे पिलू आणु दिले नाही. त्याने हट्ट करुन कोंबडी पाळली होती. (त्यामुळे आम्हा बहिणींना मांजर घरात आणता आली नाही) मग तिला ७-८ पिले झाली. त्यातून २ कोंबड्या जगल्या. त्यामुळे पुढे घरात भरपूर अंडी साठू लागली. आई ती कामवाल्या बाईला देऊन टाकायची. पण बाल्कनी खुपच खराब होत होती मग आईने कोंबड्या सुद्धा तिला देऊन टाकल्या.
एके दिवशी खारीचे पिल्लु आणले. पण ते खुप घाबरलेले आणि उदास वाटले म्हणुन त्याने सोडून दिले.
बुलबुल आणले काही दिवसानी ते घरभर छान फिरू लागले. मग एके दिवशी बुलबुलची एक जोडी आली आणि त्यांच्याबरोबर ते पळुन गेले(माझ्या भावाला फसवुन Happy ). नंतर पोपटानेही तसेच केले.
मुंगुस तर एक दिवससुद्धा नाही थांबले. घरात आणले आणि पिंज-यात ठेवताना हातातुन जे निसटले ते परत सापडलेच नाही. घारीचे पिलु जखमी अवस्थेत सापडले. तेव्हा २ दिवस त्याची सेवा करुन आम्ही दोघांनी त्याला कात्रजच्या सर्पोद्यानात दिले. सापाचे पिलू सापडले तेही सर्पोद्यानात दिले. ससे आणले तर ते सतत चरायचे आणि सगळीकडे घाण करायचे म्हणुन तेही मित्रला दिले.

एकदा ह्यांनी साप आणला होता. होता गार्डन स्नेकच. पण तोही २-३ दिवसांचा पाहुणा म्हणून होता घरात.>>> म ला तर झोपच लागली नसती.

सोनाली Happy
बोक्याचं नाव अगदी पर्फेक्ट आहे हं! आमच्या मागच्या वहिनींकडे एक बोका येतो त्याचं नाव भॉक आहे!
तुमच्याकडे पण प्राण्यांचं इतकं प्रेम आहे हे वाचून खूपच मस्त वाटलं.

नावं माहित नाही आहेत...पण प्रत्येक वसंतात ही आणि आणखी काही रंगीबेरंगी फ़ुलं पाहायला आवडतं..तिसरं मला वाटतं गुलाबाच्या जातीतलं आहे पण हे फ़क्त मी वसंतातच फ़ुलताना पाहते नंतर थंडी येईपर्यंत नुस्ती बोंडं असतात...फ़ुल नाहीच...
SpringFlowers

आज नभ भरुन आलेय बाहेर..

बाकी लोक पावसाळ्याला कितीही सुंदर म्हणोत, मला मुंबईतला पावसाळा अजिबात आवडत नाही.

पाउस कोसळत असताना हातात चहाचा कप पाहिजे, बाजुला गरमागरम खेकडाभज्यांची डिश पाहिजे आणि त्याच्या बाजुला मनातली सोबत पाहिजे.

पाऊस कोसळत असताना हातात वा-याने सतत उलटी होणारी छत्री घेऊन बसची वाट पाहणे किंवा भरदुपारी गाडीचे दिवे लाऊन गाडी चालवणे यात काही राम नाही ....

आज नभ भरुन आलेय बाहेर..>>> अगदी कालपासुन पावसाची आठवण येतेय. मी तर गारवाची गाणी ऐकायला सुरुवात पण केलीये. Happy

पाऊस कोसळत असताना हातात वा-याने सतत उलटी होणारी छत्री घेऊन बसची वाट पाहणे>>>>त्यात पण एक वेगळीच मज्जा आहे. Happy Happy

Pages