निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रभात.

साधना आज सकाली खुप काळे ढग जमा झाले होते. अस वाटल आता पाऊस पडणार पण थोड्या वेळातच कडकडीत उन पडल.

शांकली साप पाळायला आणण हे पहिलांदाच ऐकल. शशांक मान गये आपको. शांकली तुझ्यासारखीच मलाही ह्या प्राण्यांची विशेषकरून सापांची वगैरे भिती वाटत नाही. कारण ते त्यांच्या विश्वात रममाण असतात. त्यांच्याच ठरलेल्या जागेत फिरत असतात. कालही माझ्या जाऊबाईंना मोठा साप आमच्या कुंपणा बाहेर दिसला. तो आमच्या जागेचाच आहे. पक्षी ओरडले की आम्हाला ह्याचे दर्शन मिळणार हे ठरलेले असते. तसेच लहान पणापासून माझ्या माहेरीही साप पहायची खुप सवय आहे. तिथे तर सुर्य कांडारी आमच्या घरातही यायच्या कधी कधी. साप फिरताना नेहमी दिसायचे. एकदा माझ्या वडीलांना शेतावर गेले तेंव्हा जनावर चावल होत. आम्ही विषारी असेल म्हणून घाबरलो पण ते नशिबाने बिनविषारी होत. माझ्यावडीलांना चप्पल न घालता शेतात जाण्याची सवय अजुनही आहे. बहुतेक तेंव्हा त्याच्यावर त्यांचा पाय पडला होता.

सध्या आमच्याकडे बुलबुल घरट बनवतच आहे. खारि माकडांप्रमाणे ह्या झाडावरून त्या झाडावर करतच असतात. भारद्वाज सकाळी संथपणे फिरत असतात. इतर पक्शीही आपाअपल्या झाडांवर संचार करत असतात. कुत्रा आहेच. दिनेशदा, साधना, जिप्सि, मामी यांनी पाहिलाय.

मला खुप आवडतो मुंबईचा पाऊस. लहानपणापासून ओळख आहे ना !

अगदी रस्त्यावरच्या पाण्यातून चबळॉक चबळॉक आवाज करत चालणे, सांडलेल्या पेट्रोलमधे दिसणारे इंद्रधनुष्य, अचानक उगवणारे तेरडे, आघाडा, टाकळा, फुलणारा सोनटक्का, नरीमन पॉईंटला उसळणार्‍या लाटा, रखडत चाललेली रेल्वे, पावसाळी भाज्या, गवती चहा, रंगीबेरंगी छत्र्या, पावसाळी सहली, खंडाळा घाट, कर्नाळा .. सगळेच आठवते.

आफ्रिकेत रोज पाऊस पडत असला, तरी एकदाही भिजण्याचे धाडस केले नाही अजून. रौद्र वाटतो हा पाऊस.
आडवातिडवा कोसळतो, भयानक आवाज, मोठेमोठे थेंब.. घरीच बसून राहतो.

नमस्कार !
घरी सुध्दा काही पक्षांनी, खारुताईने आंब्याच्या झाडावर घरटे बांधने सुरु केले आहे.
पावसाची चाहुल लागलेली दिसते.

त्यात पण एक वेगळीच मज्जा आहे. >> जिप्स्या अशी नुसती हुल देऊ नकोस. पक्की बातमी दे.

वेका फुले मस्त आहेत. मोठा फोटो टाकता येइल का?

दिनेश, मुंबइचा पाउस आवडतो????? इतका वाइट पाउस दुसरा नसेल असे माझे मत. म्हणजे पाउस चांगलाच असतो पण या शहराने जे दिमाखाचे वस्त्र ओढलेले असते ते तो भिजवून पारदर्शक करतो. मग उघडी पडते ती त्याची बकालता, कुरुपता.

मलाही पाऊस खुप आवडतो. पुर्वी अती पावसामुळे शाळेला सुट्टी मिळायची तर कधी आमच्या समोरचा विरा भरून इतका वहायचा आणि पाणी घुडघ्यापर्यंत रस्त्यावर यायचे. मग जातानाच शाळेचे कपडे ओले होणार म्हणून कधी कधी घरूनच शाळेला दांडी मिळायची. मग काय घरी होड्या सोडा, पावसात भिजा, झाडांच्या फांद्या लावा अशी गंमत चालायची. मला फक्त पावसाळ्यातील विजा नकोशा वाटतात. बाकी मी कशालाच घाबरत नाही पण विजेला घाबरते. पावसाची चाहुल लागताच पावसाळी भाज्या चालू होतात. करांदे आम्ही स्वतः खणून उकडायचो. हळदीची मुळे, शेत लावणी तर आहाहा. पहिला शेतात आवण म्हणजे रोप करणे ते उगवले की गालीचासारखेच दिसायचे. मला शेतात डूबुक डुबुक करायला पण आवडायचे. नांगर फिरवणी, मग त्यावर आळी फिरवायची. ती त्या आळीवर मी लहान असताना बसायचे. मग शेते पाण्याने भरली की आवण काढणे म्हणजे रोपं काढून त्यांच्या गुंड्या म्हणजे जुड्या बांधायच्या. त्या पाण्यावर तरंगायच्या. मग त्या दुसर्‍या शेतात नेउन लावायच्या. हे करताना येणारा त्या रोपांचा हिरवा सुगंध अजुन दरवळतो आहे. मग शेतावर भर पावसात झाडाखाली बसुन चहा-बटरचा आस्वाद (डोळे भरले आता माझे पाण्याने कारण आता ती शेतेच राहीली नाहीत.)

सुप्रभात लोकहो
पाळीव प्राण्यांवर चाललंय म्हणून लिहिते. माझा लेक प्राणिमित्र. शाळेत(५वी/६वी) असताना एकदा त्याने संध्याकाळी मासळीबाजारातून डोकमासे विकत आणले. पैसे बाबांकडून घेतले. बाजार घराजवळच आहे. एका मित्राबरोबर गेला. घरी आल्यावर म्हणाला आपण पाळू. मी अगदीच अनभिद्न्य. मी त्याला बादल्या आणि पाट दिले. त्याने बादल्या, टब पाण्याने भरून त्यात हे मासे सोडले आणि त्यावर पाट झाकण घालून ठेवले. रात्री हे सगळं चौकात होतं. हा चौक ओपन टू स्काय आहे. इथे एक छोटी नाली आहे ज्यातून किचनमधलं पाणी जातं.
सकाळी उठल्यावर एक विचित्र दृश्य दिसलं.गोल बादल्यांवर चौकोनी पाटाची झाकणं ...त्यामुळे त्यांना बाहेर यायला जागा होत्या.बरेचसे मासे बादल्यातून उड्या मारून बाहेर आलेले होते. आणि चौकात एक मत्स्यनृत्य
चालू होतं. तेव्हा मला कळलं की हे डोकमासे ऍंफ़िबियन्स(उभयचर??) असतात.
मग मात्र सर्वानुमते त्यांची रवानगी शेजाऱ्यांच्या हौदात झाली. नंतर कित्येक दिवस लेक त्यांना भेटायला जायचा. पुढे काय झालं आता विसरले. एकदा त्याने बाजारातून कोंबडीची रंगीत पिल्लं आणली होती.
मग काही वर्षं आमच्या पाण्याच्या हौदात "नॅन्सी" नामक कासवही होतं.
मांजर येऊन जाऊन असायची. पण आता "लुई" मुळे मांजरं फारशी येत नाहीत.

त्यात पण एक वेगळीच मज्जा आहे.

हो.. तुला वाटणारच.... ..

इथे भिजलेल्या कपड्यांमध्ये हाफिसातल्या एसीत बसावे लागले की कळते..

पावसाचे लिहायला गेले तर इतक्या आठवणी भरून आल्या आहेत की एक लेखच लिहावासा वाटतोय.

आमच्या इथे सध्या यांचा गोंधळ चालु आहे. जिप्स्या बायको म्हणते का अस सगळ्यांना ? Lol

जिप्स्या अरे मला आधी फोटोच दिसले नव्हते म्हणून मी वरचा तसा प्रतिसाद दिला. आत्ता दिसले. खुप सुंदर फोटो आहेत. आमच्या घरात सध्या ह्यांचा गोंधळ चालू आहे.

आमच्या इथे सध्या यांचा गोंधळ चालु आहे.>>आपल्या गोंधळापेक्षा निसर्गाचा/ निसर्गाती पशुपक्षांचा गोंध़ळ आल्हाददायी आहे. Proud

पाण्याने भरली की आवण काढणे म्हणजे रोपं काढून त्यांच्या गुंड्या म्हणजे जुड्या बांधायच्या. त्या पाण्यावर तरंगायच्या. मग त्या दुसर्‍या शेतात नेउन लावायच्या.>>> हे नक्की कशासाठी करतात? रोप जेथे उगवते तेथेच का राहु देत नाहित?

जिप्सी मस्त फोटो. ३-४ मधे त्या पिंपळपानाचा अँगल असा पकडला आहे जसे समोरिल फांदिवर पण एक चिमणी बसली आहे.

पुर्वी आमचा रस्ता हे आमच्या समोरील शेत होते. त्यामूळे शेतातूनच जावे लागे. आमच्याकडे पुर्वी एक आयुर्वेदीक डॉ. ठाण्यावरून यायचे. सत्संग मध्ये ते कार्यरत होते. रहायलाच असायचे एक दिवस ते आमच्याकडे. आदल्यादिवशी पाउस नव्हता तेंव्हा ते आले. त्याच रात्री पाउस जोरदार पडला व शेत भरले. दुसर्‍या दिवशी त्यांना आमच्या ओळखीच्या व्यक्तींकडे न्यायचे होते. मी ५ वित असेन तेंव्हा वडीलांनी मला त्यांना तिकडे न्यायला सांगितले. त्या डॉ. ना प्रश्न पडला ह्या पाण्यातून कसे जायचे. मी त्यांचा हात पकडून त्यांना नेले. त्यांना इतके माझे कौतुक वाटले की ते नंतर आल्यावर माझ्या वडीलांना सांगू लागले. मला बोट धरून बाळकृष्ण नेतोय असे वाटले. व मी मोठी झाल्यावर खुप मोठी व्यक्ती होईन असे त्यांच्या परीने मला भरपूर आशिर्वाद दिले. माझ्या वडीलांना वाटले मी आता बहुतेक राजकारणात जाणार Lol पण ते माझे नावडते क्षेत्र.

जागु,'सुर्य कजागु,'' आता ह्ये प्रकरण काय आहे गं बाई???

तू आता पावसाळ्यातल्या आठवणींवर लिही बरं छान सविस्तर.. इकडे इतकं गोड गोड लिहित बसलीयेस.. सेपरेट्च लिही.्एच सांगायला आले होते इकडे.. Happy

हे नक्की कशासाठी करतात?>>>> मोनाला पडलेला प्रश्न मलाही अनेक दिवसांपासून पडला आहे. अन्य धान्यांसारख भाताच का नाही? म्हणजे अस की तिफण वापरून एका रांगेत बीज पेरतात मग पीक कापणीला येइतो रोप जिथे उगवल तिथेच वाढत. कदाचित कापणीला सोप जाव यासाठी भाताची रोप उपटून परत लावणी करत असावेत जेणे करून रोपाचे जुडगे एकत्र पकडून सहज कापता यावेत. अर्थात हा माझा तर्क आहे खर कारण जागु सांगेल.

मोनाली शेतात २-३ बिया एका जागी पेरणे शक्य नसते. शिवाय. शेतात जमीन पावसात चिकट म्हणजे बसते. मग रोपांच्या मुळांना ऑक्सिजन कमी मिळते. म्हणून दुसर्‍या शेतात नांगरणी करुन ती जागा सुटी-भुसभुशीत केली जाते. तसेच इतर छोटी झाडे चांगली वाढण्यासाठी जसे आपण वरुन कटींग करतो तसे ह्या भाताची मुळे काढताना थोड्या प्रमाणात तुटल्याने त्या रोपांची चांगली वाढ होते.

जिप्स्या, कुठले पक्षी हे ?

ती भातलागवडीची जपानी पद्धत आहे. तिथे त्याला सायोटामा (का असेच काहीतरी) नाव आहे. या पद्धतीने
रोपांची वाढ जोमदार होते आणि उत्पादन जास्त येते. लालबहादुर शास्त्रींनी आपल्याकडे हिचा प्रसार केला.
जपानमधे मात्र हजारो वर्षे ती होतेय. (मी मागच्या पानांवर सविस्तर लिहिले आहे.)

शांकली तुझ्यासारखीच मलाही ह्या प्राण्यांची विशेषकरून सापांची वगैरे भिती वाटत नाही. कारण ते त्यांच्या विश्वात रममाण असतात. त्यांच्याच ठरलेल्या जागेत फिरत असतात. कालही माझ्या जाऊबाईंना मोठा साप आमच्या कुंपणा बाहेर दिसला. तो आमच्या जागेचाच आहे. पक्षी ओरडले की आम्हाला ह्याचे दर्शन मिळणार हे ठरलेले असते. तसेच लहान पणापासून माझ्या माहेरीही साप पहायची खुप सवय आहे. तिथे तर सुर्य कांडारी आमच्या घरातही यायच्या कधी कधी. साप फिरताना नेहमी दिसायचे. >>>>>>>>>>>>अगदी माझं पण असच झालय. कोकणात घरात साप यायचे. विंचू , गोम तर घरात असायचे. एकदा भावाला घरी विंचवाने दंश केला होता. खूप तळमळत होता. वेग मारत होते. Sad नंतर डोली करून डॉ़क्टर कडे नेले. पण दहावीची परिक्षा जवळ आली होती. आणि तो आमच्यापासून लांब हॉस्टेलवर रहायला होता. तिकडे निघाला असतानाच. चहा प्यायला बसला आणि आईने तिच्या खांद्यावर झुरळं आहे वाटून झिडकारलेला विंचू भावाला दंश करून गेला. फार त्रास झाला पण त्याला.

शेत लावणी तर आहाहा. पहिला शेतात आवण म्हणजे रोप करणे ते उगवले की गालीचासारखेच दिसायचे. मला शेतात डूबुक डुबुक करायला पण आवडायचे. नांगर फिरवणी, मग त्यावर आळी फिरवायची. ती त्या आळीवर मी लहान असताना बसायचे. मग शेते पाण्याने भरली की आवण काढणे म्हणजे रोपं काढून त्यांच्या गुंड्या म्हणजे जुड्या बांधायच्या. त्या पाण्यावर तरंगायच्या. मग त्या दुसर्‍या शेतात नेउन लावायच्या. हे करताना येणारा त्या रोपांचा हिरवा सुगंध अजुन दरवळतो आहे. >>>>>>>>>>>>जागू, अगदी डोळ्यासमोर आलं ग सगळ. हे सगळ लहानपणी अनुभवल. पण आता खूप वाईट वाटत, यातल काहीच आपण करू शकत नाही. Sad

शोभे विंचवाचा दंश २४ तास दुखतो ना.

गेले त्याबद्दल नाहि काही करू शकत पण आता परत शेती करावी असे वाटते. पण हल्ली फार कठीण झाले आहे सगळे. एकतर शेत मिळणच कठीण झालय त्यात मिळालेच तर मजूर मिळत नाही.

जिप्स्या, फोटो छानच आहेत. आता फक्त नाव सांग. Happy
त्यात पण एक वेगळीच मज्जा आहे. >> जिप्स्या अशी नुसती हुल देऊ नकोस. पक्की बातमी दे.>>>..माधव अनुमोदन. (आधीचं अर्ध वाक्य त्याच्या मनातच आहे :डोमा:)

शोभे विंचवाचा दंश २४ तास दुखतो ना.>>>>>हो. पण नंतरही थोड्या थोड्या वेदना होत्याच. Sad आणि तेव्हा तो फक्त दहावीत होता.

गेले त्याबद्दल नाहि काही करू शकत पण आता परत शेती करावी असे वाटते. पण हल्ली फार कठीण झाले आहे सगळे. एकतर शेत मिळणच कठीण झालय त्यात मिळालेच तर मजूर मिळत नाही.>>>>.चल आपण करू आता शेती. पण पुढच्या वर्षी. Wink

Pages