निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधव, इंपाला आपल्याकडे असतात का? (अर्थात इमू सुद्धा बाहेरचेच आहेत. त्यांच्याप्रमाणेच इंपालासुद्धा इंपोर्ट होऊ शकतात. Happy )

क्रौंच पक्षी कसा दिसतो मला माहित नाही.

जागू -
प्र चि १ - blue- yellow macaw मकॉव
प्र चि ५ - Indian sarus crane म्हणजेच सारस पक्षी
आणि ती वेल - कर्टन क्रीपर

ही थायलँड मधे भेटलेली काही फुलं.जाणकार लोकं त्यांची नावं सांगतील अशी खात्री आहे(च) !! Happy
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

शेवटचे झाड रा.बा.त पण आहे ना - कृष्णवडाच्या वाटेच्या कोपर्‍यावर?

जागू, ते अनंत नाहिये. त्याच कुळातले दुसरे झाड आहे ते.

माधव ते संकरीत अनंत आहे. माझ्याकडे पण आहे ते झाड. पण मला ओरिजनल अनंतच आवड्तो. तोही माझ्याकडे आहे. पावसात अगदी भरभरून फुलतो.

लिली.. अगं इतक्या मोठ्या साईझ चं फूल होतं कि ओळखायलाच आलं नाही मला..
अनंताचंही मला मोट्ठं झाड असतं वाटलेलं.. झुडुप असतं आत्ताच कळ्ळं Happy

वर्षू अनंताच झाड होत ग. आणि तू दिलेल्या वरचे झाड नाही वाढत जास्त. तरी माधव म्हणतात त्याप्रमाणे त्याच नाव वेगळ आहे का ते शोधायला हव.

वर्षू, ते मला डिकेमाली वाटतय. मधल्या केसरांवरून. तरी खात्री करून घ्यायला कळी तोडून बघ. तोडलेल्या जागी झाडातून डिंक आला तर नक्कीच डिकेमाली आहे. अनंतातून असा स्त्राव येत नाही. त्या डींकाचा फोटो -

गौरी, मांजर ७ व्या मजल्यावरुन धडपडुन खाली पडले तरी त्याला काहीही होणार नाही. त्याला निसर्गतयःच कसेही पडले तरी शेवटी चार पायांवर आपला तोल सावरता येतो. मरणार अजिबात नाही.

आणि तरीही मेलेच तर घाबरु नकोस, a cat has nine lives Happy

माधव, तो डिंकाचा फोटो आहे???????/ मला वाटले जिप्स्याचा हरणटोळ तोंड उघडुन भक्ष्याची वाट पाहतोय.

माधव, तो डिंकाचा फोटो आहे???????/ मला वाटले जिप्स्याचा हरणटोळ तोंड उघडुन भक्ष्याची वाट पाहतोय.>>>>>>>>साधने Lol

जागू, ती पांढरी तामण आणि ते झाडही रबराचेच आहे. रबर हे भारतीय झाड आहे. (हे सर्वच फायकस कूळ
भारतीय आहे.)

शांकली कडची मांजरीची पिल्ले, फेसबुक वर झळकताहेत !!

वर्षू, दोन नंबरचे शोभिवंत (शोभेच लिहिणार होतो ) केळी कर्दली कुळातले वाटतेय. नायजेरियात अशी उलटी (म्हणजे वरच्या दिशेने केळफूल) केळी लागणारी झाडे आहेत. आकाराने लगान असतात पण जास्त गोड
लागतात. हा घड आणि त्याचे केळफूल, दिसायला पण सुंदर दिसते.

माधव,
डिकेमाली, अंधेरीला महाकाली गुंफांजवळ आहेत असे दुर्गा भागवत यांनी लिहून ठेवलेय. त्याचे फूल जरा
मोठे आणि मांसल असते. पण ओळखायची खात्रीची खूण म्हणजे त्याचा तो वास.
तो वास, लहान बाळाची अंघोळ, त्याचे धूप दिलेले जावळ, काजळ, तीट... अशा सगळ्या आठवणी एकदमच येतात.

वर्षूतै, पहिलं फूल स्पायडर लिलीचं आहे, दुसरं दिनेशदा म्हणतात ते केळं आहे, तिसरं कोस्टस (म्हणजे आपलं कोष्ट कुळिंजन किंवा आजकाल इन्शुलिन प्लँट म्हणतात) ते आहे, आणि शेवटचं डिकेमालीचंच आहे.

जागू, ती कर्टन क्रीपर आहे ना; ती इथे अनेक बंगल्यात कुंपणांवर सोडलेली असते आणि खालून अगदी एका रेषेत ती कापलेली असते; त्यामुळे मी तिचं नाव 'साधना-कट'वेल असं ठेवलंय!......(साधना म्हणजे ती हिंदी फिल्म्स मधली! आपली साधना नाही!!)

माधव, तो डिंकाचा फोटो आहे???????/ मला वाटले जिप्स्याचा हरणटोळ तोंड उघडुन भक्ष्याची वाट पाहतोय.>>>>>>>>>>>>:हाहा:

शांकली कडची मांजरीची पिल्ले, फेसबुक वर झळकताहेत !!>>>>>>>> एक आठवड्यापूर्वी कुणीतरी ही दोन्ही पिल्लं अंगणात सोडून दिली... पण आम्हाला ती परत कुठेतरी सोडून देववेना. मग आता ती पण रहाताहेत घरी. मस्त खेळत असतात, बागडत असतात. माझ्या काही कुंड्यांची वाट लावलीये त्यांनी, पण त्यांना सगळंकाही माफ आहे. आईशिवाय आहेत.. मग त्यांचे लाड नको का करायला? मुली पण खूप खूष आहेत ह्या दोन पिल्लांमुळे. किती निरागस आनंद असतो त्यांना एकमेकांशी खेळत असलेलं बघण्यात..

जागू, सध्या बरेच दिवस झाले तू रोज एक नव्या फुलाचा फोटो देतियेस ती सगळी तुझ्या बागेतली दिसताहेत.... मस्त बाग आहे तुझी. आणि सगळी फुलं खूप मस्त आहेत. ही सगळी रोपं पण चांगली हेल्दी असणार!

लेकीच्या घरी पण बोका आहे. त्याला तयार कॅट फूड देते ती. पण अधून मधून तोंडाला चव येण्यासाठी तो
चिमण्या मारतो ( सराव असावा म्हणूनही करत असेल.) आणि मग त्या चिमण्या ओट्यावर मांडून ठेवतो.
(लेकिला उद्योग !)>>>>>>>>>> Rofl

आम्ही पण कॅटफूडच आणलंय. (आमच्याकडे नाहीतर बिचार्‍यांना फक्त दूध, किंवा दूध पोळीच मिळाली असती!)

(जरा इथे यायला उशीर झाला की इतक्या पोस्टस आलेल्या असतात की आठवून आठवून मागे जाऊन मग आपली पोस्ट लिहावी लागते.)

शांकली.. त्रिवार धन्स!!!! Happy
स्पायडर लिली.. वॉव्..पटलं नाव!!
माधव धन्स..डिंकाचं..अमेझिंग!!!
'साधना-कट'वेल''.. !......(साधना म्हणजे ती हिंदी फिल्म्स मधली! आपली साधना नाही!!)
Lol

खासच आहे शेवंतीचा रंग.

मला वाटले जिप्स्याचा हरणटोळ तोंड उघडुन भक्ष्याची वाट पाहतोय. >> Lol

मला आता क्रौंच पक्षाबद्दल सांगा कुणीतरी - असा पक्षी खराखुरा असतो ना? क्रौंच म्हणजेच जागूने ज्याचा फोटो टाकलाय तो सारस का?

गौरी, परीच्या छत्रीचा दांडा क्यूटच! कुठे बघायला मिळाली ही फुलं? त्यांची रचनाच किती सुंदर केलीये नै!

वर्षूतै, शेवंतीचा रंग मस्तय!

आमच्या समोर एकांच्या बागेत एक पाम आहे. सध्या त्याला केशरी रंगाच्या फळांचे घोस लागलेत. पानांचा आकार टिपिकल फॅन पाम सारखा आहे. पण हे झाड खूपच उंच आहे. ती हिरवीगार पानं आणि ही केशरी रंगाची घोसाने लगडलेली फळं किती गोड दिसताहेत म्हणून सांगू!

सुप्रभात.
ही फुले बटणा एवढी आहेत.

शांकली धन्स नावाबद्दल.

मग ते डिकेमालीच झाड माझ्याकडे आहे. पावसात त्याला फुल येतात. आता आले की माधव मी पण त्याला डिंक येते का पाहेन. पण त्या फुलाचा वास अनंताप्रमाणेच असतो आणि आकारही. फक्त भरगच्च नसत.

Pages