निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सगळ लहानपणी अनुभवल.>>>>>> + १
पण आता करु शकत नाही याच वाईट नाही वाटत, कारण आजही आईकडे गेल्यावर हे सगळं करता येत आणि पुण्यात त्या रम्य आठवणींमधे रमता येत.

शांकली,
तो साप बाटलीत भरण्याच्या किस्यावरुन मलाही एक किस्सा आठवला. वसईला आमच्या शेजार्‍यांची मुलगी साधारण २ - २.५ वर्षांची असतांनाची गोष्ट, तिची आई घरात काम करत होती आणि ती समोर अंगणात खेळत होती. तिची आजी येता जाता तिच्याकडे लक्ष ठेऊन होती. खेळता खेळता ताईंनी सापाचं पिल्लू हातात पकडलं (अर्थात तिच्यामानाने ते मोठचं होत) आणि हात हलवून हलवून सगळ्यांना दाखवत सुटली 'मी बघ काय सॉलीड पकडलं'. तिच्या आई आजीची बोबडी वळायची पाळी आली. शेवटी तिच्या काकाने 'आपण अजुन गंमत करु' अस म्हणत म्हणत तिच्या हातातला साप हळुच एका बाटलीत भरला आणि लांबवर शेतात नेऊन सोडला.

सर्पमित्र, किंवा साप शेतकर्‍याचा मित्र वगैरे जाण आता आली.

माझ्या आजोळी आणि मालवणला देखील, दिसला साप कि मारा, असेच असायचे.
कोकणात, गडग्यात (दगडाचे कुंपण) सापाची शेपटी दिसायची, मग कुणीतरी काका ती शेपटी ओढून त्याला
गोफणीप्रमाणे फिरवायचे आणि जमिनीवर आपटायचे, खेळ खल्लास.

आजोळी, शेतात साप दिसला कि लोक काठ्या घेऊन धावलेच. मग त्याला मारण्यासाठी एक छोट्या त्रिशूळासारखे हत्यार असायचे (त्याला बर्चा म्हणतात ) त्याने सापाची मान धरायची.
एवढे सगळे करुन झाल्यावर, त्याच्यावर आवर्जून "अग्निसंस्कार" करायचे.
कसलं लाबंड जनावर न्हव का त्ये... म्हणत गापगप्पा पण रंगायच्या

भातलागवडीची जपानी पद्धत आहे. तिथे त्याला सायोटामा (का असेच काहीतरी) नाव आहे. या पद्धतीने
रोपांची वाढ जोमदार होते >>> हो तेव्हाच विचारायचा होता तो प्रश्ण. राहुन गेलेला. आजच्या जागूच्या पोस्टने परत आठवले Happy

आजच पावसाने बरसावे. धुळीने माखलेल्या झाडांना न्हाऊन काढावे. Happy

तापलेले रस्ते पाणी वाहून शांत करावेत.

पाना पानातून फुले उमलू दे.

फुलांनाही त्या चिंब भिजू दे.

हा जो पहिला ताण दिला जातो ना त्याने रोपाची वाढ जोमदार होते. आणि धान्यही जास्त मिळते. एकंदरच गवत जातीची खासियत आहे ती. जरा उपटले तर आणखी जोमाने वाढते.
जंगलात किंवा तळ्याकाठी कधी कधी आपोआप उगवलेली भाताची रोपे दिसतात. पण ती उंचीला कमी असतात
आणि त्यात दाणेही कमी दिसतात.

जंगलात किंवा तळ्याकाठी कधी कधी आपोआप उगवलेली भाताची रोपे दिसतात. >> हेच ऋषीचे भात ना दिनेश? का ते वेगळे असते?

दिनेशदा Lol

आमच्याकडेही साप मारण्याचे हत्यार ठेवतात पण जर तो साप घरात आला आणि हलत नसेल वगैरे तर मारतात अन्यथा बाहेर असेल तर जाऊ देतात.

मागच्या पानावरच्या गोगलगायी आणि गुंफा बघून हे लक्षात आले का, कि ही दोन्ही चुनखडी म्हणजेच चुन्याची रुपे आहेत.
मानवाला चुना आदीम काळापासून माहीत आहे. चुनखडीचे खडक किंवा शिंपले यापासून तो मिळवतात.
मुंबईच्या चुनाभट्टीला एकेकाळी खरेच चुन्याच्या भट्ट्या होत्या. शिवडी बंदरातून, शंख शिंपले भरलेली
जहाजे तिथपर्यंत येत असत (आता तो मार्ग नाही राहिला) पानाला चुना लावून खाण्याची परंपरा जुनी आहे
तसेच औषधोपचार आणि पाणी शुद्ध करायलाही चुना वापरत असत. पण बांधकाम करताना दोन दगडांच्या
मधे मात्र चुना वापरायची पद्धत नव्हती. ती बहुदा गडकिल्ले बांधताना झाली. म्हणून अनेक गडांवर चुन्याच्या
घाणी दिसतात.
देवळे वगैरे बांधताना, दगड नीट तासून त्याला असा काही आकार दिला जात असे कि तो शेजारच्या दगडात
अगदी चपखल बसायचा. अशी सांधेजोड, बघणार्‍याच्या लक्षातही येत नाही. वेरुळ प्रमाणे, सर्वच देवालये काही
अखंड पाषाणातून कोरलेली नाहीत.

पण चुन्याचा वापर खुप होत असे तो लेप देण्यासाठी. रंगसफेदी करणे हा शब्दप्रयोग तर आपण आजही करतो.
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळावर वर्षानुवर्षे असा थर दिल्याने, त्यावरचे कोरीवकाम पार नजरेआड झाले होते. इजिप्तमधल्या पिरॅमिडच्या मोठमोठ्या शिळा, अशाच रचल्या आहेत, त्या बांधकामात चुना वापरलेला
नाही, पण पुर्वी सर्व पिरॅमिडवर चुन्याचा लेप मात्र होता. काळाच्या ओघात त्यातला थोडासाच भाग उरलाय.

इथिओपियात एक पादचारी पूल अजूनही वापरात आहे. तो बांधण्यासाठी मात्र अंडी आणि मध वापरले होते.
अनेक शतके त्यांच्या यात्रा त्या पूलावरुन जात आहेत.

<<<चल आपण करू आता शेती. पण पुढच्या वर्षी. डोळा मारा>>>> शोभा, शेतजमिन खरेदी केलेय की काय कुठे ? Uhoh
जागू, छान लिहिलंस. मन कितीतरी वर्षे मागे जाते.
जिप्सी, मस्त फोटो !
दिनेशदा, Nature Sound 17 ही माझ्या ऑफीसमधे मी रोज शांत, हळू आवाजात ऐकताना खूप रम्य वाटते.
त्याबद्द्ल तुमचे धन्यवाद!

आजोळी, शेतात साप दिसला कि लोक काठ्या घेऊन धावलेच. मग त्याला मारण्यासाठी एक छोट्या त्रिशूळासारखे हत्यार असायचे (त्याला बर्चा म्हणतात ) त्याने सापाची मान धरायची.
एवढे सगळे करुन झाल्यावर, त्याच्यावर आवर्जून "अग्निसंस्कार" करायचे.
कसलं लाबंड जनावर न्हव का त्ये... म्हणत गापगप्पा पण रंगायच्या>>>>>>>दिनेशदा, अगदी बरोबर. Happy

आजोळी, शेतात साप दिसला कि लोक काठ्या घेऊन धावलेच. मग त्याला मारण्यासाठी एक छोट्या त्रिशूळासारखे हत्यार असायचे (त्याला बर्चा म्हणतात ) त्याने सापाची मान धरायची.
एवढे सगळे करुन झाल्यावर, त्याच्यावर आवर्जून "अग्निसंस्कार" करायचे.
कसलं लाबंड जनावर न्हव का त्ये... म्हणत गापगप्पा पण रंगायच्या
-- दा कोकणात हे असेच असते. रत्नागिरीत त्या त्रिशूळाला गच्याळ म्हणतात तेच गच्याळ नदीत रात्रीच्यावेळी मासेमारी करायलाही वापरतात.

जागुताई - लेख प्रचि मस्तच गावची आठवण आली Happy
शेतात नांगरणीच्या वेळी रिपरिप पावसात खाल्लेले सुक्या बोंबलाची चट्णी,भाकरी,कैरीची फोड आणि तो हवाहवासा मातीचा सुगंध आठवला.

माधव -आजचे सांगा पाहू माहीत नाही Happy पण प्रचि मस्त आहे.

माधव, आजच्या सांगा पाहूचे उत्तर 'भीमाची वेल' असे आहे ना?

मानुषी.. मत्स्यनृत्य!! Rofl

जिप्सी.............काय चाल्लंय काय?

हापिसात ओल्या कपड्यांवर बसावं लागतं.......:फिदी:

आजोळी, शेतात साप दिसला कि लोक काठ्या घेऊन धावलेच. मग त्याला मारण्यासाठी एक छोट्या त्रिशूळासारखे हत्यार असायचे (त्याला बर्चा म्हणतात ) त्याने सापाची मान धरायची.
एवढे सगळे करुन झाल्यावर, त्याच्यावर आवर्जून "अग्निसंस्कार" करायचे.
कसलं लाबंड जनावर न्हव का त्ये... म्हणत गापगप्पा पण रंगायच्या>>>>>>>>>>:हाहा:

गच्याळ! Happy

जागूले, फोटू भारीयेत... इकडं आम्ही पण पावसाची वाट बघतोय.

पाउस कोसळत असताना हातात चहाचा कप पाहिजे, बाजुला गरमागरम खेकडाभज्यांची डिश पाहिजे आणि त्याच्या बाजुला मनातली सोबत पाहिजे.>>> साधना... हे मात्र अगदी मनातलं बोललीस बाई!

सगळ्या कॉमेंट्स वाचून धमाल करमणूक होतीये.

प्राणीचर्चा छान. मांजरीच्या पिल्लांची नावं मस्त आहेत. जागू, पांढरे फूल मस्त. इकडेही पाऊस सुरु झालाय. खरं तर एप्रिलमध्ये पडतो पण एप्रिल कोरडा गेला. मी वाट बघून नेहमीच्या भाज्या इ. लावल्या आणि पाऊस सुरु झाला ते बरं झालं.

धाकटी बरीच फळे खाते. आंबा, सफरचन्द, केळं. कलिंगड तर फार आवडीचे.
ही मोठी, लहानपणीचे उद्योग-
canu.jpg

आला का पाऊस ही सगळी चर्चा वाचून.... Happy

जागु, गवतफुलांचे फोटो पाहुन मस्त वाटलं....

महेश. तो अल्बम पिकासावर पब्लिक आहे...लिंकवर जाऊन क्लिक केलं तरी साईज छोटी दिसते का तुम्हाला? बघते आणखी काय चेंज कराय्ला हवं ते....

माधव ते विषवल्ली आहे का ?

इनमिनतीन आमच्याकडे मजूर मेणकापडाचे फक्त डोक्याच्या भागाला त्रिकोणी बांधून घ्यायचे व पावसात शेतात उतरायचे. अगदीच काही नसेल तर सागाचा पाला एकावर एक काडीने विणून त्याची टोपी करायचे.

आमचा डॅनी आणला त्यानंतर थोड्या दिवसांनी बाळसे धरलेला.

आणि हा आत्ताचा.

हा फळे फुले नाही खात. चिकन भात आणि दुध पोहे, दुध बटर, दुध चपाती असे खातो.

कस्ली गोड दिस्तिये........... आणि मस्त पोझ दिलीये फोटो साठी!!>>+१
डॅनी मस्त रुबाबदार दिसतो आहे.
जागु, माधव, जिप्सी मस्त फोटो आहेत.
शांकली भॉक नाव आवडले. Happy

लोला..कसली गोड दिसतीये..लहान मुलांना माती उकरताना जशी मजा येते ,नेमके तसेच हाव दिस्तायेत हिच्या डोळ्यात.. Happy
जागू... वॉव.. डॉबरमन... ?? टॉल अँड हँडसम..देखणाये फा>>र!!!!
ओह!! श्याम ची आई या पुस्तकात इरले शब्द वाचला होता.. असं दिसतं तर प्रत्यक्षात!!!

इनमीन...........इरलं मस्तय.
जागू डॅनी कसला हँडसम आहे..आणि लोला तुझा थोरली ग्वाड है. लैच उद्योगी दिस्तिया!

किती भरभरून बोलताय सगळे. दरवेळी येते तर बर्‍याच पोस्टी असतात. सगळ्याच वाचून होत नाहीत तरी बर्‍यापैकी वाचते पण तरीही वर्गाच्या मागेच आहे. आता एक्स्ट्रॉ तास लावून अभ्यास करायला हवा. Happy

सुप्रभात.

लोला तुझ्या धाकटीला आमच्या डॅनीने पाहील तर प्रेमात पडेल इतकी गोड आहे. प्रेमात कसला वेडाच होईल. आधीच बाहेरची गावठी कुत्री पाहून पाघळतो नुसता Lol
अग तो चिकन खातो. भाजी, मासे नाही खात. काल सुकी मच्छी निवडून ठेवली होती आजच्या डब्यासाठी ती त्याने आज सकाळी घरातली सुक्या माश्यांची पिशवीच पळवली.

मानुषी तुझ पात्र पण छान आहे.

Pages