निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@लोला,जागु,मानुषी ...... तुम्हाला काय सांगू आमचा दुष्यंत!! आता परवाचीच गोष्ट.... Lol ( संदर्भः पु लंच पाळीव प्राणी )

मानुषीचा लुई, भारी प्रेमळ दिसतोय !

जागूचा, डॅनी प्रेमळ नाही. आमच्यावर भुंकला होता तो (आम्ही पण चिडवले होते त्याला )

माधवने, उत्तर दिले का. विषवल्ली नाही, भीमाची वेल असू शकेल, पण आपल्याकडे ती दिवाळीच्या सुमारास
फुलते.

जागूचा, डॅनी प्रेमळ नाही. आमच्यावर भुंकला होता तो Lol

दिनेशदा तो गावठी कुत्र्यांवर प्रेम करतो पाहुण्यांवर नाही. Lol

शेतीकरताना पावसापासुन वाचण्यासाठी वापरावयाचे हे इरले आता दुर्मीळ होत चाललेय.>>>>>>>>>ईनमीन तीन, खूप खूप खूप धन्यवाद. मला परवाच या इरल्याची आठवण झाली होती. आणी आज तुम्ही फोटो डकवलात. (बघ जागू, मी म्हटल ना................. Wink
शोभा, शेतजमिन खरेदी केलेय की काय कुठे ?>>>>>>>>>>तूच मनावर घे आता.
सर्वच प्राणी, फुले, निसर्ग मस्तच. Happy

श्रीकांत, पु.ल डोळ्यासमोर उभे राहिले. Lol

जागूचा, डॅनी प्रेमळ नाही. आमच्यावर भुंकला होता तो हाहा>>>>>>>>> Lol

दिनेशदा तो गावठी कुत्र्यांवर प्रेम करतो पाहुण्यांवर नाही.>>>>>>>>>>>> Lol

@लोला,जागु,मानुषी ...... तुम्हाला काय सांगू आमचा दुष्यंत!! आता परवाचीच गोष्ट.... ( संदर्भः पु लंच पाळीव प्राणी )
>>>>>>>>> श्रीकांत .कळतात.......कळतात बरं हे टोमणे!(तीच ती गालातल्या गालात हसणारी बाहुली)

पहिल्यांदाच घरात आलेल्या माणसाशी प्रेमाने वागणा-याला कुत्रा म्हणत नाही तर मांजर म्हणतात. कुत्रे माणसाची योग्य ती तपासणी करुनच मग त्याच्याशी प्रेमाने की कसे वागायचे ते ठरवतात, त्यांचे इमान फक्त मालकाशी.. डॅनी खाल्ल्या अन्नाला जागणारच...

मांजरी ज्याच्या हातात खायची वस्तु दिसेल त्याच्या अंगाला जाऊन अंग घासायला सुरवात करतात....

@लोला,जागु,मानुषी>>कळतात.......कळतात बरं हे टोमणे!(तीच ती गालातल्या गालात हसणारी बाहुली)>>>
थोडीशी थट्टा केली, पण खरच; मी जरी कुत्रा पाळला नसला तरी अगदी चकित करतील असे कुत्र्यांबद्दलचे अनुभव घेतले आहेत. मी बॅचलर असतांना नवी बाईक घेण्यासाठी पुण्याला गेलो तेव्हा माझ्या एका आत्याच्या घरी गेलो तिच्याकडे भला मोठा अल्सेशियन होता त्याची व माझी चांगली गट्टी जमली नंतर मी जवळपास पाच एक वर्षांनी माझ्या नवपरिणीत सौ. बरोबर आत्या कडे गेलो दिसल्या बरोबर त्याला हाक मारली तर माझ्यावर भुंकण्या ऐवजी त्यान मला वास घेउन पाच वर्षांनी सुध्दा चक्क ओळखल अन शेपूट हलवू लागला. मी लाड करावे म्हणून माझ्या अंगावर उड्या काय मारल्या. सौ मात्र घाबरून अजिबात जवळ गेली नाही.
दुसरा अनुभव सौ च्या आत्याकडचा. अंबरनाथ ला आम्ही त्यांच्या घरी एक रात्र राहिलो. आत्यांनी सांगितल आमच्या बाजीरावला (जर्मन शेफर्ड ) घरी पाहुणे आलेले फार आवडतात. हे ' आमचा दुष्यंत...' च्या चालीवरच असावे अस मला वाटल.पण दुसर्‍या दिवशी आम्ही संध्याकाळी जायला निघालो तेव्हा तो अचानक जोरजोराने आमच्यावर भुंकु लागला. याच काय बिनसल आता? असा मी विचार करत होतो तर आत्या म्हणाल्या की अहो तुम्ही जायला निघालात ते आवडल नाहीये त्याला. त्याच्याशी थोड बोला अन मग निघा. मग मी पुन्हा येइन तुझ्याशी खेळायला वगैरे टाईपच बोललो अन खरच तो शांत झाला नंतर आम्ही निघालो.

शशांक तुम्हाला भेंडीचे झाड पहायचे होते ना, हे बघा भेंड्च्या झाडाला लागलेले फुल.

गळलेल्या फुलाच्या जागी फळ धरत आहे.

जाउ द्या श्रीकांत.......(काय आधीच टोमणा मारलेला आहे{दिवे घ्यालच}).........पण इतका आवडीचा विषय काढलात....एक सेपरेट धागाच काढायला लागेल.
जागू भेंडीचं फूल मस्त आहे. आईकडच्या बागेत हे दृश्य नेहेमीचंच!

वर्षूला पण पाळीव प्राण्यांसाठी वेगळा धागा हवा आहे.
(मग ती "तिकडच्या" खाण्यायोग्य प्राण्यांबद्दल पण वेगळा धागा काढणार आहे.)

कालच्या सांगा पाहूचे उत्तर मला पण हवे आहे. कमळांच्या तळ्याजवळ जे मंडपासारखे बांधकाम आहे त्याच्यावर सोडली होती ही वेल. विषवल्ली नाहीये ती जागू.

बंडोपंत कुठे राहतात ह्या प्रज्ञा म्हात्रे ?

मग ती "तिकडच्या" खाण्यायोग्य प्राण्यांबद्दल पण वेगळा धागा काढणार आहे Lol खाऊ गल्ली पेक्षा जबरदस्त धागा.

माधव मग शोध काढायला हवा नावाचा.

<<<लोला,जागु,मानुषी ...... तुम्हाला काय सांगू आमचा दुष्यंत!! आता परवाचीच गोष्ट.... हाहा ( संदर्भः पु लंच पाळीव प्राणी )>>>> श्रीकांत Proud

जिप्सी ट्रम्पेट फ्लॉवर या नावाची अनेक फुले आहेत. त्या आकारात अनेक फुले असतात आणि बहुतेकांना तेच नाव असते. त्याचे मराठी किंवा शास्त्रीय नाव काय आहे?

केवढे मागे पडलो होतो मी! आज झरझर अधाशीपणे वाचून काढले.

भाताची रोपे एकीकडून दुसरीकडे का परत पेरतात हा प्रश्न मलाही पडला होता त्याचे आता योग्य ते उत्तर मिळाले.

तो 'इरली' चा फोटो सुरेख आहे. खरे आहे अशा वस्तू आता बघायला मिळत नाही. आपल्याकडे घोंगडे नावाचे पोत्यापासून तयार केलेले रेनकोट असेच असते.

सर्व निसर्गप्रेमींना सुदुपार, नमस्कार !

जुने प्रतिसाद वाचायलाच (जास्त आवडतं) इतका वेळ जातो,वेळ कमी पडतो,त्यामुळे इथे असतो पण कधी कधी प्रतिसाद देणं राहुन जातं,सगळ्यांनी समजुन घ्याल हि अपेक्षा.

पाण्याने भरली की आवण काढणे म्हणजे रोपं काढून त्यांच्या गुंड्या म्हणजे जुड्या बांधायच्या. त्या पाण्यावर तरंगायच्या. मग त्या दुसर्‍या शेतात नेउन लावायच्या.>>> हे नक्की कशासाठी करतात? रोप जेथे उगवते तेथेच का राहु देत नाहित?
नेमका असाच प्रश्न मिरची,कांदा लागवड करताना पडायचा, कि याची रोपी वाफ्यात (ओपीत) तयार करुन घ्यायची,थोडी वाढली कि मग ती उपटुन २ ची जुडी करुन शेतात काही अंतरानी लावायची.वाफ्यात गर्दीमुळे ती नीट वाढणार नाहीत

खोडातून येणारे फूल कलाबाशचे असते. मागे जिप्स्या बरोबर गेलो होतो त्यावेळी झाड दाखवले होते.
पण माधवच्या फोटोतले फुल मोठे दिसतेय.

साधना,

आजच वेबदुनिया मधे वाचले चौकूळ ला काही नवीन गुहा सापडल्यात. काही माहिती आहे का ?

आजच वेबदुनिया मधे वाचले चौकूळ ला काही नवीन गुहा सापडल्यात. काही माहिती आहे का ?

नो, घरी विचारायला पाहिजे.

मला तर तो सगळा भाग खुप पुरातन वाटतो. आंबोलीच्या हिरण्यकेशी मंदिराला लागुन असलेल्या पाणी येणा-या गुहेत १०-१५ वर्षांपुर्वी काही धाडसी तरुण गेले होते. धाडसी अशासाठी की अशा गुहेत जाणे धोकादायक असते, सलग चालता येईल इतकी उंची असेलच असे नाही, पुरेसा ऑक्सिजन/हवा नसते, सरपटणारे प्राणि भेटु शकतात इ.इ. तर ही मंडळी इतर सरपटणा-या प्राण्यांना मागे टाकत स्वतः सरपटत आत जवळजवळ १-२ किमी गेली. सोबत बॅट-या, ऑस्किजन मास्क वगैरे घेऊन गेले होते. एवढे आत गेल्यावर त्यांना तिथे चक्क एक जुनाट कारंजे सापडले. जाण्याचा रस्ता जरी अरुंद असला तरी जिथे कारंजे होते तिथे भरपुर मोकळी जागाही होती. हिरण्यकेशी नदीचा उगमही तिथेच होता. हे सगळे मी तेव्हा पेपरात वाचलेले आणि गावी ऐकलेले. यावर नेटवर कधी काही दिसले नाही.

आता त्या गुहेत कोणी जात नाही पण उजवीकडच्या गुहेत तिथे येणारी संन्यासी बाबा राहतात अधुनमधुन.

माधव, हा वेल मी पाहिलाय तिथे. आम्ही बराच वेळ तिथे थांबलेलो. कमळासारखे फुल येणारे झाडही तिथेच आहे.

शांकली, भीमाची वेल नक्कीच नाही. दिनेशदा किती वर्षे शोधताहेत ती वेल. ती राणीबागेत आहे आणि त्यांना माहित नाही असे होणारच नाही.

मला तर तो सगळा भाग खुप पुरातन वाटतो. आंबोलीच्या हिरण्यकेशी मंदिराला लागुन असलेल्या पाणी येणा-या गुहेत १०-१५ वर्षांपुर्वी काही धाडसी तरुण गेले होते. ही मंडळी इतर सरपटणा-या प्राण्यांना मागे टाकत स्वतः सरपटत आत जवळजवळ १-२ किमी गेली. >>> जबरदस्त आहे , साधनाताई ती गुहा निर्सगर्निमीत आहे का?

Pages