निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऐ होळीत फक्त माझ्या तोंडावर आणी पायावरच रंग लावायचा बर्का!!.. माझ्या शुभ्र पंखांना रंग लावलेला मला अजिबात खपणार न्हाय्..आधीच सांगून ठेवते
Happy

छे छे.. माझ्यावर तर कोणताही रंग लावलेला मला आवडणार नाही.. Angry

ऐ तायांनो,अस्काय करता??.. अगं रंग खेळण्यात कित्ती कित्ती मज्जा असते.. पाहा तरी एकदा!!!

वा वर्षू खुपच सुंदर पक्षी आहेत ग.

तू टाकलेली शेवंती माझ्याकडे दोन वर्षापुर्वी अशीच फुलली होती. मागील वर्षी जरा कमी आली.

माधव, तो डिंकाचा फोटो आहे???????/ मला वाटले जिप्स्याचा हरणटोळ तोंड उघडुन भक्ष्याची वाट पाहतोय.>>>>>>>> Lol Lol

साधना, कबुतरांनी फारच वैताग आणला तेंव्हा मी मागे मांजरांच्या धडपडण्यावर जरा गुगललं होतं. मला असं वाचायला मिळालं, की एक - दोन मजले उंचीवरून मांजर पडलं, तर काही होत नाही. साधारण चौथ्या मजल्यापर्यंत उंचीवरून पडलं तर एखादं हाड मोडायची शक्यता आहे, पण मांजर जगू शकतं. त्यापेक्षा उंचावरून पडलं तर बहुधा मरतं. इथे कोणी उंच बिल्डिंगमध्ये मांजर पाळल्याचा अनुभव असणारं आहे का?

शांकली, पिलांचं प्रचि इथे पण टाकणार का? परीच्या छत्रीचे दांडे मला कार्ल्याला बघायला मिळाले.

त्या इन्श्युलिन प्लांटविषयी इथे मागे बरीच चर्चा झाली होती. त्याचा नक्की उपयोग होतो का? माझ्याकडे हे झाड आहे, पण त्याने अपाय होत नाही अशी खात्री न झाल्याने मी अजून ते डायबेटिसवाल्यांना खायला देत नाहीये.

वर्षूतै, शेवंती काय सुरेख फुललीय!

वर्षू, मस्त आहे शेवंती !!
क्रौंच पक्षी म्हणजे तोच ना, ज्याला दिलेल्या शापातून पहिले काव्य निर्माण झाले तो ?
खरं तर या प्रजातीच्या एवढ्या उपजाती आहेत, कि आपण सरसकट सगळ्यांना बगळे म्हणून टाकतो.

आमच्याकडच्या तपकिरी रंगाचा एक बगळा, चक्क लहान बाळासारखा टँहा टँहा असा आवाज काढतो. तो स्टोर्क.
इंग्रज समाजात, तो लहान बाळांना घेऊन येतो, अशी लहान मूलांची समजूत करुन दिलेली असते.
हा पक्षी उडताना ओरडतो हे विशेष. ज्याला हा आवाज माहित नाही, त्याला हे लहान बाळाचे रडणेच वाटते.

हो, त्याला गोल्डन फिसंट असे नाव आहे. बिचारा, अंग एवढे रंगीबेरंगी असुनही किती कावल्यासारखा दिसतोय, त्यात ते डोक्यावरचं सोनेरी टोपलं त्याला अजुनच वैतागल्याचे भाव आणायला मदत करतं..

गौरी, मांजरांबद्दल असे असेलही. माझे घर पहिल्या मजल्यावर आहे आणि मांजरे खुशाल इकडेतिकडे उड्या मारत असतात. मला तशी मांजरे अजिबात आवडत नाही पण केवळ मुलीचा एकटेपणा जावा म्हणुन मी हा बेबी बोका आणलाय. तिला मांजरे खुप आवडतात. तिला खरे तर कुत्रा पाहिजे होता पण कुत्र्याला एकटेपणा सोसत नाही. मुलगी कॉलेजात गेली तरी बेबी बोका निवांतपणे गच्चीत पडुन राहतो.

त्या इन्श्युलिन प्लांटविषयी इथे मागे बरीच चर्चा झाली होती. त्याचा नक्की उपयोग होतो का? माझ्याकडे हे झाड आहे, पण त्याने अपाय होत नाही अशी खात्री न झाल्याने मी अजून ते डायबेटिसवाल्यांना खायला देत नाहीये.

उप्योग होतो की नाही माहित नाही पण अपाय होण्याची शक्यता कमी वाटतेय. मी खाऊन बघितलेय पान, मस्त चिंचेसारखे आंबट लागते.

http://www.youtube.com/watch?v=v1XNxc3CwSM

आपल्याकडे जपानी पद्धतीची भातशेती, माझ्या आठवणी प्रमाणे लालबहादूर शास्त्री यांनी प्रचलित केली.
म्हणजे एकदा बी पेरून, ती रोपे उगवल्यावर उपटून परत लावण्याची पद्धत. त्यापुर्वी आपल्याकडे बहुदा
टोकण पद्धतीने भाताची शेती होत असावी, म्हणजे साधारण ६० वर्षेच हि पद्धत आपण वापरतोय.

जपानमधे (आणि अर्थातच फिलीपीन्स, थायलंड आदी देशांत) अशी पद्धत हजारो वर्षे वापरात आहे. ज्यावेळी
मनुष्याची एखादी क्रिया, जर हजारो वर्षे अव्याहत चालत आलेली असेल, तर निसर्गातले सर्वच घटक, त्या
पद्धतीशी जुळवून घेतात.

वरच्या क्लीपमधे एका भातशेतीचा वर्षभराचा आढावा घेतलेला आहे. त्या आढाव्यात बेडूक, कासव, कॅटफिश,
चतूर, टाचणी, फुलपाखरू, सतरा वर्षे कोषावस्थेत राहणारा सिकाडा, पाणविंचू, कोळी, पक्षी याबरोबरच
माणसांच्या क्रिया (पाट काढणे, शिताके मश्रुम्सची लागवड, फळलागवड) यांचा सुंदर आढावा घेतला आहे.
माझे अत्यंत आवडते सर अटेंबरो, यांचे निवेदन आहे.

आपल्याकडे पण भाताच्या खाचरात अशा अनेक गोष्टी टिपता येतील. तीन केसाळ पाकळ्यांचे एक फूल
भातकमळ नावाने ओलखले जाते, तर डेलिकसी मानला जाणारा, जिताडा हा मासा, भातशेतीतच सापडतो.
हा मासा नदीच्या पुराबरोबर येतो आणि भाताच्या खाचरातच वाढतो. तिथे तो तांदळाची गळून पडलेली फुले
खातो. नैसर्गिक शत्रू नसल्याने तो भराभर वाढतो.
सुंदर गुलाबी रंगाचा हा मासा पुर्वी बाजारात येतच नसे. हा मासा केवळ भेट देण्यासाठी किंवा खास पाहुण्यांसाठीच शिजवला जात असे.

वर्षू पक्षी छानच. पांढरा मोर मला वाटतं, गॉन विथ द विंड सिनेमात दाखवलाय.

माधव, ते सर्व पक्षी राणीच्या बागेत आहेत.

मांजरी आयूष्याचा ७५ टक्के वेळ आराम करण्यात, २० टक्के वेळ स्वत:ची साफसफाई करण्यात आणि
५ टक्के वेळ खाण्यात घालवतात !

इंग्रज समाजात, तो लहान बाळांना घेऊन येतो, अशी लहान मूलांची समजूत करुन दिलेली असते.>>> ओके तरीच डिस्नेच्या डंबो हत्तीच्या गोष्टीत त्यांचा थवा वेगवेगळ्या प्राण्यांच्या पिल्लांना घेउन आकाशातुन उडत येऊन सर्कशीत त्या पिलांचे आपापल्या आई प्राण्यांकडे वाटप करतो.

(नि. ग. ची पाने म्हणजे निसर्गाबद्दल विकीपेडीया होतोये :))

जागू, मी आत्ताच इथे विचारणार होते, की हा उतारा तू आजच इथे दिलास ना म्हणून. तर तुझी पोस्ट वाचली. त्यांचं सगळं ऋतुचक्र पुस्तकच खूप मस्त आहे.

माधव, तुम्ही कुठल्या फोटोंबद्दल म्हणताय? पिल्लांबद्दल की त्या पामच्या फळांबद्दल? पिल्लांचे फोटो टाकते इथे. आज सुट्टीवर आहे. त्यामुळे थोड्याचवेळात इथे देते.

मुख्य पानावर दुर्गा भागवतांचा ऋतुचक्र मधील उतारा टाकला आहे.>>> अरेरे हे आधीच सांगायचेस ना. अजुन कसा वाचला नव्हता म्हणुन मगाशीच वाचुन वर स्वतःला मी वेंधळी म्हणुन घेतले. Proud

पामबद्दल.

दिनेश. क्रौंचवधावरून वाल्मिकींना पहिला छंदबद्ध श्लोक स्फुरला असे म्हटले जाते. आणि बहुतेक तो शाप होता (नीटसे आठवत नाहीये आता)

माधव ,हे सर्व पक्षी फूचियान बर्ड पार्क (चायना.. और कहाँ) मधले आहेत. वर साधना ने नाव सांगितलच आहे.
आणी शेवंती पण तिथलीच.. आणू कशी तिकडून???

मागील आठवड्यात क्वांग शी प्रॉविन्स मधे गुईलिन ला नुकतीच भेट दिली.पावसाचा सीझन असल्याने तेथील 'लि' नदीकिनारी सध्या भात रोपलेला होता..
तिथली राईस फील्ड्स ,हातानेच रोपं लावलेली आहेत.

आणी .. पिकं तयार होऊन सोनेरी झाली ही राईस टेरेसेस.. (हा फोटो दोन वर्षापूर्वीचा आहे.इथली मेजॉरिटी असलेली 'मायनॉरिटी जमातीचे लोकं,' मियाओ'(यांचे केस निसर्गतः टाचेपर्यन्त किंवा अजून लांब असतात.. इतके लांब केस टूरिस्ट अ‍ॅट्रॅक्शन बनले आणी केस कापण्यावर सरकारने बंदी घातली. टूरिस्ट्स ना पाहून बायका भराभरा पागोटी उघडून केस मोकळे सोडून उभ्या राहतात्.मग टूरिस्ट ने त्यांच्याबरोबर फोटो काढला १० युआन मागतात..)

वर्षू, डोंगरांचे आकर पण किती मस्त ना !

प्रत्येक शेताचे आगळे सौंदर्य असते, चहाचे मळे, कोबीचे शेत, बटाट्याचे शेत, कांद्याचे शेत, गव्हाचे शेत, उसाचा फड, कोथिंबीरीचा वाफा, कापसाचे शेत, झेंडूचे शेत... सगळी डोळ्यासमोर आणून बघा.

मुंबईत तर फक्त माणसांचीच शेती होते, असे वाटत राहते.

-----------

जागू हा कदंबा, निव्वळ गाठी मारून करतात ना ? यात झिपरीची पाने छान दिसली असती.
माझी आई असे हार करते रोज, इतकी भराभर करते कि मला ती गाठ समजतच नाही. मी कधी केले हार, तर
सुईशिवाय नाही करता येत, मला.

नक्कीच माधव.. आपले पांड्वच ते, १२ वर्षात पृथ्वी प्रदक्षिणा काय अशक्य होती का ?
-

मारुती चितमपल्लींनी सिकाडाचा उल्लेख केला आहे. हा किडा तब्बल १७ वर्षे जमिनीखाली कोषावस्थेत असतो.
मग त्याला पंख फुटतात आणि नंतरच्या काही दिवसात तो आपल्या आवाजाने जंगल दणाणून सोडतो.
मग अंडी घालून मरुन जातो. मी हा आवाज कधीच ऐकला नाही, प्रत्यक्ष.

पण नेट्वर मात्र ऐकलाय.

टूरिस्ट्स ना पाहून बायका भराभरा पागोटी उघडून केस मोकळे सोडून उभ्या राहतात्.मग टूरिस्ट ने त्यांच्याबरोबर फोटो काढला १० युआन मागतात..)>>>>>>>>:स्मित:

मुंबईत तर फक्त माणसांचीच शेती होते, असे वाटत राहते.>>>>>>>>>:हाहा:

जागू, या प्रकारच्या गजर्‍याला कदंबा म्हणतात होय! मस्त झालाय कदंबा! मी पण करते असे गजरे, पण जुईचे नाही.... जुईचं देठ खूप छोटं असतं...

ही एक सुंदर वेल आहे. नाव---- 'माल कांगणी' ऊर्फ 'ज्योतिष्मती'. बोटॅनिकल नाव आहे Celastrus paniculata

हिचे अनेक औषधी उपयोग आहेत.आपल्या आयुर्वेदामधे प्रामुख्याने हिच्यापासून निघणारं तेल बुद्धीवर्धक म्हणून वापरलं जातं असा संदर्भ आहे.

औषधी उपयोग असले तरी ही वेल फार सुंदर आहे. हिरवीगार पानं आणि तिळाएवढ्या फुलांचे अनेक गुच्छ आपलं लक्ष वेधून घेतात.....

mangrove trip dt 13052012 021.jpg

आणि हे तिचं तिळाच्या एका दाण्याएवढं फूल........

mangrove trip dt 13052012 031.jpg

या केव्ह्ज पांडव लेणी आहेत कि नाही माहित नाही.. गाईड ने काही सांगितले नाही..
फक्त ली नदीच्या किनार्‍यावर दोन्ही बाजूला कित्येक मिलिअन्स वर्षां आधी अनेक प्रकारच्या उलथापालथी मुळे
समुद्राचे खारे पाणी,भूकंप,वारं ,पृथ्वी च्या पोटातल्या,सरफेस वरल्या असंख्य नद्यांवर परिणाम होऊन ७० मिलिअन वर्षांपूर्वी या चुनखडीच्या टेकड्या आणी जमीनीच्या भूगर्भात नॅचरल क्रिस्टल गुहा निर्माण झाल्यात. काही गुहा इतक्या मोठ्या आणी उंच आहेत कि आतमधे खूप चढ ,उतार आहेत्च पण एका गुहेत लिफ्त लावलीये जिचं दुसरं टोक जॅक न द बीन स्टॉक सारखं दिसतच नाही..
या क्रिस्टल गुहांमधे अतिशय भडक ,निऑन लाईट्स लावलेत जेणेकरून आपल्याला क्रिसटल फॉर्म मधे आपोआप तयार झालेले भव्य देखावे स्पष्टपणे दिसावेत..
या त्या नॅचरल क्रिस्टल गुहा.. ज्यात इतके भडक दिवे लावून ऑलमोस्ट खोट्या दिसाव्यात..

या गुहांमधे काढलेले फोटोंपैकी एखादा गंडतोच..

वर्षू, तू सांगतियेस त्या वर्णनाचे - क्रिस्टल केव्ह्जचे फोटो मागच्या एका कुठल्यातरी भागात मामीने टाकले होते. भडक गुलाबीसर रंग टाकला होता त्या क्रिस्टल फॉर्मेशन्सवर.

शांकली, वेल पण छान आणि नाव पण.

वर्षू, अशी एकही गुहा मी बघितली नाही अजून ( आता सगळे म्हणाल, याच्या तक्रारीच फार )
रंग सुंदर पण नुसत्या पांढर्‍या असत्या, तर फोटो नसते चांगले आले.
आपल्याकडे मेघालयात अशा गुहा सापडल्या आहेत आणि सर्वात मोठी गुहा व्हिएतनाम मधे सापडलीय.

या गुहा म्हणजे वटवाघळांचा स्वर्गच !

इथे एका गुहेत जायचे धाडस केले होते. आत लाईट / गाईड सगळे होते पण मलाच फार कोंदट वाटले, म्हणून शेवटपर्यंत गेलोच नाही.

Pages