Submitted by विनय भिडे on 3 May, 2012 - 00:55
ठिकाण/पत्ता:
हॉटेल सूरज व्हेज ट्रिट, राम मारुती रोड, बेडेकर हॉस्पिटलजवळ, लॅक्मे सलोनसमोर, ठाणे (पश्चिम)
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
रविवार, May 6, 2012 - 01:30 to 03:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामी रविवारी सकळी लोअर
मामी रविवारी सकळी लोअर परेलहुन ठाण्याला गटगसाठी आलीये हे कळल्यावर मलाच उगीच दमल्यासारखे वाटले. >>>> सिध्दीविनायकला पायी चालत जातात तसा काहीतरी विक्रम केल्यासारखं वाटतंय हे.
गटग एकदम भारी होते. अॅडमीन
गटग एकदम भारी होते. अॅडमीन म्हणजे गुगल आहेत अशी शंका आली. आयडी सांगताच (गुगल सर्च दिल्याप्रमाणे) त्या त्या आयडी चे सगळे कारनामे बहुदा त्यांच्या अॅड्मीन रिझल्ट (गुगल रिझल्ट) डोक्यात तरळतात.
शांतपणे, हलकेसे हसुन ते सर्वांशी शीतयुद्ध (आलेल्या प्रश्णांना परतवणे) करत होते बहुदा.
माझा र म डो येईपर्यंत मी जरा उद्योजक ग्रूपला शोभण्याचे काम उरकले. बहुदा मेधानेच येउन ललीला हळुच तो प्रश्ण विचारला. (हे प्रश्ण मला नीट लिहिता येत का नाहिये :() मग मी लगेच सत्वाची पाकीटे हातात देउन तिचे शंकानिरसन केले. बिचार्या मामीने सुह्रुद असल्याचा दाखला देत तीच्यासाठी आणलेली पाकिटे पण इतरांना घेउ दिली. (पुढील गटग ला तुला देते बरका)
सर्व माबो कन्यका (पुढील पिढीतल्या) आपापल्या आईला टेबलाशी सोडुन सर्व हॉटेलचा सर्व्हे करत फिरत होत्या व तमामा आई वर्गाने "काय करायचे ते करु देत, आता शमीकापण नाहिये त्यांची काळजी घ्यायला असे म्हणत गप्पांचा फड जमवला होता.)
नाशीकहुन आलेल्या प्राचीचे विषेश कौतुक (स्वगतः मेले ठाण्यातल्या ठाण्यात पोचायचे तर माझी एवढी धावपळ झाली. हिने कसे काय जमवले
असा विचार केला व मग जाउदे असतात काही काही जण ग्रेट असे म्हणुन सोडुन पण दिला :डोमा:)
बाकी लले, त्याला "अलेऽऽ गुंड्या..." असं कसं म्हणायचं - ही समस्या अजूनही मला सतावते आहेच >>>> नंतरचे सगळे सेन्सॉर ठेवलेस का?
अरे हो, एक विषेश टिप, तो जिप्सी खोया खोया का होता हे शोधारे कोणीतरी. मित्र आला असे सांगुन तो लवकर सटकला व त्या आधीपण बराच वेळ बाहेरच होता त्या फ्रेंडची वाट पहात.
आता लवकर फोटो येऊद्या लोक्स.
प्राचीची मिहिका, जी मला
प्राचीची मिहिका, जी मला पूनमसारखीच वाटली, तिने मला "तुमचा मायबोलीवरचा आयडी काय?" असं अत्यंत गोड शब्दात विचारून माझी विकेट काढली. तिच्या आईने तिला भरपूर गटगना नेलेलं आहे हे उघड आहे. यावरून ललीनं रूनीच्या भेटीत सांगितलेला कोणा ज्युनिअर मायबोलीकरणीचा किस्सा आठवला - "हे तुझं पहिलं गटग का?" असा प्रश्न एका ज्युमानं दुसर्या ज्युमाला विचारला होता.
मंजूडीची नीरजा व्यवस्थित आणि साSSSSSवकाश पावभाजी खात होती. तिने ती प्लेटभर पावभाजी संध्याकाळपर्यंत सहज पुरवून दाखवली असती. पण मंजूडीला असल्या जागतिक विक्रमांची पर्वा नसल्याने तिनं प्रकरण हातात घेतलं आणि दमदाटी करून नीरजाला भराभर पावभाजी खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी ठरला असं वाटतंय.
केश्वी मधून मधून नारळाच्या झाडावर चढण्याचा प्रयत्न करत होती असं खात्रीलायक सूत्रांकडून कळतं.
कट्ट्याचे मालक भेटले. त्यांनी त्यांची आणि माझी अनेक गटगंपासून चुकामुक होत आहे असं सांगितलं. पण हे काय मला माहित नव्हतं आणि तसं त्यांना सांगायचा प्रयत्न केला. पण त्यांना ते मान्य नव्हतं. आता थोरामोठ्यांसमोर जास्त बोलूने, म्हणून मूग गिळून गप्प बसले (गप्पा मारत बसले). यथावकाश शेवपुरी आणि पावभाजीही गि़ळली.
केश्वी मधून मधून नारळाच्या
केश्वी मधून मधून नारळाच्या झाडावर चढण्याचा प्रयत्न करत होती असं खात्रीलायक सूत्रांकडून कळतं. >>>
तिने मला "तुमचा मायबोलीवरचा
तिने मला "तुमचा मायबोलीवरचा आयडी काय?" असं अत्यंत गोड शब्दात विचारून माझी विकेट काढली>>>
ज्युनिअर मायबोलीकरणीचा किस्सा
ज्युनिअर मायबोलीकरणीचा किस्सा आठवला - "हे तुझं पहिलं गटग का?" असा प्रश्न एका ज्युमानं दुसर्या ज्युमाला विचारला होता.>>>> तो प्रश्न विचारण्याचा पराक्रम माझ्याच ज्युनियर ने केला होता, वत्सलाच्या गार्गीला विचारलेला तिने हा प्रश्न
आम्ही (आम्ही म्हणजे आम्ही समस्त कविन/सविन/विवन परिवार :P) मिसल हे गटग
लले - उम्मीद पे दुनिया कायम है. पण म्हणून इतका आशावाद?
ज्यु. से प्रश्न लई भारी
म्हणून मूग गिळून गप्प बसले
म्हणून मूग गिळून गप्प बसले >>> हा आंबे डाळीचा अपमान आहे.
नारळाच्या झाडावर चढण्याचा प्रयत्न >>> :d
कविन/सविन/विवन >>> हे काय नविन?
(No subject)
आणि केश्वी ज्या झाडावर
आणि केश्वी ज्या झाडावर चढाईच्या प्रयत्नात होती त्याचा कट्टा (पार हो, तो भिडेंचा कट्टा नाही) हलवा असा मंजुळ दम मंजूडीने प्राचीला दिला होता.
मी डुआय???
मी डुआय???
माझ्याकडुनही "चार" शब्द
माझ्याकडुनही "चार" शब्द
इंद्राने विक्रोळीहुन मला पिकअप केलं आणि आम्ही ठाण्यात लेफ्ट राईट, पहिली गल्ली, दुसरी गल्ली, बेडेकर हॉस्पिटल, लॅक्मे सलून असं करत करत फायनली सूरज व्हेज ट्रिटजवळ पोहचलो. हॉटेलात शिरण्याआधीच जोरात हसण्याचा आणि गप्पांचा आवाज आला त्यामुळे मायबोलीकरांना शोधायला जास्त त्रास झाला नाही.
आत शिरल्या शिरल्या नील्सचा आवाज, "जिप्स्या वैनीला आणलंय ना?". मी बॅगेतुन नीलच्या वैनीला बाहेर काढल्यावर "नमस्कार वैनी" म्हणत नीलने इतरांशी ओळख करून दिली.
बरेच मायबोलीकर आधीच हजर होते. यातील समीर, प्राची आणि चिंगीला पहिल्यांदाच भेटत होतो. अर्थात नेहमीप्रमाणेच यांनाही पहिल्यांदाच भेटतोय असं वाटत नव्हतं. अॅडमिनने आणलेल्या चॉकलेटांच्या कागदांच्या आत निरनिराळे संदेश लिहिलेले होते आणि ते जोरात वाचावं असं नीलने फर्मावल. माझ्या कागदाच्या आत "give your little love today" असं काहीतरी विचित्र लिहलं होतं.
त्यावर येथे "हॉटेलातल्या बिलाला" LOVE असं म्हणतात हे नीलने जाहिर केलं.
अर्थात love littleच द्यायचे असल्याने माझीही काहि हरकत नव्हती.
समीर अगदी जातीने सगळ्यांची चौकशी करत होते. त्यांच्याशी गप्पा मारल्या, नंतर प्राचीकडुनही लेहच्या टिप्स घेतल्या. (प्राची/सेनापती विपु आणि ईमेलमधुन लेहला जाईपर्यंत पिडणार आहे, तेंव्हा तयार रहा
). ज्युनियर माबोकरांचा दंगा चालु होताच. अधुनमधुन इंद्रा, अॅडमिनच्या कॅमेरातुनही फोटोसेशन चालु होते.
:-). थोड्यावेळाने अॅडमिन, नीलवेद आणि आनंदमैत्री यांच्यात कुठल्याशा गहन विषयावर चर्चा करायला, काहीवेळ तेथे उभा राहिलो पण काहिच टोटल न लागल्याने परत जागेवर आलो.
तेव्हढ्यात कुठुनतरी माझ्या हातावर येऊन बसलेल्या एका सुंदरशा फुलपाखराचे फोटोसेशन चालु झाले. मॅक्रो फोटोग्राफीच्या नावाखाली नीलने इंद्राचा कॅमेरा त्या फुलपाखराच्या इतक्या जवळ नेला कि आता त्या फुलपाखराला लेन्समध्येच घालतोय कि काय असं क्षणभर वाटल. अर्थात फुलपाखराला नीलची अतिजवळीक आवडली नाही म्हणुन ते उडुन गेलं.
माझे हात त्या फुलपाखरानेच बांधल्याने मला मात्र फोटो काढता आला नाही.
गप्पाटप्पा/खादाडी झाल्यावर एक एक माबोकर रजा घेऊ लागले. माझाही प्लान होता मित्रांबरोबर बाईकने खादाडीसाठी जायचा म्हणुन त्यांची वाट पहात होतो. दोन मित्र आले होते तिसर्याची वाट पहात होतो (मोनाली वाचतेयस ना? :फिदी:). हॉटेलात अॅडमिन आणि इतर महिलामंडळच होते. सगळ्यांची रजा घेऊनही पंधरा-वीस मिनिटे हॉटेलबाहेरच उभा होतो आणि मित्र आल्यावर निघुन गेलो.
)
(मामे, आईस्क्रीम खायचा प्लान झाल्यावर गुपचुप समस केला असता तर लगेच परत आलो असतो ना हॉटेलात. दिल चाहता है च्या "केक खाने के लिए हम कही भी जा सकते है" या डायलॉगच्या धर्तीवरच "आईस्क्रीम खाने को हमभी कही भी आ सकते है".
थोडक्यात काय तर त्या तास दिडतासात फुल्ल टु धम्माल केली.
थोड्यावेळाने अॅडमिन, नीलवेद
थोड्यावेळाने अॅडमिन, नीलवेद आणि आनंदयात्री यांच्यात >>> या चा मै करा
मंजुडी changes done!!!!
मंजुडी

changes done!!!!
सर्वांना भेटून मजा आली.
सर्वांना भेटून मजा आली. आंबेडाळ मस्तच होती. पन्हं पण चाललं असतं
आईस्क्रीम चुकलेल्यांसाठी: त्यासाठी शेवटपर्यंत रहावं लागतं
ही काही क्षणचित्रे:









सह्ही रे सह्ही जाम धमाल
सह्ही रे सह्ही
जाम धमाल केलिये तुम्ही लोकांनी
लली इन साडी... विश्वास नसता बसला.. पण आता अॅडमिन नी फोटोच दाखवले ... छान दिसताय हां ललिताजी
बाकी पण फोटो दाखवा की लोकहो....
बादवे, समीर यातले तुम्ही कोण?? की नाहिच्च आहात या फोटोंमधे
प्राची, कमाल आहे हां तुझी.. एव्हढी नाशिकहून गटगसाठी आलिस म्हणजे
जिप्स्या, फुलपाखरू तुझ्या हातावर येऊन बसलय... याचा अर्थ काय समजावा
लाजो... वॉश बेसीन नोटीस खाली
लाजो... वॉश बेसीन नोटीस खाली बसलेले चेक्स शर्ट म्हणजे आपले समीर भाउ.
व्वा मस्त फोटो मी चुकवलं हे
व्वा मस्त फोटो
मी चुकवलं हे धम्माल गटग
कुणीतरी फोटो धाडाल का कृपया.
@ समीर, तुम्ही थोडे बारिक झालात असं वाटतं.
@ लली, साडी भारी असूनही फोटोत का हे विचित्र एक्सप्रेशन्स?
आयडु... तुझी भेट होइल अशी आशा
आयडु... तुझी भेट होइल अशी आशा होती.
आल्या आल्या ईतरांना मी विचारले होते की आयडु येणार आहे का..
समीर, मस्त फोटो. आता
समीर, मस्त फोटो. आता केव्हाही इकडे आलास की गटगचं नक्की. एकदा वविच्या दरम्यान भारत भेट जमव.
रोहन, मी ते वॉश बेसीन खाली बसलेले असं वाचलं
पन्ह खरंच घेऊन यायला हवं होतं मी
मला वाटलं सगळे तिकडे मस्त हादडत असतील आणि पन्ह्याकडे कोण एवढं बघणार ! म्हणून फक्त आंबेडाळच घेऊन आले. ४ ते ५ बाटल्या पन्ह होईल एवढा गर करुन ठेवला होता. अजून पितेय ते गारेगार करुन किंवा पोळीशी लावून खातेय 
मी ते वॉश बेसीन खाली बसलेले
सेन्या, त्यापेक्षा असं लिहायचसं ना की दोन 'भारदस्त' व्यक्तीमत्वांच्या मधे अंग चोरुन बसल्येत ते समीर....

एक आठवडा मी ऑनलाईन आलो नाही
एक आठवडा मी ऑनलाईन आलो नाही आणि एका इव्हेंटला मुकलो. मी या हॉटेलपासून पायी पाच मिनीटांच्या अंतरावर राहतो. पुढच्यावेळी नक्की येईन
अश्वे... लाजो...
अश्वे... लाजो...
समीरने फोटो टाकले? मस्तच.
समीरने फोटो टाकले? मस्तच.
दुसर्या कुणी टाकले असते तर खैर नव्हती त्या व्यक्तिची.
इंद्राने फोटो शेअर केलेत पण
इंद्राने फोटो शेअर केलेत पण ते गुगल+ वर..
सेन्या, पाठव की मग मला पण....
सेन्या, पाठव की मग मला पण....
ते तोच पाठवु शकेल.. मी कसा?
ते तोच पाठवु शकेल.. मी कसा? तु आहेस ना तिथे? माझ्या सर्कल मधुन इंद्राला शोध आणि पकड त्याला..
ओह... ते गूगल+ वर आहेत का? मी
ओह... ते गूगल+ वर आहेत का? मी म्हटले असे काय.. जिप्स्याने पाठवलेले दिसताहेत आणि इंद्राने पाठवलेले का दिसत नाहीत? आमच्या ऑफिसच्या सर्वरला गूगल+ आवडत नाही.
<< जिप्स्या, फुलपाखरू तुझ्या
<< जिप्स्या, फुलपाखरू तुझ्या हातावर येऊन बसलय... याचा अर्थ काय समजावा >>
शिंपल, फुलपाखराला मॉडेलींग करायची ईच्छा आहे.
रैना, हीच पोस्ट पुणे गटगवर पण
रैना, हीच पोस्ट पुणे गटगवर पण कॉपी पेस्ट करावी लागेल तुला
जिप्स्याने पाठवलेले
जिप्स्याने पाठवलेले दिसताहेत
>>> मला ते दिसत नाही आहेत.. कुठे पाठवले अहेत?
Pages