समीर सरवटे यांना भेटण्यासाठी मुंबई गटग

Submitted by विनय भिडे on 3 May, 2012 - 00:55
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल सूरज व्हेज ट्रिट, राम मारुती रोड, बेडेकर हॉस्पिटलजवळ, लॅक्मे सलोनसमोर, ठाणे (पश्चिम)
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, May 6, 2012 - 01:30 to 03:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नी, हो! अ‍ॅक्चुअली! कपाळावर, हातात, गळ्यात, कानात.... फक्त नाकात नव्हतं काही!

खरंच तिने नवर्‍यावर फारच आशा लावल्या होत्यासं दिसतंय.>>> हे वाक्य म्हणजे, तिने सात नंबरच्या घोड्यावर फारच पैसे लावले होते असं दिसतंय, टाईप वाटतंय. Lol

वृत्तांत भाग २

हळू हळू बर्‍यापैकी गर्दी जमली. साधना, जरबेरा धावती भेट देऊन गेल्या. मेधाचे बाळ भारीच गोड आहे. त्याने मस्त मिरवून घेतले सगळ्यांच्या कडे. स्वातीचा मुलगा ' काय दंगा करताहेत ही ही मोठ्ठी माणसं!!!' अश्या नजरेने बघत होता आमच्याकडे. जुई आल्यावर मिहिका, नीरजा आणि जुई यांचा मस्त ग्रुप झाला. पा भा, र म डो, ओ उचा फडशा उडाला. जिप्सीने काही फोटो काढले. चिंगीने माबो शर्टस् हातात पडताच पळ काढला.
थोड्याच वेळाने खाऊपिऊ उरकले तसे एकेकजण वेगवेगळी कारणं देऊन निरोप घेऊ लागले. शेवटी फक्त मी, अमृता, मंजू, केश्विनी, ललिता, मामी आणि समीर उरलो. मग आम्ही जरावेळ नुसत्याच गप्पा मारल्या. समीर खरंच एकदम कुल आहेत. मस्त गप्पा मारल्या. अजय आणि समीर या दोघांचेही व्यक्तिमत्व फार प्रभावी आहे. दोघांनी आपली इतर कामं सांभाळून माबोचा व्यापही अगदी यशस्वीरित्या सांभाळला आहे. दोघांचेही अभिनंदन आणि अगदी मन:पुर्वक आभार. Happy

जरा गप्पा झाल्यावर आईस्क्रीम खायला जायचे ठरले. तिकडे जात असतानाच चेतन आला. त्याला बघितल्यावर समीर यांनी सुटकेचा श्वास टाकल्याचे माझ्या लक्षात आले. Proud

टेम्पटेशन मध्ये बराच गोंधळ घालून शेवटी प्रत्येकीने आपापली ऑर्डर दिली. तिथला एसी बंद होता, ललिताने दुसर्‍या एका दुकानाचे नाव घेऊन तिकडे आईस्क्रीम चांगले मिळते असे मोठ्या आवाजात म्हणताच, गल्ल्यावरच्या बाईने लगेच एसी चालू केला. Lol

मग आईस्क्रीम खाल्ल्यावर आधी समीरने आणि मग मी व चेतननी बाकीच्यांना बाय बाय केले.
बाकीच्या आंबेमहोत्सवला भेट द्यायला गेल्या. Happy

मस्त मजा आली. सगळ्यांना भेटून छान वाटले. मी जवळजवळ सगळ्यांशी आवर्जून बोलले. (कमीत कमी १ तरी वाक्य) पण तरीही गडबडीत काहींजणांशी नीट बोलता आले नाही. म्होरल्या वेळी नक्की. Happy

भारीच मजा केली पब्लिकने!

दोन्ही वृत्तांत वाचुन मजा आली!

प्राची, तु नाशिकरोडहुन ठाण्याला जाण्यासाठी दादरला का गेलीस?

प्राची, तु नाशिकरोडहुन ठाण्याला जाण्यासाठी दादरला का गेलीस?>>> मला देवळालीला थांबणारी गाडी हवी होती. शिवाय, अगदी ऐनवेळी ठरल्याने रिझर्वेशन्स नव्हती उपलब्ध. Happy

शिवाय, सर्वांना खायला मिळाले आणि तेदेखिल एकाच ठिकाणी. >>> Proud
अ‍ॅडमीन हे बरे नाही. मी गेल्यावर बरे तुम्ही आईस्क्रीम चे खुळ काढले. बहुदा संयुक्त आघाडी जास्त गरम झाली म्हणुन त्यांना डोके थंड करायला नेले का? Wink

अजय आणि समीर या दोघांचेही व्यक्तिमत्व फार प्रभावी आहे. दोघांनी आपली इतर कामं सांभाळून माबोचा व्यापही अगदी यशस्वीरित्या सांभाळला आहे. दोघांचेही अभिनंदन आणि अगदी मन:पुर्वक आभार.>>> + १०००

अजय आणि समीर या दोघांचेही व्यक्तिमत्व फार प्रभावी आहे. दोघांनी आपली इतर कामं सांभाळून माबोचा व्यापही अगदी यशस्वीरित्या सांभाळला आहे. दोघांचेही अभिनंदन आणि अगदी मन:पुर्वक आभार.>>> + १

लली इन साडी .... यु मिस्ड दॅट तोषा...

हाईला!!!! भारीच की रे जिप्स्या..... Happy

वरच्या सगळ्या तमाम वृत्तांतात माझ्यासकट सर्वांकडून नकळत अनुल्लेख झाला होता. ही आंबेडाळ केश्विने करून आणली होती. समीरने बाकी काहीही न खाता हीच फक्त खाल्ली Happy

नंतर अश्विनी रिक्षात मला म्हणाली, की ती २ बाटल्या भरून पन्हंही आणणार होती. मी चित्कारले - अगं, का नाही आणलंस मग... Lol

चॉकलेट, पावभाजी आणि मोसंबी ज्यूस आणि शेवटी आईसक्रीम हे सर्व पोटात ढकलल्यावरही त्या न मिळालेल्या पन्ह्यापोटी मी खरंच हळहळले Proud

मस्त वृतांत...........
मस्त......... कट्टा मिस केला..........
फोटोही सह्ही आलेत ...............(२) मस्त...

वर अजुन असच दिसतय...

19 मायबोलीकर जाणार आहेत.

जाउन आले अस बदलून दिसत का नाहिये...?

जाउन आले अस बदलून दिसत का नाहिये...? >>> Rofl नावनोंदणी करणार्‍यांपैकी काहीजण ऐनवेळी टांगारू होतात हे त्या codeला माहित असणार, मग नक्की संख्या तो कशी दर्शवणार Wink

सगळेच Lol
ते सस आपल्या मुक्कामी पोचलेही असतील तरी ह्या बाफ वर लोकं अजून फुल्ल फॉर्मात आहेत, गटगला न जाताही मजा येतेय ... (आयपीएल मॅच अ‍ॅक्चुअल ग्राउंडवर न जाता घरी बसून टिव्ही वर पाहिल्यासारखी ;))

अ‍ॅडमीन हे बरे नाही. मी गेल्यावर बरे तुम्ही आईस्क्रीम चे खुळ काढले. बहुदा संयुक्त आघाडी जास्त गरम झाली म्हणुन त्यांना डोके थंड करायला नेले का? >>>> Lol

आंबेडाळ लै भारी बनली होती हे खरंच. धन्यवाद केश्वी.

आता माझ्याकडुन २ शब्द.
समीर खरंच खूप शांत आहेत. मी गटगला आले होते की मंजुकडुन वविचे टीशर्ट न्यायला असा प्रश्न विचारुन त्यांनी मला खिंडीत पकडले.
मी अटेंड केलेले पहिलेच असंयुक्त गटग..सगळ्यांनाच पहिल्यांदा भेटत होते हे कळल्यावर आयडी ओळखा चा खेळ सुरु होणारच होता पण वाचले.. मग ललिताला खोपचीत सगळ्यांचे आयडी विचारुन घेतले आणि बाकीच्यांच्या मनोरंजनाचा विचका केला. Proud विनय, जिप्सी, मंजुडी, समीर यांचे फोटो बघितले असल्याने त्यांना ओळखता आले, सगळ्यात धक्का बसला तो सेनापती हा आयडी सांगितल्यावर.. मी इतके दिवस ड्युआयडी समजत होते. Uhoh Light 1
मेधा माझ्या घरापासुन जवळच अंतरावर राहते आणि आपण कधीतरी भाजी घ्यायला तिकडे आलो की नक्की भेटु असं ठरवुनही २-३ वर्ष झाली.. फायनली परवा भेटलो. मामी रविवारी सकळी लोअर परेलहुन ठाण्याला गटगसाठी आलीये हे कळल्यावर मलाच उगीच दमल्यासारखे वाटले. Wink प्राचीच्या इमेजबद्दल +१. ललीता साडीत छान दिसत होती. केश्विनीने मला तेवढ्यातल्या तेवढ्यात एक रेसिपी फुप्रोचे कोणते पाते वापरायचे यासकट समजाउन सांगितली .. मला जायचंय जायचंय म्हणुन १० मि उभ्या उभ्या गप्पा मारल्यावर फायनली हॉटेल मधुन बाहेर तर पडले पण पुढच्या वेळी बडीशेपसोबत बाकी खादाडी करण्याइतपत वेळ काढुन गटगला यायचं असं ठरवलंय.
बरीच वर्षे रोमात राहुन मायबोलीवर पडीक असल्याने ओळखीच्या वाटणार्‍या आयडींच्या मागचे चेहरे बघायला मजा आली. मायबोली रॉक्स! Happy

Pages