समीर सरवटे यांना भेटण्यासाठी मुंबई गटग

Submitted by विनय भिडे on 3 May, 2012 - 00:55
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल सूरज व्हेज ट्रिट, राम मारुती रोड, बेडेकर हॉस्पिटलजवळ, लॅक्मे सलोनसमोर, ठाणे (पश्चिम)
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, May 6, 2012 - 01:30 to 03:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोंडात टाकायला घेउन या रे काहितरी<<<
छान म्हणजे हाटेलाचा पत्ता देऊन फुटपाथवर गोल करून उभे रहायची परंपरा राखणार की काय Wink

समीर याना एक सुचना... हे ठाणेकरांचे गटग आहे.. घरुनच व्यवस्थीत खाऊन जाणे.. Proud
विनय आणी मंडळी... धमाल करा, जिप्स्याच्या फोटो सह वृत्तांत येउद्या.. तुम्हाला शुभेच्छा.. Happy

मंजूडी.. चील माडी.. इतरांसाठी नाही, ते वाक्य बागुलबुव्वा साठी होते... विनय आणी मागील वर्षीच्या ववी संयोजकाना त्यातील गम्मत माहिती आहे..:)

गटग झालंन् बरं का. येते / येतो म्हणूनही न येणार्‍यांचा णिषेद! Happy

अ‍ॅडमिन खरंच अतिशय शांत आहेत. Happy

Admin na bhetun anand zala. Purn vel thambu shakalo nahi. Ata photo ani vru yeu dya.

हो हो अमृता, जुई आणि चिंगीचं कौतुक.

पावभाजी एकदम डिमांडमध्ये होती. आणि ज्यांनी गटगकरता जास्त वेळ दिला, रविवार असूनही मुद्दाम गटगकरताच वेळ ठेवलेला (म्हणजे जे काय ना काय कारणं सांगून सटकले नाहीत) त्यांच्याकरता अ‍ॅडमिननी खास आयसक्रीमचा कार्यक्रम ठेवला होता. Proud

हो हो ! आम्ही नंतर आईस्क्रीम खाल्लं. समीरने दिलं Happy समीर, चेतन आणि प्राची गेल्यावर आम्ही आंबा महोत्सवात गेलो. समीर म्हणजे डोक्यावर बर्फाची लादी ठेवलेल्या व्यक्तींपैकी एक आहे Happy

अ‍ॅडमिनना भेटुन खरोखर आनंद झाला. Happy

अ‍ॅडमिन खरंच अतिशय शांत आहेत.>>>>+१. मितभाषी व्यक्तिमत्व Happy

त्यांच्याकरता अ‍ॅडमिननी खास आयसक्रीमचा कार्यक्रम ठेवला होता>>>>आयसक्रीम दिल्याबद्दल अ‍ॅडमिनचा आणि हे इथे लिहिल्याबद्दल मामी आनि केश्विनीचा जाहिर णिषेध Proud

म्हणजे जे काय ना काय कारणं सांगून सटकले नाहीत Happy

अ‍ॅडमिनना एक प्रश्न विचारणार होते. लोक जेव्हा 'अ‍ॅडमिन, इकडे लक्ष द्या, अमुकतमुक आयडी माला त्रास देतोय' असा विपु करतात तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया असते? त्यांचा शांत धीरगंभीर चेहरा पाहुन उत्तर मिळाले Happy

समीर शांत आहे?????????? ...

मायबोली अ‍ॅडमिन हा रोल करताना समीर शांत वाटतात. बाकीच्या रोल्समध्ये आम्ही कुठे पाहिलेय??? Proud

सांगणार नव्हते पण जाऊ द्या, सांगूनच टाकते.

ज्या सदस्या शेवटपर्यंत थांबल्या त्यांना आईस्क्रीम तर मिळालंच पण शिवाय त्यांना खास बोनस म्हणून आता सगळ्यांच्या संपर्कातून केलेल्या मेल्सही वाचायला मिळणार आहेत. Proud

तासाभरापूर्वी पोचले घरी.
मस्त मजा आली. सगळ्यांना भेटून छान वाटले.

सविस्तर वृत्तांत (बोल्ड (म्हणजे गडद, दुसरा काही अर्थ काढू नये :फिदी:) वाक्यांसहित) उद्या वाचायला मिळेल. तेव्हा या बाफवर लक्ष ठेवा. Happy

Pages